दाक्षिणात्य सिनेमा कसा वाटला.

Submitted by mrunali.samad on 9 March, 2023 - 06:23

या धाग्यात आपण तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी डब्ड/वीथ सबटायटल्स पाहिलेले सिनेमा, कसा वाटला,कुठे पाहिला याची चर्चा करू शकतो.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हे गाणेही परवापूर्वी कधीही न ऐकल्याने त्याला ऑस्कर घोषित झाल्यावर उत्सूकतेपोटी युटूबवर लावले. पण मला ते ऑस्करविजेते ग्रेट वाटले नाही
>>>
मलाही 'जय हो' च्या वेळी असेच वाटले होते. मग विचार केला की ऑस्कर निमित्ताने रहमानच्या इतर गाण्यांकडे अभारतीय लोकांचे लक्ष जाईल. आणि ते सर्वात जास्त महत्वाचे. तसेच 'नाटु नाटु'चे. एम एम किर्वाणी यांची इतर गाणी जास्त छान आहेत. होपफुली ती ही ऐकली जातील.

नाटू नाटू संबंधाने थोडे अवांतर त्या बद्दल क्षमस्व आहे

१९८७ मध्ये मी अ‍ॅड एजन्सीत कामाला लागले ज्यु. कॉपिरायटर. पहिले नारायण गुड्यातून लुना चालवत ज्युबिलि हिल्स चेकपोस्ट ला येत असे. तेव्हा अन्न पूर्णा स्टुडिओ वाला रोड नंबर २ बंजारा हिल्स हा सिंगल लेन रस्ता होता धूळ मिश्रित. व लूना बंद पडली तर हातात धरून चालत जावे लागे. आता तो रोड बघितला तर फरक कळेल. स्टुडिओ शेजारी प्रसाद लॅब व मग एल व्ही प्रसाद आय इन्स्टि. आली.

१९८८ मध्ये आम्ही बंजारा हिल्स रोड नंबर १२ ला घर घेतले. तिथून हपिसला जायचा प्रवास निम्म्याहूनही कमी झाला. आतल्या रस्त्याने अपोलो हॉस्पिटल ची हिल. एक लेक व पुढे फिल्म नगर आणि त्याच्या पुढे ज्युबिलि हिल्स व मग चेकपोस्ट. हपीस. हे ही मी लूनावर जात असे. तेव्हा एक वळन असे होते की मागे बघितले तर लेक. त्यातील बेट व त्या वरील तीन झाडे. इकडे हिली रस्ता मागे हिली रस्ता व आजू बाजूस मोठे बंगले.
तर तिथे लूना बंद पडावी व मागून चिरंजीवीची गाडी यावी व त्याने विचारावे काय झाले अशी एक फँटसी असे. असे कधी झाले नाही.

आमच्या कडे अपोलो हैद्राबादच्या जाहिरातींचे काम होते म्हणून सारखे ह्या भागात फिरावे लागे. कॉपी अप्रुवल अ‍ॅड अप्रुवल साठी. शोभना कामिनेनी ही प्रताप रेड्डी डॉ. ह्याची मोठी मुलगी. व अजून तीन मुली. त्यांची मुलगी मला वाट्ते उपासना. हे सर्व तेव्हा फार लहान होते.
त्या काळात आमचे गॉसिप म्हणजे बॉस हा रेड् डी - तो ह्या लोकांशी बोलणी करून येत असे व प्रताप रेड्डी कडे आठ लाखाचे घड्याळ आहे व्गैरे रंजक माहिती सांगे. तेव्हा आमचे पगार म्हणजे हजार बाराशे. व लंच टाइम मध्ये स्विस बँकेत अकाउंट कसे उघडत असतील अश्या शंका डिस्कस कराय चो. ( बोफोर्स घोटाळा बहुतेक तेव्हा चर्चेत होता. )

रस्त्यात कुठे कधी शूटिन्ग चालू असलेले दिसायचे. क्षण क्षणम ह्या राम गोपाल वर्माच्या सिनेमात पण आमच्या रोड नंबर १२ च्या सुरुवातीच्या भागात शूट केलेले दिसते.( श्रीदेवी/ वेंकी) दोघे क्रश होते.

ह्या सर्व क्लोज नेस मुळे नाटू नाटू वर प्रेम. ज्यु एन टीआर व फॅमिली तेव्हा रोड नं १३ वर मागच्या साइडला राहायचे. तिथे मिनि स्टर कॉल नी होती. रस्त्याला उतार इतका की गाडी घरातून निघाल्यावर न्युटरल मध्ये पण खाली बंजा रा हॉटेल परेन्त पोहोचत असे. हिली एरिआ यु नो.
आर आर आर सिनेमा कसाही असूदे पण त्यातील आदिलाबाद चे सुरुवातीचे चित्रण बरोबर आहे व कुमरम भीमूडू. एक कनेक्ट आहे. तिथे.
रामुडू भीमुडू मला वाट्ते एन टी आरचा जुना सिनेमा होता. तेलुगु देसम ची स्थापना एन टी अर चे दुसरे लग्न पुढे चंद्रबाबूचे पार्टी हाय जॅक करणे
हे अगदी रोजच्या न्युज मध्ये व प्रत्यक्ष घडताना बघितले.

स्पॉटिफाय वर एक तेलंगणा बीट्स प्ले लिस्ट आहे ती जरूर ऐका. तेलंगणा चा असा एक खास सांस्कृतिक वारसा आहे. तो कळेल.
नक्षल चळवळीतले लोक त्याम्ना अन्नालू म्हणत. त्या बरोबरीने डफ वाजवून क्रांतीची गाणी गाणा रे कलाकारही फेमस आहेत तिथे.

नाटु नाटू हे नाचो नाचोचे दाक्षिणात्य वर्जन आहे का? कधी पाहिले नाही हे. पण नाचो नाचो हिट आहे आमच्या घरी वा सोसायटीत. लहान मुलांना फार आवडते हे गाणे. मलाही पहिल्यांदा ओके ओके वाटलेले ऐकायला. पण नंतर मजा येऊ लागली. आजही आमच्या प्लेलिस्टमध्ये ते वाजले जाते. त्यावर नाचले जाते. ऑस्करपात्र आहे की नाही त्यात पडायचे नाही. पण जय हो पेक्षा कैक पटींनी चांगले आहे. ते फार बोअर आहे. कोणी फार रिपीट मोडवर ऐकतही नसेल.

नाटू ना टूच ओरिजिनल तेलुगु आहे ना. त्या पार्टीं मध्ये हे परदेशी गोरे लोक्स त्यांचे नृत्यप्रकार करत असतात ते आपल्याला कसे जमतील. जे आपल्या मातीतील आहे आपल्याला लहान पणापासून येते तेच झोकात करु असे राम चरण भीमुडु ला म्हणतो. प्लस सीजी वगैरे आहेच. तो पॅलेस जिथे पार्टी होते तो युक्रेन मध्ये आहे पण लोकेशन सु टेबल म्हणून तिथे केले म्हणे.

नाटु नाटु असो कि नाचो नाचो, ओरिजिनल हेच.
https://www.youtube.com/watch?v=NrI8yBxluuk
ढलत्या भारतीय कलाकृतीला ऑस्कर द्यायचा प्रघात असल्याने याला मिळाला नाही.

vikrithi ..मल्याळम(वीथ सबटायटल्स) नेटफ्लिक्स वर
एक मुकबधीर मनुष्य स्वतः च्या मुलीजवळ दवाखान्यात दोन रात्री जागल्यानंतर दमून ट्रेनमध्ये गाढ झोपतो..काढ सेल्फी,काढ फोटो कि टाक सोमीवर अशी सवय असणारा एक तरुण त्या झोपलेल्या अनोळखी माणसाचा फोटो काढून दारू पिऊन झिंगलेला म्हणून वायरल करतो..त्याच्या या क्रुतीमुळे त्या मनुष्य आणी कुटुंबाला काय काय झेलावे लागते..
चांगला आहे सिनेमा.

Nayattu (the hunt) मल्याळम (सबटायटल्स) नेटफ्लिक्स.
जातियवादाच्या सापळ्यात सापडलेल्या मनुष्याला निर्दोष असला तरीही सुटकेचा मार्ग नसतो, हे सांगणारी हि तीन पोलीस ऑफिसर्स ची गोष्ट..
निशब्द..Sad reality of public servants..

ख्रिस्तोफर अर्धा पाहिला. ख्रिस्तोफर नावाच्या अधिकार्‍याची चौकशी सुरू होते आणि त्याची कहाणी उलगडते. कुठल्या तरी खर्‍या अधिकार्‍याच्या जीवनावर आहे. मामुट्टी चे सिनेमे हे अलिकडे याच धाटणीचे असतात. लार्जर दॅन लाईफ. त्याचं वय कळत नाही. सत्तरच्या जवळ नक्कीच असेल. या स्टेजला आल्यावर कोणताच अभिनेता मुद्राभिनयाच्या भानगडीत पडत नाही. फक्त सहज वावर ठेवतात.
मध्यंतरापर्यंत तुकड्यात तुकड्यातली कथा बघावी लागणार का असे वाटत होते. पण मध्यंतरानंतर सुरूवातीच्या पाच मिनिटातल्या वर्तमानकाळात प्रेक्षकाला जोडून घेतले जाते. तिथून एकसंध कथा सुरू होते. इथून पुढे एक खलनायक आणि त्याचा माग. हे एंगेजिंग झाले आहे. बाकि साऊथची अब्बास मस्तानच्या वरताण शैली आहेच.

F3 - fun and frustration तेलुगू (सबटायटल्स) नेटफ्लिक्स..विनोदी सिनेमा.
कैच्याकै सिनेमा आहे पण फक्त हसायचा मुड असेल तर डोकं बाजूला ठेवून पाहू शकता..व्यंकटेश ची कॉमेडी भारीए..
पण गम्मत सगळी डायलॉग्जमधे आहे..

Advocate मुकुंदन unnee पाहिला prime वर.
अत्यंत सामान्य व्यक्तीला संधी मिळाल्यास फक्त हाव / ग्रीड मुळे कुठल्या पातळीवर घसरला हे एकदम नीटच दाखवलंय.
ओरिजिनल मल्याळम असेल. हिंदी डब पाहिला.
एकदा बघू शकता.

अरे हो मागच्या पानावर अज्ञातवासी ह्यांची legend सरवना बद्दल कॉमेंट वाचली.
आठवले म्हणून लिहितोय.
चेन्नईत मुख्य मार्केट मध्ये 6 मजली मॉल / स्टोअर आहे.
गर्दी असते म्हणजे फेमस असेलच. आम्हा बाहेरून जाणाऱ्या लोकांना तिथेही भेट द्या मार्केट मध्ये असा सल्ला मिळालेला.
Legend हे बारीक अक्षरात आणि त्याला सर्वाना स्टोअर्स नाव आहे. तिथे मॉडेल म्हणून असलेला एक फोटो पाहिला.
मनात म्हणालो इतका कृत्रिम दिसणारा व्यक्ती ह्या मॉल चा ब्रँड ambasador का असेल बरे? मग वाटले की असेल एखादा इथला फेमस ऍक्टर, आपल्याला माहीत नसलेला.
Hotstar वर त्या चित्रपटाचे पोस्टर आले तेव्हा कळाले.
तेच मालक असणार.
त्यामुळे सबकुछ तेच.

Jana gana mana मल्याळम (सबटायटल्स) नेटफ्लिक्स.. Political,legal thriller सिनेमा..
सिनेमातलं प्रत्येक पात्रं दमदार आहे आणि प्रत्येकाने भुमिकेस पुरेपूर न्याय दिला आहे.
सुरूवातीला थोडं गोंधळात टाकणारं वाटणारं कथानक पोलीस ऑफिसर सज्जन कुमार ची एन्ट्री होताच क्लीअर होत जातं.
सिनेमाचा सेकंड हाफ उत्तम, प्रुथ्वीराज सुकुमारन just tremendous.सिनेमाची शेवटची ४५ मिनटं म्हणजे पुरेपूर टर्न्स आणि ट्वीस्ट ने भरलेले आहेत..
सिनेमा सध्याची भारताची पॉलिटिकल स्थिती दर्शवतो.
बघण्यासारखा आहे नक्कीच.

Mukundan unni associates ,मल्याळम, (हिंदी डब्ड) हॉटस्टारवर.
एक सामान्य ज्युनीअर वकिलाला बरीच वर्षे सीनीअर वकीलाच्या ऑफिसात काम करूनही आयुष्यात काही साध्य करता येत नाही.. पैशांची हाव या माणसाला कुठे नेऊन सोडते हे बघा मुंकुंदन उन्नी असोसिएट्स फक्त हॉटस्टारवर..
डार्क ह्युमर थ्रीलर सिनेमा.

आचार्य बघू का ?
फसलेला असेल , चिरफाड करण्यासारखा असेल तरी चालतो आपल्याला.

Annathe बघितला नेटफ्लिक्सवर हिंदीत..रजनीकांत वाला..
फुल्ल इमोशनल ड्रामा, स्टाईलीश ऐक्शन्स, अ आणि अ कथानक.. दुष्ट, क्रुर व्हीलन्स..आणि भाई बहन का प्यार..
टाईमपास मसाला सिनेमा..

Heaven मल्याळम (हिंदी डब्ड) हॉटस्टारवर.
एका पोलिस ऑफिसरचा मुलगा, फ्रेंडच्या घरी गेलेला असताना, अलॉंग वीथ फ्रेंड फैमिली मुलाचा ही मर्डर होतो.. का?कुणी? कशासाठी? शेवटपर्यंत सिनेमा खिळवून ठेवतो..
सस्पेन्स, थ्रीलर.

मृणाली तुमच्यामुळे दाक्षिणात्य सिनेमाची आवड लागली. जमेल तसे तुम्ही लिहिलेले मुव्ही बघते.
नुकताच ख्रिस्तोफर बघितला. चांगला वाटला. नेटफ्लिक्स जाणूनबुजून नाही घेतले .
एखादी वेब्सिरीज बघून झाली कि उगीच खूप वेळ वाया घालवला असे वाटत रहाते सो एकदम कंटाळा आलाच तर सिनेमा बघते .

थँक्स सामी Happy

काल पाहिलेले सिनेमे.
18 pages - तेलुगू नेटफ्लिक्सवर (सबटायटल्स)
ह्रदयभंग झालेल्या एका तरूणाला दोन वर्षे जुनी एका मुलीची डायरी सापडते..नायक वाचता वाचता त्यात गुंतत जातो..पण 18 पानातच डायरी संपतेय..पुढे काय? पहा सिनेमात..रोमांटिक, सिनेमाटिक सिनेमा.. चांगला आहे.

Sakini Dakini- तेलुगू नेटफ्लिक्सवर (सबटायटल्स)
शालिनी आणि दामिनी, एक डिसेंट मुलगी एक मास मुलगी, दोघी पोलिस ट्रेनिंग अकैडमी जॉईन करतात...अनावधानाने एका मुलीच्या किडनैप केसच्या साक्षीदार बनतात.. पोलिसांकडून कुठलीही मदत मिळत नाही, तेव्हा दोघी मिळून खलनायकाचा पर्दाफाश करतात, कसं ते पहा सकिनी डाकिनी मधे..स्त्रीशक्ती ऐक्शन सिनेमा...

Hridayam मल्याळम (सबटायटल्स) हॉटस्टारवर.
अरूण केरळहून तमिळनाडू इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकायला येतो..फर्स्ट इयर रैगिंग, फर्स्ट क्रश, हॉस्टेल लाईफ, भांडंणं, परिक्षा,फायनल इयर..मग सगळे दोस्त मंडळी विखुरतात..आपापल्या करिअर पाथमधे बीझी होतात.. लग्न, मुल, इमोशन्स, जपलेली मैत्री.. मस्त दाखवले आहे सगळं..म्हटलं तर तीच ती कॉमन स्टोरी पण छान चित्रित केली आहे..बघताना आपण हरवून जातो अरूणच्या गोष्टीत..सिंपल गोईंग सिनेमा...भरपूर आणि मस्त गाणी आहेत.

Gatta kusthi तमिळ, नेटफ्लिक्सवर.
किर्ती एक कुस्तीपटू केरळची मुलगी.. कुस्तीपटू असल्याने गावात लग्न जमत नसते..वीरा तमिळ मुलगा, त्याला जशी हवी त्याच्या अगदी विरुद्ध मुलीशी (किर्ती- खोटं बोलून ) लग्न होते..खोटं लपवता लपवता घडणाऱ्या गमतीजमती पहा सिनेमामध्ये.
हलकाफुलका कॉमेडी सिनेमा.

jagame thandhiram , तमिळ, नेटफ्लिक्स (हिंदी उपलब्ध)
एक मदुराई चा गैंगस्टर सुरूळी, लंडनला जातो..तीथे एक तमिळ गैंगस्टर शिवदास आणि एक लोकल गैंगस्टर पीटर यांच्यात वैमनस्य असते..तिकडे जाऊन सुरूळी , क्रिमिनल एक्टीवीटीज मधे इनवॉल्व होतो..मग त्याला नायिका अट्टली भेटते मग एक नवी गोष्ट समजते.. ऐक्शन आणि धमाका पाहायचा असेल तर बघा जगमे थंडिराम..ठिक आहे.

हिरॉइन चा बाप शेवटी व्हिलन निघतो तो का?
इतके बघितलेत कि इकडची स्टोरी तिकडे लावली तरी फरक पडत नाही.

एकात अल्लू अर्जुन फॉरेनच्या कॉलेजात गिटार शिक(व)त असतो. हिरवीन त्याच्या मागे लागते. हा त्याच्या प्लॅनचा हिस्सा असतो. मग तिथे मारामारी करून लोकल गॅंगचं सहाय्य घेऊन टॅक्स हेवन कंट्रीत जाऊन देशाचा काळा पैसा स्वतःच्या नावावर करतो. भारतात येऊन गॅंग पकडून देतो. शेवटी तो अंडर कवर हपिसर निघतो.

असे तीन पिक्चर होते. सगळ्यात हिरॉइन चा बाप करप्ट मंत्री / बिल्डर किंवा माफिया.

नाही.. नायिकेच्या वडिलांचं पात्र नाही सिनेमात..
सिनेमाचा मुख्य विषय निर्वासित तमिळियन्स हा आहे..

अल्लू अर्जुन चा म्हणताय तो पाहिलय सिनेमा गिटारवाला..

Shyam singha roy, तेलुगू, नेटफ्लिक्सवर (सबटायटल्स)
एक नवोदित दिग्दर्शकाची पहिलीच फिल्म रिलीज होते आणि त्याच्यावर 1969 च्या प्रसिद्ध बंगाली लेखकाची कथा चोरल्याचा आरोप येतो..नक्की काय घडले याची शहानिशा करता करता रोचक गोष्टी समोर येत जातात...ड्रामा, पुनर्जन्म सिनेमा.. चांगला आहे.

Minnal Murali, मल्याळम, हिंदीत उपलब्ध, नेटफ्लिक्सवर.
एका गावात दोघांवर वीज पडते आणि त्यातून ते वाचतात..आणि त्यांना सुपर पॉवर्स मिळतात.. अफाट ताकद, अतिवेगवान वेग, वस्तूंना हात न लावता दुरून कंट्रोल करणे..पण त्यांना उडता येत नसतं..
एक बनतो सुपरहिरो आणि एक सुपरव्हिलन..
सुपरव्हिलन-शिबू, स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांना मारणारा, ( ह्याचा मास्क - गोणपाट कापड)
सुपरहिरो-जेसन,लोकांना वाचवणारा.. (ह्याचा मास्क- मफलर)
दोघांच्या अपयशी प्रेमकहाण्या.
चांगला आहे सिनेमा, ऐक्शन,एडवेन्चर.बोअर होऊ देत नाही सिनेमा.. हलकंफुलकं पाहायचं असेल तर बघू शकता.

Pages