दाक्षिणात्य सिनेमा कसा वाटला.

Submitted by mrunali.samad on 9 March, 2023 - 06:23

या धाग्यात आपण तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी डब्ड/वीथ सबटायटल्स पाहिलेले सिनेमा, कसा वाटला,कुठे पाहिला याची चर्चा करू शकतो.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Parking तमिळ हॉटस्टार वर हिंदीत.
चेन्नई मधले एक दुमजली घर..खालच्या घरात जुना भाडेकरू सरकारी नोकरीवाला..वरच्या मजल्यावर नवा भाडेकरू आयटी वाला गरोदर बायकोला घेऊन राहायला येतो..दोन वेगवेगळ्या जनरशेनचे वेगळ्या मानसिकतेचे कुंटुंब भाड्याने राहत असतात..खरा सिनेमा सुरू होतो,जेव्हा नवा भाडेकरू नवी कार घेतो..घराला एकाच कारचं पार्किंग असतं..जुन्या भाडेकरू कडे बाईक असते..पार्किंग ला जागा नाही यावरून कुरबुरी सुरू होऊन दोघांचे इगोज एक्स्ट्रीम लेवलला जातात..चांगला आहे सिनेमा.. आधी हलकाफुलका वाटला पण थ्रीलर, एंगेजिंग आहे..

Hindi dubbed South Indian Movies names
414479474_341436115360398_6253669124479832708_n.jpg

र आ Lol
:खिलोना बना खलनायक' हे कोणत्या सिनेमाचं नाव आहे ओळखा पाहू?
Hint : चित्रपट south चा नाही

Falimy मल्याळम, हॉटस्टार, हिंदीत.
त्रिवेंद्रम मधे राहणारे एक कुटुंब.. आई वडील आजोबा आणि दोघे भाऊ..काशीला जायचं म्हणून आजोबांनी तिनवेळा घरातून एकट्यानेच निघून जायचा त्यांचा प्रयत्न फसलेला असतो..त्यांची इच्छा पूर्ण करायला म्हणून पूर्ण कुटुंब काशीला जायला निघते रेल्वेने.. मधेच कुटुंबाची ताटातूट होते...पूर्ण प्रवासभर मस्त मजा आहे सिनेमात.. शेवटी ते सगळे काशीला कसे पोचतात? बघा सिनेमात..
कॉमेडी, फैमिली, थोडा इमोशनल.. छान आहे सिनेमा..

झपाटलेला picture हिंदीत एकदम डब्बा वाटतो. मराठीत काय कडक सिनेमा आहे तो!(उपमा संदर्भ : कुमार गिरीश )

Tantiram प्राईमवर तेलुगू सबटायटल्स.
एका गावात एक फटाक्यांची फैक्टरी, फैक्टरीच्या तरूण मालकाचा भुतकाळातील काही घटनांमुळे स्त्रीयांवर विश्वास नाही पण वडिल जबरदस्तीने एका सुंदर, मनमिळाऊ मुलीबरोबर मुलाचे लग्न लावून देतात..थोड्याच दिवसांत मुलगी नवर्याचं मन जिंकून घेते..कहाणी मे आता है ट्वीस्ट जेव्हा नायकाला एक जीन (हो तोच तो अलाद्दीनच्या दिव्यात असतो तसा) भेटतो आणि नायकाचं आयुष्य ढवळून टाकतो....चांगला आहे टाईमपास, थ्रीलर, फैन्टसी चित्रपट..

1. Dorsani तेलुगू प्राईमवर सबटायटल्स.
एका गावातला गरीब राजू, सावकाराच्या मुलीच्या दोरसानीच्या प्रेमात पडतो..सावकाराला कळतं आणि तो त्यांच्या विरोधात काय काय करतो..कोण जिंकणार प्रेमात आकंठ बुडालेले जोडपे कि खानदान कि इज्जतीसाठी काहीही करायला मागेपुढे न पाहणारा सावकार..म्हणलं तर तीच ती स्टोरी आहे पण वेगळे गाव, वेगळे वातावरण, नवे कलाकार.. एकदा बघू शकता..रोमान्स, थ्रीलर..

2. A Ranjith cinema मल्याळम नेटफ्लीक्स सबटायटल्स
एक नवोदित फिल्ममेकर एका सिनेमासाठी कथा लिहितो..स्वतःबरोबर घडलेल्या घटनांवरून सिनेमाची अर्धी कथा लिहून होते..पुढची अर्धी कथा इमाजिनेशन ने पूर्ण करतो...त्याने जी जी कल्पना केलेली असते ते ते त्याच्या सोबत प्रत्यक्षात घडायला लागते...थ्रीलींग, एंगेजिंग सिनेमा...

१.sapta sagaradaache ello side A - कन्नड प्राईमवर सबटायटल्स..
मनु एक कार ड्रायव्हर, महिना बारा हजार कमवणारा..
प्रिया एक मध्यम वर्गीय कॉलेज तरूणी, गायिका व्हायची स्वप्नं पाहणारी.. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आणि भविष्याची स्वप्नं रंगवण्यात दंग झालेले..झटपट पैसे मिळवण्यासाठी मनु असा एक निर्णय घेतो कि दोघांच्या आयुष्यात एक भयंकर ट्वीस्ट येतो..यातून हे बाहेर कसे पडतील? पडतील का तरी असं आपल्यालाच टेन्शन येतं..
खिळवून ठेवणारा ह्रदय स्पर्शी ड्रामा..आवडला सिनेमा..

२.sapta sagaradaache ello side B कन्नड प्राईमवर सबटायटल्स
वरच्या सिनेमाचा पुढचा भाग इकडं काही लिहिलं कि वरच्या सिनेमाचा स्पॉईलर होईल..
दुसर भाग थ्रीलर, जुने हिशेब चुकते करणारा... पुन्हा खिळवून निशब्द करणारा आहे..आवडला..

3.Saindhav तेलुगू सबटायटल्स प्राईमवर
एक एंग्री ओल्ड मैन (व्यंकटेश) आणि एक खतरनाक कनींग हिंदी भाषिक व्हिलन (नवाझुद्दिन सिद्दीकी) , काय नाही दोघांमध्ये सारखी फायटींग असते..व्यंकटेश एक सिंगल पेरेंट असतो मग लेकिच्या साईडने एक इमोशनल स्टोरी असते..ड्रामाटिक ऐक्शन सिनेमा.. ठिक आहे..

वेंक टेश माझा फेवरि ट स्टार. पण आव डते पिक्चरस क्षण क्षणम श्रीदेवी. अफलातून विनोदी. व चंटी. भावना प्रधान. दोन्ही अल्बम्स गाणी जबरद स्त आहेत. कॅसे ट जळे परेन्त ऐकलीत.

Manjumel Boys कोणी पाहिला आहे का इथे? मल्याळम विथ इंग्लिश सबटायटल आहे.. थिएटरला आहे सध्या. एक मल्लू मित्र सोबत येतोस का म्हणून विचारत आहे..

१. anweshippin kandethum मल्याळम हिंदीत नेटफ्लीक्सवर
सस्पेन्शन संपवून परत नोकरीवर रूजू झालेल्या पोलिस ऑफिसरला एक सहा वर्ष जुनी मर्डर केस सॉल्व करायला दिली जाते..आणि नायक सस्पैन्ड का झाला त्याची एक वेगळी केस असते...मर्डर इन्व्हेस्टिगेशन,सस्पेन्स सिनेमा.. चांगला आहे.

२.Udal मल्याळम प्राईमवर सबटायटल्स
नवरा कामानिमित्त बाहेरगावी, बेडरिडन सासू, अधू द्रुष्टी असलेले सासरे, आणि आपल्या छोट्या मुलासोबत राहणारी नायिका- शाईनी..एका रात्रीत, एका घरात, तीन पात्रं आणि खिळवून ठेवणारा- डार्क,सस्पेन्स, थ्रीलर, क्राईम सिनेमा... आवडला..

३.Lover तामिळ हॉटस्टारवर हिंदीत पण आम्ही तमिळ मधे पाहिला सबटायटल्स सोबत.
दिव्या आणि अरूण कॉलेजमध्ये असल्यापासून सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये असतात..नंतर परिस्थिती बदलत जाते आणि नात्यात कुरबुरी सुरू होतात..नाते टिकते कि तुटते पहा सिनेमात.. नायकाचा अभिनय जबरदस्त..
ड्रामा, रोमांटिक सिनेमा. चांगला आहे।

४.Case of kondana कन्नड प्राईमवर सबटायटल्स
राजू एक पाणीपुरीवाला , आजारी मुलाला वाचवायला पैशासाठी वणवण फिरतोय.. वील्सन, पोलीस डिपार्टमेंट मधे नव्याने रुजू झाला आहे..एके दिवशी वील्सनचा एक अपघात होतो आणि त्याची गाठ पडते राजूशी, तिथून वील्सन हळूहळू हळूहळू गुंत्यात अडकत जातो आणि आपण सिनेमात.. बघण्यासारखा आहे सिनेमा. क्राईम, थ्रीलर...

Case of kondana >> याचा सिक्वल काय असेल सांगा? 'केस ऑफ रायबा' Happy

आदी लगीन ....

Case of kondana >> याचा सिक्वल काय असेल सांगा?>
केस ऑफ सोडा ना. (निदान जामिनीवर तरी)

anweshippin kandethum: पाहिला होता पण इथे post करायला विसरलो. चांगला आहे.

KURUTHI: मला तरी आवडला. Violence असला तरी निर्थक नाही. निरपेक्षपणे बघितल्यास आवडेल. थोडे फार समाजाचे representation आहे. फक्त वर्गीकरण reverse आहे. म्हणजे जे बहुसंख्याक आहेत ते इथे अल्पसंख्याक... एखाद्या नाटकाप्रमाणे आहे. Climax सोडून बहुतेक सर्व एका खोलीत घडते. एकदा नक्कीच बघण्यासारखा आहे

इकडे चांगली माहिती मिळते चित्रपटांची.
ब्रह्मयुगम नंतर भूतकालम पाहिला. ओके टाईप आहे.शेवटी जम्प स्केअर्स आहेत.पण कथेत काहीच नवे नाही.

हनुमान अर्धा पाहिला. मस्त आहे.
व्हिज्युअल्स बाहुबलीच्या तोडीचे आहेत. सुपरहिरो चा खूप वेगळा सिनेमा. साऊथच्या विनोदी शैलीने घेतलाय. थोडं अ‍ॅडजस्ट केलं तर हसायला येईल.

Pages