Submitted by mrunali.samad on 9 March, 2023 - 06:23
या धाग्यात आपण तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी डब्ड/वीथ सबटायटल्स पाहिलेले सिनेमा, कसा वाटला,कुठे पाहिला याची चर्चा करू शकतो.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
१.तुघलक दरबार..तमिळ..हिंदीत
१.तुघलक दरबार..तमिळ..हिंदीत युट्युबवर.
विजय सेतुपती एक वाईट वाया गेलेला माणूस असतो...एके रात्री चमत्कार होतो, त्याचा डावा डोळा फडफडतो आणि तो काही वेळा पुरता चांगला माणूस बनतो..पुन्हा डाव डोळा फडफडला कि वाईट माणूस.. वाईट असताना घातलेले घोळ चांगलावाला निस्तरत असतो.. असा हा तुघलक दरबार.. मजा आली बघायला..
कॉमेडी, ड्रामा, पॉलिटिकल.
२.धर्मा दुराई, तमिळ, हिंदीत हॉटस्टारवर.
एक डॉक्टर, ह्रदयभंग झालेला..दारूच्या आहारी गेलेला..घरच्यांशी अजिबात न पटणारा... हा असा का आणि कसा बनला दाखवतात फ्लैशबैक मधे..
इमोशनल ड्रामा.. चांगला आहे.
3.Andala rakshasi तेलुगू, नेटफ्लिक्सवर, सबटायटल्स.
एक श्रीमंत मुलगा गौतम, एका साध्या घरातल्या मुलीच्या, मिथुना च्या प्रेमात पडतो, माहिती असताना कि ती दुसऱ्या मुलाच्या प्रेमात आहे...त्यांचं लग्न ठरत असताना अशा काही गोष्टी घडत जातात कि त्यांची आयुष्यच बदलून जातात..अस्वस्थ करणारा इमोशनल, ट्रैजिक सिनेमा.
तुघलक दरबार.
तुघलक दरबार.
बघितला, आवडला. सेथूपतिचा अभिनय. मी प्रथमच त्याला बघतो आहे.
टिक टिक टिक तमिळ सिनेमा .
टिक टिक टिक तमिळ सिनेमा . यूट्यूब वर आहे. हिंदी डबड. सायन्स फिक्शन आहे. सुप्रसिद्ध अर्मागेडान वरून इंस्पारेशन. बरा आहे. SCI-FI आवडत असेल तर बघा.
नवऱ्याला सांगते. तो साय फाय
नवऱ्याला सांगते. तो साय फाय प्रेमी प्लस साऊथ डबड प्रेमी आहे. थॅंक यु केशवकुल.
Super Delux तमिळ,
Super Delux तमिळ, नेटफ्लिक्सवर, सबटायटल्स वाचत.
एक नवविवाहित जोडपं एका डेडबॉडीची विल्हेवाट लावायच्या प्रयत्नात असते तेव्हा..
एक छोटा मुलगा सरप्राईज होतो जेव्हा पहिल्यांदाच आपल्या ट्रान्सजेन्डर वडिलांना भेटतो तेव्हा..
एका टिनेज मुलाला त्याच्या आईची दुसरी बाजू कळते तेव्हा आणि
एका अंधश्रद्धाळू माणसाचा देवावरून विश्वास उठतो तेव्हा काय होते...
चार गोष्टी एकत्रित पाहा सुपर डिलक्स मधे.
डार्क सिनेमा..चांगला आहे.
#घरच्यांसोबत बघू नये.#
Anukokunda Oka Roju (2005)
Anukokunda Oka Roju (2005) तेलुगू, नेटफ्लिक्सवर, सबटायटल्स.
एक अल्लड,हसरी सहस्रा नावाची कॉलेज तरूणी आणि पार्ट टाईम प्लेबैक सिंगर..एके संध्याकाळी मैत्रिणीबरोबर पार्टी ला जाते..कधी घरी येते कशी येते हे सकाळी उठल्यानंतर तीला काहीही आठवत नसते..जसजसे दिवस जातील तसतसे तिच्यावर अनोळखी लोकांकडून ठिकठिकाणी जीवघेणे हल्ल्याचे प्रयत्न होत असतात..
कोण असतात हे लोक? का तीला मारायला टपलेले असतात पहा सिनेमात.. थ्रीलींग सिनेमा.. खिळवून ठेवणारा.. शेवटपर्यंत ससपेन्स अबाधित...
Pookkalam, मल्याळम,हॉटस्टारवर
Pookkalam, मल्याळम,हॉटस्टारवर, हिंदीत.
सत्तर वर्षाच्या लग्नानंतर आजोबांना, आजीकडून घटस्फोट हवाय..त्यांच्या तीन मुली, नातवंडं सगळे टेन्शनमध्ये.. का ? कशासाठी? पहा सिनेमात..निसर्गद्रुश्ये मस्त.. एका नातीचा मधमाशीपालनाचा व्यवसाय असतो ते पण छान आहे..तीथेच त्या लटकवलेल्या रंगिबेरंगी दोर्या कसल्या असतात कळले नाही..
फैमिली, कॉमेडी, ड्रामा सिनेमा..
https://youtu.be/cmIGczDZeCo
https://youtu.be/cmIGczDZeCo
यू ट्यूब वरील गझिनीकांत निखळ मनोरंजन देतो , सहकुटुंब पाहण्यासारखा आहे .
दक्षिणेतील आर्या या हिरो ने शॉर्ट टर्म मेमरी लॉस ग्रस्त प्रियकराचा रोल मस्त केला आहे .
प्रेयसी ला भेटायला जायचे आहे हे देखील हा विसरून जातो.
सेथूपतिचा अभिनय. मी प्रथमच
सेथूपतिचा अभिनय. मी प्रथमच त्याला बघतो आहे. >>>>>>
सेतुपतीचे एक से एक मूव्ही बघितले असल्यामुळे तुघलक दरबार मला सुद्धा आवडला !
सेतुपती च्या मागे स्टार डम नाही , कष्टाने वर आलेला अभिनेता , दिसायला सर्वसाधारण असल्यामुळे आपल्यातील असल्याची जणू खात्रीच पटते. . .
फुरोगामी
फुरोगामी
सेथूपतिचा अभिनय लाजवाब!
तुघलक दरबार ह्या सिनेमाचा विषयच ग्रेट आहे.
त्याचे अजून सिनेमे बघणार आहे.
गझिनीकांत निखळ मनोरंजन देतो ,
गझिनीकांत निखळ मनोरंजन देतो , सहकुटुंब पाहण्यासारखा आहे .
दक्षिणेतील आर्या या हिरो ने शॉर्ट टर्म मेमरी लॉस ग्रस्त प्रियकराचा रोल मस्त केला आहे .>>>>>> बघितलाय हा..मस्त सिनेमा.
सेतुपती माझा पण फेवरीट..96 पाहिल्यापासून तर प्रेमातच आहे...तरीही विक्रम,मास्टरमधे पण आवडला.
त्याचा puriyatha puthir (unsalved puzzle) ओरिजिनल , कत्ल का राज (नावावर जाऊ नका, हिंदी डब्ड ला कैच्या कै नावं ठेवतात) नावाने युट्युबवर सापडेल...जुना आहे..मस्त सिनेमा आहे..सस्पेन्स, ट्वीस्ट्स, इमोशनल..
त्याचाच रेक्का पण हिंदीत सापडेल युट्युबवर पॉलिटिकल, कॉमेडी आहे.
ओके. आभार. नक्की बघणार.
ओके. आभार. नक्की बघणार.
सेतूचा पप्पू पासपोर्ट देखील
सेतूचा पप्पू पासपोर्ट देखील उत्तम .
कथा एकदम सध्या असतात , पण हा अवलिया जान भरतो.
सेतूचे बरेचसे मूव्ही हिंदू मध्ये डब असतात आणि you ट्यूब वर सापडत हे एक विशेष .
नाहीतर बाकीची दक्षिणेतील लोकं लै वाईट .
सर्वोत्तम कंटेंट असतात , पण हिंदी द्वेष्टे असल्यामुळे हिंदीत डब करत नाही.
मग त्यांचे मूव्ही with english subtitles बघताना खिशात पैसे नसल्यामुळे काचेतून मिठाई बघणे आणि पायाला पेटके पडे पर्यंत टिव्ही च्या दुकानाबाहेर उभे राहून मॅच बघण्यासारखे फिलिंग येते.
ट्यूब वरील गझिनीकांत निखळ
ट्यूब वरील गझिनीकांत निखळ मनोरंजन देतो , सहकुटुंब पाहण्यासारखा आहे .
दक्षिणेतील आर्या या हिरो ने शॉर्ट टर्म मेमरी लॉस ग्रस्त प्रियकराचा रोल मस्त केला आहे .
प्रेयसी ला भेटायला जायचे आहे हे देखील हा विसरून जातो.
>>>>>>>
हा सिनेमा सहकुटुंब किती वेळा पाहिला याची मोजदाद नाही .
प्रत्येक वेळी नवीनच पाहतोय असे वाटते .
फुरोगामी
फुरोगामी
तुमचे वरचे प्रतिसाद वाचल्यावर एक संशय आला. मायबोलीवर किती फुरोगामी आहेत? का ही जेकील आणि हाईड टाईप केस आहे? काय चाललाय काय?
विजय सेतुपती ओव्हररेटेड वाटला
विजय सेतुपती ओव्हररेटेड वाटला.
फुरोगामी
फुरोगामी
तुमचे वरचे प्रतिसाद वाचल्यावर एक संशय आला. मायबोलीवर किती फुरोगामी आहेत? का ही जेकील आणि हाईड टाईप केस आहे? काय चाललाय काय ?
>>>>>>>>>>
जाऊ द्या हो , सिनेमावरील निखळ चर्चेचा आनंद घ्या
त्यांचे मूव्ही with english
त्यांचे मूव्ही with english subtitles बघताना खिशात पैसे नसल्यामुळे काचेतून मिठाई बघणे आणि पायाला पेटके पडे पर्यंत टिव्ही च्या दुकानाबाहेर उभे राहून मॅच बघण्यासारखे फिलिंग येते.>>अस लिहिल तर एन्जोय करणारच.
थोडे अवांतर आहे, पण एक डाव
थोडे अवांतर आहे, पण एक डाव मानून घ्या.
अगदीच राहवले नाही म्हणून खालील लिंक देत आहे. Without any comment!
Rihana Power Packed Performance in front of AR Rahman Sir in Super Singer Junior Season 8
https://www.youtube.com/watch?v=fHVvYYvTdR8&ab_channel=CinemaWorldEntert...
आणि ही पण एक लिंक
https://www.youtube.com/watch?v=JUDRo09TazM&ab_channel=MKMEDIACREATION
कसली क्युट एटिट्युड ने गातेय
कसली क्युट एटिट्युड ने गातेय ती छोटी..मस्त.
सकाळी एकजण लोकलमध्ये कुठलातरी
सकाळी एकजण लोकलमध्ये कुठलातरी साऊथ सिनेमा पाहत होता. त्याचं नाव कुणाला माहीत आहे का?
कथा अशी...
हिरो विमानात आहे. त्याला भविष्यातील (म्हणजे लगेचच घडणाऱ्या) घटना दिसतात. त्यात त्याला एका जाहीर सभेत भाषण देणाऱ्या पुढाऱ्याला गोळी मारून ठार करायला सांगतात. तो तसं करतो. पोलीस त्याला गोळी मारून संपवतात. तो पुन्हा विमानात जागा होतो. असं टाइम लूप कि काय म्हणतात तसं दोनेक वेळा घडतं. मग त्याला असं दिसतं कि त्या पुढाऱ्याला तो नाही तर कॅमेरामन गोळी मारतो. मग हिरो त्याचा माग घेत जातो.
येन्ना कुडमाडिगा
येन्ना कुडमाडिगा झुल्लपागवर्सिका
Andhakaaram तमिळ नेटफ्लिक्सवर
Andhakaaram तमिळ नेटफ्लिक्सवर सबटायटल्स.
एक हताश क्रिकेटर, घरातील लैन्डलाईन फोन एक्सचेंज करून घेतो आणि त्याला यायला लागतात स्ट्रेंज कॉल्स..
एका अपघातातून वाचलेला आणि फैमिली,करिअर सर्वस्व गमावलेला मानसोपचारतज्ञ परवानगी नसताना जुन्या पेंशट्स वर उपचार करू पाहतोय.
एक अंध लायब्ररीयन, स्वतःच्या उपचारासाठी पैसे जमवू पाहतोय.. त्याला आत्म्यांशी संपर्क साधायची कला अवगत असते...फर्स्ट हाफ सिनेमा ह्या लूपमधून त्या लूपमधे जात असतो..नक्की काय चाललंय हे स्पष्ट होत नाही पण एगेंजीग आहे..सेकंड हाफमधै सिनेमा उलगडत जातो..ट्वीस्ट्स, ससपेन्स, हॉरर,सुपरनैचरल गोष्टीनी पुरेपुर. पहा अंधकारम..आवडला.
Bakasuran तमिळ, हिंदीत उपलब्ध प्राईमवर.
एक गावातील एक स्ट्रीट नाटककार क्रुरपणे काही लोकांना शोधून मारतोय..
एक रिटायर्ड आर्मीमैन आणि युट्युबर, ऑनलाइन चालणारे सेक्स रैकेट्स चा पर्दाफाश करण्याच्या कामगिरीवर..
या दोघांच्यात काही कनेक्शन असेल? कसे? पहा सिनेमात.
वायोलंस, थ्रीलर,रिवेंज सिनेमा.
Custody तेलुगू ,प्राईमवर, सबटायटल्स.
एक प्रामाणिक कॉनस्टेबलला (नागाचैतन्या), एक कुख्यात गुन्हेगाराला(अरविंद स्वामी) 30 तासात बेंगलोर कोर्टात हजर करायचं आहे..
अडचणी-गुन्हेगार डायरेक्ट सीएमच्या गोटातील असल्याने बाकीची पोलीस फोर्स कॉनस्टेबलच्या विरोधात आणि मागावर..मुख्य पोलीस (शरदकुमार)सगळ्यांना च शुट ऑन साईटच्या प्रयत्नात.
हिरोईनीचं उद्या सकाळी कुणा दुसऱ्या बरोबर लग्न ठरलं असल्याने ती रात्रीच घरातून पळून येऊन हिरोसोबत जाते.
तीस तासाच्या आत बेंगलोर कोर्टात, कस्टडीत असलेल्या गुन्हेगाराला हिरो पोचवू शकेल का पहा सिनेमात.
ऐक्शन सिनेमा.
नील वरून सुरूवात असलेला एका
नील वरून सुरूवात असलेला एका हॉरर पट आहे प्राईम वर. हा बहुतेक काही वर्षांपूर्वी चिरंजीवी आणि मामुट्टी असा दोघांच्याही भूमिकेत वेगवेगळा डब्ड पाहिला आहे असे वाटते.
Night drive- Malayalam,
Night drive- Malayalam, Netflix subtitles.
एक कपल लॉंग ड्राईववर निघतात..वाटेत एका पोलीसाबरोबर बाचाबाची होते, पुढे जाऊन हे कपल एका अवघड परिस्थितीत अडकतात आणि गाठ पुन्हा त्याच पोलीसाशी पडते.राजकारणी हस्तक्षेप,भ्रष्ट पोलिस, ड्राईवींग करणारी पत्रकार नायिका आणि ड्रामा पहा सिनेमात, सशक्त स्त्री पात्रं हि मल्याळम सिनेमांची खासियत. आवडला.
काल मी 'रातचासन' बघितला.
काल मी 'रातचासन' बघितला. चांगला आहे आवडला.
धन्यवाद मृ.
mrunali.samad, तुमच्या पोस्ट
mrunali.samad, तुमच्या पोस्ट मधून अनेक दाक्षिणात्य चित्रपटांची माहिती मिळत आहे. धन्यवाद.
थँक्स अस्मिता, निर्देश
थँक्स अस्मिता, निर्देश
१.Dada (the appa-father) तमिळ, प्राईमवर,सबटायटल्स
सिंगल फादरची संघर्ष मय कहाणी.. थोडा इमोशनल थोडा हलकाफुलका..फैमिली सिनेमा.. चांगला आहे.
२.Lift तमिळ हॉटस्टार सबटायटल्स
एका तरूणाचा ऑफिसमधला पहिलाच दिवस.
संध्याकाळी सगळे गेल्यावर एकट्याला जास्त वेळ थांबावे लागते आणि मग डिस्कवर होते लिफ्टमधले भुत..
फिरून फिरून एकाच जागी येणे..लिफ्ट ऑपरेट न होणे..भास होणे..सगळे घाबरवण्याचे प्रयत्न केलेले आहेत सिनेमात पण अजिबात भिती वाटली नाही..ठिक आहे सिनेमा..
३.Rekha मल्याळम, नेटफ्लिक्सवर, सबटायटल्स
एका गावातली एकुलती मुलगी गावातल्याच मुलाच्या प्रेमात असते..एके दिवशी रात्री मुलगा तीला भेटायला घरी येतो आणि घडतात स्ट्रेंज गोष्टी.. काय ते पहा सिनेमात..
खतरनाक रिवेंज स्टोरी.. डार्क,वायोलंस, थ्रीलर सिनेमा.
Romancham मल्याळम, हॉटस्टार,
Romancham मल्याळम, हॉटस्टार, हिंदीत उपलब्ध.
बेंगलोर मधे सात बैचलर मित्र एका फ्लॅटमधे राहत असतात पैकी एक कमावता आणि बाकीचे बेरोजगार असतात.
गमतीगमतीत प्लैंचेट गेम सुरू करतात..नंतर नंतर खेळ सगळ्यांची झोप उडवणारा बनत जातो.. कसा? बघा सिनेमात.. हॉरर, कॉमेडी सिनेमा.
विनोदी भट्टी फार भारी जमलेली आहे...सगळी टिम मस्त आहे...आवडला
Pachuvum Athbutha Vilakkum,
Pachuvum Athbutha Vilakkum, मल्याळम प्राईमवर,सबटायटल्स
प्रशांत(फहाद फासील) मिडल क्लास मल्याळी,मुंबई मधे आयुर्वेद फार्मसी चालवतोय...मुंबई हून रेल्वेने केरळ ला जात असताना काही घटना घडत जातात आणि प्रशांत आणि इतरांसोबत आपणही सिनेमात गुंतत जातो..
देवकी दफ्तरदार, मोहन आगाशे, छाया कदम वगैरे मराठी मंडळी असल्याने मला मजा आली बघायला..जरी प्रेडिक्टेबल असला तरी बोअर होत नाही सिनेमा..
इन्सीपीरेशनल, फैमिली बॉंडिंग वाला, फिल गुड सिनेमा.
Pages