दाक्षिणात्य सिनेमा कसा वाटला.

Submitted by mrunali.samad on 9 March, 2023 - 06:23

या धाग्यात आपण तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी डब्ड/वीथ सबटायटल्स पाहिलेले सिनेमा, कसा वाटला,कुठे पाहिला याची चर्चा करू शकतो.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

१.Trishanku, मल्याळम, नेटफ्लिक्सवर, सबटायटल्स.
एक पोलिसाची मुलगी आणि तीचा बॉयफ्रेंड, धर्म वेगवेगळा असल्याने घरचे कधीच स्वीकारणार नाहीत म्हणून पळून जायचा प्लान करतात..नायिका ठरल्या ठिकाणी पोचते तर नायक निघतोच तितक्यात त्याला कळतं कि त्याची बहिण तीच्या बॉयफ्रेंड बरोबर पळून गेलीए..आता जबाबदार भाऊ म्हणून घरातल्यांना सांभाळणे आणि बहिणीचा शोध घेणे त्याला भाग पडतं.. बहिणीला शोधायला दोघा चुलत्यांबरोबर हा केरळहून मेंगलोरला बसने जायला निघतो आणि नायिका त्यांना कशी काय जॉईन होते आणि जी काय धमाल होते ती पहा सिनेमात.. हलकाफुलका, मस्त सिनेमा.. आवडला.

२.तमिळरसन , तमिळ, झीफाईवर,सबटायटल्स.
नायक एक प्रामाणिक पोलिस, अचानक त्याच्या मुलाला हार्ट ट्रान्सप्लान्ट करायची परिस्थिती उद्भवते..हॉस्पिटलमधलं राजकारण आणि शत्रुचे हल्ले यातून तो काय सोल्युशन शोधतो आणि मुलाला वाचवू शकतो कि नाही, पहा सिनेमात. ऐक्शन सिनेमा..

Good night, तमिळ, हॉटस्टार, हिंदीत.
एक आयटिमधे काम करणारा तरूण-मोहन, घोरण्याच्या समस्येने त्रस्त असतो, त्याला सगळे मोटरमोहन म्हणत असतात..घरी बहिणी, कलिग्ज,क्रश सगळ्यांच्या थट्टेचा विषय बनतो..जसे तसे त्याचे लग्न होते आणि त्याच्या त्रासात आणखी भर पडते..पुढे काय होते पहा सिनेमात..
हलकाफुलका, कॉमेडी सिनेमा.

Love, मल्याळम, नेटफ्लिक्सवर, सबटायटल्स.
एक जोडपं, दोघांतील भांडणे, उद्भवणारी अनपेक्षित परिस्थिती, पुढे काय पुढे काय वाटायला लावणारा सायकॉलॉजीकल थ्रीलर ड्रामा..चांगला आहे..

pichaikkaran 2 (भिकारी-२) तमिळ, झीफाईव्ह,सबटायटल्स.
पहिला भिकारी भाग पण आहे..ज्याच्या मराठी रिमेकमधे स्व.जो.आहे.
एक धनाढ्य नायक, आपल्या गोटात शत्रू बाळगून..एक नायकाशी मिळत्या जुळत्या चेहऱ्याचा भिकारी..
नायकाचे शत्रू भिकार्याचा मेंदू नायकाच्या शरीरात टाकतात, त्यांना वाटते भिकारीच तर आहे ना आता आपण म्हणू तसा नायक वागेल..पण भिकारी निघतो एक मर्डरर..तुरंगात दहा वर्षे राहून आलेला..आणि पुढं सगळ्या अनरिअलिस्टिक गोष्टी आहेत सिनेमात.. नाही बघितला तरी चालेल.

thiruvin kural तमिळ, नेटफ्लिक्सवर, सबटायटल्स.
मुकबधीर नायक, आपल्या जखमी वडिलांना सरकारी दवाखान्यात एडमिट करतो..तीथं चार भयंकर लोकांची एक गैंग असते..अतिभयंकर..नायकाच्या वडिलांना हे लोक टारगेट करतात..दिसेल त्याच्यावर हल्ला करत असतात..नुसताच रक्तपात.. नका बघू.

Bommai Nayagi: serious सिनेमा आवडत असेल तर नक्कीच आवडेल. Characters अगदी true to life वाटतात. योगीबाबू, जो नेहमी comic किंवा villian च्या assistant चा रोल करतो, तो main character मध्ये आहे. child trafficking/ abusive treatment वर आहे. कदाचित jara slow वाटू शकतो

Bommai Nayagi:>>>> टाकला यादीत.

Neelvelicham मल्याळम, सबटायटल्स,प्राईमवर.
गोष्ट आहे १९६१ ची.
एक लेखक एका गावातल्या एकाकी बंगल्यात राहायला येतो..वदंता असते कि, बंगल्याच्या मालकिन मुलीने प्रेमभंगामुळे तीथे आत्महत्या केली आणि तीचं भूत तीथे फिरतंय.तिथं राहायला जाणारे लोक एक रात्र हि बंगल्यात थांबू शकत नाहीत..तर लेखक महाशयांना काय अनुभव येणार आहेत त्या बंगल्यात.. बघा सिनेमात..
मला पहिला हाफ आवडला, कॉमेडी, हलकाफुलका वाटला..दुसरा हाफ अतिप्रेडिक्टेबल, बाळबोध भुताटकी सिनेमा वाटला..

Bommai nayagi बघितला..सुचवल्या बद्दल थँक्स mbhure.

1.Bommai Nayagi z5वर,तमिळ, सबटायटल्स.
वडिल आणि ९ वर्षाच्या मुलीचे ह्रदयस्पर्शी भावनिक नातं, एक अशी घटना घडते आणि समाज, राजकारणी यामुळे या साध्या सरळ जीवन जगणाऱ्या कुटुंबावर त्याचा काय परिणाम होतो पहा सिनेमात.. चांगला आहे सिनेमा.

2.Vasantha kokila तेलुगू, प्राईमवर,सबटायटल्स
रूद्रा, एका आयटी कंपनीत एका प्रोजेक्टवर दिवसरात्र अथक काम केल्यानंतर, गर्लफ्रेंड बरोबर क्वालिटी टाईम स्पेन्ड करायला रोमांटिक ट्रिपला जातो..येताना ते एका वसंत कोकिला नावाच्या हॉटेलमध्ये रात्र घालवावी म्हणून थांबतात आणि सुरू होते रोलर कोस्टर राईड..
आधी मला triangle टाईप वाटला पण वेगळा आहे..अनप्रेडिक्टेबल..मजा आली बघायला.. आवडला..

Neelvelicham >> पाच दहा मिनिटे पाहिला होता. सबटायटल्स वाचताना तारांबळ उडाली म्हणून नाद सोडून दिला.

एका दक्षिण भारतीय सिनेमातली एक क्लिप पाहायला मिळाली. एक माकड कार चालवते आहे. कारमध्ये एक प्रेग्नंट बाई आणि एक कुत्रा आहेत. मागे गुंड पाठलाग करताहेत. कुठेतरी कार थांबवून माकड आणि कुत्रा बाईची डिलिव्हरी करतात. माकड बाईचं तोंड दाबून धरतं आणि कुत्रा पोटावर पंजाने दाब देतो. तोवर गुंड तिथे पोचतात. तेव्हा माकड बाळाला घेऊन कुत्र्याच्या पाठीवर बसतं आणि ते चक्क त्या गुंडाच्या वरून हाय+ लाँग जंप करतात.

कोणाता सिनेमा ते शोधायचा प्रयत्न केला. गुंडा राज्य नावाच्या कन्नड सिनेमात माकड आणि कुत्रा बाईला गुंडांपासून वाचवतात , बेशुद्धावस्थेतील स्त्रीला सतरंजीवरून घेऊन जातात, तिच्या बाळासाठी दुधाची बाटली आणतात असे सीन दिसले, पण हा डिलिव्हरीचा सीन दिसला नाही.

कोणाला माहीत असेल तर सांगा किंवा वेळ जात नसेल Wink तर शोधा.

कुठेतरी कार थांबवून माकड आणि कुत्रा बाईची डिलिव्हरी करतात. माकड बाईचं तोंड दाबून धरतं आणि कुत्रा पोटावर पंजाने दाब देतो.....!!!)))))

Rofl

the house next door.

south हॉरर चित्रपटांमधली पांचट कॉमेडी यात नाही हे मुख्य वैशिष्ट्य. suspense सुद्धा छान मेंटेन केलाय. बघण्यासारखा आहे

१.ennalum nteliyaa मल्याळम प्राईमवर सबटायटल्स
दुबई मधे एका कॉम्प्लेक्स मधे राहणार्या दोन केरळी फैमिलीजमधे काही कारणानं गैरसमज होतात आणि शेवटी जेव्हा हे गैरसमज दूर होतात तेव्हा कहानी मे आता है मजेदार ट्वीस्ट्..हलकाफुलका, फिलगुड सिनेमा..

२.thankam, मल्याळम, प्राईमवर, सबटायटल्स
मुथु (बिजु मेनन) आणि कन्नन (वीनीथ श्रीनिवासन दोघं गोल्ड एजंट्स असतात..त्रिसूरहून मुंबई ला यायला निघतात..प्रवासात आणि मुंबईत पोचल्यावर काही अशा घटना घडतात आणि गोष्टीत महाराष्ट्र पोलिस (गिरीश कुलकर्णी) आणि टिमची एन्ट्री होते..चौकशी साठी महाराष्ट्र पोलीस टिम तमिळनाडू ला जाते, भाषेमुळे पोलिसांची उडणारी त्रेधातिरपीट मस्त दाखवली आहे..एंगेजींग सिनेमा आहे..चांगला आहे..

३.mandela तमिळ,नेटफ्लिक्सवर.
एक गाव, गावातील एक व्रुध्द नेता..नेत्याच्या दोन वेगवेगळ्या जातीच्या बायका..दोघींना मुलं..गावाची निवडणूक जवळ आली आहे..दोघींची मुलं उमेदवार आहेत..त्या त्या जातीच्या लोकांचा त्यांना सपोर्ट.. गावातील एक गरिब, पडेल ती कामं करणारा..पुढच्या दाराने प्रवेश नसणारा न्हावी- स्माईली (योगीबाबू) जेव्हा त्याचं एक मत निर्णायक ठरतं तेव्हा एका रात्रीत फळफळणारं त्याचं नशीब आणि अनुषंगाने घडणारे प्रसंग पहा सिनेमात.
राजकारण, सामाजिक सिनेमा... चांगला आहे..

४.chakravyuham the trap तेलुगू प्राईमवर
सीरी कोट्याधीश हाऊसवाईफ, तीच्या घरात म्रूत सापडते आणि पोलिस मर्डर मिस्ट्री सॉल्व कशी करतात हि कॉमन स्टोरीलाईन आणि कॉमन मोटिव..बोअर नाही सिनेमा पण तेच तेच काय बघणार..नवीन काही नाही..८.६ IMDb म्हणून बघितला..अगदिच वेळ जात नसेल तर बघा नाहीतर नाही बघितला तरी चालेल.

Kilometers and kilometers
मल्याळम, नेटफ्लिक्सवर, सबटायटल्स
एका गावातील एक कर्जबाजारी तरुण, वडिलांची शेवटची आठवण बुलेट विकणारच असतो तितक्यात त्याला एका अमेरिकेत तरूणीकडून बुलेटवरून भारतभ्रमणाची ऑफर मिळते..निसर्गद्रुश्ये अप्रतिम.. केरळहून निघून हे लोक उत्तरेकडे जातात..प्रवासातल्या गमती, नायकाचे मोडके तोडके इंग्रजी संभाषण, साईटसीईंग,अनपेक्षित घडणारे छोटे प्रसंग छान दाखवले आहेत..फीलगुड,इमोशनल,हलकाफुलका सिनेमा..छान आहे.. आवडला.

छान आहे अनु हा सिनेमा..
नायकाचं काम मस्त...स्पोकन इंग्लिश चं पुस्तक घेऊन तो प्रवासभर तीच्याबरोबर जो संवाद साधतो ते बघायला मजा आली.. एकदा त्यांचं भांडण होतं तेव्हा..तुमची अमेरिका अशी अन तुमची अमेरिका तशी म्हणून जे काय अर्धवट इंग्रजीत भांडतो तो सीन पण भारी..

मी तर मल्याळम सिनेमांची चाहती झालीऐ..काय एकेक विषय, मांडणी, अभिनय, सराऊडिंग,चित्रिकरण सगळंच भारी असतं.

१. Thandatti तमिळ प्राईमवर सबटायटल्स.
एक भांडकुदळ लोकांचं गाव..त्यांच्या भानगडीपासून पोलिस पण चार हात दूर राहतात.एक रिटायरमेंट जवळ आलेला पोलीस, ट्रान्सफर होऊन त्या गावच्या पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि त्याच दिवशी गावातील एक मुलगा त्याची आजी हरवल्याची तक्रार घेऊन येतो..नवीन पोलीस केसमधे लक्ष घालतो.. मुलाची आजी, आजीच्या पैशाला हपापलेल्या लेकी, आजीचा फ्लैशबैक... आजी सापडते का? चांगला आहे सिनेमा, इमोशनल,सस्पेन्स, कॉमेडी..

२.Doctor तमिळ नेटफ्लिक्सवर सबटायटल्स.
एक तरुण डॉक्टर एका मुलीला विवाहासाठी बघायला जातो, स्थळाचं काही जमत नाही पण तो तीथे असताना कळतं कि त्या घरातील शाळकरी मुलगी शाळेतून घरी येताना किडनैप झाली आहे..डॉक्टर तरुण मुलीला शोधायला त्या कुटुंबाबरोबर जातो..
ह्युमन ट्रैफिकींग विषय असला तरी कॉमेडी, पॉपकॉर्न सिनेमा..

Love Today (तमिळ ) - एक मुलगा मुलगी प्रेमात आहेत.. मुलीचा बाप लग्न करायला परवानगी द्यायला तयार आहे पण एका अटी वर... मुलाने आणि मुलीने आपापले फोन 24 तासाकरता एक्सचेंज करायचे... नंतर त्यांचा तोच डिसिजन असेल तर लग्न लावले जाईल... फोन एक्सचेंज होतात आणि मग एक एक गोष्टी बाहेर येऊ लागतात... मस्त चित्रपट...

@mrunali.samad...
तुम्ही सुचवलेले दोन्ही movie पाहिले..
Fractured ,Kilometres and Kilometres
खरंच छान आहेत.
एकदम engaging मुव्हीज..

जया जया जया हे पाहिला.एकदा बघायला धमाल आहे.अभिनेती बरेच कमी संवाद असून चांगला अभिनय करते. हिरो पण.
जज पण भारी आहे शेवटी.

1.Uyare मल्याळम नेटफ्लिक्सवर सबटायटल्स.
एक हुशार,महत्वाकांक्षी मुलगी.. लहाणपासून पायलट व्हायचं स्वप्न पाहणारी, पायलट ट्रेनिंग ऑलमोस्ट पूर्ण झालेलंच असतं आणि तीचा शाळेपासून चा जीवलग मित्र आताचा पझेसीव्ह बॉयफ्रेंड,तीच्यावर एसिड एटैक करतो..त्यानंतर नायिकेची अशक्य वाटणारी स्वप्न पूर्ण होऊ शकतात का? त्या तरूणाला शिक्षा होते का..बघण्यासारखा सिनेमा.. नायिकेचं (मल्याळम अभिनेत्री- पार्वथी) काम अप्रतिम.. नायकानं पण निगेटिव्ह रोल मस्त केला आहे..नायिकेच्या वडिलांचा तीच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा असणे, लेकीसाठी अस्वस्थ होणे,छान चित्रदर्शी आहे...
इमोशनल, ह्रदयस्पर्शी सिनेमा.. आवडला.

2.kannai nambathey तमिळ नेटफ्लिक्सवर सबटायटल्स
एक तरुण घरमालकाच्या मुलीच्या प्रेमात असतो..घरमालकाला कळते तेव्हा तरूणाला तडकाफडकी घर खाली करावे लागते..दुसऱ्या घरात रूममेटसोबत राहत असताना, त्या रूममेटमुळे तरुण गुंतागुंतीच्या प्रकरणात अडकतो..एक गुंता सोडवता सोडवता आणखी एक प्रकरणात गुंततो.. सगळ्याचा उलगडा शेवटी कशाप्रकारे होतो सिनेमात पाहता येईल.. क्राईम, थ्रीलर, सस्पेन्स..
बरा आहे.

1.Raja Rani तमिळ हॉटस्टार सबटायटल्स.
अटलीकुमारचा बहुचर्चित सिनेमा (२०१३)
सुरुवात:- चर्चमधे रेजिना (नयनतारा) आणि जॉनचं (आर्या)लग्न असतं पण वाटतंय दोघांना ही ते लग्न नकोय..समहॉव लग्न तर होतं..दोघं एका घरात अनोळखी माणसांसारखं राहत असतात...दोघांचे आपापले ट्रैजिक भूतकाळ असतात...शेवटी दोघं एकत्र येतात कि सेपरेट होतात..पहा सिनेमात... इमोशनल, रिलेशनशिप, ट्रैजिक सुंदर सिनेमा.. आवडला.

2. Hello Meera तेलुगू, प्राईमवर, सबटायटल्स
विजयवाडा मधे राहणारी एक तरूणी-मीरा, जीचं उद्या लग्न आहे..शॉपिंग करून कारने घरी निघाली आहे आणि पोलिसांचा कॉल येतो कि ताबडतोब हैदराबाद ला येणे, तीच्या एक्स बॉयफ्रेंड ने सुसाईड अटेंप्ट केलाय आणि सुसाईड नोटमधे हिचे नाव आहे.. मीराला, आई, होणारा नवरा, सासू,वडिल, हैदराबादमधे असणारे मित्र,मैत्रिणी
सगळ्यांचे कॉल येत असतात..मीरा घरी न जाता विजयवाडा हून हैदराबाद ला जायला निघते..सिनेमाभर फक्त मीरा दिसते कार चालवणारी आणि इतर पात्रांचे फोनवरचे आवाज...
आधी वाटलं काय असणार सिनेमात म्हणून दहा मिनिटे पाहून बंद केला..दुसऱ्या दिवशी पूर्ण पाहिला..वेगवान सिनेमा.. सायकोथ्रीलर..मस्त आहे..अभिनेत्री ला अभिनय म्हणावा तितका छान जमला नाही बाकी सिनेमा मस्त आहे..
आवडला.

3.Njan prakashan मल्याळम, नेटफ्लिक्सवर, सबटायटल्स.
बी एस सी नर्सिंग केलेला एक आळशी तरुण (फहाद फासिल) abroad ला जाऊन भरपूर कमाई करून lavish लाईफ जगायची स्वप्ने पाहत असतो..कॉलेजात असताना त्याने डिच केलेली तरूणी- सलोमी जेव्हा जर्मनी ला जाऊन ३,००,०० रू.महिना कमावणार हे कळतं तेव्हा तीच्याबरोबर प्रेमाचं नाटक आणि लग्न करून वीझा मिळवून जर्मनीला जायचे प्लान नायक करतो पण तसं होणार नसतं.. पुढे सगळ्या अनपेक्षित गोष्टी घडत जातात..
छान आहे सिनेमा, कॉमेडी, इझी गोईंग, फिल गुड,इमोशनल..आवडला.
फहाद फासिल नेहमीप्रमाणे मस्तच..

इथं वाचून किलोमीटर्स ॲन्ड किलोमिटर्स बघितला. आवडला. Happy
फक्त ते दोघं प्रेमात पडल्याने माती झाली. म्हणजे लैंगिक आकर्षणावर आधारित नसलेलं स्नेह-जिव्हाळा-मैत्र दाखवायला हवे होते, सिनेमा आणखी प्रगल्भ झाला असता. तसा वावही होता व त्यांच्यातील केमिस्ट्री पण तशीच होती. ॲन्टन चेकाव्ह सम अपेक्षा ठेवल्या होत्या थोड्या... त्या पूर्ण झाल्या नाहीत. अमेरिकन तरूणीचं कामही चांगलं आहे. परदेशी लोक सहसा मिसफिट वाटत रहातात आणि न-अभिनय करतात, त्यामुळे तर फारच आश्चर्य वाटले. लेकी सोबत बघितला व तिलाही समजावलं की 'त्या किसने कशी माती झाली शेवटी.' नेहमीप्रमाणे तिने दुर्लक्ष केलं. Happy

१.Bheeshma parvam मल्याळम हॉटस्टार हिंदीत...
गैंगस्टर,सीब्लींग्ज, पॉलिटिकल, ऐक्शन सिनेमा.
मामुट्टी एका कुटुंबाचा मुख्य असतो तो म्हणेल ती पूर्व दिशा..भावंडांमधली ईर्ष्या,भांडणं एक्स्ट्रीम थराला जातात ..सिनेमा पूर्ण मामुट्टी का स्वैग..चांगला आहे सिनेमा..

२. Janaki jaane..मल्याळम, हॉटस्टार, हिंदीत.
नायिका जानकी एंक्झायटीने त्रस्त असते..ती एकटी कुठे जाऊ शकत नाही.. अनोळखी लोकांत वावरू शकत नाही.. अंधारात घाबरते..तीचे लग्न होते..नायकाला सगळं माहिती असते..लग्ना नंतर ती एक वेगळ्याच अडचणीत सापडते..
हलकाफुलका, फैमिली ड्रामा.

३.Mammannan..(emporer) तमिळ, नेटफ्लिक्सवर, सबटायटल्स.
पॉलिटिकल, सोशल, कास्टिजम- वर आहे सिनेमा..
व्हिलन फहाद फासिल मस्त...ठिक आहे सिनेमा.. मोठा आहे..

४.Regina..तमिळ, प्राईमवर, सबटायटल्स.
एका बँकरॉबरीमधे अनाथ रेजिना चा नवरा मारला जातो..पोलिसांकडून कसलीही माहिती, मदत मिळत नाही तेव्हा रेजिना स्वतः खुन्यांना शोधायला निघते..फर्स्ट हाफ सरळ वाटणारी गोष्ट सेकंड हाफमधे टर्न्स घेते..
चांगला वाटला..

कन्नड सिनेमा: Ulidavaru Kandanthe.

Pulp fiction पासून inspired आहे. एकदा बघण्यासारखा आहे. वेगळी treatment आहे. Local culture कथेत चांगले mix केले आह़े. दिग्दर्शकाचा पहिलाच प्रयत्न असला तरी आवडला. Photography छानच

सीतारामन: सर्वसाधारण पेक्षाही खालच्या दर्जाचा वाटला. उगाचच घातलेले असंख्य सीन... सैन्याबद्दलचे नियम धाब्यावर बसवून काहीही प्रसंग दाखवले आहेत. Boring and unnecessarily hyped movie.

वेब सिरीजच्या धाग्यावर 'फर्झी'च्या चर्चेत विजय सेतुपतीच्या '96' बद्दल वाचलं होतं. तो यूट्यूबवर हिंदी डब्ड सापडला.
एकदा बघण्यासारखा आहे.
त्याचं काम आवडलं. तरी काही सीन्स अ आणि अ आहेत.
त्रि.कृ. चाळीशीच्या वयोगटातली वाटत नाही. (रियुनियनच्या वेळचं त्या बॅचचं साधारण वय)
रियुनियनची पार्टी संपल्यानंतरच्या सिनेमात टाइमलाइनचा मेजर घोळ वाटतो. आणि शेवटी विमानाचं तिकीट काढण्याचा सीन Uhoh
एखादं आयत्यावेळचं विमानाचं तिकीट किती आयत्या वेळचं असू शकतं याचं ते आदर्श उदाहरण. (एखादं मळखाऊ कापड किती मळ खाऊ शकतं.... या चालीवर वाचा.)

1.raangi- हिंदीत, झीफाईव्ह वर.
एक तडफदार तरूण पत्रकार भवानीला, तीच्या भाचीला ब्लॅकमेल करणार्याला शोधून काढता काढता अतिरेकी कारवायांबद्दल डिटेल्स कळतात.. टेरिरिझम टेरिरिझम खेळणारे अतिरेकी, कैच्या कै गोष्ट, बोअरिंग अभिनय सगळ्यांचेच.. त्रिशा पण बोअर यात..क्लायमॅक्स ऐक्शन सीन्स तर अशक्य बोअर.. काय ते ग्राफिक्स.. सगळंच गंडलंय... हिंदीत आहे तरी नका बघू.

2.maaviran हिंदीत प्राईमवर
निवडणूक जवळ येते म्हणून एक भ्रष्ट नेता झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना एका नवीन इमारतीत घरं देतो..इमारतीचा दर्जा खालच्या च्या खालच्या लेवलचा असतो.. त्या लोकांतील एक तरुण-सत्या एका न्युजपेपरसाठी कॉमिक कॉलम लिहित असतो.. एका अपघातात त्याच्या डोक्याला मार बसतो आणि तेव्हापासून एक नरेटेड आवाज ऐकू यायला लागतो..जो त्याला त्यानेच लिहिलेली गोष्ट सांगत असतो...सोशल, फैन्टसी, मस्त सिनेमा..हलकाफुलका..एंगेजींग..आवडला.

3.Amala मल्याळम, नेटफ्लिक्सवर, सबटायटल्स
एक सायको सीरीयल किलर...इन्वेस्टीगेशन..पोलिस, शोध..थ्रीलींग पाठलाग... ठिक आहे सिनेमा..

Jan Gan Man... मल्याळी मूवी पहिला..चांगला आहे... इंटरवल नंतर एकदमच ३६० डिग्री टर्न होतो मूवी..पृथ्वीराज च काम मस्त...

Pages