दाक्षिणात्य सिनेमा कसा वाटला.

Submitted by mrunali.samad on 9 March, 2023 - 06:23

या धाग्यात आपण तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी डब्ड/वीथ सबटायटल्स पाहिलेले सिनेमा, कसा वाटला,कुठे पाहिला याची चर्चा करू शकतो.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

सीतारामन: सर्वसाधारण पेक्षाही खालच्या दर्जाचा वाटला. उगाचच घातलेले असंख्य सीन... सैन्याबद्दलचे नियम धाब्यावर बसवून काहीही प्रसंग दाखवले आहेत. Boring and unnecessarily hyped movie.

नवीन Submitted by mbhure on 14 August, 2023 - 18:10
स हा म त, खूपच डोक्याला त्रास न देता लिहिला गेला आहे तो सिनेमा .

र आ Lol

Corona papers मल्याळम,हॉटस्टार, हिंदी.
कोरोना पैन्डेमिकनंतर एका नवीन रूजू झालेल्या पोलिसाची/नायकाची बंदूक गर्दीने भरलेल्या बसमधून चोरी होते.. पुढे त्याच बंदुकीचा वापर करून एक मर्डर आणि बँक रॉबरी होते..पोलिस गोत्यात येतो..बंदूक सापडते का ..चोरांचा पर्दाफाश होतो का पहा सिनेमात.. बरा आहे..क्राईम, थ्रीलर सिनेमा.

Surekha manzil मल्याळम, हिंदीत, हॉटस्टार.
केरळमधील एका मुलीचं लग्न ठरलंय मुलगा दुबई हून फक्त लग्नासाठी केरळला आला आहे..लग्नघर,पाहुणे, रूसवे,नवर्यामुलाचे गैरसमज, नवरीची घालमेल, लग्नघरातली खादाडी... संथ, सिंपल , हलकाफुलका, फिल गुड सिनेमा..

नाव घेता येत नाही पण हा पिक्चर आवडला.साधी कथा आहे.
IMG_20230821_191452.jpg
मृणाली मुळे मी दक्षिण चित्रपट बघायला लागले.(आणि हॉलिवूड थ्रिलर पण.एरवी अन्य भाषेत पिक्चर बघायचा उत्साह कमीच.)

अनु, छान आहे हा सिनेमा हलकाफुलका..नाव मला पण येत नाही उच्चारता Happy
Njan prakashan मल्याळम, नेटफ्लिक्सवर, सबटायटल्स.>>> हा पण मस्त आहे, सिंपल आहे...आवडलेला. ..फहाद फासिल मला हलक्या फुलक्या आणि कनिंगवाले दोन्ही रोलमधे आवडतो..

जेलर पाहिला शेवटच्या हाणामारीपर्यंत.
रजनीचे तमिळ फॅन्स काय असतात याचा अनुभव चार महीने घेतलेला आहे. उगीच इतका जोरात चालला नसणार !

Padmini मल्याळम नेटफ्लिक्सवर सबटायटल्स
लग्नानंतर पहिल्या रात्रीच नवर्याच्या डोळ्यासमोर नवी नवरी बॉयफ्रेंड बरोबर पळून जाते आणि नायक सगळ्यांच्या चेष्टेचा विषय होतो..एका मैरेज ब्युरो कडून पुन्हा नायकाचं लग्न जुळवायचा घरचे प्रयत्न करताना होणाऱ्या गमतीजमती... नायकाचं दुसरं लग्न ठरल्यावर अनपेक्षित उभ्या ठाकलेल्या अडचणी आणि त्यातून बाहेर पडायची सगळ्यांची धडपड..तीन सशक्त स्त्री पात्रांनी अख्खा सिनेमा व्यापून टाकलाय..हलकाफुलका, सिंपल सिनेमा

Run baby run तमिळ हॉटस्टारवर हिंदीत.
ऐक बँकेत जॉब करणारा तरुण, एका अडचणीत असलेल्या मेडिकल विद्यार्थिनीला तीचे नातेवाईक येईपर्यंत स्वतःच्या घरात आसरा देतो..सकाळी ती त्याच्याच घरात म्रुत सापडते.. पोलिसांच्या कचाट्यात सापडू नये म्हणून प्रेताची विल्हेवाट लावायच्या प्रयत्नात आणखी गुंतागुंत होते..तो गुंता तरुण कसा सोडवतो पहा सिनेमात..
सस्पेन्स सिनेमा.. ठिक आहे.

Taramani तमिळ नेटफ्लिक्सवर सबटायटल्स
एक सामान्य बेरोजगार तरूण आणि एक अप्पर मिडल क्लास कॉर्पोरेट जॉब करणारी सिंगल मदर, प्रेमात पडतात पण लवकरच त्यांच्या लक्षात येतं दोघांचे जग वेगळे आहेत..प्रेमकहाणी यशस्वी होते कि नाही..
सिंपल पण ऑफबीट सिनेमा..

My dear bootham तमिळ झीफाईववर सबटायटल्स
प्रभुदेवा एक जीनी टाईप भुत असतो एका छोट्या मुलाला भेटतो आणि तीच ती नेहमीची शाळेतील, छोट्या मुलांची मज्जाच मज्जा.. लहान मुलांसाठी चा सिनेमा..घरातील बच्चे पार्टी एन्जॉय करते हा सिनेमा..

जेलर पाहिला शेवटच्या हाणामारीपर्यंत.
रजनीचे तमिळ फॅन्स काय असतात याचा अनुभव चार महीने घेतलेला आहे. उगीच इतका जोरात चालला नसणार !
>>>>>>
मी पण पाहिला आणि के जी एफ पेक्षा बरा वाटला !
त्या के जी एफ च्या यशाचे गणित अजून मात्र उमगले नाही .

Thiruchandrabalam तमिळ प्राईमवर.. हिंदीत आहे..पण आम्ही तमिळमधे पाहिला..हिंदी डबींग इमोशन्सलेस वाटत होतं..
एका फुड डिलीवरीबॉय ची गोष्ट आहे जो त्याच्या वडिल आणि आजोबांसोबत राहत असतो.. दोन वेळा मुलींना प्रपोज करायला जातो दोन्ही वेळा रिजेक्ट होतो..शेजारी एक त्याची जीवलग मैत्रीण राहत असते जी प्रत्येक परिस्थितीत त्याच्या बरोबर असते.. वडिलांबरोबरचे आयुष्य भराचे गैरसमज, नात्यातली कटुता..त्यातून सगळं नीट होणं छान वाटलं बघायला.... मस्त आहे हलकाफुलका, इमोशनल..

Por Thozhil नावाचा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा पाहिला. लांबी खूप आहे पण कंटाळा येत नाही.
काहीसा रत्सासनच्या वाटेनं जाणारा. सिनेमा पाहताना रत्सासनची आठवण येत राहते.

Mark Antony तमिळ प्राईमवर सबटायटल्स.
१९९५- जैकी गॉडफादर गैंगस्टर, त्याचा मुलगा मधन गैंगस्टर.. मार्क गरीब मैकैनिक, मार्कचा वडिल एन्टनी मोठा गैंगस्टर, जैकीचा जीवलग दोस्त, १९७५ मध्ये एका चकमकीत ठार झालाय..तेव्हा पासून लहानग्या मार्क चा सांभाळ जैकीने केला आहे..मार्क चा वडिलांवर लहानपणापासून राग असतो तो एक वाईट गुंड होता असाच त्याचा समज असतो..
एके दिवशी वैतागलेल्या मार्कला एक टेलिफोन सापडतो
एक टेलिफोन ज्यावरून भुतकाळात कॉल करता येतो..भुतकाळात थोडा जरी बदल झाला तरी भविष्य पर्यायाने वर्तमान काळ बदलणार असतो... टेलिफोन ची एन्ट्री झाल्यावर सिनेमात जी काय मजा येते त्याला तोड नाही.... मस्त ऐक्शन, कॉमेडी, टाईम ट्रैव्हल पॉपकॉर्न सिनेमा.. शेवटपर्यंत खिळवून ठेवतो..मजा आली बघायला.. एस.जे.सुर्या डबल रोल मधे जबरदस्त...

miss shetty mr polishetty तेलुगू नेटफ्लिक्सवर हिंदीत उपलब्ध.
अन्विता- व्यवसाय मास्टरशेफ,युकेत वाढलेली...इंडिपेंडंट,कायम सिंगल राहण्याचा निर्णय.
सिध्दू- स्टैंडप कॉमेडियन फ्रॉम हैदराबाद, तेलंगाणा, कमिटेड रिलेशनशिप मधे विश्वास असणारा..
दोघे एका कारणाने एकत्र येतात खरे पण त्यांचं प्रेम सिध्दू कडून एकतर्फी आहे असं वाटणारे,काय होईल शेवटी पहाता येईल सिनेमात..
हलकाफुलका सिनेमा आहे पण मोठ्यांसाठी...लहानांसमोर बघण्यासारखा विषय नाही...
चांगला आहे सिनेमा..

Dear friend मल्याळम नेटफ्लिक्सवर सबटायटल्स
आपल्या जवळच्या मित्रांबद्दल आपल्याला किती माहिती असते....Do we trust them because they are our friends, or are they our friends because we trust them?
सिनेमा फर्स्ट हाफ हलकाफुलका आहे..सेकंड हाफमधे खरा सिनेमा सुरू होतो..जेव्हा चार फ्रेंड्ससोबत राहणारा हसरा,खेळकर,नेहमी मदतीस तत्पर विनोद एक चिठ्ठी ठेवून घरातून निघून जातो...
ठिक आहे सिनेमा.. इमोशनल आहे...

क्युट आहे तो सिनेमा मिस शेट्टी मिस्टर पोलिशेट्टी.नायक नायिकेची खरी आडनावं.
नवीन पोलिशेट्टी चा वावर खूप क्युट आहे.त्याच्या साठी पाहिला.त्याचं पात्र आणि एकंदर जोक्स बघून राहुल सुब्रह्मानियन ची आठवण आली.ते दोघं एकामेकांबरोबर काम केलेले असल्याने पात्र त्याला विचारून डिटेलिंग केलं असेलही.

१.paramporul( the Almighty) तमिळ प्राईमवर सबटायटल्स
एक हजारो वर्ष जुनी दुर्मिळ मुर्ती,
एक भ्रष्ट पोलिस ऑफिसर,
एक बेरोजगार, बहिणीच्या इलाजासाठी पैशांची अत्यंत गरज असलेला तरुण..
दोघे मिळून दिडशे कोटी किंमत असलेली ती प्राचीन मूर्ती विकायचा प्लान करतात..त्यांची होणारी गडबड, कन्फ्युजन, थ्रीलींग आहे सगळं प्रकरण...गुंतवून ठेवणारा आणि शेवटी अनपेक्षित धक्का देणारा सिनेमा.. मस्त आहे ऐक्शन, थ्रीलर सिनेमा ..आवडला..

२.tatsama tadbhava कन्नड प्राईमवर सबटायटल्स
नवरा संजय मिसिंग आहे अशी कंप्लेन्ट घेऊन आरिका पोलिस स्टेशनवर येते तिथून सुरू होतो सिनेमा.. पोलीस इन्स्पेक्टर अरविंद तपास सुरू करतो..तपासा दरम्यान आरिका, तीचे सासरे,मेड सगळ्यांची चौकशी होत असते...आरिकाचे स्टेमेंट्स, इतरांचे जबाब कशाचा काही मेळ बसत नसतो..विश्वास ठेवावा तर कुणाकुणावर..तपासादरम्यान सीक्रेट्सचं जाळंच समोर पसरत जातं ..नक्की तथ्य कशात आहे..मस्त खिळवून ठेवणारा सायकोथ्रीलर सिनेमा..

१.Irugapatru तमिळ नेटफ्लिक्स सबटायटल्स
तीन जोडप्यांच्या तीन गोष्टी.
स्वतः च यशस्वी मैरीड लाईफ असलेली मैरेज कौन्सलर,
तीच्याकडे येणाऱ्या जोडप्यांच्या कहाण्या ऐकून स्वतःच्या अशा वैवाहिक जीवनात अडचणी येऊ नयेत म्हणून आतिकाळजीने वागणारी..
हलकाफुलका, इमोशनल, रिलेशनशिप वगैरे.. चांगला आहे सिनेमा..

२.Pulimada मल्याळम नेटफ्लिक्स सबटायटल्स
एक अविवाहित पोलीस ऑफिसर, कसंतरी लग्न ठरतं सगळे पाव्हणे रावळे येतात, लग्नाची गडबड गोंधळ..आनंद ओसंडून वाहणारा घोडनवरा सगळे चर्च मधे पोचतात आणी कळतं नवरी पळून गेली, त्यात नरभक्षक वाघ त्या एरियात फिरत असल्याची खबर येते..आता मोडून पडलेला, चिडलेला विन्स्टन काय करणार? चांगला आहे सिनेमा सस्पेन्स, थ्रीलर...

३.tiger nageswara rao तेलुगू प्राईमवर सबटायटल्स
१९७० मधे स्टुअर्ट पुरम असं एक चोरांचं गाव होत..त्यावर आधारित ऐक्शन पीरीऑडिक ड्रामा..
रवीतेजा एकदम सिरीयस रोलमध्ये... फुल्ल ऐक्शन सिनेमा.. ठिक आहे..

४.Rahasya हिंदी नेटफ्लिक्स
डॉक्टर आईवडिलांची एकुलती मुलगी घरातच म्रुत अवस्थेत सापडते..मर्डर मिस्ट्री इनवेस्टिगेशन... फास्ट मुवींग सिनेमा.. केके मेनन मस्त.. चांगला आहे.

५.Bhoomika मल्याळम नेटफ्लिक्स सबटायटल्स
चार जणांचा एक ग्रुप एका निसर्गाने नटलेल्या गावात एका प्रॉपर्टी चा सर्वे करायला जातो...तिथं स्ट्रेन्ज आणि भयावह गोष्टी समोर यायला लागतात..एक आत्मा त्यांच्या बरोबर संपर्क साधू पाहत असतो..
हॉरर,सस्पेन्स सिनेमा..बरा आहे.. खूप स्केअरी नाही..लहान मुलांसोबत पाहू शकतो.

६.Bhagwant kesari तेलुगू प्राईमवर सबटायटल्स
एक पोलीस ऑफिसर अपघातात मरण पावतो त्याच्या छोट्या मुलीचा सांभाळ आणि तीला आर्मीत भरती करण्याचं वचन मरता मरता हिरोकडून घेतो..हिरो म्हणजे बालक्रुष्णा एक कैदी असतो....
ऐक्शन, कॉमेडी सिनेमा.. चांगला आहे टाईमपास.. अचाट ऐक्शन सीन्स बघायला मिळतील..

७.Iraivan तमिळ नेटफ्लिक्सवर, हिंदीत.
अतिभंगार अतिबकवास,सुपरफ्लॉप तरी बघितला पूर्ण..तरुण मुलींना किडनैप करून मारणारा सीरीयल किलर आणि त्याला पकडायला धावणारा नायक पोलिस.
मला वाटलं लेडी सुपरस्टार नयनतारा काहीतरी मर्दानी राणी मुखर्जी सारखं करून दाखवेल पण सुरूवातीला दहा मिनटं दिसून नयनतारा गायब, मधेमधे जरा जरा येत होती..
नका बघू.

Hot star वर हिंदी डब कन्नूर स्कॉड देखील मस्त थ्रीलींग मूव्ही आहे .
विशेष म्हणजे सत्यकथेवर आधारित आहे .
केरळ राज्यात येवून गुन्हा करून पळालेल्या चार पाच गुन्हेगारांना केरळ चे स्कॉड देशभरात पाठलाग करून कसे पकडते ते पाहण्यासारखे आहे .

जुना सागरसंगम, youtube वर दिसला म्हणुन परत पाहिला.जुन्या style चा आहे पाय आपटून 50 गुंड हवेत उडवणे किंवा murder mystery वगैरे काही नाही तरी छान वाटतो. अमिताभ superstar च्या शिखरावर असताना त्याला कमाल हासनबद्दल विचारलं; तेंव्हा त्याच्यासारखे role आपल्याला मिळत नाहीत अशी खंत अमिताभने व्यक्त केली होती.

Jalikatu: Lilo Jose Pellisery ने direct केलेला हा चित्रपट पाहिला. अप्रतिम. ज्यांना त्याचे Churuli किंवा Angmaly Diaries हे आवडले असतील तर नक्की पहा. थोडासा वळृचा concept, but 100 times better. मला वळू अजिबात आवडला नव्हता.

सागर संगम छान आहे.

जालिक ट्टू मी बघायचा प्रयत्न केला पन इतके मीट शॉट्स आहेत. रक्ताळलेले मटन. हत्या प्राण्यआंच्या की बघवेना. पन पिक्चर छान आहे. असे ऐकले आहे.

सागर संगमम लिहा. Happy
मी बघावा म्हणुन सागर संगम शोधला आणि सुरू केला, वाटलं हिंदी डब्ड असेल, तर तो मिथुनचा निघाला Lol

मग आता सागर संगमम सापडला कमल हसनचा.

Pages