दाक्षिणात्य सिनेमा कसा वाटला.

Submitted by mrunali.samad on 9 March, 2023 - 06:23

या धाग्यात आपण तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी डब्ड/वीथ सबटायटल्स पाहिलेले सिनेमा, कसा वाटला,कुठे पाहिला याची चर्चा करू शकतो.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Mukhchitram प्राईमवर..तेलूगू, हिंदीत उपलब्ध
सस्पेन्स क्राईम सिनेमा.
एक प्लास्टिक सर्जन असतो..एका अपघातात त्याच्या x मैत्रिणी चा चेहरा खराब होतो..तो तीला स्वतः च्या बायकोचा चेहरा देतो..पुढे ट्वीस्ट्स आणि टर्नस येत राहतात..क्लायमॅक्स च्या कोर्ट रूम ड्रामा मधे तितकासा दम नाही वाटला.. बरा आहे सिनेमा..

nna thaan case kodu मल्याळम, हॉटस्टारवर हिंदीत उपलब्ध.
एक भुरटा चोर ज्याने दोन वर्षापासून चोरी सोडून दिली आहे..एके दिवशी रस्त्याने जात असताना MLA च्या घरा बाहेरून कंपाऊंड वॉल वरून आत उडी मारतो.. पोलीस येऊन त्याला घेऊन जातात..त्याच्या वर MLA च्या घरात चोरीचा आरोप येतो आणि केस फाईल होते..मग सुरू होतो चुरचुरीत, खुसखुशीत कोर्ट रूम ड्रामा, चोर स्वतः निर्दोष आहे हे सिध्द करण्यासाठी पुरावे, मजेशीर साक्षीदार गोळा करण्याच्या कामगिरी ला लागतो..त्यात येणाऱ्या अडचणी, कोर्टरूममधे होणाऱ्या गमती बघण्यासारख्या आहेत..शेवटी सत्य काय असतं आणि ते कसं समोर येतं पहा सिनेमात.

Soppana sundari तमिळ हॉटस्टारवर हिंदीत उपलब्ध
एका मिडल क्लास मुलीला लकी ड्रॉमधे १० लाखाची कार मिळते..पण त्यांचं सेलिब्रेशन जास्त काळ टिकत नाही.कारवर मालकी हक्क दाखवणारा मुलीचा भाऊ आणि कार बरोबर येणाऱ्या इतर अडचणी यातून नायिका मार्ग काढू शकेल? शेवटी कार कुणाला मिळणार पहा सिनेमात..
कॉमेडी थ्रीलर सिनेमा.

Mallikapuram मल्याळम, हॉटस्टारवर, हिंदीत उपलब्ध.
एक आठ वर्षाची मुलगी आणि तीचा छोटा दोस्त दोघेच एका गावातून बसने अय्यप्पाला भेटायला शबरीमला जायला निघतात.. मागावर व्हिलन पण असतो..मग हिरो पण येतो..
लहान मुलांची एक्टींग सुंदर आहे बाकी सिनेमा मला बोअर झाला.

Nanpakal Nerathu Mayakkam, (a beautiful nap in the afternoon. )
मल्याळम, नेटफ्लिक्सवर, हिंदीत उपलब्ध.
एक मल्याळम प्रवाशांची बस एका देवस्थानावरून परतीच्या प्रवासाला केरळला निघालेली असते..ऐन प्रवासात जेम्स (मामुट्टी) बस थांबवतो आणि तमिळनाडूतील गावातल्या एका घरी जातो जणू काही ते त्याचं गाव, त्याचं घर,त्याचं कुटुंब असल्याच्या आवेशात वावरतो..त्याची बायको,मुलगा,सहप्रवासी शोधत गावात येतात आणि हतबल होऊन जे होतंय ते पाहत वाट पाहत राहतात..नक्की काय प्रकार आहे पहा सिनेमात..
मामुट्टी ची एक्टिंग फारच छान.. गावातील नेत्रसुखद निसर्ग द्रुश्ये सुरेख..मला आवडला सिनेमा..

CBI-5 The brain, मल्याळम, नेटफ्लिक्सवर, हिंदीत.
फ्लाईट मधे अचानक एका मंत्र्याचा ह्दयविकाराच्या झटक्याने म्रुत्यु होतो..मग त्याच्या डॉक्टर चा मग एक पत्रकार आणि एका पोलिस ऑफिसरचा..केस सीबीआय कडे सोपवली जाते..मामुट्टी त्यांच्या पध्दतीने गुन्हेगार शोधून काढतो, कसा ? मोटिव्ह? सगळी गुंतागुंत पाहण्यासारखी आहे..
थोडा lengthy वाटू शकतो सिनेमा पण बोअर होत नाही..
सस्पेन्स, थ्रीलर.

Pathu thala तमिळ, प्राईमवर, सबटायटल्स
एक undercover पोलीस, एका पॉवरफुल गैंग लीडर पकडायला/मारायला त्याच्या गैंगमधे शिरतो..आणि विश्वासू पंटर बनतो..प्युअर ऐक्शन आणि थ्रीलर सिनेमा आहे..आवडत असेल तर बघू शकता.

Butta bomma तेलुगू, नेटफ्लिक्सवर, सबटायटल्स.
एका गावातील मुलीचा चुकुन एका रिक्षाड्रायव्हर ला कॉल लागतो.. गप्पा सुरू होतात आणि ती अनोळखी माणसाच्या प्रेमात पडते.. फर्स्ट हाफ सगळं व्यवस्थित सुरू असते गोष्ट टर्न घेते जेव्हा मुलगी त्याला भेटायला एकटीच वैजागला जाते..सेकंड हाफ ट्वीस्ट्स, थ्रीलर,अनप्रेडिक्टेबल..चांगला आहे.

Balagam (Strength) तेलुगू प्राईमवर सबटायटल्स.
गोष्ट आहे एका तेलंगाणाच्या छोट्या गावात अकरा दिवसात फ्युनरलमधे घडणारी...सिनेमात नायक,नायिका ,मुख्य पात्र कुणीही नाही.. सगळी पात्रं महत्त्वाची,रोजच्या जीवनात वावरणारी माणसं, गावातलं वातावरण, नात्यांमधले इगो, हेवेदावे छान चित्रित केले आहे..विषय अंधश्रद्धेचा आहे , घासाला कावळा का स्पर्श करत नाहीए, हि कन्सेप्ट चांगल्या हेतूने मांडली आहे...सुरूवातीला
विनोदी वाटणारा सिनेमा शेवटी शेवटी इमोशनल करतो..
सुंदर सिनेमा बघण्यासारखा.

virupaksha तेलुगू नेटफ्लिक्सवर सबटायटल्स.
सुरूवातीला : एका गावात एका ब्लैक मैजिक करणार्या जोडप्याला, गावकरी रंगेहाथ पकडतात आणि मारून टाकतात...त्यांच्या अकरा वर्षाच्या मुलाला गावातील एक भला माणूस हॉस्टेलमध्ये पाठवतो.
या घटनेच्या बारा वर्षानंतर त्या गावात गावकऱ्यांचे एका पाठोपाठ एक गुढ म्रुत्यु व्हायला लागतात..अख्खं गाव भीतीच्या छायेखाली वावरायला लागतं.
नायक या प्रकरणाचा छडा लावायची जबाबदारी घेतो आणि सत्य शोधून काढतो..(नायक हा चिरंजीवी चा कुणी नातलग आहे..तो सोडून बाकी सगळ्यांना अभिनय मस्त जमतो..)
सुपरनैचरल,हॉरर, मिस्ट्री सिनेमा..बरा आहे.

जुम्बलिका जुम्बलिका ... (ओरिजिनल तेलगु and not hindi)
किंवा
चिकू बुुकू रैैले...ह्या गाण्यांना ऑस्कर का नाही? असा विचार करतोय.

चिकू बुुकू रैैले...ह्या गाण्यांना ऑस्कर का नाही? असा विचार करतोय.>> मस्तच . माझे पण फेवरिट गाणे तेलुगु व तमीळ दोन्हीत.
जंटलमॅन सिनेमाची गाणी पण जबरद्स्त आवडलेली. आणी चंटीचा कोई मुकाबला नही. क्या गाने क्या गाने. तैलंपट्टी तालंपटी. आज सर्व परत ऐकण्यात येतील.

o अंतारा मावा oo oo पुष्पा -१ हे पण ऐका. haunting me.
अजून उर्वशी उर्वशी ,
मुक्काला मुक्काला ...तमिळ.
छैय्या छैय्या ...तमिळ.
काय गाणी आहेत एकेक.
मला अर्थ समजत नाही तरी ऐकत रहातो.

अजून उर्वशी उर्वशी ,>> मी हे सिनेमे ओरिजिनल रिलीज झाले तेव्हाच पाहिले आहेत. व तेव्हा गाणी सारखी लागायची. क्यासेटी घेतलेल्या आहेत.
उर्वशी माझे स्पॉटिफायचे मोस्ट हर्ड साँग होते लास्ट इअर. प्रभुदेवा काय होता तेव्हा. आणि विनोदाचे अंग लै भारी.
कादलन मधली गाणी ऐकली आहेत का? तेलुगुत प्रेमीकुडु. सर्वच लै भारी आहेत. माझे फेवरिट ओ चेलिआ. इतके रोमांटिक हळुवार पण कोणीतरी आपल्यासाठी गावे ही माझी फॉरेवर फँटसी आहे.
क्षण क्षणम ची पण गाणी फारच भारी तेव्हा. १९८९ मध्ये बहुतेक.

मी चेन्नईला १९९१ मध्ये ट्रेनिन्ग निमित्त गेले होते तिथे रस्त्यावर क्यासेट विकतात त्या स्टॉल वर चंटीची गाणी तेलुगुतून ऐकून फार होमसिक वाटले होते. आंध्रा/ तेलंगणा ची इतकी आठवण आलेली.

मी हल्ली हल्लीच दाक्षिणात्य गाणी डिस्कवर केली. आता तुम्ही सांगितलेली गाणी ऐकेन.
मी इ.स. पूर्व काळी तुथ्थु्कोडीला (तुतीकोरीन) होतो. तिथून तिरुनेलवेल्लीला जाऊन पिक्चर बघत असे.
तुम्हाला अप्रिशिएट होईल म्हणून सांगतो. सोमय्यााजुलुन्चा शंकराभरणं तिथे बघितला. मग गाण्याची कासेट विकत घेतली. तसाच जयाप्रदा आणि कमल हासन च एक भन्नाट पिक्चर बघितला. नाव नाही आठवत पण त्यात कमल हासनचे साउथ क्लासिकल डान्स होते. त्याला राष्ट्रपती काहीतरी अवार्ड मिळाले होते.
अवांतर तेव्हा कमल हासन हा कमाल हसन मुस्लीम वाटायचा.नंतर मित्राने चूक दुरुस्त केली.
थँँक्स अमा.

Rawanasura तेलुगू, प्राईमवर, हिंदीत उपलब्ध.
एका शहरात खून होत असतात
आणि खूनी लगेच सापडतात पण खून करणार्याला काही आठवत नसते..इनवेस्टिगेट करणाऱ्या पोलिस ऑफिसर ला एक ज्युनिअर वकिल (रवीतेजा) वर संशय असतो..वेगवान कथानक, मर्डर मिस्ट्री,वायोलंस.. चांगला आहे सिनेमा.. रवीतेजा मस्त.

सोमय्यााजुलुन्चा शंकराभरणं तिथे बघितला. मग गाण्याची कासेट विकत घेतली. तसाच जयाप्रदा आणि कमल हासन च एक भन्नाट पिक्चर बघितला. नाव नाही आठवत पण त्यात कमल हासनचे साउथ क्लासिकल डान्स होते. त्याला राष्ट्रपती काहीतरी अवार्ड मिळाले होते.
अवांतर तेव्हा कमल हासन हा कमाल हसन मुस्लीम वाटायचा.नंतर मित्राने चूक दुरुस्त के>> आता काय सांगावे, शंकरा भर णम ची गाणी मी पाठ केलेली एके काळी. सर्व च फार सुरेख व अवघड आहेत. ऑल टाइम फेवरिट अल्बम. आज ऐकायला मोठीच लिस्ट दिली आहे तुम्ही.
कमला हासन चे पिक्चर स्वाथी मुत्यलु , सागर संगम म असे असतील दोन्ही एक च आहेत की काय ते आता आठवत नाही. एकात कमल क्लासैकल डान्सर असतो. असेच बघुन शिकलेला गरीब माणूस आई विधवा व एका सीन मध्ये ती लग्न कार्यालयात मागे भाजी चिरत असते तिथे तो नाचतो तो सीन फार भारी आहे. ह्या च सिनेमात बहुतेक वैतागून विहिरीच्या कडेवर पण नाचतो. हि इज अमेझिंग अ‍ॅज अ‍ॅन अ‍ॅक्टर.

जुने तेलुगु नट सरथ बाबू परवाच वारले ७१ वय होते.

कमल चे स्वासमे स्वासमे गाणे जरुर ऐका ठेका धरालच. जबरी रोमांटिक आहे.

इश्वरन/ इश्वर सिनेमात पण एक सीन आहे त्यात आई व सात आठ वर्शाचा मुलगा असे निराधार जोडी असते. तर साउथ मध्ये देवळात प्रसाद मिळतो तो भात दोघांचा एका द्रोणात करून आई मुलाला देते हा सीन बघितला तर अगदी गहिवरुन येते. देवळातील प्रसाद टॅमरिन्ड राइस हो तो.
बिचार्‍या पोराचे पोट भरते हा सीन लेखक दिग्दर्शक विचार करुन घालतात हेच मला फार भारी वाटते. आजकाल गरीबाचे लाइफ दिसतच नाही सिनेमात. सर्व आलिशान नाहीतर गुन्हेगारी. पण क्वालिटी नाही.

सागर संगम असणार.
स्वासमे स्वासमे ऐकल. रोमांटिक आहे.
पण सध्या माझा ए आर रेहमानचा मूड आहे. हा धागा साउथ साठी असल्यामुळे जास्त लिहिणार नाही.

स्वातीमुथ्थम म्हणजे हिंदीतला ईश्वर

सागर संगमम - कमल हसन क्लासिकल डान्सर असतो. सुरूवातीला दारूच्या आहारी गेलेला पत्रकार एका क्लासिकल डान्सरच्या चुका काढतो. तो सिनेमा. विहीरीवरच्या पाईपवर दारू पिऊन केलेला डान्स !

Moondram Pirai (सदमा)
कमल हासन आणि श्रीदेवी. Maximam movie.
एका प्रेक्षकाने लिहिलेला रिव्यू
After I watched this Moondram pirai movie I became fan of Kamal Hassan and sridevi.Kamal Hassan is the legend of Tamil cinema and we are very proud to have Kamal Haasan.This is the best Film in tamil cinema until Kamal Haasan's Nayakan release.This is the first time he got national award. This is the best romantic drama movie. Whenever I saw this climax I started crying such a amazing movie

कमल हसनचा अजून एक उत्कृष्ट सिनेमा म्हणजे..
Anbe sivam
दोन माणसं, एक तरूण आणि उध्दट (आर.माधवन), दुसरा शारीरिक व्यंग असलेला पण मनानं खंबीर(कमल हासन).. दोघंही एका अवघड परिस्थितीत अडकतात..परिस्थिती कडे बघण्याचा दोघांचा विरुद्ध टोकाचा द्रुष्टीकोन पण नियतीने त्यांना एका अद्रुश्य धाग्याने बांधलेले असते...
प्राईमवर आहे..

प्राईमवर आहे.>>>
गरिबी मुळेे कुठल्याही पलटफार्म वर नाही.
यू ट्यूबवर आहे का बघतो.

mrunali.samad
आभार. अनेकवार आभार. आता बघतो.

Anbe sivam
हिंदी आवृत्ती पाहिली.
चांगला आहे. पहिला अर्धा तास नक्की काय चालले आहे ते समजत नव्हते, पण उत्तर-अर्ध चढत्या क्रमाने सुंदर होत जातो.

थिरुडा थिरुडा (चोर चोर) हिंदी डब्ड् बघितला. ओके आहे. थ्रीलर आहे. मधून मधून विनोद आहेत. अनु आगरवालच काम आहे.
मी मुळात सिनेमा बघितला तो Konjam Nilavu या तमिळ गाण्यासाठी टेरिफिक हॉंंटिंग आहे. ए आर रेहमान द ग्रेट.
गाण्याची ही घ्या लिंक
https://www.youtube.com/watch?v=Uj_18hXo5G0&ab_channel=APInternational

Konjam Nilavu या तमिळ गाण्यासाठी टेरिफिक हॉंंटिंग आहे. ए आर रेहमान द ग्रेट.>>>> +११ जबरदस्त गाणं आहे हे.

Ela veezha poonchira मल्याळम, प्राईमवर, सबटायटल्स.
सुधी आणि मधु, दोघे पोलिस ऑफिसर्स एका हिलटॉपवर वायरलेस पोलिस स्टेशन मधे ड्युटीवर असतात.. मुसळधार पाऊस ,कडाडणार्या वीजा आणि त्यांना मिळणारा मेसेज कि इलावीजापुंचिरा गावात जागोजागी मानवी अवयव सापडत आहेत..कोण?का?कुणी? कशी सॉल्व होणार हि मिस्ट्री पाहा सिनेमात.. अप्रतिम निसर्गद्रुश्ये..
क्राईम, थ्रीलर, मिस्ट्री सिनेमा.

थिरुडा थिरुडा (चोर चोर) हिंदी डब्ड् बघितला. ओके आहे. थ्रीलर आहे. मधून मधून विनोद आहेत >>>>

दिग्दर्शक म्हणून मणी रत्नम आणि स्टोरीरायटर म्हणून राम गोपाल वर्मा.

हे कॉम्बिनेशन मग रामू च्या तेलगू सुपरहिट गायम मध्ये रिवर्स झालं. .

Pages