Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनिंद्य , कुरडई ची भाजी साठी
अनिंद्य , कुरडई ची भाजी साठी कुरडई गरम पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवली होती . त्यामुळे ती नूडल्स प्रमाणे मोकळी आणि सुट्टी झाली . अगदी शेवया च्या उपम्या सारखी लागत नाही कारण गहू कुरडई थोडी आंबट चव असते.
बाकी कृती फार वेगळी नाही . नेहमीची तेलातील मोहरी, हिंग , हळद घालून फोडणी केली. त्यात कांदा आणि हिरवी मिरची घातली . जरासे परतल्यावर त्यात कुरडई घातली. झाकण ठेवून एक वाफ आणली.
(No subject)
मिसळ भाकरी
अरे वाह मिसळ भाकरी कॉम्बिनेशन
अरे वाह मिसळ भाकरी कॉम्बिनेशन कधी खाल्ले नाही..
चपाती सोबत मिसळ खातो आणि आवडते.
किंबहुना कुठल्याही रस्सा भाजीत फरसाण टाकून चपाती सोबत खायला आवडते.
झाल्यास दही सुद्धा टाकतो त्यात..
@अनिद्य ,
@अनिद्य ,

अश्विनीने कुरडई भाजीची रेसिपि दिलिच आहे ...तुमच्या शन्केप्रमाणे ही भाजी अजिबात स्लाईमी किवा गिचका गोळा होत नाही..पाण्यातुन काढुन कुरडई थोड्यावेळ निथळत ठेवायची..मी पण शाळेत न्यायची ही भाजी...मला नुसती खायलाच जास्त आवडते.
@ अश्विनी११,
@ अश्विनी११,
Thanks for short recipe
@ प्राजक्ता
Thanks for this pictorial evidence of “non-gichka” kurdai bhaji. Will try soon.
केया,
केया,
विठाई नाव कळालं
पण जरा कुठे आहे , कुठून कसे जाउ ते ही सांगा की.
मिसळ फोटो?
धनि काळा मसाला स्पेशल मिसळ एकदम नाक कान तोंड जाळ निघत असणार.
अश्विनी 11 वेगवेगळ्या रेसिपी आणत आहेत
मानव, मिसळ भाकरी छान.
पण जरा कुठे आहे , कुठून कसे
पण जरा कुठे आहे , कुठून कसे जाउ ते ही सांगा की.
मिसळ फोटो?>>>उभ्या मारुती चौकात आहे हॉटेल..सकाळी ch जायचं..
फोटो गडबडीत काढायचा राहिला
मिसळ भाकरी idea आवडली.. कुरडई भाजी कधी केली नाहीये..छान दिसते आहे.
संगमनेर ला भाऊ असतो , त्याला
संगमनेर ला भाऊ असतो , त्याला मसाला आणायला सांगेन . काळया मसाल्याची दिसतेय. >> चंदन चे बरेच मसाले असतात. त्यांचा एक झटका म्हणून मसाला आहे. तो पण मसालेदार भाज्यांना चांगला वाटतो.
कुरडईची भाजी. फार आवडती
कुरडईची भाजी.
फार आवडती
उभा मारुती चौक? कोल्हापूर?
उभा मारुती चौक?
कोल्हापूर?
हो..माहीत नाही का...अर्ध्या
हो..माहीत नाही का...अर्ध्या शिवाजी पुतळा पासून जवळ आहे..google वर नक्की सापडेल....
कोबीची भाजी, वांग्याचं कालवण
कोबीची भाजी, वांग्याचं कालवण ,चपाती ,डाळ भात आणि शो स्टॉपर आमरस .
(No subject)
मेनू भारी आहेच..
मेनू भारी आहेच..
पण फोटो अगदी प्रो आला आहे..
सिमरनची थाळी मस्त दिसते आहे
सिमरनची थाळी मस्त दिसते आहे एकदम.
मस्तच दिसतेय थाळी आणि आमरस
मस्तच दिसतेय थाळी आणि आमरस ही सिमरन..
वांग्याचं कालवण म्हणजे काही
वांग्याचं कालवण म्हणजे काही वेगळी रेसिपी आहे का?
कातील फोटो!
कातील फोटो!
सिमरन मस्त. केळीच्या
सिमरन मस्त. केळीच्या पानासारखी प्लेटपण सुरेख आहे.
थँक्स सगळ्यांना .
फोटोतून का होईना आमरस पोचला सगळीकडे याचाच आनंद आहे
थँक्स सगळ्यांना .
थँक्स सगळ्यांना .
वांग्याचं कालवण म्हणजे काही वेगळी रेसिपी आहे का?>>>>रेसिपी वेगळी अशी नाहीं आपली तीच नेहमीची चटणी कूट घालून केलेली.
चटणी? रेसिपी सांगा ना प्लीज!
चटणी? रेसिपी सांगा ना प्लीज!
चटणी म्हणजे वर्षभरासाठी
चटणी म्हणजे वर्षभरासाठी वापरतो कोल्हापुरी चटणी ज्याला कांदा लसूण मसाला असंपण म्हणतात . त्याची रेसिपी माबोवर असेलच शोधून टाकते .
कांदा लसूण मसाला माहिती आहे
कांदा लसूण मसाला माहिती आहे मला.
मी त्या वांग्याच्या भाजीची रेसिपी म्हणते आहे.
वांग बटाटा उभ्या फोडी करून
वांग बटाटा उभ्या फोडी करून 2टेबलस्पून चमचे तेलावर दोन तीन मिनिटं मिडीयम गॅस वर परतून घ्यायचं, मग हवं असल्यास टोमॅटोच्या फोडी टाकायच्या (मी टाकते) त्याही जरा परतून त्यावर 1 चमचा कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद आणि चवीपुरते मीठ घालून तेही थोडंसं परतायचं मग लगेच चार वाट्या पाणी टाकायचं (जास्त पातळ कालवण हवं असेल तर अजून 2 वाट्या पाणी घालू शकता) वांगी शिजताना पाणी आटतं , झाकण ठेवून वांग बटाटा शिजतात, दहा पंधरा मिनिटांत शिजले की त्यात चार टीस्पून भाजक्या शेंगदाण्याचं कूट घालायचं ,मिक्स करून कालवण तयार 2 मिनिटांनी गॅस बंद करायचा. (वांग थोडं थपथपित( जसं फोटोत आहे) हवं असल्यास पाणी कमी करू शकता पण कूट कमी करायचं नाही उलट जास्त झालं तरी चालते भरल्या वांग्या सारखे लागते.
धन्यवाद सिमरन, छान आहे रेसिपी
धन्यवाद सिमरन, छान आहे रेसिपी. मी करून बघीन.
थोडी वेगळी पण आहे. मी भरले वांगे किंवा साधी परतलेली वांगी बटाट्याची सुकी भाजी करते, असे कालवण नाही. भातावर छान लागेल.
मस्त सोपी रेसीपी आहे.
मस्त सोपी रेसीपी आहे.
Pages