Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ 
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या 
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्पे (गुंतपांगलु) छान दिसत
अप्पे (गुंतपांगलु) छान दिसत आहेत, विशेषतः रंग.
शेवयाच्या खिरीचे टेक्स्चर मस्त! नाहीतरी शेवयाची खीर मला आवडतेच.
homemade apple pie cake बद्दल काय लिहू? So perfect, looks like AI generated image!
धन्यवाद लोकहो , तुमचे कौतुक
धन्यवाद लोकहो , तुमचे कौतुक पोहोचवते मुलीपर्यंत ! सध्या food styling आणि baking आवडते आहे तिला.
फारच सुंदर केक अश्विनी . अगदी
फारच सुंदर केक अश्विनी . अगदी प्रो.
जबरी आहे पाय केक..एकदम
जबरी आहे पाय केक..एकदम प्रोफेशनल वाटतो आहे.
जुई सगळ्या डिशेस मस्त.
जुई सगळ्या डिशेस मस्त. नैवेद्य ताट्रे पण छान
अश्विनी कसला भारी दिसतो आहे
अश्विनी कसला भारी दिसतो आहे तो केक. सुंदर आकार आणि texture पण एकदम प्रोफेशनल दिसत आहे..कसा बनवला आहे एकदम भारी
मिसळ भाकरी आणि गाजर का हलवा..
मिसळ भाकरी आणि गाजर का हलवा...
जेवण घेतले आणि लाईट गेली
अरे वा,कंदील लाईट डिनर
अरे वा,कंदील लाईट डिनर
फोटोजेनिक फोटो आहे एकदम.
हा आमचा गुरुवारचा डिनर पालक पनीर, वाटाणा रस्सा,वरण भात पोळी आणि केसरी(शिरा).

ज्वारीचे डोसे
ज्वारीचे डोसे

कुळथाच माडगं
कुळथाच माडगं

मिसळ भाकरी मस्त.
मिसळ भाकरी मस्त.
सिमरन, ताट भारी आहे. बघूनच भूक लागली.
सर्व नवीन एन्ट्रीज
सर्व नवीन एन्ट्रीज = 👌
व्वा! कुणी कंदीलाच्या उजेडात
व्वा! कुणी कंदीलाच्या उजेडात जेवतंय, कुणी केळीच्या पानावर जेवायला वाढतंय, कुणी ज्वारीचे डोसे करतंय, कुणी कुळथाचं माडगं ओरपतंय ...
मज्जा चाललीये या धाग्यावर!
कुळथाच माडगं ... म्हणजे पिठीच
कुळथाच माडगं ... म्हणजे पिठीच का की काही वेगळे असते? पिठीपेक्षा पातळ दिसत आहे.
ऋतुराज, या दोन्हीची पाकृ द्या
ऋतुराज, या दोन्हीची पाकृ द्या ना..
माडग माझ्या आजीचे खूप आवडते होते, तिची आठवण करून दिलीस.
माडग म्हणजे सुप सारख असाव !
माडग म्हणजे सुप सारख असाव !
सगळ्याचे फोटो मस्त.
नो उपवास साबुदाणा खिचडी
नो उपवास साबुदाणा खिचडी
सर्व नवीन डिशेस मस्त !!
सर्व नवीन डिशेस मस्त !! ज्वारीचे डोसे ना जाळी मस्त पडलीय. पिठाचे प्रमाण देता येईल का ?
पिठाचे प्रमाण देता येईल का ?
पिठाचे प्रमाण देता येईल का ?
दोन वाट्या ज्वारीच्या पिठात चार चमचे तांदुळाचे पीठ टाकून पाण्यासारखे (नीर डोश्याइतके) पातळ करून दहा मिनिटे ठेवावे. त्यात बारीक कांदा, टोमॅटो, शिमला मिरची कोथिंबीर, मीठ आवडीप्रमाणे टाकावे.
यासाठी अगदी भरवशाचा, राबलेला तवा किंवा चांगला नॉन स्टिक तवाच वापरावा. हे खूप महत्त्वाचे आहे.
याची जरा वेगळी रेसिपी संज्योत कीर याची आहे.
मी पण कालच पाहिली ही रेसिपी
मी पण कालच पाहिली ही रेसिपी https://youtu.be/5kMtIm6H0e4?si=xbSOG2faaSgMGOo2
तो सुरीने डोसा किती कुरकुरीत आहे ते दाखवतो त्यानेच भूक चाळवते.
ऋतुराज तुमचाही डोसा चटणी टेम्पटींग दिसतेय.
भरवशाचा, राबलेला तवा किंवा चांगला नॉन स्टिक तवाच वापरावा. हे खूप महत्त्वाचे आहे.>>हीच मेन टीप आहे.
पोह्यांची खीर
पोह्यांची खीर


कालचा नैवेद्य- भोपळ्याची भाजी ,तांदळीची भाजी,खोबर्याची चटणी ,भरलेल्या मिरच्या, वरण ,भात ,पोळी आणि खीर
सिमरन, नैवेद्याचे ताट मस्तच.
सिमरन, नैवेद्याचे ताट मस्तच.
पोह्यांची खीर तर एकदम pro.
चारोळ्या बऱ्याच दिवसांनी पाहिल्या.
पोह्यांची खीर रेसिपी देता का?
पोह्यांची रेसिपी एकदम सोपी
पोह्यांची खीर एकदम सोपी आहे. 1 वाटी पोहे पाण्यात धुवून दुधात किंवा पाण्यात बूडतील इतके ५ मिनिटे भिजवून मिक्सरमध्ये एकदा घुर्र करून घ्यायचं मग अर्धा लिटर दुधात साखर आणि ते मिश्रण पातेल्यात गॅस वर ठेवून ढवळत राहायचं मग त्यात दोन चमचे तूप टाकायचं फिरनीपेक्षा थोडं पातळ टेक्श्चर आलं की त्यात वेलची पूड आणि जे काय द्रायफ्रुटस असतील ते घालायचे .थंड झाल्यावर खीर घट्ट होते आणि थंड जास्त छान लागते .शिऱ्या पेक्षाही कमी वेळात लगेच ही खीर तयार होते.
वाह मस्तच !
वाह मस्तच !
मी चारोळ्या बघूनच खुष झालो
खीर नावडत्या पक्षात, पण भरलेल्या मिरच्या आणि चारोळ्या बघून खुष झालो
वॉव! पोह्यांची खीर! करून
वॉव! पोह्यांची खीर! करून पाहायला हवी. नैवेद्याचे ताट मस्त दिसतंय.
नैवेद्याच ताट एकदम मस्त.
नैवेद्याच ताट एकदम मस्त..पोह्य्चाची खिर पहिल्यादाच एकली..करुन पाहिल आता !
नैवेद्याच ताट एकदम मस्त >>>
नैवेद्याच ताट एकदम मस्त >>> १००++
मागच्या फोटोला दोन महिने झाले
तांदळीची भाजी ?
काय असते ?
पोकळा आणि तांदळा एकच का ?
नवैद्याचे ताट एकदम मस्त.
नवैद्याचे ताट एकदम मस्त.
पोह्यांची खीर जरा एकझॉटिक करायची असेल तर नारळाच्या दुधात करायची, साध्या दुधापेक्षा वेगळी आणि छान लागते.
क्रिस्पी कॉर्न आणि ग्लास दोन्ही फारच छान
Pages