Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ 
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या 
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जमलीय मिसळ.
जमलीय मिसळ.
मी पण यादीत घेतली आहे. या आठवड्यात करेन केव्हातरी.
मिसळ आमच्याकडे ठरवून कधी केली
मिसळ आमच्याकडे ठरवून कधी केली जात नाही...
फरसाण आहे, उसळ करू का?
किंवा
उसळ आहे, फरसाण मागवू का?
यातला एखादा मुहूर्त जुळावा लागतो
मिसळ आणि इतर सगळे फोटो जबरी
मिसळ आणि इतर सगळे फोटो जबरी आहेत.
ह्या धाग्यांचा निषेध करायला हवा
आमची वजनं वाढवण्यासाठी हा नक्की कारणीभूत आहे.
आमची वजनं वाढवण्यासाठी हा
आमची वजनं वाढवण्यासाठी हा नक्की कारणीभूत आहे. >
ऋतुराज, असं म्हटल की आपण खायला मोकळे.
हो ना आर्च.
हो ना आर्च.
असं म्हटल की आपण खायला मोकळे
असं म्हटल की आपण खायला मोकळे >>
अनिंद्य.. मिसळ मस्त दिसते आहे
अनिंद्य.. मिसळ मस्त दिसते आहे. मिसळ आमच्याकडे अगदी आवडता प्रकार आहे. आमचा विचारही चालला होता करायचा
पण मग साबुदाणा खिचडी जिंकली.
या धाग्यामुळे बरेच प्रकार करून होतात. कैरी भात झाला, सा खी झाली. आता मिसळ पण होईलच
आता मिसळ पण होईलच…
… मी पण यादीत घेतली आहे. …
… आता मिसळ पण होईलच… ..
झकासराव यांच्या फोटोचा इफेक्ट 😄
फोटोचा इफेक्ट >> १००%
फोटोचा इफेक्ट >> १००%
पाणीपुरी .
पाणीपुरी


.
अरे हे पाणीपुरीचे पदार्थातील
अरे हे पाणीपुरीचे पदार्थातील रंग सेम आमच्या घरच्यासारखे आले आहेत
इथल्या पोस्टी फोटो पाहून आता
इथल्या पोस्टी फोटो पाहून आता आम्ही पण मिसळ करणार.
जुई, एवढ मांडून फोटो काढेपर्यंत धीर कसा धरला?
पापु मस्तच
आता मिसळ पण होईलच >>> लगेच
आता मिसळ पण होईलच >>> लगेच करूया
पाणीपुरी
ऋतुराज खरंतर मी फोटो
ऋतुराज खरंतर मी फोटो काढेपर्यंत घरच्यांनाच पेशन्स नव्हता
rmd थँक्यू
ऋन्मेऽऽष तुमच्या घरच्या पाणीपुरीला सेम पिंच...
आता मिसळ पण होईलच >>> लगेच
आता मिसळ पण होईलच >>> लगेच करूया >> केली केली .. मिसळ
संगमनेरचा मसाला आणि गणेशचे फरसाण = जबरदस्त मिसळ ! झकासरावांच्या फोटो मुळे
मस्त दिसतेय!
मस्त दिसतेय!
मी मटकी भिजायला घालायलाच विसरतोय परवा पासून.
आताच भिजायला घालतो, रविवारी करतो.
जुई k तुमच्या रेसीपी ne
जुई k तुमच्या रेसीपी ne ओल्या काजू चि भाजी केली मस्त झाली होती . धन्यवाद रेसिपी करता .

धनी च्या मिसळीचा रन्ग अगदी
धनी च्या मिसळीचा रन्ग अगदी हॉटिलच्या मिसळिचा आलाय...चन्दन मसाला झटॅक असावा.
निमिष, मिसळ मस्तच !! संगमनेर
निमिष, मिसळ मस्तच !! संगमनेर ला भाऊ असतो , त्याला मसाला आणायला सांगेन . काळया मसाल्याची दिसतेय.
नवीन वाळवणाचे पदार्थ घरी आले
नवीन वाळवणाचे पदार्थ घरी आले . त्यामुळे उरलेल्या कुरडई ची भाजी करून जुने संपवले.

मिसळ, काजू दोन्ही अगदी झणझणीत
मिसळ, काजू दोन्ही अगदी झणझणीत दिसत आहेत.
कुरडई भाजी आवडीची. ऑफिसमध्ये एक मित्र वरचेवर आणतो निम्म्याहून अधिक मीच संपवतो
झकास! मिसळ आणि पाणिपुरी
झकास! मिसळ आणि पाणिपुरी म्हणजे माझा वीक पॉईंट!
रोज रोज येउन, एक से बढकर एक पदार्थांचे फोटोज पाहुन रसना चाळवुन घेण्यापेक्षा आता फक्त जुम्मे के जुम्मे ह्या धाग्यावर यायचे ठरवले आहे. म्हणजे सोमवार ते गुरुवार दरम्यान आलेल्या एंट्रीजमधुन दोन-तीन पदार्थ शॉर्ट्लिस्ट करुन विकेंडला त्यांचा आस्वाद घेता येईल 😀
>>"कुरडई ची भाजी ?">>
रेसिपी प्लिज....
मागे एकदा घरी एकटा असताना एकाच्या शिफारशीवरुन 'भाजणीचा ढोकळा' करुन पाहिला होता! हा पदार्थ नॉर्मल ढोकळ्याप्रमाणे छान हलका आणि जाळीदार झाला होता पण त्याची चव मात्र मला अजिबात आवडली नाही! भाजणीचे पदार्थ भाजुन किंवा तळुनच चांगले लागतात असे माझे वैयक्तीक मत.
मिसळ ! झकासरावांच्या फोटो
मिसळ ! झकासरावांच्या फोटो मुळे …
धनी = लोभबळी क्र. २ 😀
काळा मसाला दिसतोय.
आता मानव यांच्या मिसळ फोटोज् ची प्रतीक्षा
भाजणीचे पदार्थ भाजुन किंवा
भाजणीचे पदार्थ भाजुन किंवा तळुनच चांगले लागतात…
+ १
@ कुरडईची भाजी
नाविन्यपूर्ण
प्र. क्र. १ : चव शेवयांच्या उपम्यासारखी लागते काय?
प्र. क्र. २: कुरडयांचा चुरा / गिचका होऊ न देणे कसे जमवतात ?
प्र. क्र. ३: फायनल प्रोडक्टचे टेक्स्चर slimy असते का ?
Enlighten me please !
"मिसळ ! झकासरावांच्या फोटो
"मिसळ ! झकासरावांच्या फोटो मुळे …"
अर्थातच... आता उद्या-परवा करावीच लागणार! (हा पदार्थ मला आता उत्तमप्रकारे बनवता यायला लागलाय 😍)
मटकीची मात्र नाही आवडत, मजेदार मिसळ ही हिरव्या वाटाण्याचीच!
अमुपरी छान दिसतेय भाजी..
अमुपरी छान दिसतेय भाजी..
हिरव्या वाटाण्ञाची मिसळ -
हिरव्या वाटाण्ञाची मिसळ - पहील्यांदा ऐकले.
मूग, मटकीची माहीत आहे.
चला त्या मिसळीच्या।फोटोचं
चला त्या मिसळीच्या।फोटोचं सार्थक झालं

धनी आणि झकास चा फोटो बघून आज
धनी आणि झकास चा फोटो बघून आज मिसळ केली ..आमच्या कोल्हापुरी style ने..no misal masala विकतचा...
झकासराव...विठाई ची try केलीय का मिसळ..नसेल तर नक्कीच जा.. लय भारी आहे..कट वडा पण अप्रतिम असतो तिथला..
बिनफोटोची मिसळ!
बिनफोटोची मिसळ!
म्हणजे एकदम जबरी झाली असणार, फोटो काढायचे भानही नाही.
Pages