Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ 
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या 
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कैरीच्या भाताची रेसिपी कुठे
कैरीच्या भाताची रेसिपी कुठे आहे धनि/ अश्विनी. कैऱ्या आहेत घरी.
झकासराव, मिसळ जबरदस्त दिसतेय. झणझणीत एकदम. माझी मशिनगन तर तुमचा बॉम्ब आहे.
इथे अश्विनी ने टाकली आहे.
इथे अश्विनी ने टाकली आहे.
https://www.maayboli.com/node/86304?page=10
थॅंक्यू धनि.
थॅंक्यू धनि.
कैरी भाताची मूद सुंदर आहे धनि
कैरी भाताची मूद सुंदर आहे धनि. झकासराव मिसळ झणझणीत दिसतेय. कसा रंग येतो कळतच नाही.
कैरी भाताची मूद सुंदर आहे धनि
कैरी भाताची मूद सुंदर आहे धनि. झकासराव मिसळ झणझणीत दिसतेय.>> +१
जुन्या माबोत असेल एक रेसिपी.।
जुन्या माबोत असेल एक रेसिपी.।
लालू आयडी ह्यांनी लिहिलेली.
शोधाशोध करावी लागेल.
त्यांनी लिहिलेल्या रेसिपीने तंतोतंत प्रमाण पाळत केले तर मिसळ चव, रंग, कट सगळं परफेक्ट येत असणार.
मी फोटो टाकलाय ती मात्र रेडिमेड.
वडे, मिसळ, भेळ, समोसे असले पदार्थ घरी त्या चवीचे होत नाहीत.
रेसिपी शोधत गेलो आणि सापडली.
लालू ह्यांनी नवीन माबोत परत टाकली होती त्यामुळे सहजरीत्या सापडली.
https://www.maayboli.com/node/2596
इथे बघा वाचा करा फोटो टाका
भोपळ्याचे तिखट वडे
भोपळ्याचे तिखट वडे


इडली आणि पोडी इडली
Bite size पोडी इडली
Bite size पोडी इडली = 👌
भोपळ्याच्या तिखट वड्यात तिखट
भोपळ्याच्या तिखट वड्यात तिखट घातले आहे की oli mirchi?
अनिंद्य थॅन्क्स
अनिंद्य थॅन्क्स कृपया तुमची विपु बघाल का?
देवकी हिरवी मिरची टाकली आहे आणि कोथिंबीर चिरून
वाह भोपळ्याचे वडे.. बदाम
वाह भोपळ्याचे वडे.. बदाम बदाम बदाम
या वड्यांना जो एक सुवास असतो तो फार आवडतो.
(No subject)
रित्झ क्रॅकर ची शेवपुरी


रेड्पेपर्,कोन्थिबिर्,कन्दा,मिरची आणी फेटा चिझ घालुन ऑमलेट आणी मल्टिग्रेन ब्रेड मुलिने बनवुन दिल.
बुका दि बेपो मधे विकेन्डला इटालियन खाण फ्रेश गार्लिक पार्मेझान ब्रेड्,पास्ता-पेने अल व्होडका आणी चिकन पार्मेझाना.
सॅलेडचा फोटो राहिला.
वाह.. भारी
वाह.. भारी
प्राज क्ता देखणे मेन्यूज्
प्राजक्ता देखणे मेन्यूज्
सगळेच मेन्यू भारी आहेत.
सगळेच मेन्यू भारी आहेत.

-----
एग आंबोळी.
अंडे आणि आंबोळी पीठ?
अंडे आणि आंबोळी पीठ?
कधी आंबोळी सोबत अंड्याचा कुठलाच प्रकार खाल्ला नाही. कसे लागत असेल हे इमॅजिन करायचा प्रयत्न करत आहे..
दिसायला मात्र मूग डाळ डोसा सारखे दिसत आहे. ते आवडतात.
हो, आंबोळीच्या पिठात दोन
हो, आंबोळीच्या बॅटरमध्ये दोन अंडी फेटून घातली वेळेवर.
छान लागते.
ओके एग डोसा, एग उत्तप्पा
ओके एग डोसा, एग उत्तप्पा अश्या नावाने काही रेसिपी शोधल्या...
उत्तप्पामध्ये अंडे डायरेक्ट मिक्स करून आणि डोशामध्ये तव्यावर पीठ पसरवल्यावर त्यावर अंडे फोडून असे दोन्ही व्हेरिशन करून बघायला हवेत.
फक्त आधी त्या दुसऱ्या धाग्यावर जाऊन जाणकारांकडून हे विरुद्ध अन्न तर नाही ना हे कन्फर्म करावे लागेल
Yeah. Body gotta be always
Yeah. Body gotta be always careful.
Mybody ain't so.
डोशामध्ये तव्यावर पीठ
डोशामध्ये तव्यावर पीठ पसरवल्यावर त्यावर अंडे फोडून >>> हे अतिशय भारी लागतं. नक्की करून पाहा. अंड्यावर थोडं तिखटमीठ टाकलं तर अजून भारी लागतं
मापृ, एग आंबोळी भारी दिसतेय
प्राजक्ता, सगळे मेनू तोंपासु
प्राजक्ता, सगळे मेनू तोंपासु
प्राजक्ता, सगळे मेनू तोंपासु >>> १००++
आज पुन्हा एकदा काजूची भाजी
आज पुन्हा एकदा काजूची भाजी बनवली...

संपला आता ओल्या काजूचा सीझन..
प्राजक्ता, जुई मस्त.
प्राजक्ता, जुई मस्त.
एग आंबोळी सारखे मी ओटमीलचे उत्तपे पिठात अंडं घालून करते. क्विक ओट मिक्सर मधे भरडून घेऊन सगळं घालायचं.
धन्यवाद!
धन्यवाद!
चिकन करी आणी डोसे पण फार भारी लागतात...डोसे अगदी पातळ पेपर सारखे न पसरवता किचित जाड पसरावयचे.
आन्बोळे आणी काजुची भाजी लिस्ट वर आहेत...आन्बोळ्याच पिठ करतेच आता जागुच्या रेसिपिने
ओल्या काजुच्या भाजिला मात्र योगच यावा लागेल..
वरचे भोपळ्याचे वडे एक नबर दिसतायत..पोडि इडली पण छान..गरम वाफाळती इडली त्यावर साजुक तुप आणी पोडी पसरवुन गरम गरम खायचे.
किसलेली काकडी कैरी आणि बारीक
किसलेली काकडी कैरी आणि बारीक चिरलेला कांदा घालून केलेले दडपे पोहे.
मस्त झाले होते.
अहाहा कैरी काकडी घालून केलेले
अहाहा कैरी काकडी घालून केलेले पोहे. करायला हवेत.
छान लागले असेल हे कॉम्बिनेशन.
छान लागले असेल हे कॉम्बिनेशन.. दिसताहेत सुद्धा छान
झकासरावांनी फोटो दाखवला आणि
झकासरावांनी फोटो दाखवला आणि कधी नाही ती मिसळ खाण्याची तीव्र इच्छा झाली.
मग काय, केला घरी बेत वीकांताला.
घरात कुणाचीही फारशी फेवरेट नसूनही सर्वांनाच आवडली. पाव-फरसाण विकतचे.
ही तयारी :
अनिंद्य छान दिसतेय मिसळ
अनिंद्य छान दिसतेय मिसळ
अनिंद्य छान दिसतेय मिसळ >>
अनिंद्य छान दिसतेय मिसळ >> १००+
Pages