खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कैरीच्या भाताची रेसिपी कुठे आहे धनि/ अश्विनी. कैऱ्या आहेत घरी.
झकासराव, मिसळ जबरदस्त दिसतेय. झणझणीत एकदम. माझी मशिनगन तर तुमचा बॉम्ब आहे. Happy

जुन्या माबोत असेल एक रेसिपी.।

लालू आयडी ह्यांनी लिहिलेली.
शोधाशोध करावी लागेल.
त्यांनी लिहिलेल्या रेसिपीने तंतोतंत प्रमाण पाळत केले तर मिसळ चव, रंग, कट सगळं परफेक्ट येत असणार.

मी फोटो टाकलाय ती मात्र रेडिमेड.
वडे, मिसळ, भेळ, समोसे असले पदार्थ घरी त्या चवीचे होत नाहीत.

रेसिपी शोधत गेलो आणि सापडली.
लालू ह्यांनी नवीन माबोत परत टाकली होती त्यामुळे सहजरीत्या सापडली.

https://www.maayboli.com/node/2596

इथे बघा वाचा करा फोटो टाका

अनिंद्य थॅन्क्स कृपया तुमची विपु बघाल का?
देवकी हिरवी मिरची टाकली आहे आणि कोथिंबीर चिरून

रित्झ क्रॅकर ची शेवपुरीIMG_5660.jpeg
रेड्पेपर्,कोन्थिबिर्,कन्दा,मिरची आणी फेटा चिझ घालुन ऑमलेट आणी मल्टिग्रेन ब्रेड मुलिने बनवुन दिल.
IMG_5647.jpeg
बुका दि बेपो मधे विकेन्डला इटालियन खाण फ्रेश गार्लिक पार्मेझान ब्रेड्,पास्ता-पेने अल व्होडका आणी चिकन पार्मेझाना.
सॅलेडचा फोटो राहिला.
IMG_5662.jpeg

अंडे आणि आंबोळी पीठ?
कधी आंबोळी सोबत अंड्याचा कुठलाच प्रकार खाल्ला नाही. कसे लागत असेल हे इमॅजिन करायचा प्रयत्न करत आहे..
दिसायला मात्र मूग डाळ डोसा सारखे दिसत आहे. ते आवडतात.

ओके एग डोसा, एग उत्तप्पा अश्या नावाने काही रेसिपी शोधल्या...
उत्तप्पामध्ये अंडे डायरेक्ट मिक्स करून आणि डोशामध्ये तव्यावर पीठ पसरवल्यावर त्यावर अंडे फोडून असे दोन्ही व्हेरिशन करून बघायला हवेत.

फक्त आधी त्या दुसऱ्या धाग्यावर जाऊन जाणकारांकडून हे विरुद्ध अन्न तर नाही ना हे कन्फर्म करावे लागेल Happy

डोशामध्ये तव्यावर पीठ पसरवल्यावर त्यावर अंडे फोडून >>> हे अतिशय भारी लागतं. नक्की करून पाहा. अंड्यावर थोडं तिखटमीठ टाकलं तर अजून भारी लागतं

मापृ, एग आंबोळी भारी दिसतेय

प्राजक्ता, सगळे मेनू तोंपासु

प्राजक्ता, जुई मस्त. Happy
एग आंबोळी सारखे मी ओटमीलचे उत्तपे पिठात अंडं घालून करते. क्विक ओट मिक्सर मधे भरडून घेऊन सगळं घालायचं.

धन्यवाद!
चिकन करी आणी डोसे पण फार भारी लागतात...डोसे अगदी पातळ पेपर सारखे न पसरवता किचित जाड पसरावयचे.
आन्बोळे आणी काजुची भाजी लिस्ट वर आहेत...आन्बोळ्याच पिठ करतेच आता जागुच्या रेसिपिने
ओल्या काजुच्या भाजिला मात्र योगच यावा लागेल..
वरचे भोपळ्याचे वडे एक नबर दिसतायत..पोडि इडली पण छान..गरम वाफाळती इडली त्यावर साजुक तुप आणी पोडी पसरवुन गरम गरम खायचे.

झकासरावांनी फोटो दाखवला आणि कधी नाही ती मिसळ खाण्याची तीव्र इच्छा झाली.

मग काय, केला घरी बेत वीकांताला.

घरात कुणाचीही फारशी फेवरेट नसूनही सर्वांनाच आवडली. पाव-फरसाण विकतचे.

ही तयारी :

367a8c4e-5197-47df-87b7-1fdf47290bf1.jpegआणि हे फायनल प्रोडक्ट :

ed745974-b502-4274-9a87-c6f28a8be06e.jpegआयडियादाता सुखी भव !

Pages