नवीन मायबोली: असे सुधारता येईल

Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54

आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.

तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता हा धागा वर आलाच आहे तर माझेही काही मुद्दे लिहितो.

  • इतरांच्या प्रतिसादातील मजकूर सहज कोट करण्याची सुविधा हवी . सध्या कॉपी-पेस्ट करुन >>> असे लिहावे लागते . त्यात तो कोणाचा प्रतिसाद आहे ते कळत नाही.
  • प्रत्येक प्रतिसादाला "सहमत आहे / मलाही हेच म्हणायचे आहे " व "सहमत नाही " अशी बटणे असावीत.
  • विशिष्ट प्रतिसादाला प्रत्युत्तर देण्याची सोय हवी . व त्यानुसार प्रतिसादांचे ट्री structure दिसावे . (मिसळपाव व reddit वर हि सोय आहे .)

"इतरांच्या प्रतिसादातील मजकूर सहज कोट करण्याची सुविधा हवी- माबो वाचक"

याच्याशी सहमत आहे ✅️

बटणे आणि प्रतिसादाला प्रत्युत्तर हे होईल की नाही याबद्दल साशंक ❔️

ज्या धाग्यांवर वाद सुरू आहेत ते धागे गरम धागे म्हणून वर दिसावेत जेणेकरून सगळ्या वाचकांना त्याचा लाभ घेता येईल.

खरेदी विभागात माबोवर घेण्यासाठी ए आय अवतार उपलब्ध करून देण्यात यावेत. जास्त दर देणाऱ्याला आकर्षक अवतार.

त्या अवताराचे सुपर रिअ‍ॅलिस्टीक ए आय ह्युमनॉईडस विक्रीस ठेवावेत. आपल्या मनातले विचार त्या ह्युमनॉईड मधे तत्काळ उमटावेत आणि त्याप्रमाणे त्याने मौखिक / लिखित संभाषण करावे.

भविष्यात हेच ह्युमनॉईडस परस्पर वविला जातील.

>>> ज्या धाग्यांवर वाद सुरू आहेत ते धागे गरम धागे म्हणून वर दिसावेत जेणेकरून सगळ्या वाचकांना त्याचा लाभ घेता येईल.

काही धागे 'त्यावर वाद व्हावेत' या उद्देशाने वर ठेवण्याची सोय आहे सध्या बोकलत, तिचा तर आधी लाभ घ्या

प्रत्येक प्रतिसादाला "सहमत आहे / मलाही हेच म्हणायचे आहे " व "सहमत नाही " अशी बटणे असावीत.

>> सहमत आहे. मलाही हेच म्हणायचे आहे. Happy

त लिहिले की ताकभात उमटावे.
(त्या आधी अ असताना जे चालु आहे त्याच्याशी संबंधीत नव्हे.)

विनोद असल्यास (म्हणजे लिहिणाऱ्या व्यक्तीला तसे वाटत असल्यास) पोस्टच्या सुरवातीला आणि शेवटी आठ आठ फिदीफिदी/खोखो स्माईल्या उमटाव्यात.

पूर्वी तार खात्यात ठराविक संदेशांसाठी क्रमांक असत.
१)क्रमांक ८ वधु वरांना शुभेच्छा. म्हणजे आपण आठ क्रमांक तारेने पाठवला कि तिकडे वधु वरांना शुभेच्छा जात असत.
तद्वत प्रतीसादानाही क्रमांक असावेत. म्हणजे २ दाबले कि "छान" असा प्रतिसाद आपोआप उमटेल. त्यामुळे "छान" असे टंकायला जे अपार कष्ट होतात ते वाचतील!
२)प्रतिसादांची शब्द संख्या मर्यादित करावी. उदा से १८०. जर कुणाला तेव्हढ्या शब्दात गूज मनीचे सांगता येत नसेल तर १८०० शब्दातही कसे सांगता येईल?

काय वाचू ?
असा धागा असला तर खूप दिवसांनी आलेल्यांना काय वाचावे हे समजेल.

  1. प्रतिसाद कोणाचा आहे हे नाव आधी असावे.
  2. नावासोबत डिपी सुद्धा दिसावा.
  3. लाईक बदाम हाहा राग इश्य वगैरे बटण प्रत्येक लेखाला प्रत्येक प्रतिसादाला असावे.
  4. लेखाला किती व्ह्यू आले, किती वाचने झाली ते सुद्धा समजावे.
  5. लेखाची लिंक मायबोली बाहेर थेट शेअर करायचे बटण असावे. किती जणांनी शेअर केला हे सुद्धा समजल्यास उत्तम.

काळासोबत चाललो नाही तर मायबोलीकरांचे सरासरी वय सत्तर होत संपून जाऊ !

मी मायबोली app नाही वापरत पण पाककृती च app वापरते , त्याचा feedback देण्यासाठी वेगळा बाफ होता का? Link मिळेल का ??

"पाककृती च app वापरते , त्याचा feedback देण्यासाठी वेगळा बाफ होता का? Link मिळेल का??-स्वस्ति"

पाककृती ॲपच्या प्रकाशनाच्या घोषणेचा हा धागा आहे.

तिथे अभिप्राय देता येईल.

ℹ️ मराठी पाककृती हे ॲप देखील प्ले स्टोर मधून काढून टाकले आहे.

मराठी पाककृती हे ॲप देखील प्ले स्टोर मधून काढून टाकले आहे. >>> अच्छा हे माहित नव्हते. End of support असेल तर feedback देऊन फार उपयोग नाही

मायबोलीवर मला काही आयडिज च्या प्रोफाईल मध्ये संपर्क चा टॅब दिसतोय पण काहींच्या नाही.

उदाहरणार्थ मला कुमार१ यांच्याकडून संपर्कात मेल तर आली आहे. पण मला त्यांना संपर्कातून मेल पाठवता येत नाहीये. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची संपर्क सुविधा उत्तम चालू आहे. पण मला संपर्क चे बटण च दिसले नाही तर मेल पाठवू कशी?

अवांतर: मला मायबोलीवरील काही आयडीजच्या प्रोफाईल मध्ये संपर्क टॅब दिसतोय आणि काहींच्या नाही.

केकू माझ्या धाग्यावर दोन वर्षे तुम्ही ट्रोल्स ना साथ देत असताना अनेकदा असे वाटले होते. तुम्हाला आता असे वाटते हे पाहून बरं वाटलं. Happy

काही गैरसमज झाला असावा. तुमचे आणि त्या ट्रोल्सचे काय प्रॉब्लेम्स होते मला कल्पना नाही. मी सिन्सिअरली तुम्ही कादंबरी पूर्ण करा अशी रिक्वेस्ट करत होतो. आजही ती कथा पूर्ण करा अशी रिक्वेस्ट करेन.
एकदा मी हे ही लिहिले होते कि रानभुलीवर वेमाने अन्याय केला आहे. हे तुम्ही वाचले नाहीये का?
असो. मी त्या "ट्रोल्स" बरोबर होतो त्याची कारणे अगदी निराळी आहेत/ होती.
त्या रिक्वेस्ट शिवाय मी तुमच्या विषयी इतर काहीही लिहिलेले नाही. एव्हढेच समजून घ्या.

* काही आयडीजच्या प्रोफाईल मध्ये संपर्क टॅब दिसतोय आणि काहींच्या नाही.
>>> हे गूढ आहे !
मला दोन वर्षांपूर्वी फक्त एकाच्या बाबतीत ती सुविधा दिसली नव्हती.

तुमचे आणि त्या ट्रोल्सचे काय प्रॉब्लेम्स होते >>>त्यांनी का ट्रोलिंग केलं ते कदाचित तुम्हाला माहित असेल. मला तरी माहीत नाही. काही कारणच नाही.
तुम्ही माझ्या धाग्यावर त्यांना साथ दिलेली पाहिली तेव्हापासून पहिल्यांदा तुम्हाला प्रतिसाद दिला आहे. या आधी प्रभुदेसाईंच्या सर्व कथांना मी सपोर्ट केला होता. तुम्हाला सुद्धा केला होता.

हा आयडी असा का वागतो हे समजले नाही. इथे लेखनसीमा.

>>मायबोलीवर मला काही आयडिज च्या प्रोफाईल मध्ये संपर्क चा टॅब दिसतोय पण काहींच्या नाही.

ज्या सदस्यांनी आपल्या प्रोफाईल मधे 'व्यक्तिगत संपर्काची सोय हवी आहे' असं सेटिंग केलेले आहे त्यांचा संपर्क होऊ शकतो अन्यथा नाही असं असावं बहुतेक.

⭕️ रच्याकने - कुमार१ यांचा संपर्क टॅब मलाही दिसत नाहीये ❗️

मित्रहो
या प्रकरणावर आता पडदा पडला आहे. संपर्क झालाय. चर्चा थांबायला हरकत नाही Happy

Pages