नवीन मायबोली: असे सुधारता येईल

Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54

आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.

तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ webmaster, तुमचा दुसरा प्रश्न थोडा अवघड वाटतो आहे. अजूनही येतो आहे का? >>> होय! प्रश्न अजूनही तसाच आहे.

>>या २०१८ जानेवारीपासून , फक्त गेल्या एका वर्षात भाग घेणार्‍या स्वयंसेवकांचे रंगिबेरंगी सभासदत्व चालू ठेवले आहे.
ओह! हे माहित नव्हते... तशी घोषणा वाचल्याचे आठवत नाही. हरकत नाही... आता पुन्हा रंगीबेरंगी पान कसे मिळवायचे? आधी सारखे वेगळी वार्षिक सभासद फी देऊन का? कृ. ईमेल वर कळवाल का ?

तुम्ही ज्यांचे चाहते झाला आहात त्यांच्या व्यक्तिरेखेत "तुम्ही त्यांचे चाहते आहात किंवा नाही" याचे बटन दिसेल (Group Audience च्या वर) ते टॉगल सारखे काम करते. ते वापरून चाहते होणे किंवा नाही किंवा परत होणे असे करता येते.

शोध सुविधा वापरता येत नाहीये, मी मधे शोधलं होतं तेव्हा चालत होतं, आता शोध टेक्स्ट बॉक्स मधे टाइप करता येत नाहीये \ कॉपी केलेलं पेस्ट होत नाहीये Sad

मायबोलीवर स्टँडर्ड ड्रूपल बदलून त्याची वाट लावली आहे. उदा. पुढील यू.आर.एल. चालत नाहीत.
https://www.maayboli.com/search (चालत नाही)
https://www.maayboli.com/search/user (चालत नाही)
https://www.maayboli.com/user (पान दिसत नाही)
http://www.maayboli.com/user/me/track (चालत नाही) try userid in place of me as well
http://www.maayboli.com/user/me/authored
मी स्वतः काय लिहिले आहे आणि कुठे प्रतिसाद दिला आहे, हे सुद्धा सहज शोधता येत नाही.
मुळात गूगलवर अवलंबून राहण्यापेक्षा ड्रूपलचे अंगभूत (default) साईट इंडेक्सिंग वापरले तर साईट सर्च जास्त छान होते आणि मायबोलीची गूगल रँक वर जायला मदत होईल.
दुसरी गोष्ट म्हणजे https://www.maayboli.com/search सर्च हे anonymous user साठी उघडे ठेवले तर organic search सोपे पडेल. (मायबोलीवर ते anonymous user साठी बंद केले आहे पण authenticated user साठी चालू आहे )

मायबोलीच्या ॲपवर डार्क मोड उपलब्ध करून देण्याचा काही विचार आहे का? गेले काही महिने जिथे शक्य आहे तिथे डार्क मोड वापरत आहे आणि त्याचा फायदा होतो (बॅटरी अधिक टिकणे, डोळ्यांवर कमी ताण इत्यादी) असं लक्षात आलं आहे.

स्मायली टाकताना लिंकवर क्लिक करुन नवीन पानावर सगळ्या स्मायली उघडतात. मग तिथुन स्मायली कोड कॉपी करुन पुन्हा मागे येऊन पेस्ट करावे लागते त्यापेक्षा प्रतिसादाच्या पानावरुनच कुठेही न जाता सर्व स्मायली उघडाव्यात व हव्या त्या स्मायलीवर नुसते क्लिक केले की प्रतिसादात उमटावी असे केले तर खुप सोपे होईल. असे इतर खुप ठिकाणी पाहिले आहे. सध्याची ही पद्धत खूप जुनी झालीये. थँक्स. आणि अजुन विविध स्मायली आणा.

॰विपुचे नोटीफिकेशन मेलवर कळते.त्यापेक्षा ते अँपवरच कळाले तर बरे होईल.

॰विपुमधे प्रतिसाद देताना प्रतिसादासाठीची screen/ टेक्स्ट न दिसता भलतेच जुने धागे दिसतात.

॰दिलेला प्रतिसाद /कमेंट समोरच्या व्यक्तीला मिळाले आहे कि नाही ते कळत नाही.

॰ block ची सुविधा हवी.

॰कथांचे/ लेखांचे पार्ट असतील तर ते शोधावे लागतात/ लेखकाला लिंक द्यावी लागते. त्याऐवजी ते सलग वाचायला मिळतील.अशी सोय असायला हवी.

> अजुन विविध स्मायली आणा. > +१

> ॰कथांचे/ लेखांचे पार्ट असतील तर ते शोधावे लागतात/ लेखकाला लिंक द्यावी लागते. त्याऐवजी ते सलग वाचायला मिळतील.अशी सोय असायला हवी. > चांगली सुचवणी आहे. मिपा पुस्तकं सारखं काहीतरी.

अनेक भागांत असलेल्या लेखनाबद्दल - लेखकाने अ‍ॅडमिनना सांगून त्यांची लेखमाला करून घ्यायची सोय आहे. हे बहुधा लेखन पूर्ण झालं की करता येतं.

कालच माबो ऍप अपडेट केले. खूपच पश्चाताप होतो आहे. कुठेही काहीही क्लिक न करता सतत पेज अप होऊन सगळ्यात वर जाते आहे सगळे. मला प्रत्येक धाग्याला हा प्रॉब्लेम येतो आहे.

अक्षरशः स्क्रोल डाऊन करून करून कंटाळले. जरा काही मन लावून वाचावं तर पेज अप होऊन आपण धाग्याच्या कंटेंट वर येऊन पोहचतो.

हा प्रतिसाद लिहिताना पण असे वारंवार होत आहे.

अजून एक म्हणजे उबर ईट्स ची भलीमोठी जाहिरात पूर्ण पान व्यापते आहे. कितीही क्लिक करूनही ती बंद होईना.

मायबोलीवरील बहुतेक हेडिंग वगैरे निळ्या रंगात आहे व आकर्षक पण दिसते. हे फॉंटचे रंग दिवसाआड, आठवड्यानंतर, वेगवेगळ्या रंगांचे झाले तर मला अजून मजा येईल.

मागे लिंबुभाऊंनी जुन्या मायबोलीचा ट्री व्ह्यु सुचवला होता, तसा परत करता येईल का? बर्‍याच वेळा रेसेपी सुद्धा शोधा या सदरात शोधावी लागते.

@ पियू
>कालच माबो ऍप अपडेट केले. खूपच पश्चाताप होतो आहे. कुठेही काहीही क्लिक न करता सतत पेज अप होऊन सगळ्यात वर जाते आहे सगळे. मला प्रत्येक धाग्याला हा प्रॉब्लेम येतो आहे.
हे असे व्हायला नको आणि पहिल्यांदाच ही अडचण समजली आहे. अ‍ॅप पूर्ण डिलीट करून परत ईन्स्टॉल करून पाहणार का?

अ‍ॅडमिन/वेमा
xxx यांचे चाहते व्हा! ही सोय पूर्ण बंद करण्याबद्दल किंवा विचारपुशीसारखी Enable/Disable करता येण्याबद्दल विचार व्हावा असे वाटते आहे. हे शक्य नसल्यास त्यामागची Become Fan of xxx ही संकल्पना बदलून Follow xxx on Maayboli असे नामकरण करता येईल का त्याचाही कृपया एकदा विचार करावा असे वाटते आहे. (ते ही शक्य नसल्यास ही सोय माझ्यापुरती बंद केली तरी चालेल Proud )

संकल्पना खूप चांगली आहे पण मला वाटते ती counter productive प्रुव होते आहे. लेखक(लेख वा प्रतिसाद लिहिणारे) आणि त्यांचे चाहते ह्यांच्यात एकमेकांप्रती लॉयल्टी असावी असा एक गैरसमज आपोआप तयार होतो आहे, वाढीस लागतो आहे असे वाटते. ज्यातून अपेक्षा आणि अपेक्षाभंग अशा दोन्ही भावना सुद्धा वाढीस लागत आहेत आणि त्यांचे पडसाद ऊमटल्याचे सुद्धा प्रकर्षाने दिसत आहे.

जर एक अशी गंमत करता आली की लेख टाकल्यावर, कविता चर्चा टाकल्यावर, लेखकाचे नावच येणार नाही मग ५ दिवसांनी झळकेल. तर? Happy
मीनव्हाइल, प्रत्येकाचे प्रामाणिक (अनबायस्ड) मतदान/प्रतिसाद येतील.
__________________
>>>>>>>>>>>xxx यांचे चाहते व्हा! ही सोय पूर्ण बंद करण्याबद्दल>>>>>>>>>>> नविन सदस्य (मी) सध्या एकेकाच्या प्रोफाइलमधून त्यांच्या चाहत्यांवर जाउन , त्या चाहत्यांचे लेख वाचते आहे. जर ती सोय नसेल, तर कसे कळणार कोण सदस्य होते व त्यांचे लिखाण कसे वाचणार. सहसा चाहते पाहीले की सकस खाद्य मिळणार याची खात्री असते जी आत्तापर्यंत पूर्ण झालेली आहे.

हवं तेव्हा एडिट करता आला धागा आणि प्रतिसाद तर उत्तम.
काही जणांना आपल्यापुरते ब्लॉक करता यावे अशी सोय असली तर बरं होईल.
बाकी, आपल्या लिखाणात इमेज घालण्याकरता खूप कसरत करावी लागते मोबाईलवरून.
Drag and drop वगैरे options असतील तर बरे पडेल.

नविन प्रतिसाद आधी वाचता येतील का,. आत्ता आधीच वाचून झालेल्या स्क्रोल करुन मग पुढच्या पानावर जाऊन मग नविन वाचाव्या लागतात, त्यापेक्षा जर त्या उलट्या क्रमाने अरेंज करता आल्या तर ........

नवीन प्रतिसादांची संख्या वेगळी दाखवलेली असते. तिच्यावर टिचकी मारली की फक्त नवीन प्रतिसाद दिसतात देवी जी.

स्मायली देणे सोपे करा प्लीज. प्रत्येकवेळी नवीन पान उघडुन स्मायलीचा कोड कॉपी करुन मागे यावे लागते. त्यापेक्षा प्रतिसादाच्या पानावरच ड्रॉपडाऊन करा व सिलेक्ट करायचे की आपोआप प्रतिसादात उमटेल असे पहा. यामुळे खुपदा खदाखदा लोळत हसायची इच्छा असली तरी स्मितच करावे लागते Happy असे

Pages