नवीन मायबोली: असे सुधारता येईल

Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54

आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.

तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुगल क्रोम नटोरियस आहे मेमरी हॉग म्हणुन. युजर एक्स्पिरियंस एन्हांस करण्याच्या नादात तो भरपुर मेमरी खातो. आणि एखादा प्लग-इन्/एक्स्टेंशन मेमरी लीक करत असेल तर बोंबला...

पण हा आत्ताचा इशु वेगळा आहे असं वाटतंय. म्हणजे क्रोम मेन कल्प्रिट नसावा पण आगीत तेल टाकायचं काम करत आहे. मला मॅक्/सफारीवर काहि प्रॉब्लेम येत नाहि पण आय्फोनवर इंटरमिटंटली मायबोली फोर्स्ड लागौट होत आहे. हे नॉर्मली वीक डेटा/वायफाय कनेक्शन असताना होतं, पण आता ते स्ट्राँग कनेक्शन असतानाहि होतंय...

कुछ तो गडबड है...

येस मला ही हा इश्यू बरेच दिवस झालेत येतो आहे. सगळे प्लॅट्फॉर्म ट्राय करून झाले. मॅक सफारीवर तेव्हढा जाणवला नाही पण आयफोन, आयपॅड वर जाणवण्याइतपत आणि विंडोज १० एंटरप्राईज (ऑफिस लॅपटॉप) वर सगळ्याच ब्राउजर्स (क्रोम, एज, आयई, फाफॉ) वर फार हॅग होतेय.

आयफोनवरून मलाही प्रॉब्लेम येतो आहे - पेज पूर्ण लोड होत नाही, पोस्ट लिहिताना मध्येच रीलोड व्हायला लागतं आणि लिहिलेलं नाहीसं होतं.

आयफोन वर प्रॉब्लेम आहे खरंच.
काही वेळानंतर आपोआप लॉग आऊट, प्रचंड स्लो ( अक्षरं एडिटर मध्ये दिसायला खूप वेळ लागतो टाईप केल्यानंतर; मग कळत नाही चुकीचं टाईप झालंय का. मागे जाऊन करेक्ट करणं ते आणखी दुसरंच ऑर्डियल! आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी परिस्थिती ).

पण मॅकबूक वर मात्र काही प्रॉब्लेम नाही.

सशल>>> +1
आता टाईप करताना पण खूप स्लो टाईप होतय.जोडाक्षर टाईप करताना खूप त्रास होतो याचा.क्रोमवर सारख रीलोड होत पोस्ट लिहीताना.आणि इतक्या मेहनतीवर पाणी पडल्यामुळे हळहळायला होत.

>>आयफोनवरून मलाही प्रॉब्लेम येतो आहे - पेज पूर्ण लोड होत नाही, पोस्ट लिहिताना मध्येच रीलोड व्हायला लागतं आणि लिहिलेलं नाहीसं होतं.>>+१. पुन्हा प्रतिसाद विंडोमध्ये टाईप करताना ती विंडो ब्लँकच दिसते आणि मग हळूहळू प्रतिसाद उमटायला लागतात तिथे.

गेले बरेच दिवस मलाही मोबाईल आणि टॅबच्या क्रोममध्ये माबो, मिपा, ऐसी ला प्रॉब्लेम येत होता. दोन दिवसांपूर्वी माझा मोबाईल बिघडला म्हणून सर्व्हिस सेंटरला दिला. त्यांनी पुन्हा नवीन सॉफ्टवेअर मारून दिले.

पण आता बघतो तर माबो, मिपा, ऐसी एकदम टकाटक चालतंय. काहीच प्रॉब्लेम नाहीए.

मुद्दाम क्रोमचं व्हर्जन बघितलं, तर तेच जुनं 6 की 8 मार्चचंच आहे. मग आत्ताच काय बदल झाला की सर्व व्यवस्थित चालायला लागलंय.

पण टॅब उघडून पाहिला तर क्रोममध्ये तोच पूर्वीचा त्रास अजून चालू आहे.

मग माझ्या मोबाईलचा क्रोम सुधारला कसा? Uhoh

जिथे प्रोब्लेम येतो आहे तिथे कॅश क्लीन करून पहा. >>> टॅबची cache memory clean अगोदरच बऱ्याच वेळा करून पाहिलीय. पण त्याने काहीच फरक पडत नाहीए.

मोबाइल क्रोमचीसुध्दा cache memory clean बऱ्याचवेळा करून पाहिली होती. हेच नाही तर क्रोमसुध्दा दोनवेळा uninstall करून पुन्हा install केला होता. पण प्रॉब्लेम काही सुटला नव्हता. तेव्हा मोबाईलचं नुसतं क्रोमच नव्हे तर फेसबुक आणि यूट्यूबसुद्धा भेंडाळलं होतं.

सर्व्हिससेंटरवाला मोबाईलच्या बूट सेक्टरविषयी काहीतरी बोलत होता. मला तर व्हायरस हल्ल्याची शंका येतेय.

वरच्या प्रॉब्लेम ला +1

वेमा ते निवडक 10 आणि माझे लिखाण गायब झालेत ते पण बघा की एकदा

मी गेला आठवडाभर इथे येऊन याच प्रॉब्लेमबद्दल लिहिण्याचा रोज एकदा तरी प्रयत्न करते... पण दरवेळी कमेंट अर्धी पोस्ट होते आणि आधी हे पेज आणि मग आख्खं मायबोलीच हँग होतं... आत्ताही थांबत थांबत टाईप केलंय... पोस्ट होईल की नाही माहिती नाही Sad

मी गेला आठवडाभर इथे येऊन याच प्रॉब्लेमबद्दल लिहिण्याचा रोज एकदा तरी प्रयत्न करते... पण दरवेळी कमेंट अर्धी पोस्ट होते आणि आधी हे पेज आणि मग आख्खं मायबोलीच हँग होतं... आत्ताही थांबत थांबत टाईप केलंय... पोस्ट होईल की नाही माहिती नाही Sad

>https://www.maayboli.com/user/58970/created

इथे "58970" च्या जागी स्वतःचा युजर आयडी टाकला तर लेखन दिसायला हवे
https://www.maayboli.com/user/me/created अशासारखी लिंक असेल तर तिथे मधूनच प्रॉब्लेम येतो आहे. ती तुम्ही बुकमार्क केली असेल तर सध्या काढून टाका.

@ सिम्बा, जाण्याची नोंदच्यावर माझे सदस्यत्ववर क्लिक करा, दिसू लागेल.

माझे सदस्यत्वच्या वरील आपल्या नावावर क्लिक केले की लेखन दिसत नाही. आणि हा प्रॉब्लेम फार पूर्वीपासूनचा आहे.

अरे वा, ग्रेट
झाला की प्रॉब्लेम सोल्व्ह
धन्यवाद सका

मायबोली स्लो असण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काही बदल केले आहेत. अजूनही जर स्लो असेल तर कृपया सांगा. सांगताना मोबाईल का डेस्कटॉप्/लॅपटॉप आणि ब्राऊजर वर्जन ही कृपया सांगा.

पेज पूर्ण लोड व्हायला अजून प्रॉब्लेम येतोय .आणि पोस्ट करताना मध्येच हँग होतो फोन.मोबाईल वरून नेट वापरतेय

पेज पूर्ण लोड व्हायला अजून प्रॉब्लेम येतोय .आणि पोस्ट करताना मध्येच हँग होतो फोन.मोबाईल वरून नेट वापरतेय >>>> + ११११

मला मोबाईल आणि डेस्क्टॉप दोन्हीवर प्रॉब्लेम येतोय.

जाण्याची नोंदच्यावर माझे सदस्यत्ववर क्लिक करा, दिसू लागेल.

माझे सदस्यत्वच्या वरील आपल्या नावावर क्लिक केले की लेखन दिसत नाही. आणि हा प्रॉब्लेम फार पूर्वीपासूनचा आहे. >>>>> मला दोन्ही कडे काहिही दिसत नाहीये.
निवडक १० तर दिसत नाहीये पण लेखन माधे पण टॉमाटो राईस दिसतीये.

अजुन एक, विपुला उत्तर देण्यसाठी प्रतिसादवर क्लिक केले असता कुठलातरी धागा ऊघडतो.

मग त्यासाठी ज्यांना प्रतिसाद द्यायचाय त्यांच्या विपुत जावुन लिहावे लागते.

थोडक्यात काय तर काही वाचायचे असेल आणी भरपुर वेळ असेल तर्च माबो ठिके, नाहीतर ...

मला गेल्या आठवड्यात प्रॉब्लेम येत होता. पण गेले 2 3 दिवस ठीक चालू आहे. सो या बग फिक्सचा परिणाम नसावा. आता व्यवस्थित चालू आहे. (फोन, अँड्रॉइड)

Pages