नवीन मायबोली: असे सुधारता येईल

Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54

आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.

तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@रीया
आपण म्हणतो की हे आभासी जग आहे पण ते काही खरे नाही. येथे प्रत्येकाला स्वतःचे विचार आहेत, आई-वडील, बायको, नवरा, मुलं आहेत. जोवर तुमच्या विचारांना विरोध होतो तोवर तुम्ही दुर्लक्ष करु शकता. पुढची पायरी म्हणजे विचार सोडून तुमच्या चारीत्र्यावर हल्ला होतो. येथेही तुम्ही दुर्लक्ष करु शकता. असे दुर्लक्ष केले की मग तुमच्या आईच्या चारीत्र्यावर शिंतोडे उडवले जातात. सातत्याने हा घाणेरडा प्रकार सुरु राहतो. आणि हा प्रकार तुमच्या विपूमधे नाही होत. तो धडधडीत पहिल्या पानावर होत राहतो. इग्नोर करा सांगणारेच माबोकर हे चविने वाचत असतात. आता तुमचे म्हणने असेल की हेही दुर्लक्ष करा तर मग असे दुर्लक्ष करण्यापेक्षा सोशल मेडीयावर येवूच नये. सांगायला काय जाते तुमचे? तुम्ही फक्त क्षणभरच विचार करा की तुमच्या आईच्या चारीत्र्यावर मायबोलीसारख्या मोठ्या संस्थाळावर चिखलफेक सुरु आहे. आणि तरीही ‘दुर्लक्ष करा’ हेच तुमचे म्हणने असेल तर तुम्हाला नक्कीच महान सिद्धी प्राप्त असावी. आभासी काहीच नसते. हे जर आभासी असते तर येथे आपल्या लेखनाचे कौतूक झाल्यावर कुणाला आनंद वाटला नसता. कुणी कौतूक केल्याने जर आनंद होत असेल तर गलिच्छ प्रतिसादाने संताप होणारच. कुणाही स्त्रीला विचारा की रस्त्याने चालताना कुणी तिची छेड काढली व तिच्या नवऱ्याने ‘जावू दे गं, इग्नोर कर’ असं म्हटलं तर त्या स्त्रीला नवऱ्याविषयी किती आदर व प्रेम वाटेल? प्रत्यक्ष रस्ता काय किंवा सोशल मिडीया काय, काही गोष्टी कधीही सहन करु नयेत. याऊपर आपली मर्जी.

तैमूर सहमत. पण इथं आपण एक दोघेच मतं मांडली. माबो प्रशासनाने ओळखपत्र कंपलसरी केले तरच प्रश्न मिटेल. खरं नाव फोन नंबर, पत्ता हे प्रत्येकाला कंपलसरी केले पाहिजे. सुरुवात अज्ञातवासी पासून झाली पाहिजे.

माझी एक सुचवणी

चर्चा हा विभाग सोडून इतर सर्व लिखाणावर येणारे प्रतिसाद प्रकाशित करण्याचे हक्क फक्त लेखकास हवेत. यातून बरेच प्रश्न सुटतील. विचार करून पाहा.

मला वाटतं संपूर्ण मायबोलीला एकाच व्यक्तीने वेठीस धरले आहे आणि ते म्हणजे मंदार जोशी. वरचा सुची जी त्यांचाच आइडी आहे. मला खात्री आहे मायबोली प्रशासन पण त्यांना वैतागले आहे. आयडेंटिटी लपवून वेगवेगळे आईडी घेऊन शिवीगाळ करणे, नव्या लेखकांना नाउमेद करणे, ठराविक विचारधारा ( Anti Modi) असणाऱ्या लोकांना टार्गेट करणे हे असे उद्योग ते नेहेमीच करत असतात. मला आश्चर्य वाटत आहे की इथले बरेच लोक ज्यांना हे सगळं माहीत आहे ते त्यांचं नाव घ्यायला का घाबरत आहेत? मन्जो काय Voldemort आहे का - he who we don't speak of.
मी पण असा एक आइडी आहे ज्याने इथल्या काही लोकांना ट्रोल केले आहे. पण जेव्हा जेव्हा इतर सदस्यांनी मला थांबण्याची विनंती केली मी तिथेच थांबलो आहे. इथले काही लोक असे अहेत ज्याना विरोध बिलकूल सहन होत नाही. सध्या मोदी hysteria आहे आणि इथले काही लोक त्याचे जबरदस्त शिकार आहेत. विरोधी विचारधारा असू शकते आणि त्याच्यावर चर्चा पण होऊ शकते. पण चर्चा सुरु व्ह्याच्या आधीच हे लोक ताळतंत्र सोडून समोरच्याला नक्षली , पुरोगामी असे संबोधून हिणवुन टाकतात. डॉ खरे इथले सन्माननीय सदस्य आहेत. त्यांचे काही लेख फारच माहितीपूर्ण असतात. पण मोदी विरोधी काही दिसले की ते बऱ्याच वेळेला ताळतंत्र सोडतात. एका डॉक्टर कडून आपण एका maturity, तटस्थ भूमिकेची अपेक्षा करतो आणि तिला तडा जातो. पुरोगामी हा शब्द हे लोक असा ऐकवतात जणू काय ती एक शिवी आहे. असे वारंवार दुखावल्या मुळेच माझ्या सारख्या ट्रोल चा जन्म होतो.
असो , मी ट्रोल असलो तरी तुम्हा रसिक लोकांच्या वाचनाच्या आनंदात बिलकुल व्यत्यय नाही आणणार. कारण माझा पिंड trolling चा नाही. मी माझा सदस्यता काढून घेण्याची विनंती इथल्या प्रशासनाला मागेच केली आहे.

@ झम्प्या दामले
वा
याला म्हणतात "चोराच्या उलट्या बोंबा"

आपली मूळ आयडी दुसरीच आहे.
माझ्या डॉक्टर असण्यापासून ते माझ्या नौदलातील नोकरीबद्दल संशय घेऊन बेजबाबदार म्हणण्यापर्यंत आपली मजल गेली.
आपले सगळेच्या सगळे आरोप खोडले गेले आणि मी आपल्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले तरी अजून आपण माझ्याबद्दल पूर्वग्रह दूषित विधाने करीत आहात.
मी जेवढे काही लिहिलं आहे त्याचे सर्व दुवे दिलेले आहेत आणि धागा चिनुक्स यांनासुद्धा जागतिक तज्ज्ञांचा एका अहवाल दिला आहे ज्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे कि ३५ अंशाला हा विषाणू हतप्रभ होतो. तरीही लोकांनी सोयीस्कर दुर्लक्ष करून टीकेची झोड उठवली.

श्री चिनुक्स यांनी पण प्रामाणिकपणे त्याला दुजोरा देण्याची तसदी घेतली नाही.

आपण शिखंडीसारखे आडूनच वार करणारे आहात( कारण मूळ नावाने लेखन करण्याची हिंमत नाही कि काय ते माहिती नाही) हे पहिल्यांदाच ओळखल्यामुळे आपल्याकडे साफ दुर्लक्ष केले तरी आपली जळजळ संपत नाहीच.

दुवा खाली देतो आहे. आपण वाचणार नाही याची खात्री आहे.

पण असो.

मायबोलीकर सुज्ञ आहेत. वरचे प्रतिसाद वाचून योग्य तो निष्कर्ष काढतीलच. हा माझा मायबोली वरचा शेवटचा प्रतिसाद आहे. Admin ने माझा आइडी उडवावा.

https://www.google.com/imgres?imgurl=https://www.ft.com/__origami/servic...

भारतात हिमालयाच्या पायथ्याशी असलेलीबराज्ये सोडून बऱ्याच ठिकाणी याचा परिणाम होणार नाही असे लिहिण्याचे कारण असलेला दुवा पण वाचून घ्या.
केवळ एखाद्यावर शिंतोडे उडवण्यासाठी शिखंडी सारखे डू आयडी घेऊन वक्तव्ये करण्यापूर्वी एकदा विचार तरी करायचा होता.

अँड्रॉइड च्या लेटेस्ट app release मध्ये जाहिरातींचा भडिमार आहे.
खासकरून वरच्या भागात title bar च्या खाली असणारी पट्टी जी प्रत्येक पान उलटल्यावर परत येते...ती फार annoying आहे.... सगळा युजर experience घालवून टाकते.:/

ऍडमिन/वेमा:
"माझ्यासाठी नविन" मध्ये वर "आवडत्या मायबोलीकरांचे लेखन" दिसते. हे चांगलेच आहे.
पण यातून गप्पांचे पान वगळता येईल का?
कारण हे काही लिखाण आणि लिखाणा वरील प्रतिसाद नव्हेत.

यातील तांत्रिक मर्यादा समजू शकतो, जमत असल्यास बघा.

मानव,
त्यासाठी ग्रूपमध्ये नवीन पर्याय पहा. त्यात गप्पांची पाने वगळली आहेत.
https://www.maayboli.com/new4me_group

ऍडमिन, होय.

म्हणजे तांत्रिकदृष्ट्या गप्पांची पाने वगळता येतात.

ती "माझ्यासाठी नवीन" मधूनही वगळावीत असे सुचवतो आहे.

अर्थात ही केवळ माझे आणि अजुन एक दोघांचे मत जाणून केलेली सूचना आहे.

धन्यवाद.

माफ करा, वरील प्रतिसाद जरा घाईने दिला.

"ग्रुपमध्ये नविन" या मध्ये "आवडत्या मायबोलीकरांचे लेखन" असा विभागच नाही (जे योग्य वाटते). आपण ज्या ज्या समूहाचे सभासद आहोत, त्यातील नवे लेखन/प्रतिसाद (गप्पांच्या पानांसाहित) तिथे दिसतात. जे योग्य वाटते.

"माझ्यासाठी नवीन" मध्ये वरती "आवडत्या मायबोलीकरांचे लेखन" असा विभाग येतो. यातून फक्त गप्पांचे पान तेवढे वगळावे हे सुचवायचे आहे. इतर लेखन नाही.

---------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------
@admin/webmaster
कृपया हे काढून टाकले तर बरे होईल. आजकाल मराठी टायपिंग साठी विविध पर्याय आलेत त्यांचाच वापर केला जातो. ही सुविधा कोणी वापरत असेल असे वाटत नाही. याच्या सहाय्याने मराठी टाईप करणे फार जिकीरीचे आहे. याउलट त्यामुळे गैरसोयच अधिक होत आहे. By default हे 'मराठी' असते. ते तसेच ठेवून लेख/प्रतिसाद टाईप करताना त्रास होतो. नको ती अक्षरे मध्येच उमटतात. It's very very annoying. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रतिसाद टाईप करण्याआधी ते "इंग्रजी" सेट करावे लागते. इतरही मायबोलीकरांनी अनुभवले असेल.

त्यामुळे हे कृपया काढून टाकले तर बरे होईल. किंवा शक्य नसेल तर त्याचा default पर्याय "इंग्रजी" ठेवावा ही विनंती.

त्यामुळे हे कृपया काढून टाकले तर बरे होईल. किंवा शक्य नसेल तर त्याचा default पर्याय "इंग्रजी" ठेवावा ही विनंती. >>> पूर्णपणे सहमत.

माझे सदस्यत्ववरही असेच होते. कधी कधी नजरचुकीने default - मराठी पर्यायाकडे दुर्लक्ष होते आणि मग चुकीची माहिती भरल्या जाते. त्या कारणाने २-३ वेळा पासवर्ड बदलावे लागले.

Pages