Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54
आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.
तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जर वेळेवर कारवाई केली नाहीत
जर वेळेवर कारवाई केली नाहीत तर मायबोली रसातळाला जाईल. गुणवत्तेसाठी सदस्य संख्या निम्म्यावर आली तरी चालेल. जागे व्हा
अज्ञातवासी, तुम्ही म्हणताय की
अज्ञातवासी, तुम्ही म्हणताय की ऍडमिन कडे तक्रार केली तर त्याची दाखल घ्यायला 12तासापेक्षा जास्ती वेळ लागतो आणि त्यात इकडे नको तेवढा गोंधळ घातला जातो.
पण माझ्या तक्रारीची तर आजतागायत दाखल घेतली गेली आहे की नाही मला माहिती नाही.
माझे 2 प्रॉब्लेमस होते एक म्हणजे इकडच्या काही जुन्या आयडीनी मला विनाकारण मानसिक त्रास दिला बर एक आयडी नाही बर का अख्खा कंपूच्या च्या कंपू जाणू टोळ धाडाचं !
त्या बद्दल मी मा. ऍडमिन यांना रीतसर मेल पाठवला होता त्यावर त्यांचा till date एका शब्दाचाही रिप्लाय आला नाही... ह्याचा अर्थ मी काय समजायचा ते मला माहिती नाही.
आणि दुसरं म्हणजे काही ड्यू आयडी नी माझ्या धाग्यावर अतिशय अश्लाघ्य भाषेत प्रतिसाद दिले होते त्याबद्दल मी मा. ऍडमिन ह्यांना विपू केली होती त्या बद्दलही मला त्यांचा काहीही रिप्लाय आला नाही.
त्यांनी तो आयडी उडवला प्रतिसाद उडवला मला माहिती नाही..
ह्या सगळ्या मनस्तापातून मी मायबोलीवर लिहायचं नाही असं ठरवलं. शेवटी मला त्रास होतं असेल आणि त्याची दखल जर का कुणी घेत नसेल तर मी हा मार्ग स्वीकारणं मला योग्य वाटलं..
इकडे अज्ञातवासी, मी, खरे काका
इकडे अज्ञातवासी, मी, खरे काका एवढे जण आपले त्रास मांडतोय तर ऍडमिन नी येऊनही त्यांचीही बाजू मांडावी ....
एखादा आयडी विकृत आहे व अत्यंत
एखादा आयडी विकृत आहे व अत्यंत घाणेरड्या भाषेत प्रतिसाद देतो हे माहित असूनही धाग्याचा विषय आक्षेपार्ह नाही म्हणून त्यावर हिरीरीने प्रतिसाद देणे चुकीचेच आहे. आयडी कसाही असला तरी या धाग्यावर काहीही वाईट लिहित नाही म्हणून मी प्रतिसाद देणारच हि हरिश्चंद्री वृत्ती काय कामाची?
हा आयडी सर्व मराठी संस्थळांवर फिरून येऊन शेवटी मायबोलीवरच का स्थिरावला याचा कुणी विचार केलाय का? इतर संस्थळांवर हा स्थिरावयाचे दूर, टिकला सुद्धा नाही. याला कारण येथील ऍडमिनचे धोरण व सदस्यांमधील 'आपल्याला काय करायचंय' हि वृत्ती.
भाऊबंदकीमधे दुसऱ्या भावाचा काटा काढायला एक भाऊ बाहेरच्याला घरात घेतो. आलेली व्यक्ती दुसऱ्या भावाचा निकाल लावते. मग सावकाश वेळ पाहून ज्याने घरात घेतले त्याचाही निकाल लावतेच.
आणि महत्वाचे म्हणजे येथे कुणाचाही वैयक्तिक विरोध करायचा नाही, तर घाणेरड्या वृत्तीचा विरोध करायचा आहे.
धोरणात आणले की अडमिनला पावर
धोरणात आणले की अडमिनला पावर येते आणि प्रतिसाद धडाधड उडतील मग पाहा काम सोपे होते. संपूर्ण धागा उडवायची गरज पडणार नाही.
धाग्यावर आडवेतिडवे प्रतिसाद टिकत नाही म्हटल्यावर हाणामारी बंद होईल.
आईडींचे आइपी अड्रेस पाहा, तपासायचे कोड लिहा हा नसता खटाटोप वाचेल.
तैमूरजी सहमत. प्रकाश घाटपांडे
तैमूरजी सहमत. प्रकाश घाटपांडे यांचा प्रतिसाद आवडला. इकडचे बोटचेपे आयडी पाहिले की फार त्रास होतो. तैमूर हेच पहा ना. खऱ्या आयडीनं विरोध करु शकत नाहीत बिचारा. सदस्य संख्या शेकड्याच्या आत आली तरी चालेल पण प्रत्येकाचा आधार कार्ड, पासपोर्ट प्रोफाइल वर ठेवणं बंधनकारक केले पाहिजे. तसेच चालू मोबाईल नंबर दिला पाहिजे. किंवा अजून काही प्रमाणपत्र ग्राह्य धरुन प्रवेश केला पाहिजे.
अज्ञात वासीजी सुध्दा खरी माहिती लपवून आहेत. मागे डॉ. राजू कुसुंबे यांनी शाली अप्पांला खरी ओळख फोन नंबर पत्ता लिहायला सांगितले होते पण त्यांनी तसं केलं नाही. माझं निरीक्षण आहे की जे आयडी खऱ्याखुऱ्या नावाने इथं आहेत ते फारच कमी गैरवर्तणूक करतात किंबहुना करीत नाहीत. मायबोली धोरण बदलण्याची वेळ आली आहे. मनोरुग्ण लोक फायदा घेत आहेत. विकृत आयडी उडवण्याबरोबर ब्लॅककॅट, अज्ञातवासी यांना समज दिली पाहिजे. अज्ञात वासीही अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन प्रतिवाद करताना दिसतात.
अॅडमीन यांना विपू करायला गेले
अॅडमीन यांना विपू करायला गेले तर तैमूर भाऊजींनी माझ्या आयडीकडं लक्ष द्या हा विपू केलेला दिसला.
तैमूर हेच परशूराम असावेत. साळसूदपणे इकडं एक लिहिणार आणि दुसऱ्या आयडीनं शिव्या देणार.
तैमूर हे नाव घेण्यामागे
तैमूर हे नाव घेण्यामागे काहीतरी कारण असावं. हेतू असेल परसूचा.
स्वत:चा प्रतिसाद काढून
स्वत:चा प्रतिसाद काढून टाकायची सोय द्यावी.
भारतातील किमान ३ जण admin असावेत जे वेळ देऊ शकतील.यात किमान १ स्त्री असावी.
भारतीय admin होऊन चालणार नसतील तर किमान अमेरिकन admin संख्या ५ ने वाढवावी. इथे खूप कचरा असतो. शिवीगाळ, अश्लील कविता, इ. लगेच उडवण्याची गरज आहे.
इकडे बरेच जण दुर्लक्ष करा असा
इकडे बरेच जण दुर्लक्ष करा असा सल्ला देतायेत मुळात किती आणि का दुर्लक्ष करायचा असा माझा सवाल आहे. वर्गात जर एखादा आडदांड मुलगा इतर मुलांना त्रास देत असेल तर आपण इतर मुलांना म्हणतो का खारे त्याचे 2 फटके नाही काही होतं नाही..तसं होत नाही ना.. त्या मुलांना शिक्षा मिळालीच पाहिजे. मुळात इकडे जे दुर्लक्ष करा म्हणून संतगतायेत त्यापैकी किती जणांना त्यांच्या प्रत्येक प्रतिसादावर विनाकारण ट्रोल केलेलं चालेल? किती जणांना त्यांच्या आई वरून शिवी दिलेली चालेल?? आणि त्यांना चालत असेलही म्हणून इतरानी का बर हे सगळं सहन करायचं?? ते असतील गेंड्याच्या कातडीसारखे म्हणून सगळ्यांनीही तसंच का वागायचं??
होय कमला जी सिध्देश्वर नावाचा
होय कमला जी सिध्देश्वर नावाचा आयडी अत्यंत अश्लील कविता लिहित होता. लोकांनी तक्रार करुनही कविता तशाच आहेत. आयडीदेखील असावा. त्याला छान छान बोलणारे बरेच लोक आहेत मायबोलीवर.
मी रुचा ताई तूम्हाला ट्रोल
मी रुचा ताई तूम्हाला ट्रोल करणारांची यादी लिहा इथं. अॅडमीनना कळू देत कोन कोन आहेत.
>> ब्लॉक करण्याची सुविधा
>> ब्लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
Submitted by अजिंक्यराव पाटील on 23 March, 2020 - 17:11
+11111 कोणत्याही सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म वर (पोर्टल असो फोरम असो किंवा मेसेंजर असो) या दोन मुलभूत सुविधा असणे आवश्यकच आहे:
१. ब्लॉकिंग: गरज भासल्यास सदस्यांना एकमेकाला ब्लॉक करता यायला हवे कि जेणेकरून त्यानंतर त्यांची कोणतीही कृती (धागा, संदेश, प्रतिसाद इत्यादी) एकमेकांना दिसणार नाही.
२. रिपोर्टिंग: सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्मच्या धोरणा विरोधात असेल तर तो कंटेंट सदस्यांना रिपोर्ट करता यायला हवा जेणेकरून व्यवस्थापनाला त्याविरोधात कारवाई करता येईल.
अगदी फेसबुक अथवा इतर कोणताही सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म घ्या, या दोन मुलभूत सुविधा असतातच. त्यामुळे सदस्यांना पण त्रास होत नाही व व्यवस्थापनाचे काम सुद्धा अत्यंत सोपे होते. याहीपलीकडे जाऊन आपले प्रोफाईल, धागे, विपु या गोष्टीना मर्यादित अक्सेस देणे वगैरे या गोष्टी येतात. पण तो पुढचा भाग.
मनोरुग्ण लोक फायदा घेत आहेत.
मनोरुग्ण लोक फायदा घेत आहेत.
मनोरुग्ण असो/नसो , चाचणी कोण करणार?
भंकसगिरी प्रतिसाद उडवायचे.
मनोरुग्ण लोक फायदा घेत आहेत.
मनोरुग्ण लोक फायदा घेत आहेत.
मनोरुग्ण असो/नसो , चाचणी कोण करणार?
भंकसगिरी प्रतिसाद उडवायचे.
तूम्हाला ट्रोल करणारांची यादी
तूम्हाला ट्रोल करणारांची यादी लिहा>>मी ऑलरेडी ती यादी मेल थ्रू ऍडमिन ना पाठवली आहे. मी एक भला मोठा मेल लिहिला होता पण मी जसं लिहिलं त्या मेल चा एका शब्दाचाही रिप्लाय आला नाही. किंवा त्या त्या आयडीना समज किंवा तंबी देण्यात आली असेल असेही मला वाटत नाही. त्यांच व्यवस्थित चाललंय सगळं...
इकडे बरेच जण दुर्लक्ष करा असा
इकडे बरेच जण दुर्लक्ष करा असा सल्ला देतायेत मुळात किती आणि का दुर्लक्ष करायचा असा माझा सवाल आहे. वर्गात जर एखादा आडदांड मुलगा इतर मुलांना त्रास देत असेल तर आपण इतर मुलांना म्हणतो का खारे त्याचे 2 फटके नाही काही होतं नाही..तसं होत नाही ना.. त्या मुलांना शिक्षा मिळालीच पाहिजे. मुळात इकडे जे दुर्लक्ष करा म्हणून संतगतायेत त्यापैकी किती जणांना त्यांच्या प्रत्येक प्रतिसादावर विनाकारण ट्रोल केलेलं चालेल? किती जणांना त्यांच्या आई वरून शिवी दिलेली चालेल?? आणि त्यांना चालत असेलही म्हणून इतरानी का बर हे सगळं सहन करायचं?? ते असतील गेंड्याच्या कातडीसारखे म्हणून सगळ्यांनीही तसंच का वागायचं??
Submitted by me_rucha
क्षमा करा. मीही दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला होता पण आता मला माझी चूक कळली आहे. संबंधितांवर कठोर कारवाई केली गेली पाहिजे यात वादच नाही.
कारवाई होईल तेंव्हा होईल.
कारवाई होईल तेंव्हा होईल. सध्या अशा आयडीजना पुर्ण वाळीत टाका.
आध्यत्मावर धागा येवो अथवा समस्येवर उत्तर मागणारा धागा येवो, पुर्ण दुर्लक्ष करा.
तैमूर बरोबरच बोलत आहेत.
तैमूर बरोबरच बोलत आहेत. जेव्हा जेव्हा त्या व्यकतीच्या धाग्यांवर प्रतिसाद जास्त मिळायला लागले की ठराविक आयडींना सहन होत नव्हते मग ते वाकडं तिकडं लिहून त्याला मुद्दामच डिवचतात. तो शिव्या घालत लागला की हेच आकांडतांडव करुन त्याचेइ लिहिले आणि आयडी उडवाया लावतात.त्या विकृती बरोबरच त्याला नेहमीच डिवचणार्या आयडी उडवाया पाहिजे.
माझं सध्याचं मायबोली वय 7-8
माझं सध्याचं मायबोली वय 7-8 वर्षे असावं का? असेल बहुदा. आले तेंव्हा मी बऱ्यापैकी 'लहान' होते. मायबोलीने मला मोठं आणि समृद्ध केलं. मी आले तेंव्हा परिस्थिती फार सुंदर होती असं नाही पण बरी होती. आता फारच वाया गेलीये.
इथे हिरहिरीने सल्ले देणाऱ्यांना एक प्रश्न विचारावासा वाटतो, जे संकेतस्थळ users कडून एक पैसा न घेता चालतंय त्यांनी का म्हणून लोकांची मनस्थिती, ओळख वगैरे तपासात बसावं?
कोणावरही कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास मायबोली प्रशासन कायद्याला सर्वतोपरी साहाय्य करेल हे admin व वेबमास्टर यांनी आधी अनेक वेळा स्पष्ट केलं आहे.
ज्यांना फार त्रास होतोय त्यांनी सायबर गुन्हा दाखल करा की. कितीही डुआयडीने आलेले असले तरी पोलीस पकडतील बरोबर. का करत नाही तुम्ही कारवाया?
अनेक admin नेमण्याबाबत - ज्यांनी मायबोली निर्माण केली त्यांच्या कामावर तुम्ही शंका घेताय, या admin team वर शंका घेणार नाही कशावरून?
जो पातळीसोडून वागतोय त्याचा अनुल्लेख केलात तर तुम्ही 'नामर्द' ठरत नाही. काय बोलल्यावर तुम्ही उचकता हे माहीत असतं तेंव्हाच तसे प्रतिसाद येतात. आणि त्यांना शिक्षा देणारे तुम्ही कोण? भोगतील त्यांचं ते. तुम्ही अनुल्लेख करा , बघा कसे तडफड करतील. मग एका वेळेला थांबेल सगळं.
Admin तुम्ही हे करा ते करा सांगण्यापेक्षा मायबोली स्वच्छ करण्यासाठी मी काय करू शकतो तो विचार करा आणि कृती करा बरं.
योग्य विचार मांडला रीया.
योग्य विचार मांडला रीया.
हो आणि एक आठवलं. इकडे जेव्हा
हो आणि एक आठवलं. इकडे जेव्हा गळे चिरण्याची भाषा केली जात होती तेव्हा च कोणीतरी पोलिसात तक्रार करायला हवी होती. मरण्या मारण्याची लढाई इकडं सुरू करणारांची तक्रार अवश्य करायला हवी होती.
साधं धोरण ठेवले की बाबा कोणत्याही ओळखपत्राचा फोटो प्रोफाइल वर ठेवा. तर असले प्रकार होणार नाहीत.
रिया +१
रिया +१
मी पण इग्नोरास्त्र वापरतो, पण त्यालाही मर्यादा आहे.
माझा अनुभव आहे की, एखादा धागा उघडला तेथे चांगली चर्चा चालू असते, अन बघता बघता वातावरण दूषित होते. पुर्ण मुड जातो.
मायबोलीवर शहरी नक्षलवादी
मायबोलीवर शहरी नक्षलवादी लोकांसारखे काही लोक सक्रीय असावेत अशी मला शंका आहे. पोलिस तक्रार झाली तर अशांचेही खरे चेहरे समोर येतील. एकमेकांच्या साथीने ते सरकारविरोधात गलिच्छ टीका टिप्पणी करत असतात. काही एका आयडीनं सभ्यपणा करतात आणि डुआयडीनं विकृती दाखवितात.
आठ दहा आईडींच्या दांडगाईने
आठ दहा आईडींच्या दांडगाईने लेख नासताहेत. ती सुरू झाली की दुसरे लोक धागा सोडून जातात. त्यांना हेच पाहिजे असतं.
कारवाई गुढी पाडव्यापासून सुरू
कारवाई गुढी पाडव्यापासून सुरू करतील बहुतेक.
मंडळी एक लक्षात आलं का मन्या
मंडळी एक लक्षात आलं का मन्या नावाच्या आयडीला अत्यंत अश्लाघ्य भाषेने त्या आयडीनं उध्दार केल्यानंतर मन्या आयडीनं कोणताही प्रतिवाद केला नाही. ना एडमीन कडे तक्रार केली. उलट काही घडलंच नाही असं दाखवत इतर धाग्यांवर हसतखेळत प्रतिसाद देत फिरत आहे.
त्याच्या धाग्यावर मिठाचा खडा टाकून बाजूला नामानिराळे . हीच कंपूची मोडस ऑपरेंडी आहे.
प्रत्येक वेळी इग्नोर करणे पटत
प्रत्येक वेळी इग्नोर करणे पटत नाही. आपण Utopia मध्ये राहत नाही त्यामुळे कायदे सक्षम हवेत. बहुसंख्य वेळा हेच पाहण्यात आलाय की पातळीहीन प्रतिसाद येणे सुरु झाले की चांगली सुरु असलेली चर्चा पण अचानक थांबते आणि ज्यांची चांगला प्रतिसाद द्यायची इच्छा असते तेही प्रतिसाद करायला हात आखडता घेतात.
जिथे बऱ्याच विनंत्यांना न जुमानून धागाविषयाची थट्टा करत केवळ विनोदी प्रतिसादाने सुद्धा वर्षानुवर्षे चाललेला धागा बंद पडतो तिथे अश्लील शिवीगाळ इग्नोर करून धागायोग्य प्रतिसाद येतील अशी अपेक्षाच करणं धाडसाचं आहे.
असे किती धागे आहेत जेथे चिखलफेक सुरु झाली तरी इग्नोर करून चर्चा व्यवस्थित सुरु राहिली याचा विचार करून माबोचा दर्जा अजून घसरू द्यायचा नसेल तर कठोर पावले उचलायलाच हवीत.
कोहंसोहं जी बरोबर बोलत आहा.
कोहंसोहं जी बरोबर बोलत आहा. अतिशय छान चर्चेला गालबोट लावणारे काही अलिकडील आयडी नथुराम, झम्प्या दामले, खसकूराम, परशुराम, आत्माराम अशी राम असलेली आहेत. त्यातल्या त्यात ब्लॅककॅट सतत चिथावणीखोर वक्तव्यं करत असतो. हे मुद्दामच वातावरण निर्माण करुन गोंधळ चालू करतात. मायबोलीचे चार भाघ करावेत.
एक अमेरिकन लोकांसाठी, दोन भारतीय लोकांसाठी ,तीन फक्त महिला, चवथा अशा गोंधळ घालणारांसाठी.
मायबोली निरोगी ठेवण्यासाठी
मायबोली निरोगी ठेवण्यासाठी ब्लॅककॅट या आयडीच्या प्रतिसादाला कुणीही प्रत्युत्तर देऊ नये. आताही तो आयडी ऋन्मेष यांच्या धाग्यावर उलटसुलट प्रतिक्रिया करत आहे. विकृत विचारांना ठेचण्यासाठी प्रत्येकानं त्या आयडी व या आयडीच्या प्रतिसादांना दुर्लक्षित केले तरच मायबोली ट्रॅकवर येईल.
Pages