नवीन मायबोली: असे सुधारता येईल

Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54

आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.

तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता नीट सुरू आहे काल बदल केल्यापासून .सध्या काहीच त्रास नाहीये.धन्यवाद वेबमास्टर इश्यू क्लीयर केल्याबद्दल.

माझे सदस्यत्वच्या वरील आपल्या नावावर क्लिक केले की लेखन दिसत नाही. आणि हा प्रॉब्लेम फार पूर्वीपासूनचा आहे. >>>>> मला दोन्ही कडे काहिही दिसत नाहीये.
निवडक १० तर दिसत नाहीये पण लेखन माधे पण टॉमाटो राईस दिसतीये.>> डिट्टो. सेम प्रॉब्लेम येतोय मलाही

स्लो चं माहिती नाही, पण मला तो बॅकस्पेसचा प्रॉब्लेम येतो. एकदा बॅकस्पेस दिली, तर पुढे स्पेस देऊन लिहावे लागते, नाहीतर -- असकाहहेतरपुन्हाआएक्द -- असे शब्द जोडले जातात आणि मात्रा/वेलांट्या/उकार/रफार इकडून तिकडे उड्या मारतात.

<लो चं माहिती नाही, पण मला तो बॅकस्पेसचा प्रॉब्लेम येतो. एकदा बॅकस्पेस दिली, तर पुढे स्पेस देऊन लिहावे लागते, नाहीतर -- असकाहहेतरपुन्हाआएक्द -- असे शब्द जोडले जातात आणि मात्रा/वेलांट्या/उकार/रफार इकडून तिकडे उड्या मारतात.>

ही क्रोमची जुनी समस्या आहे.

https://www.maayboli.com/new4_all - हे पान लगेच लोड होतंय.

मात्र त्यातलं एखादं पान उघडायला पुन्हा तसाच भरपूर वेळ लागतोय.

(डेस्कटॉप, ऑपेरा)

आयफोनवरून बहुधा मायबोली सुरळीत चालु झाली असावी. परंतू मला काल वेगळा प्रॉब्लेम आला. काल सफारीचा ब्राउझर डेटा वगैरे डिलिट केला होता व त्यानंतर मायबोलीवर आले, तर मी लॉगआउट झाले होते. (सदस्यांच्या लिंका ग्रे होत्या) परंतू मला लॉगिन करायला बॉक्सच सापडला नाही. :| मी सगळीकडे शोधले. आज परत ट्राय करीन, सेम प्रॉब्लेम आला तर स्क्रीनशॉट घेते.

बस्के सेम इश्यू मला आज आला आहे. क्रोम वर. विंडोज १० एंटरप्राईज.
आणि पहिलेसारखेच पेजेस नॉनरिस्पॉन्सिव होताहेत... Sad

अडमीन,

गृप मध्ये नवीन लेखन केल्यावर खाली " use group default" हा ऑप्शन कायम सिलेकटेड असतो

म्हणजे धागा बाय डिफॉल्ट गृप पुरता मर्यादित असतो.
नवीन लोकांना हे कळत नाही, आणि धागा कमी लोकांपर्यंत पोहोचतो ( thanks to group system)

तरी बाय डिफॉल्ट धागा सार्वजनिक असावा, ज्याला हवे तो मर्यादित करून घेईल.

आता सर्व व्यवस्थित चालतंय. क्रोमवर चांगलं टायपता येतंय.

पण नवीन प्रॉब्लेम झालेला दिसतोय. मोबाईलवर 'माझ्यासाठी नवीन'मध्ये लेख किंवा प्रतिसाद वाचून बॅक केले की अनुक्रमणिकेचे पान व्यवस्थित जागेवर येऊन थांबतेय. पण स्क्रीनला बोट टच केल्याबरोबर पान उडी मारून अनुक्रमणिकेच्या पहिल्या लेखावर येऊन थांबतेय. लेख पुन्हा खाली शोधत यावा लागतोय.

वेबमास्टर सर;
मायबोलीवर लिहीलेल्या लेखनाची चोरी होवू नये म्हणून काहीतरी उपाययोजना करावी.इथले चांगले लेख इतर वेबसाईटवर काही व्यक्ती मूळ लेखकाची परवानगी न घेता आपल्या नावाने छापत आहेत .द्वादशांगुला हिची बिर्यानी नावाची कथा साक्षी कदम नावाच्या व्यक्तीने बेधुंद लहरी अॅपवर छापली आहे.अजून बर्याच लेखकांच्या कथा/ कविता देखिल अशाच उचलल्या आहे.कृपया या समस्येवर विचार करावा आणि योग्य ती कारवाई करावी.
-आदिसिद्धी.

उबंटू वर ते वापरता येतं का? >> क्रोमचं एक्स्टेन्शन आहे. मी सेंटऑस / फेडोरा मध्ये वापरतो. उबंटूवर ही चाललं पाहिजे.

@सिम्बा
>म्हणजे धागा बाय डिफॉल्ट गृप पुरता मर्यादित असतो.
>नवीन लोकांना हे कळत नाही, आणि धागा कमी लोकांपर्यंत पोहोचतो ( thanks to group system)
हे असे नाही.
सार्वजनिक ग्रूप (जिथे कुणाही मायबोलीकराला सभासद होता येते असे ग्रूप) : use group default = सार्वजनिक
खाजगी ग्रूप (जिथे तुम्हाला आमंत्रण मिळालेच तर सभासद होता येते असे ग्रूप) : use group default = खाजगी (ग्रूप मधेच दिसेल)

दोन्ही ग्रूपमधले धागे, नवीन लेखन करताना , लेखक use group default न वापरता ते बदलू शकतो. पण अ‍ॅडमीनने एखादा धागा, संपादित करून मुद्दाम ग्रूपपुरता मर्यादित केला तर तो सार्वजनिक करता येत नाही.
उदा.
https://www.maayboli.com/node/64518 हा धागा use group default वापरून लिहला आहे. पण तो कुणालाही दिसतो. तुम्ही मायबोलीकर नसला तरीही तो दिसतो कारण तो सार्वजनिक ग्रूप मधे आहे.

@सचिन काळे
सर्व व्यवस्थित चालतंय हे इथे कळवल्याबद्दल धन्यवाद. तुमचा दुसरा प्रश्न थोडा अवघड वाटतो आहे. अजूनही येतो आहे का?

@आदिसिद्धी
वेबवर (मायबोलीवरच नाही तर कुठलीही वेबसाईट, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप) एकदा प्रकाशीत झालं की ते सुरक्षीत ठेवण्याचा कुठलाही तांत्रिक मार्ग नाही. जिथे तुमचे लेखन चोरी होऊन प्रकाशीत झाले आहे तिथल्या अ‍ॅडमीनला, इथलि लिंक देऊन इथे प्रकाशित झाले आहे, आणि तुमच्या परवानगी शिवाय चोरी केले आहे असे तुम्ही कळवू शकता.

@योग
मायबोलीच्या उपक्रमांत ज्यांनी स्वयंसेवक म्हणून भाग घेतला त्यांना एका वर्षासाठी रंगिबेरंगी सभासदत्व दिले जाईल असे आपण जाहिर केले होते. पण एक वर्षांनंतर लगेच रद्द केले नव्हते आणि काही स्वयंसेवकांनी दहा वर्षांपूर्वी जरी एकदाच भाग घेतला असला तरी ते चालूच होते. या २०१८ जानेवारीपासून , फक्त गेल्या एका वर्षात भाग घेणार्‍या स्वयंसेवकांचे रंगिबेरंगी सभासदत्व चालू ठेवले आहे.

@ललिता-प्रीति , जाई., जिज्ञासा, दत्तू, सस्मित
>आत्ता सर्व पानं त्वरित लोड झाली Happy
इथे आधी आणि नंतर आवर्जून कळवल्याबद्दल धन्यवाद .

Pages