नवीन मायबोली: असे सुधारता येईल

Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54

आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.

तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेमा,
लोकांना भांडायला वेगळा साहित्य प्रकार काढावा. इग्नोर करायला सोपे जाईल.
अथवा
आयडी फाॅलो / अनफाॅलो करायची सुविधा द्यावी. वारंवार आयडी उडवायची गरज पडणार नाही

एखादा आयडी वैयक्तिक पातळीवर ब्लॉक करण्याची सोय असली तर फार बरे होईल. एक(?) आयडी विनाकारण घाण, अश्लील प्रतिसाद देतो, आयडी उडाला की नव्या रुपात येऊन पुन्हा ये रे माझ्या मागल्या करतो, त्यावर तुमच्याकडेही इलाज नसेलच म्हणून.. ब्लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

मायबोली प्रशासनाला स्वत:ची खरी ओळख दिल्याशिवाय सदस्यत्व देऊ नये.>>>+1111111.. खरंतर मायबोली वर काही चांगलं वाचायला मिळेल या अपेक्षेने मी मायबोलीवर येते.. पण इथे काही धागे इतके निरर्थक असतात आणि फेक id तयार करता येतो म्हणून कोणीही काहीही प्रतिसाद देत सुटतात. कारण खरी ओळख कोणालाच माहीत नसते... आणि आता तर याचं प्रमाण खूपच वाढलंय. अगदी नकोसं होतं कधी कधी.. जर हजारो id काढण्याची मुभा नसेल तर मायबोलीचा दर्जा नक्की सुधारेल.. आणि खर्या चेहर्‍याने लिहिणारे आपल्या प्रतिमेचाही विचार करतील.. यावर खरंच विचार करण्यात यावा.. मी तर या प्रकाराला इतकी कंटाळली आहे की वाचनासाठी दुसरा प्लॅटफॉर्म शोधायला सुरवात केली आहे.. पण मायबोली खूप आवडते म्हणून याला आळा घालता येत असेल तर प्लीज प्रयत्न करा अशी विनंती आहे..

झोपडपट्टी भाषेचा उद्रेक झालेला आहे. त्याला पोरकटपणाही म्हणवत नाही. सरासर हीन पातळी गाठतायत. मोबाईल व व्हेरीफिकेशन ऑफ मोबाईल - ही कल्पना आवडेल.

मला कल्पना नाही, एक email id आणि त्यावर वेगवेगळे user id असे शक्य आहे का माबोवर?
user id साठी मोबाईल नंबर किती सक्सेस होईल कल्पना नाही

माझे काही मुद्दे आहेत.
१. सगळ्यात आधी तर प्रत्येक आयडीला आयडी घेताना काहीतरी ओळखपत्र अपलोड करायला लावा. ते नीट verify झाल्यावरच आयडी द्यावा.
२. एकच एडमीन न ठेवता एक एडमीन टीम बनवावी, आणि तिलाही काही अधिकार असावेत. इथे आईवरून शिव्या दिल्या जातात, स्त्रियांची इज्जत काढली जाते, आणि तो धागा दोन तीन दिवस तसाच राहतो.
३. एक आयडी शिव्या देऊन उडतो, पुन्हा तो मीच म्हणून येतो, पुन्हा शिव्या देतो, ट्रोलिंग करतो, पुन्हा आयडी उडतो आणि तो पुन्हा येतो आणि तो मीच असं जाहीर करतो. मग असं जाहीर केल्यावर तो आयडी उडवावा अशी तसदी प्रशासन का घेत नाही? की आईवरून शिव्या घातल्यावरच आयडी उडवला जाईल, असा प्रोटोकॉल आहे.
४. एखाद्या कथेवर कथालेखक नाच्या आहे, सक्रेड गेम्स मधला कुकु आहे अशी भाषा वापरली, तरी तो आयडी उडवण सोडा, तो प्रतिसादही उडवला जात नाही. आणि हो, प्रत्येक कथेवर अशाच प्रकारचे ट्रोलिंगचे प्रतिसाद असतील, तर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. यावर तक्रार करूनही कारवाई होत नाही.
५. एखाद्या आयडीला ब्लॉक करायची व केल्यास आपले लेखन किंवा प्रतिसाद त्याला दिसणार नाहीत अशी सोय करण्यात यावी. यामुळे काहीतरी लिहावंसं तरी वाटेल.
६. एडमीनने तक्रारीची वाट न बघता, proactive असावं, आणि नीट जरब बसवावी.

अज्ञातवासी, सगळे पॉईंट्स ना अनुमोदन
काही जुन्या आयडीना ऍडमिन चे छुपे समर्थन आहे का असाही एक प्रश्न मला व्यक्तिशः पडला आहे.
हे सर्वस्वी माझे मत आहे आणि मला आलेल्या अनुभवातून मी तयार केले आहे.
त्याला इतर कुणी डिस ऍग्री करत असेल तर जरूर करा.
मला त्याचा फरक पडत नाही.
एकच व्यक्ती ऍडमिन ह्याला काय अर्थय.
If i am not wrong that person is inU. S. A
त्यामुळे इंडियन टाइम मध्ये इकडे काय गोधळ चाललाय त्याची त्या व्यक्तीला काहीही आयडिया नसते...

@ me_rucha - Exactly माय पॉईंट. इथे भारतीय प्रमाणवेळेत जो गोंधळ होतो, तो निस्तरायला तब्बल १२ तासाचा अवधी लागतो. जर एक एडमीन टीम असली, तर एडमीनचंच काम सोपं होईल.
अजून एक, एका आयडीने दुसऱ्या आयडीला उद्देशून कितीही अपशब्द वापरले, तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही. मग एकाच आयडीची सगळे मिळून किती का खिल्ली उडवेनात.
मग आईवरून घाणेरड्या शिव्या दिल्यावर नाईलाज झाल्यासारखा तो आयडी उडवला जातो.
Harassometer ची लेवल जरा कमी करा, आणि वैयक्तिक पातळीवर जाऊन होणारी चिखलफेक असेल तरी कारवाई पटकन करा.
अजून एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, एखादा जुना आयडी उडवताना ना, त्याचं मायबोलीवर काँट्रिब्युशन बघून मग उडवा, कारण तो आयडी उडवावा, यासाठीच नवीन दुआयडी घेऊन लोक येत असतात. त्याच्या बायकोला, आईला, नाही नाही ते बोललं जात. कुठलाही सज्जन माणूस त्यांच्या लेव्हलला उतरू शकत नाही, म्हणून शेवटी हाराकीरी वर येतो, आणि शेवटी त्याचा आयडी जातो.
पण त्या आयडीमागे त्याने मायबोलीला किती मोठं योगदान दिलंय, याचाही विचार व्हावा!
जर त्या डू आयडीवर वेळीच कारवाई झाली असती, तर अशी वेळ आली नसती.
जमलं तर त्यांचा आयडी परत आणायचं बघा.

मायबोलीवर भारतातील दोन स्त्रियांना उप प्रशासक म्हणून नेमावे. आणि एखाद्या आयडी ने आक्षेपार्ह लिहिले तर तो आय डी तात्पुरता निलंबित करण्याचे किंवा त्या आयडी ला ताकीद देण्याचे आणि तो प्रतिसाद काढून टाकण्याचे अधिकार द्यावेत. आणि
म्हणजे ताबडतोब प्रक्रिया सुरू होईल आणि आक्षेपार्ह वक्तव्ये करणारया आयडी ना चाप ही बसेल.
आयडी काढून टाकण्याचे किंवा कोणत्याही कायम कार्यवाहीचे अंतिम अधिकार मूळ प्रशासकाचे राहतील.

सगळ्यांचे सर्व बरोबरच आहे पण प्रत्येकवेळी ऍडमिनने लक्ष घालावे, कारवाई करावी अशी अपेक्षा करण्यापेक्षा वाह्यात, डुप्लिकेट आयडीला दुर्लक्षून ठोका की. आपण कशाला मधे पडा असा विचार न करता चुकिच्या प्रतिसादाला, गलिच्छ भाषेला विरोध करा की. माबोकरांचे आवडते अस्त्र म्हणजे इग्नोरास्त्र. पण त्याच्या मर्यादा लक्षात घ्या. जेवताना ताटात किडे असले तर ते बाजूला करुन जेवता की ताटच बाजूला सारता? घरात कुणी घाण केली तर ती ओलांडून जाता की साफ करता? येथेही घाण दिसली तर साफ करा, ओलांडून जावू नका. आपापसात लाख वैचारीक मतभेद असतील पण जेंव्हा कुणी मर्यादा ओलांडतो तेंव्हा मिळून निषेध नोंदवा. विरोध करा. ऍडमिन कारवाई कधी करतील याची वाट पाहू नका.
जो आयडी गेले काही दिवस येथे गोंधळ घालतोय त्याला आता उडवले आहे तर सगळे बाहेर येऊन बोलत आहे. तो आयडी तासाभरात पुन्हा येईल तेंव्हा सगळे बिळात जाऊन बसतील याचे वाईट वाटते. उगाच नाही तो आयडी शड्डू ठोकून सांगत की मला माबोकर घाबरतात. आणि माबोकर इग्नोरास्त्रचे निमित्त पुढे करून बिळात लपतात.
ऍडमिनला जे करायचय ते करतीलच, तुम्ही काय कपायचे ते ठरवा. कारण गोंधळ घालणाऱ्या आयडीला येथे कोणीच वर्ज्य नाही. कधी कुणाची लाज काढेल ते सांगता येत नाही. ठरवा, झोडायचं की झुकायचं.

चिखलात डुकराबरोबर फाईट मारु शकत नाही कारण डुक्कर तीच फाईट एन्जॉय करत असतं.
मला नवल वाटतं जेव्हा स्त्री आय डी धाग्यांवरती लंबेचवडे प्रतिसाद देतात.

याच दोन (किंवा तीन किंवा प्रशासक मंडळ) स्त्री आयडी ना नवीन आय डी ची छाननी करण्याचे अधिकार द्यावेत. ज्यासाठी त्यांना PAN adhar or mobile verification करू द्या.
आणि ही स्थिती प्रत्येक आय डी बाबत करा. कारण अशा लोकांनी दहा बारा आयडी घेऊन ठेवलेले आहेत त्यामुळे असे नियम आणून त्यांचे हे अतिरिक्त आय डी आपोआप निकामी होतील.
सध्याच्या काळात अनेक मायबोली कर घरातूनच काम करत असल्याने ही प्रक्रिया त्यांना सोपी जाईल.

ज्या आय डी अशी छाननी विशिष्ट वेळेपर्यंत पूर्ण करत नाही त्या आय डी आपोआप रद्द होतील ही व्यवस्था करा.

जी भाषा आपण आपल्या आई किंवा बहिणि समोर किंवा एखाद्या सरकारी अधिकार्यासमोर वापरू शकत नाही अशी भाषा सार्वजनिक न्यासावर असूच नये.
सार्वजनिक स्थळाचे एक औचित्य आणि शालीनता असते. आपण स्थळाचेमायबोली हे नाव ठेवले आहे ते नाते थेट आईपर्यंत जाते. तेथे आईबद्दल अत्यंत अश्लाघ्य भाषा वापरण्यामुळे माझ्यासारखे अनेक लोक जे मायमराठी आणि मायबोलीवर प्रेम करतात त्यांना अतोनात दुःख होतं.

कोण स्वतःचा उद्धार करून घेईल त्या विचित्र माणसाशी पंगा घेऊन? त्यातल्या त्यात admin साहेबांचं त्याला अभय आहे की काय अशी शंका यावी इतपत तो माणूस शिरजोर आहे.. म्हणून ईग्नोरास्त्र.. तसं तैमुरराव, तुमचंदेखील वय फार कमी दिसतंय मायबोलीवर! खून करून दुसऱ्या दिवशी फोटो काढत निंदा करणाऱ्या जक्कल सारखी तर आयडिया नाही ना? (कृ ह घ्या)

खरे साहेब? तुमचं इतर लिखाण खूप चांगलं, पण बऱ्याच बाबतीत तुमच्या मांडीला मांडी लाऊन ही अश्लील मंडळी वावरतात, काय मत आहे आपलं?

मुळात फक्त चर्चा करुन अपेक्षित बदल होणार नाहीयेत. मायबोलीच्या admin आणि टिमने मनावर घ्यायला हवे.
तसेच आवश्यक बदलांसाठी वेळ आणि पैसा दोन्ही लागेल. त्यासाठी चर्चेत सहभागी होणारा कितपत मदत करु शकेल? हा मुद्दा अनुत्तरीत आहे.

अश्लाघ्य भाषा आणि माणसाचे शिक्षण याचा संबंध नाही.
साक्षर, सुशिक्षित आणि सुसंस्कृत यात फरक आहे.
सुशिक्षित आणि सुसंस्कृत मधील फरक हा तो माणूस आपल्या बायकोला किंवा बहिणीला कसे वागवतो यावरून समजून येते.
साधारणपणे असंस्कृत माणसे पण आईला नीट वागवतात.
Literate
Educated
And
Cultured
या पायऱ्या आहेत.

काही दिवसांपूर्वी इथून कंटाळून निघून गेलेल्या काही लोकांबरोबर गप्पा झाल्यात.
त्यात मायबोलीवर डू आयडी वाढण्यात एडमीन पेक्षा जास्त इथले सुजाण मायबोलीकर जबाबदार आहेत, आणि त्याला कारण मला तो बोलत नाही ना, मग कशाला मध्ये पडा ही मानसिकता.
काही उदाहरणे.
१. त्या आयडीने इथल्या एका स्त्रीला अत्यंत अश्लाघ्य अशा शिव्या दिल्या, तरीही इथे महिलांच्या हक्कांवर सरसावून येणाऱ्या कुणीही त्यावर आक्षेप घेतला नाही.
२. ही व्यक्ती डू आयडी आहे, विकृत आहे, असं असतानाही त्याने काढलेल्या धाग्यांवर लोक सिरियसली प्रतिसाद देतच राहिले.
त्याने मी म्हातारा झालोय, म्हणून मरावं का? असा धागा काढला. आणि त्याला इग्नोर करण्याऐवजी लोक अक्षरश प्रतिसादावर प्रतिसाद देत राहिले. आणि हे अटेन्शन सकिंग आहे म्हटल्यावर त्याने शिव्या द्यायला सुरुवात केल्यावर सगळ्यांनी काढता पाय घेतला.
राहावे की जावे या धाग्यावर कित्येक लोकांनी राहावे लिहिलं???? फक्त तो आपल्या विरोधतल्या व्यक्तिला विरोध करतोय म्हणून?
तो आयडी दुसऱ्या कुणाला शिव्या घालतोय ना? मग ते सोडा, आपण त्याच्याशी चर्चा करूच असाही बऱ्याच मायबोलीकरांचा विचार असतो.
डॉक्टर साहेब, इथे साक्षर, निरक्षर, कल्चरड वगैरे जाऊ द्या, पण तुम्हालाही सगळं दिसत असूनही तुम्ही त्याच्यासोबत मस्त साथीने दुसऱ्याशी वाद घालत होतात, त्याला आनंदाने चांगलं म्हणत होतात. आता तो आयडी नाही म्हणून तुम्ही हे सगळं लिहिताय.
जाऊदे, असो!!!

@ तैमूर : एखाद्या धाग्यावर प्रतिसाद असतील किंवा मोजके असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे उचित आणि शक्य होईल पण प्रत्येकच धागा कोणी ना कोणी spoil करत असेल तर नेमके कसे दुर्लक्ष करायचे.. आणि त्यामुळेच मायबोली कडेच दुर्लक्ष करावं की काय असं वाटण्याइतपत पातळी घसरली आहे..

पण तुम्हालाही सगळं दिसत असूनही तुम्ही त्याच्यासोबत मस्त साथीने दुसऱ्याशी वाद घालत होतात, त्याला आनंदाने चांगलं म्हणत होतात. आता तो आयडी नाही म्हणून तुम्ही हे सगळं लिहिताय.
जाऊदे, असो!!!

मी मायबोलीवर बऱ्याच दिवसांनी आलो मधल्या काळात काय झाले हे मला माहिती नाही. मी कोणाच्याही साथीने काहीही करत नाही केलेले नाही.

या आयडी पैकी कुणालाही त्यांच्या मूळ नावाने ओळखत नाही किंवा भेटलेलो नाही.
मी आपल्याला ही ओळखत नाही.
माझं मूळ नाव जे आहे तेच मी सर्वत्र लावतो आणी त्याच मूळ नावाने वावरतो.
माझ्या धाग्यावर लोकांनी माझ्या पदवीपासून निवृत्त झालो आहे का पासून लायकी आणि ज्ञाना बद्दल उगाचच राळ उठवली. ही कंपूबाजी होती की नाही हेही माहिती नाही.
माझ्या धाग्यावर आलेले आक्षेप मी त्या त्या आयडी ना विपु मध्ये माझ्या म्हणण्याचे समर्थन करणारे दुवे सुद्धा पाठवले.
ब्लॅक कॅट यांनी माझा CNBC वर झालेल्या शोचा व्हिडीओ टाकल्यावर माझ्या ओळखीवर शिक्का मोर्तब झाले.
आपण म्हणता आहात तसे कोणत्याही आय डी ने वापरलेल्या अश्लाघ्य भाषेचं मी एकदा तरी समर्थन केलं आहे असे दाखवता येईल का?

या सर्व आय डी ना मी ओळखत असून मी त्यात काही केले नाही हा आरोप मुळापासून गैरलागू आहे.
सध्या मुद्दा तो नाहीच.
मायबोली हे मराठी मातीआणि भाषेबद्दल प्रेम असणारे संकेतस्थळ उत्तम कसे चालवावे याबद्दल विचार करणे हा मुद्दा आहे.
मी मांडलेले मुद्दे चूक असतील तर त्यातील चूक दाखवून देण्याऐवजी आपण वैयक्तिक पातळीवर येऊन फाटे का फोडत आहात ते समजले नाही

@ मोक्षु
मायबोली कडेच दुर्लक्ष करावं की काय असं वाटण्याइतपत पातळी घसरली आहे..

YOU SAID IT

मला तरी वाटतय की हे सगळं अज्ञातवासी आणि त्यांचा कंपूमुळे होत होते. त्यांनी अनेकांना निष्कारण त्रास दिला. डिवचून डिवचून त्या सायको आयडीला वेडं करून टाकले. जणू त्याने शिव्या द्याव्यात म्हणून त्याला काही जन उचकावित होते. मी पाहिलं की तो आयडी इतर आयडींचा मान ठेवत होता.
अप्पा यांनी लिहिलेले स्वानंदासाटी लिहावे पण ते सोता कामेंट कडे दुर्लक्ष करायचे सोडून त्या च्या नादाला लागत बसले. अलीकडेच ब्लॅक कॅट हा आयडीही विकृतासारखा त्याच्या मागं लागला होता. तो म्हणाला होता की त्याचे मानसोपचार चालू आहे कि होते.
आता इथं कवित्व करून काय उपयोग नाही. अजिंक्य पाटील चौगुले ताईच्या मागं हात धुवून कसे मागे लागले होते हे सगळ्यांनी पाहिले होते. आता इथं लिहिणारांनी लगेच आपापल्या आधार कार्डची फोटो टाका म्हनलं तर कोन कोन तयार आहे हे सांगा बरं.
मन्याला सुध्दा काय गरज होती त्याच्या धाग्यावर जायची. ती गेली ती मीमधूरा, महाश्वेता, मन्या, उर्मिला म्हातरे, अजून दोन चार महीला आयडी आणि अज्ञातवासी हे करुन सवरुन नामानिराळे राहतात. सरळ दूर्लक्ष करायचं सोडून काही आयडी मूद्दामच त्याची खोड काढत होते. मोदींना काही बोललं तर त्याला सहन होत नाही हे लक्षात यायला पाहिजे. काही हिंदू धर्माला वाईट बोलणारी आयडी आहेत. ते लोक सूद्धा जाणूनबुजून गोंधळ घालतात राचकीय धाग्यांवर.

माझी बाजू कुणी घ्यावी की न घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तसेच माझ्या विरुद्ध कुणी बोलावं हा ही आहे.
परंतु वैयक्तिक पातळीवर येऊन बोलून एखाद्याच्या सहनशीलतेचा अंत पाहे पर्यंत लोक ट्रोल करतात.मी असे कितीही टोकाला लोक गेले तरी माझी पातळी सोडत नाही किंवा कोणाला अश्लाघ्य भाषेत बोलत नाही. कदाचित डॉक्टरकीच्या कित्येक दशकांच्या अनुभवामुळे असेल
पण इतका संयम लोकांचा रहात नाही.
आणि असा संयम संपेपर्यंत मायबोलीच्या प्रशासनाने वाट पाहावी असे होत असल्यामुळे बऱ्याच लोकांना मायबोलीवर यावेसे वाटेनासे झाले आहे ही चिंतेची गोष्ट आहे.
एकीकडे मराठी संकेत स्थळांनवरील लोकांची उपस्थिती कमी होत चालली आहे ही चिंता असताना आशा ट्रोल भैरवांकडे अपरिमित काळापर्यंत प्रशासनाने दुर्लक्ष केले तर मराठी संकेत स्थळ ही काही कंपूबाज लोकांची किंवा काही विशिष्ट राजकीय विचारसरणीची बटीक होऊन बसतील हा खरा धोका आहे.

धोरणबदल हा एक मार्ग होऊ शकतो.
लेखाच्या विषयाला धरून नसलेले प्रतिसाद उडवण्यात येतील हे धोरण आणावे. मग अडमिन म्हणून तीनचार जणांना ठेवल्यावर त्यांचे काम सोपे होईल आणि लेख स्वच्छ राहतील. "अरे तू इकडे कुठे?" या प्रतिसादापासून सुरू होऊन नंतर हाणामारी सुरू होते. ते सर्वच एका झटक्यात उडेल.

Pages