क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीच मायबोलीचा रोहित' असाही तुझा दावा असेल तर बोलणॅ खुंटले
>>>
नाही, मी शाहरूख मध्ये खुश आहे Happy

अँकी जिंकण्याबद्दल म्हणाला नाहिये तर शर्मा प्रसिद्धीझोतामधे राहण्याबद्दल म्हणतो
>>>>

एक्झॅक्टली.. आणि मी खेळातील हार जीत बद्दल बोलत आहे. कारण माझ्यासाठी ते मॅटर करते
>>>>

लोकांना फक्त हार जीत किंवा परफॉर्मन्स मॅटर करत असता तर पेड पीआर ची कुणालाच गरज पडली नसती. पण तशा कंपन्या आहेत, त्यांचे क्लायंट हे लोक आहेत. There is a much larger game beyond the boundry line and this is a part of it.

मला वाटलं होतं की शर्मा कसा त्या गेम मधे ही टॉप प्लेअर आहे वगैरे म्हणशील तू... पण तू त्या बाहेरच्या गेम कडे निगेटिव्ह असल्यागत बघतो आहेस.

पण तू त्या बाहेरच्या गेम कडे निगेटिव्ह असल्यागत बघतो आहेस.
>>>>

छे .. तसे असते तर मी त्यावर टीका केली असती. उलट मी त्यातून मिळणाऱ्या आर्थिक फायद्याचे समर्थनच केले आहे.
मला फक्त त्याच्याशी घेणे देणे नाहीये.
सोशल मीडियावर रोहीत कोहली धोनी यांचे चाहते कोणाची ब्रँड व्हॅल्यू जास्त आणि कोणाचे फोलोर्स जास्त वगैरे फालतू गोष्टीवरून एकमेकांशी स्पर्धा करत असतात. मला ते हास्यास्पद वाटते इतकेच. त्या लोकांना ते लखलाभ. आणि त्या लोकांचा फायदा उचलून या खेळाडूंनी खुशाल कमावावेत. मला त्याचे काही सुख दुःख नाही. जर ते सगळे यात खुश असतील तर गूड फोर देम.

मला त्याचे काही सुख दुःख नाही. जर ते सगळे यात खुश असतील तर गूड फोर देम. >> त्या पी आर गेमवरून धोनीवर ठपके ठेवलेले विसरलास का ? आयपील मधे कॉम्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट वरून ज्या भानगडी झाल्या होत्या त्यात धोनीची पी आर कंपनी नि त्यात संलग्न असलेले प्लेयर्स - त्यांचे भारतीय नि चेन्नई संघात सिलेक्शन हा एक मुद्दा पण होता. त्यात किती तथ्य होते ह्याची कल्पना नाही (माझ्या मते धोनीबाबत तरी नसावी) पण पैसे कमावण्यापलीकडेही त्याचा वापर करणे शक्य आहे ही शक्यता त्यातून उघड झालेली दिसते.

आयपीएल रीटेंशन मधे मुंबई ची लिस्ट बघायला मजा येणार आहे. बुमरा, हार्दिक, सूर्या नि रोहित चौघांनाही रीटेन करणे लॉजिकल वाटते पण मग उरलेल्या पैशांमधे स्ट्राँग नवीन टीम बनवणे कितपत शक्य होईल ?

सनराईजरस नी हेड, अभिशेक, कमिन्स , क्लासेन नि रेड्डी ह्यांना रिटेन केलय. परत लॉजिकली बरोबर वाटले तरी किती कमी पैसे उरणार आहेत. नटराजनला नाही केले हे आश्चर्य आहे.

त्यात किती तथ्य होते ह्याची कल्पना नाही
>>>>

मग इग्नोर करा.
जसे मी आयपीएलमध्ये काही सामने काही निकाल scripted असतात बोलतो तेव्हा मला जो सल्ला देता तोच तुम्ही सुद्धा इथे आचरणात आणा Happy

असो,
खेळात इतका पैसा आला की हे सगळे होणारच आहे हे स्विकारायला हवे.
देशासाठी खेळताना फक्त आपले शंभर टक्के द्या इतकेच मी अपेक्षा ठेवतो.

मग इग्नोर करा. >> मी तुला काय करावे ह्याबद्दल सल्ला विचारला असे माझ्या पोस्ट मधल्या कुठल्या भागामूळे तुला वाटले बाबा ? पूर्ण पोस्ट मधला एकच भाग समजाला का ?

देशासाठी खेळताना फक्त आपले शंभर टक्के द्या इतकेच मी अपेक्षा ठेवतो. >> (फक्त शब्दाची जागा चुकली आहे. ) देशासाठी खेळत नसताना १००% नाहि दिले तरी चालेल का ? खेळासाठी किंवा चाहत्यांसाठी किंवा आपल्या उपजिवीकेच्या साधनासाठी १००% कमिटमेंट नसली तरी चालेल का ? हे स्वीकारण्याचे लॉजिक पुढे जाऊन फिक्सिंग सारख्या कीडेला जन्म देते.

आयपीएल मध्ये आपल्या मालकांसाठी खेळताना ते खेळाडू काय करतात मला काही फरक पडत नाही.

Dravid trolls Rajdeep when asked about India's superstar culture

https://youtu.be/H97bjVlWe-k?si=ciBJ877qmjMp9LX-

असामी हा व्हिडिओ बघा.
खुद्द द्रविडच काय म्हणाला आहे
काय योगायोग.. अगदी माझेच शब्द द्रविड आधीच बोलून गेला आहे Happy

त्या व्हिडियोचा आपण बोलतोय त्याच्याशी काय संबंध आहे ?

त्याच व्हिडियोमधे द्रविड म्हणाला कि - लोक हिरो बनवतात. आता तू इथे जुम्मा, धोनी नि रोहित च्या बाबतीत काय करतो हे तुझे तूच मान्य केलेस हे बरे झाले Lol

लोकं हिरो बनवतात आणि त्यात काही चुकीचे नाही असेच म्हटले आहे. जे लोक चांगले खेळतात तेच हिरो बनतात. आणि त्यांना हिरो चाहते बनवतात. पीआर फक्त माध्यमांचे काम करू शकतात. बाकी सगळे लोकांच्याच हातात.
तसेच सुपरस्टार कल्चरला दोष देऊ नका असेच म्हटले आहे.

खेळाडूना हिरो बनवून पैसे सगळेजण कमावतात हे देखील म्हटले आहे. अगदी जसेच्या तसे माझे वाक्य आहे Happy

खेळाडूना हिरो बनवून पैसे सगळेजण कमावतात हे देखील म्हटले आहे. अगदी जसेच्या तसे माझे वाक्य आहे >> आता द्रविड पण तुझ्या वाक्यांछी चोरी करू लगला तर ...... Lol द्रविड ला प्रश्न काय विचारला नि त्याचे उत्तर प्रश्नाला धरून कसे मुद्देसूद होतेते बघ. "सुपर हिरो बनवून पैसा कमवण्यात गैर काय" हा मुद्दा नव्हताच इथे कधीही. अँकी किंवा मी पैशाबद्दल बोललो नाहियेत. पी आर म्हणजे फक्त पैसा ह्यापेक्षा बाळबोध गैरसमज नसावा.

द्रविडने तेच शब्द वापरले तर मुद्देसूद आणि माझे बाळबोध Lol

रोहीत धोनी कोहली पंत याचे कौतुक केले तर ती व्यक्तीपूजा...
सचिन द्रविड यांचे कौतुक केले तर ती क्रिकेटवरची निष्ठा Lol

येणी वेज, आता तर द्रविडच आमच्या पार्टीत आहे Lol

तू इथे जुम्मा, धोनी नि रोहित च्या बाबतीत काय करतो
>>>
"जुम्मा चुम्मा दे दे" आठवले

भारतीय संघाला, संघाच्या सगळ्या चाहत्यांना, क्रिकेट प्रेमींना दिवाळीच्या शुभेच्छा

Rishabh Pant, K L Rahul and Shreyas Iyer -- the three young stars of Indian cricket and captains of their IPL teams -- could be headed to the auction after failing to agree deals with their franchises.

बोकलत, द्रविडने वाद भांडण जे काही होते ते संपवले.
द्रविड म्हणाला त्याच्याशी आम्ही दोघे सहमत आहोत Happy

आयपीएल लिलावात मजा आहे यंदा

पंजाब धुमाकूळ घालणार ऑक्शनमधे. राजस्थान, मुंबई नि हैद्राबाद ला परत सम प्रॉब्लेम आहे ४५ मधे उरलेले सर्व बसवायचे. मुंबई बटलर च्या पाठी जाईल की डी कॉक कि किशनच्या ?

पांड्या परत कॅप्टन आहे. रोहितचे फॅन काय करणार आता ?

दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली.

दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली. >> आफ्रिका बहुधा दुसरा संघ असेल टेस्ट फायनल मधे खेळणारा. त्यांचे दान फारच सोपे आहे भारत किंवा लंकेपेक्षा.

*पांड्या परत कॅप्टन आहे. रोहितचे फॅन काय करणार आता * - जोपर्यंत कोच/मेंटोर/ हितचिंतक/ प्रेक्षक म्हणून सचिन मुंबई संघाच्या आसपास दिसतो, तोपर्यंत मुंबईच्या फॅनना मुंबईचा कॅप्टन कोणीही असला तरी फरक पडत नाही ! व, आयपीएल पुरतं तरी, रोहितचे फॅन हे अधिकतर मुंबई फॅनच असावेत ! Wink

"राजस्थान, मुंबई नि हैद्राबाद ला परत सम प्रॉब्लेम आहे ४५ मधे उरलेले सर्व बसवायचे." - केकेआर आणि सीएसके पण त्याच बोटीत आहेत.
यंदा ऑक्शनमधल्या प्लेयर्सचे भाव बरेच उतरतील असं वाटतंय. मग पुढच्या वर्षीपासून ट्रेडिंग करणं, एखाद्या महागड्या प्लेयरला वगळून ऑक्शनमधे स्वस्तात परत घेणे वगैरे प्रकार सुरू होतील.

मला आर सी बी कसे बिल्ड करते ते बघायची पण उत्सुकता आहे. दर वेळी मेस अप करणे हे येरा गबाळ्याचे काम नोहे. म्हणजे कागदावर बलवान असतो संघ पण मैदानात काहीतरी गंडतेच. पंजाबसारखे नाही - त्यांची दोन्हीकडे बोंब असते. आता भारतीय पेसर्स हि प्रिमियम कॅटेगरी आहे हे उघ्गड असताना अर्शदीप ला का रीलीज केले ? तेच हरप्रीत ब्रार बद्दल पण विचारता येईल. अन कॅप्ड प्लेयर आहे म्हणजे थोडक्यात सुटला असता. गुजरात परत संगाबाहेर ढकलले गेलेले गोळा करून मोट बांधेल का ?

आयपीएल हे फ्रॅंचाईजी क्रिकेट आहे. तिथे कोण काय भावनेने कोणाला सपोर्ट करतो हे जो तो आपले निकष लाऊन ठरवतो. हा ज्याच्या त्याच्या चॉईसचा मामला आहे.

कोणी आवडीच्या खेळाडूच्या संघाला करतो - जसे पंत आहे तर दिल्लीला सपोर्ट.

तर कोणी आपल्या शहराचे नाव आहे त्या संघाला करतो - मुंबईकर आहोत तर मुंबईला सपोर्ट.

तर कोणी मालक कोण आहे हे बघून करतो.- म्हणजे शाहरूख फॅन आहोत तर कोरबो लोरबो जितबो रे..

मी पर्सनली या तिन्ही कारणास्तव काही संघाना सपोर्ट करून झाला आहे.
याउपर सुद्धा काही कारणे असतील.

यंदा कोणाला सपोर्ट करायचे ते लिलावानंतर आपसूक मन सांगेलच..
पण दोन संघ मनातून उतरले आहेत.
एक मुंबई आणि दुसरी लखनऊ.. आणि दोन्हींचे कारण म्हणजे त्यांच्या मालकांची खेळाडूंशी असलेली वर्तणूक.

आरसीबीचा उल्लेख राहूनच गेला होता. बरं झालं तू लिहिलंस त्यांच्याविषयी. आत्तापर्यंत तरी बॅटिंग बलाढ्य करून, मोठे स्कोअर्स करून जिंकता येईल अशीच त्यांची धारणा दिसते. अगदी पहिल्या दोन सीझन्स मधे कुंबळे, स्टेन (तेव्हा हा सगळा प्रकारच अर्भकावस्थेत होता) आणि नंतरच्या काळात चहल सोडला (तो सुद्धा अननोन च होता. त्याच्या peak वर असताना त्याला रिलीज केलं) तर आरसीबीच्या बॉलर्सचा उल्लेख करावा असं काही नाही. त्यांच्याकडे चांगले बॉलर्स नव्हते असं नाही, पण एक तर ते त्यांच्या प्राईममधे नव्हते (झहीर, व्हेटोरी, मुरली), किंवा त्यांनी कोअर बॉलिंग अ‍ॅटॅक कधी तयारच केला नाही.

ऋन्मेऽऽस>>+१
मला मुंबई संघा विषयी कधीच प्रेम वाटले नाही. मी राहुलचा फॅन आहे. पण आता मात्र...
मागच्या वर्षी वाटले होते कि त्याच्यावर अन्याय झाला. पण आता तर तो राजी खुशीने पांड्याच्या हाताखाली खेळायला तयार झाला आहे! अर्थस्य ही पुरुषो दासः!

Pages