क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१४७ टार्गेट

अवघड आहे इथे...
शर्मा आणि कोहली हिशोबात पकडू नका..
यशस्वी लवकर आऊट झाला तर पंतसाठी देव पाण्यात ठेवा.
डावखुऱ्या फलंदाजांनी जबाबदारी घ्यायला हवी.
बॅटिंग मध्ये डेप्थ आहे हीच केवळ एकमेव जमेची बाजू आहे.

असे कसे 147 पैकी 11 रन शर्माजीने केले आणि आपले काम करून आऊट झाला. प्रत्येकाने 10 ते 15 रन केले तरी आपण जिंकू.

किती किती वाईट शॉट होता शर्माचा!! Dude needs to rethink if he wants to continue playing test cricket.

गिलने सरळ बॉल सोडून दिला Uhoh

शर्माचा फॉर्म गंडला आहे. असेही बाद होणार तर निदान मारून बाद होऊया यात तो गेला.

गिलने सरळ बॉल सोडून दिला. पीच डोक्यात होता.

कोहलीने आता कोणाला धावबाद करू नये. आणि स्वताही होऊ नये.

शर्मा आणि कोहली - दोघांनी उर्वरित करियरचा सिरियसली विचार करावा. तसंही टेस्टमधे शर्मा इतका मोठा प्लेयर नाहीये. पण कॅप्टन्सीचा मोठा भाग आहे त्याच्या टीममधे असण्यात.

हल्लीच्या क्रिकेट मध्ये टेम्परामेन्ट, परिस्थिती नुसार खेळ वै शब्द मिसिंग आहेत काय?

150 चे टार्गेट 500 चे असल्यासारखे दिसतेय

Jaiswal lunged forward and played for the spin but got done in by the lack of spin. >> कुछ स्पिन मे गये कुछ भाव खाके गये.

आपल्याला आज न्यूझीलंड ची शेवटची विकेट काढायला १४ बॉल लागले
त्यांनी ४२ मध्ये आपल्या पहिल्या ५ काढल्या...

कुछ स्पिन मे गये कुछ भाव खाके गये.
>>
या सिरीज चं आऊटकम

दडपण झुगारून देण्यासाठी आडवी तिडवी बॅट फिरवून टेस्ट मध्ये टी 20 खेळायचं म्हणजे आपण हीरो बनू हा गैरसमज कधी दूर होणार देव जाणे...
पंत चं हेच चालू आहे. अजून १०० हवे आहेत जिंकायला.
असं मारता मारता तुक्क्यानी जिंकतीलही. पण त्यानी उगाच शेफारून जायची गरज नाही...

एकटा पंत किवी बॉलर्सना विचार करायला, त्यांचे प्लॅन्स बदलायला भाग पाडतोय. तो गेला तर इंडिया ६०-८० रन्स मधे ऑल-आऊट होऊ शकतील असं वाटतंय.

ऑस्ट्रेलियात साई सुदर्शनला टीमबरोबर ठेवून घ्यावं का?

आपण कसोटी चॅम्पियन नाहीच आहोत, हे सिद्ध करायला केवढा हा तीन कसोटीचा आटापिटा !!!!
*२८ वर ४ गंभीरने वाट लावली. * - की, गंभीरची वाट लावयला हे मोठ्ठं कटकारस्थान !!!

1.1

Ajaz Patel to Pant, no run, appeal for LBW, but this was spinning down leg, slower and shorter - Pant was early into the pull and was struck on his body
Replays on 11.1 - It was crashing into the leg-stump, three reds, New Zealand might've just missed a trick. Ajaz wasn't so confident and he didn't ask his captain to go for it either

दडपण झुगारून देण्यासाठी आडवी तिडवी बॅट फिरवून टेस्ट मध्ये टी 20 खेळायचं म्हणजे आपण हीरो बनू

उगाच चुम्मा म्हणत नाही त्याला

Ajaz Patel to Washington Sundar, 2 runs, a chance and Sundar has been dropped -
भारताने विजयश्री खेचून आणली आहे.
गेम ओवर.!!

..

न्युझीलँड विरुद्ध ऋषभ पंत सामना चालू आहे.

.

पंतला बॉलिंग करताना पटेल लूप न करता, सरळ आणि फास्ट बॉलिंग करतोय. भारताच्या आणि व्हाईटवॉशच्या मधे एकटा पंत उभा आहे.

अजूनही या पिचच्या मानाने बरेच धावा हव्या आहेत आणि तितक्या विकेट हातात नाहीयेत.
सुरुवातीचे फारच बेकार खेळले आहेत. त्यामुळे देव न करो पंत बाद झाला तर सामना एका क्षणात संपेल अश्या स्थितीत आहोत त्या स्थितीत पूर्ण चेस राहणार.

पंतला बॉलिंग करताना पटेल लूप न करता, सरळ आणि फास्ट बॉलिंग करतोय.
>>>>

कारण तो पंत पुढे येत सिक्स मारतो Happy
लोकांना पंतचा खेळ पाहून तो अडम तडम आणि दांडपट्टा प्लेअर वाटतो. पण त्याची गेमची समज कमाल आहे जी त्या लोकांच्या समजेच्या बाहेर असते. म्हणून मी सुद्धा कोणाशी वाद घालत बसत नाही. ज्यांना खेळाची ती समजच नाही त्यांना कुठे समजवावे असा विचार करतो Happy

Pages