क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

35 more to go ...
3 wickets in hand

जिंकुन देखील दुनिया सारी गंभीर येथे रडला होता
सलग एक अंकी धावावर बाद होऊन कोहली त्याला नडला होता

भारतात भारताचा 3-0 नी दारुण पराभव, worst ever performance. केवळ ह्या सीरिज च्या performance वर रोहित नी राजीनामा द्यायला हवा

सर्रास असली घाणेरडी पीचेस बनवून आपण आतापर्यंत कसोटी क्रिकेटचीच टर उडवत होतो व आता तर स्वतःचीही चेष्टा करून घेतोय !!! Sad
पण पंतला सलाम व अचूक गोलंदाजी करणाऱ्या न्युझीलंडच्या गोलंदाजांनाही !!

Again, we didn't play our best cricket, we know and we accept. They did so much better than us. We made a lot of mistakes and we'll have to accept it.>>oh yeah, न्यूझीलंडचे खेळाडू तेथे उभे राहून चना सेंग खात TP करत होते.

Screenshot_2024-11-03-13-38-10-69_40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b12.jpg

..

मालिकेत सर्वाधिक धावा
ऋषभ पंत - २६१ (तीन अर्धशतके)
त्या खालोखाल राचिन, यंग, कोनवे हे तिन्ही त्यांचे प्लेअर.
सरफराज, गिल, यशस्वी हे लिस्टमध्ये दिसत असले तरी केवळ एकदाच अर्धशतकी खेळी खेळले.
कोहली आणि शर्मा हे स्क्रीनशॉट घेताना आले नाहीत. अजून खाली कुठेतरी असतील.

या मालिकेतील अपयश हे कर्णधारासोबत प्रामुख्याने फलंदाजाचे आहे. गोलंदाजीत एखाद दुसरा गोलंदाज चालला तरी मालिकेचा निकाल पलटू शकतो. फलंदाजीत एकटा फलंदाज ते करू शकत नाही. बॅटिंग युनिट म्हणून आपण फेल गेलो.

आज पंतला आऊट नव्हता दिला पाहिजे होता. डाऊटफुल होता. ऑन फील्ड अंपायरने सुद्धा आऊट दिले नव्हते. शंका असल्यास त्याचा निर्णय पलटवण्याची गरज नव्हती.

सकाळचा खेळ पाहून असेच वाटले होते की न्युझीलँड डीझर्व्ह करतेय ३-० स्कोअरलाईन.
फक्त पंतची इनिंग बघून जिंकावे आपण असे वाटू लागले होते.

पण आता वाटतेय एका अर्थी जे झाले ते चांगले झाले.
पंतने एकहाती जिंकवून दिले असते तर इतरांच्या चुका लपल्या असत्या.

तिन्ही सामन्यात पंतची विकेट निर्णायक ठरली.
पहिल्या सामन्यात शतक जवळ आले त्या नादात ९९ वर बाद झाला आणि मग डाव कोसळला.

दुसऱ्या सामन्यात कोहलीसमोर शून्यावरच धावबाद झाला आणि चांगल्या सुरुवाती नंतर जी आशा पल्लवित झालेली ती मावळली.

आणि हा सामना तर त्याच्या आणि न्यूझीलंड विरुद्धच चालू होता. त्याला संशयाचा फायदा मिळाला असता तर व्हाईट वॉश वाचला असता.

श्रीलंकेने न्यूझीलंडला व्हाइटवाश दिला, न्यूझीलंडने भारताला व्हाइटवाश दिला, आता आपण ऑस्ट्रेलियाला व्हाइटवाश देणार.

आता कसोटी चॅम्पियनशिप फायनल विचार न करता बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कशी जिंकता/राखता येईल हा विचार करायला हवा.
या धक्यातून बाहेर पडायला वेळ फार कमी आहे.
पहिल्या सामन्यात कोणीतरी जबरदस्त खेळी करून संघाचे मनोधैर्य उंचावण्याची गरज. जे गेल्यावेळी रहाणेने केले होते.

आता रोहित शर्मा ची कामगिरी लाजिरवाणी झाली तर त्याला सोडून पंत चा उदोउदो सुरू आहे. रिझल्ट 3-0 असाच आहे त्यामुळे किती व्यक्तिपूजा करा काही अर्थ नाही

पंतचा उदोउदो मी त्याच्या गाबा इनिंगआधी पासून करत आहे. त्यात नवीन काही नाही. आणि पंत एकटा खेळला म्हणून त्याचे कौतुक आहे. नव्वदीच्या दशकात सचिन चे सुद्धा याच कारणासाठी लोकं करायचे. भले भारत सामना का हरला असेना. जो खेळला त्याचे कौतुक आणि ज्यांनी चुका केल्या त्यावर चर्चा. यात काय वावगे आहे.

आता रोहित शर्मा ची कामगिरी लाजिरवाणी झाली तर त्याला सोडून पंतचा उदोउदो सुरू आहे

हे म्हणणे चूक आहे, रिषभ खेळला, किंबहुना एकटाच खेळला तर ते मान्य करायला काय चूक आहे. आणि रोहित खेळलेला नाहीये हे त्याने स्वतः पत्रकार परिषदेत मान्य केलेच आहे.

विक्रमांची ही आकडेवारी बरोबर आहे का?
Team India Under Gambhir-Rohit - so far

- After 27yrs, Lost a Bilateral ODI Series vs SL

- For 1st time, Lost 30 Wickets in a 3 match ODI Series

- After 45yrs, India Remained Winless in a Calendar Year in ODIs

- After 36yrs, India Lost Test v NZ at Home

- After 19yrs, India Lost Test at Chinnaswamy

- For 1st time Scored Less than 50 runs at Home

- For 1st time ever, Lost Test Series against Newzealand at Home

- After 12yrs, Lost a Home Test Series

- After 12yrs, Lost back to back Home Tests

- After 12yrs, Lost Test match at Wankhede

- For 1st time, Got Whitewashed (3-0) in a Home Test Series

गंभीर समस्या !
काहीतरी नक्कीच चुकत असणार या कॉम्बोचे.
द्रविड-शर्मा जोडी या WTC Cycle पर्यंत असायला हवी होती.
व्हाईट बॉल फॉरमॅट शर्मा बाप आहे पण इथे त्याला द्रविडची जोड हवी होती.
किंबहुना आधी म्हटले होते तेच. ऑल फॉरमॅट एक कर्णधार हा हट्ट सोडून आधीपासूनच रोहीत कोहली हे दोन्ही एकाच वेळी व्हाईट-रेड बॉल कर्णधार करायला हवे होते.

रिषभ खेळला, किंबहुना एकटाच खेळला तर ते मान्य करायला काय चूक आहे.
>>>

मी वर सुद्धा म्हटले आहे की त्याची महानता सहजी मान्य होत नाही. कारण त्याची खेळायची शैली पाहून जे क्रिकेटप्रेमी एका चौकटीतच विचार करतात त्यांना ते पटत नाही. पण तो या फॉरमॅट मध्ये सातत्याने स्वताला सिद्ध करतो. जिथे बाकीच्यांना खेळणे अवघड जाते तिथे हा पठ्ठ्या उभा राहणे हे काही नवीन नाही. त्याचे रन्स जे रेकॉर्ड बुक मध्ये दिसतात त्यापेक्षा त्यांची व्हॅल्यू जास्त आहे. ऋषभ पंत हे भारतीय कसोटी क्रिकेटला मिळालेले वरदान आहे.

विक्रमांची ही आकडेवारी बरोबर आहे का

हो, बरोबर आहेत. विक्रम बनावे यासाठी कोणी खेळत नाही, खेळाडू खेळतात म्हणून विक्रम बनतात.

ते तर आहेच.
तरी आमच्या क्रिकेट ग्रूप वर बरेच जणांना मी त्याची खेळायची शैली आणि विचार पद्धती पटवून दिली आहे.
पण शाळेच्या ग्रूपवर सुद्धा क्रिकेट विषय चालतो तेव्हा पंत बद्दल सर्वसाधारण मते टिपिकल असतात.
पण कॉमेन्ट्रीला जे असतात ते जाणकार मात्र अगदी अचूक विश्लेषण करतात. तो खेळताना त्याच्या समोरचा प्लेअर जणू अस्तित्वातच नसतो. त्याचाच विषय चालू असतो.

*गंभीर समस्या !* - सतत तीन सामन्यात असा लाजिरवाणा पराभव घडवून आणणं जगातल्या सर्वोत्तम कोचलाही जमणं अशक्य आहे ! गंभीरला याचं श्रेय देण्याची चूक आपण करू नये , असं मला वाटतं !!

ऑस्ट्रेलयाविरुद्धच्या टेस्ट सिरीज आधी इंडिया टीम केवळ एक प्रॅक्टिस मॅच खेळणार होती, ती पण इंडिया A विरुद्ध...
बीसीसीआय नी आता ही मॅच च कॅन्सल केलिये. कारण म्हणे की कुणी इंज्युअर नको व्हायला. असले ह पा इंज्युअर होणार असतील तर फिटनेस ट्रेनिंग अन् जिम मधे घालवलेल्या वेळाचा काय उपयोग??

अख्खी पब्लिक को पता है की इंडिया A से हारनेका रिस्क हटाने मॅच का पत्ता कट हुआ है...

Pages