क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चौथी बॅटिंग करायला लागणं म्हणजे लागोपाठ दोन टेस्ट्स खडतर होण्याची चिन्ह असतील. >> मूळात असे पिच बनवायची खरच गरज होती का हाही प्रश्न विचारायची गरज भासणार आहे आता.

इंग्लंड आलेली तेव्हा छान पीच होते. आपण चांगला खेळ केला आणि जिंकलो. मायदेशात असेच पीच हवेत. पाहिला सामना हरल्यावर अशी विकेट म्हणजे अजून प्रेशर वाढले आपले. स्पेशली लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाजांना मदत मिळताच आपले बोलो तारारारा होते.

आज सुंदर फलंदाजीला नऊवा आला. तो या फॉरमॅटमध्ये या लेव्हलला खूप चांगला फलंदाज आहे. त्याला आश्विन आणि जडेजा आधी सुद्धा पाठवू शकतो. किंबहुना मी तर म्हणतो पुढच्या डावात त्याला तिसरा पाठवा. सध्या त्याचाच कॉन्फिडन्स सर्वात हाय असेल संघात..

https://www.rediff.com/cricket/report/rana-gets-test-call-up-kuldeep-axa...
आस्ट्रेलिया टेस्ट सेरीज आणि द आफ्रिका T- 20 सेरीज साठी भारतीय संघाली निवड जाहीर झाली आहे . तुमचे काय म्हणणे आहे? कुलदीप
आणि axarला डच्चू.कुलदीप म्हणे जखमी आहे. शमी पण नाहीये.

काल मी हौशीने स्टेडियम मध्ये गेलो सामना पाहायला. मूड घालविला फलंदाजांनी. विशेषतः कोहली, पंत आणि सरफराज बेजबाबदार फटका मारायचा प्रयत्न. किवी फलंदाज आपल्या जागतिक दर्जाच्या फिरकी गोलंदाजांना सातत्याने यशस्वीरीत्या रिव्हर्स स्वीप मारत होते. किमान २५-३० धाव तश्या घेतल्या. अश्विन खूपच निष्प्रभ वाटला. जागतिक रेकॉर्ड मेकर फलंदाज एकाच स्पिनर समोर लोटांगण घालत होते. कुठेच आपला सामन्यात आव्हान राखण्यासाठी प्रयत्न जाणवला नाही.

मागे एकदा शर्मा मला मुंबईत दिसला होता. तो गाडीत होता. मी त्याला बोललो काच जरा खाली कर. त्याने लगेच काच खाली केली. त्याच्याजवळ गेलो आणि म्हणालो बाबा रे तू सारखा जिंकतोयेस पण वर्ल्ड चॅम्पियनशिपला गेल्यावर हारशील त्याचं काय? त्याने विचार केला आणि हसून बोलला पॉइंट है भाई. बघतो कायतरी. त्यानंतर तो कमी रन बनवून आऊट होतोय. त्याची आणि माझी त्यादिवशी गाठ भेठ नसती झाली तर आज nz ची अवस्था बांग्लादेशसारखी असती. पण देवाच्या मनातच होतं त्याला कोण टाळणार.

मुळात आपला काय प्रॉब्लेम आहे? गणेश चंद्रशेखारन् याचे एक चांगले आर्टिकल वाचले. त्याच्या म्हणण्यानुसार पिचमध्ये सुरुंग वगैरे काही नाहीये. ओके, स्पिनिंग आहे. खरा प्रॉब्लेम हा आहे कि आपले फलंदाज लेफ्ट आर्म स्पिनेर्स पुढे नांगी टाकतात. त्यासाठीच तर पंत हा महत्वाचा खेळाडू होता. पण त्याचा बळी राईट आर्म फिलिप्सने घेऊन आपली वात लावली.
म्हणून मी म्हणतो कि पंत आणि सर्फराजने जबाब दारी ने खेळायला पाहिजे होते.
अजूनही दुसरा डाव व्ह्याचा आहे.
Game is not over till the last ball is bowled!
Miracles do happen!

ह्या सामन्यातील आपल्या सर्वात यशस्वी बॉलरला रोहितने एकही षटक दिले नाही आज. उगाच दोन्ही डावात ५ बळी मिळाले असते तर अश्विन जडेजाला वाईट वाटले असते. २५५ सर्व बाद जिंकायला ३५९ धावा हव्यात सॅन्टनर समोर पुन्हा घालीन लोटांगण म्हणू नये जागतिक दर्जाच्या कोहली, रोहित आणि गँगने आणि चुम्माने पैर नहीं चुमना चाहिये फिलीप्स के फुलटॉस के!

359 टारगेट
भारतात चौथ्या डावात ३००+ चेस करताना आपण २६ पैकी एकाच वेळी जिंकलो आहोत ज्यात सचिनने नाबाद शतक मारले होते.

पण ती खेळपट्टी आणि ही यात जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे सामन्याचा निकाल जवळपास लागला आहे.
वाईट एकच गोष्टीचे वाटते. उद्या रविवार आहे आणि निवांत बघायला मॅच नसणार..

पण पुढच्या सामन्यापासून उसळी मारू.. विश्वास ठेवा या संघावर !

359 करायचे आहेत...
अडीच दिवसापेक्षा जास्त वेळ आहे...

नीट खेळा

आता फक्त चुम्माच आपल्याला यातून बाहेर काढू शकतो. t२० फायनलला गुडघा दुखतोय म्हणून सामना थांबवला आणि क्लासेनची विकेट काढली तसंच आता दुपारी १२ ते ५ पिचवर झोपला म्हणजे झालं. हाय काय नाय काय.

पण पुढच्या सामन्यापासून उसळी मारू.. विश्वास ठेवा या संघावर !

पण ती खेळपट्टी आणि ही यात जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे सामन्याचा निकाल जवळपास लागला आहे.

>>
तू स्वतः विश्वास गमावला आहेस संघावरचा...
डाव सुरू व्हायच्या आधीच निकाल ग्राह्य धरून खेळपट्टीला दोष देऊन मोकळा झाला आहेस.
हा संघ या खेळपट्टीवर नीट खेळू शकत नाही असा सूर तुझाच लागतोय.

आपण २५० टारगेट असते तर मारले असते
पण चौथ्या डावात या इथे इतके नाही मारत.
पहिल्या डावात त्यांची बरोबरी केली असती तर गोष्ट वेगळी होती.
मी या संघाला भारी मानतो पण म्हणून आता काहीही अपेक्षा नाही ठेवणार

घ्या.
आपल्याला खूप घाई झाली आहे.

मी सचिन दादा द्रविड अझहर वगैरे खेळाडू असताना त्या संघाला १०० आणि ६६ धावावर सर्वबाद होताना पाहिले आहे. तेव्हा फार शॉक वगैरे मध्ये गेलो होतो. पण त्यानंतर अनुभवाने समजले की क्रिकेटमध्ये असे दिवस येतात. असे सामने होतात. ते विसरायचे आणि पुढे जायचे. लढणे महत्त्वाचे असते. आणि त्यात ही पोरे तरबेज आहेत. हा नाहीतर पुढचा सामना नक्की लढतील. खचून जाणार नाहीत पण म्हणून यांच्या गळ्यावर तलवार ठेवून बसायची गरज नाही. गेल्या काही काळात इतका आनंद दिला आहे या संघाने म्हणून अपेक्षा वाढल्या आहेत. पण त्यांचे ओझे त्यांच्यावर लादायचे नाही. काही लोकं टपले आहेत सोशल मीडियावर जे वाट बघत आहेत की कधी हे अपयशी ठरतात आणि आम्ही तोंड सुख घेतो. हा मानवी स्वभाव आहे. त्यांना तूर्तास अपना टाईम आयेगा म्हणून पुढे जायचे आहे.

"उद्या रविवार आहे आणि निवांत बघायला मॅच नसणार.."
आज वर्किंग दिवस आहे का?

असो दिवसाच्या पहिल्या सेशन मध्ये 5 विकेट काढल्या, 350च्या आसपास लीड थांबवली आणि 81/1 अशी सुरुवात केली. चांगले आहे हे. आश्वासक आहे. आजचा दिवस शांततेत खेळले तर दिवसाखेर 270+ झाले तर उद्याचा दिवस आपला असेल. सेशन बाय सेशन खेळ पुढे न्यावा, फिरकी समोर नांगी टाकू नये एवढी अपेक्षा.

पहिले 2 सेशन शेयर्ड, मग 3 त्यांचे आणि मग 2 आपले असा आता पर्यंतचा या मॅचचा प्रवास आहे.

नाही आज सुद्धा सुट्टी आहे. पण मला दोन्ही दिवस मॅच बघायची होती.
आता सकाळी माहेरी जायला निघालो म्हणून प्रवासात त्यांची फलंदाजी पाहिली नाही.
घरी पोहोचल्यावर आपली पाहिली.
उगाच आशा दाखवत आहेत असे खेळून..
चौथ्या डावात या पीच वर असे खेळतात होय. घाबरून खेळा यार.. कारण जोपर्यंत माराल तोपर्यंत लोकांना ते आवडते.. बाद झाल्यावर शिव्या खाल खूप

उगाच आशा दाखवत आहेत असे खेळून..
चौथ्या डावात या पीच वर असे खेळतात होय. घाबरून खेळा यार..

क्या बात, हा विचार आवडला बर का

"जिंकली इंडिया"

आपके मुह मे घी शक्कर. डायबेटिक असाल तर स्टिविया.

PAK v ENG, 3rd Test
PAK 37-1 & 344
ENG 112 & 267
Pakistan won by 9 wkts

Pages