क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*गेल्या वर्षी कुठे होता भाऊ तुम्ही ? * क्रिकेटच्या बाबतीत इतका मागे पडलो आहे, हे कळलंच नाही ! वयं मोठ्ठं खोट्टम, हेच खरं !! Wink

टॉस हरले

बंगळुरू - टॉस हरले मॅच हरले
पुणे - टॉस हरले मॅच हरले
मुंबई - टॉस हरले मॅच हरले ?

केशवकुल
अंबानी या देशातला नंबर एक चा पावरफुल माणूस आहे. जेव्हा त्याच्या इज्जतचा सवाल असेल तेव्हा तो कोणाचीही वाट लावू शकतो. त्याच्याशी पंगा नाही घेऊ शकत कोणी. पडद्यामागच्या गोष्टी आपल्याला माहित नाहीत. समजणार सुद्धा नाहीत.

या मॅच बद्दल काय वाटते, बुमराहला बाहेर ठेऊन सिराजला घेतले. 3 सलग कसोटी हरण्याच्या पराक्रम करू नये म्हणजे मिळवलं

आयपीएल म्हणजे पैशाचा खेळ. जुगाराच्या जाहिराती करणारे खेळाडू त्यांना कसला आलाय मान सन्मान. अंबानीने अजून दोन चार कोटी हातावर टेकवले तर त्याच्या घरी हसत हसत पाणी पण भरतील हे.

लग्नात जेव्हा सगळे Who's who हजेरी लावत होते तेव्हा हा पठ्ठ्या विम्बल्डन बघायला गेला होता तेव्हा वाटले होते. कोई है.

रोहीत कोहली धोनी खुद्द सचिन यांची ब्रँड व्हॅल्यू कितीही का वाढेना ते अंबानीसोबत पंगा घेऊ शकत नाहीत.
खेळाडूपेक्षा संघ मालक डोईजड होणे कारण त्यांच्या हातात पैसा आणि पॉवर आहे याचसाठी मला हे फ्रॅंचाईजी क्रिकेट आवडत नाही.
या वादात क्रिकेटप्रेमींनी मात्र क्रिकेट खेळाडूंना सपोर्ट करणे सोडू नये. मग तो रोहित असो राहुल असो धोनी असो किंवा पांड्या असो, आपल्या आवडीचा असो नसो..
आणि खेळाडूंनी सुद्धा यांच्या नादात आपल्यातील संबंध बिघडवू नये. 2024 विश्व चषकामध्ये हेच दिसले आपल्याला.

समजा मुंबईचा कर्णधार पांड्याच असेल आणि रोहित फॅन क्लब नुसार रोहीतचा आपमन झाला होता. त्यात पांड्याने रोहितला एकदा boundry लाईन वरती फिल्डींग ला पाठवून अपमानही केला होता. खर तर रोहितने मुंबई टीम सोडून द्यायला हवी होती. रोहित कडे ऑलरेडी ५-६ आयपीएल ट्रॉफी आहेत त्यात T-20 वर्ल्ड कपाची भरही पडलेली आहे. कोणीही त्याला विक्रमी बोली लावून घेतले असते. पंड्या सारख्या खेळाडू मुंबई समोर अटी ठेऊ शकतो तर रोहित का नाही? एक तर आपमान झाला हे रोहित फॅन क्लब चां गैरसमज असेल नाहीतर रोहितला करतील ते कॅप्टन.

NZ 73/3

3-0 ची दाट शक्यता .
तसेही आपण आताWTC फायनलच्या शर्यती मधे नाही . त्यामुळे काळजी नाही .

तसेही आपण आताWTC फायनलच्या शर्यती मधे नाही
>>>>
काय झाले? आपल्याला स्पर्धेतून बाद केले का आयसीसी ने?

बघता बघता गेम पलटला..
दहा-बारा मिनिटे असताना उगाच जयस्वाल रिव्हर्स करायला गेला.

सिराजला नाईट वॉचमन नव्हते पाठवायला पाहिजे. आला तेव्हाच मला हे अनाकलनीय वाटले होते. कारण त्याने आश्विन आता दहावा झाला. त्यापेक्षा त्यालाच आता पाठवायला हवे होते.

आणि कोहलीला पंतचा शाप लागला. स्वतःच रन आऊट होऊन गेला. दिवस फिरलेत त्याचेही.

पण आपली खरी फलंदाजी आता सुरू होते.
उद्या समजेल सामना कुठे जातोय.

शेवटची १५ मिनिटं संपूर्ण ब्रेनफ्रीझ झाल्यासारखी खेळली इंडियन टीम (८ बॉल्समधे जैस्वालचा प्रिमेडिटेटेड रिव्हर्स स्वीप, सिराजचं नाईट वॉचमन म्हणून येणं आणि डीआरएस वाया घालवणं, कोहलीची सुसायडल चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न) . तोपर्यंत इतके छान खेळत होते, कि दिवसाचा शेवट अगदीच अनाकलनीय झाला. काही कारणं अशी असावी:
बहुतेक इंडियन टीम एका अज्ञात प्रदेशात वावरतीय - घरच्या मैदानावर, गेल्या काही वर्षांत, त्यांना कुणी इतकं डोमिनेट केलं नव्हतं. थोडक्यात म्हणजे ते ह्या नविन प्रेशरखाली कोलमडतायत.

दुसरं म्हणजे, कोहली, शर्मा, अश्विन त्यांच्या करियरच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत आणि टीम ला अश्या अवघड परिस्थितीतून तारून न्यायला असमर्थ ठरतायत. आयडियली, कोहली, शर्मा पैकी कुणीतरी अश्या परिस्थितीत खंबीरपणे उभां रहायला हवं आणि तरूण मुलांना त्यांच्या रोल्समधे फुलायची संधी मिळायला हवी. पण सध्या कोहली-शर्माचं 'ओझं' ह्या तरूण फळीला ओढून न्यावं लागतंय.

थोडक्यात म्हणजे ते ह्या नविन प्रेशरखाली कोलमडतायत. >> +१०००

पण सध्या कोहली-शर्माचं 'ओझं' ह्या तरूण फळीला ओढून न्यावं लागतंय. > इंग्लंडविरुद्ध जैस्वाल खेळून गेला नि हातभार गिल, सर्फराज, जुरेल चा लागला होता म्हणून जाणवले नाही. ह्यावेळी ते पण 'तळ्यात मळ्यात' करत आहेत त्यामूळॅ अधिकच जाणवतेय.

काय झाले? आपल्याला स्पर्धेतून बाद केले का आयसीसी ने? >> बांग्लादेशच्या दौर्‍याआधी ह्या वर (वितंड)वाद घातला होतास त्या पोस्ट्स बघ, कळेल.

ही मॅच पण हरण्याकडे वाटचाल. ऑस्ट्रेलिया चा दौरा पण फार कठीण आहे. 2011 मध्ये आपले सगळे सुपरस्टार लयाला आले होते, तेव्हा आपण 4-० नी हरलो होतो, आता पण तशीच परिस्थिती वाटते आहे. शर्मा, कोहली, आश्विन, जाडेजा कारकिर्दीच्या अखेर ला आले आहेत.

ऑस्ट्रेलिया चा दौरा पण फार कठीण आहे. >> +१ गेले दोन दौरे ऑस्ट्रेलियाच्या हब्रिस मूळे झुकवता आले होते. ह्यावेळी ते सज्ज आहेत. दोन टेस्ट मधे ड्रॉप ईन पिचेस आहेत हीच एक समाधानाची बाब आहे. आपली बॉलिंग जबरदस्त चालेल नि नाही चालली तरी पिचकडे बोटे दाखवता येईल Wink अ संघातून पड्डीकल नि साई जबरदस्त खेळले आहेत. मुकेश कुमार नि प्रसिद्ध पण पॉईंट प्रूव्ह करायच्या मोडमधे वाटले आहेत. समजा दोन-शून्य वगैरे सुरूवात झाली तर पर्याय तयार आहेत

हा सामना वाचवण अवघड दिसतय . गील आउट झाला नसला तरी ढुंडो ढुंडो रे साजना चालू होते . अशा खेळपट्टीवर सुरक्षित जागा म्हणजे नॉन स्ट्रायकर असणे या आणि आधिच्या मॅचला कोहलीचा हाच प्रयत्न होता का? अस म्हणण म्हणजे त्याच्यावर अन्याय आहे . पण तीच चूक ओळीने दोनदा . ?
सरफराजचे घरगुती मैदान आहे येवढीच जमेची बाजू .

रोहीत ऑस्ट्रेलियात पहिल्या सामन्या साठी वैयक्तिक कारणामुळे उपलब्ध नाही असे वाचले होते . मला तरी बॉगा चषक जिंकण्याबदल या टीम कडून अपेक्षा नाही . दमलेले बाबा बरेच आहेत .

उरलेल्या मॅचेस बद्दलची शक्यता - उघडा डोळे बघा नीट , मग कळेल कीआपल तिकिट कापलय आपणच . ICC कशाला पाहिजे ?

किती नकारात्मक विचार करता रे...
मला खरेच नाही जमत.
खेळ म्हटले की हारजीत चालायचीच.
हरले की दुखी होण्यात किंवा नाराज होण्यात काही वावगे नाही. उलट ते झालेच पाहिजे. तेच स्वाभाविक आहे. माझाही मूड ऑफ होतो.
पण निराश होणे, आता संपले सारे समजून सोडून देणे हे मानसिकतेवर अवलंबून असते. मला खरेच नाही तसा विचार करणे जमत.
गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 36 ला सर्वबाद झाल्यावर तुमच्या सारखा विचार भारतीय संघाने केला असता तर इतिहास कधी घडला नसता.

असो,
सध्या मी झोपताना विचार करतोय की उद्या सकाळी मस्त साडेनऊ चा अलार्म लाऊन उठायचे आणि आपला चुम्मा ऋषभ पंत काहीतरी जबरदस्त खेळी करेल ती बघायची Happy

गिल पंत सरफराज २५० पर्यंत घेऊन जातात का बघायच .

काल अश्विन पुनः अपयशी ठरला .
बंगलोरच्या विकेटवर आपण त्यांना दोन्ही डावात २५० करू दिले तिथेच सामना हरलो . पुनः त्याच त्याच चुका .
पंतच्या बडबडीमुळे आपल्या गोलंदाजांना वाटत आपण चांगली बोलिंग टाकतोय . पण धावांची गती पाहिली तर चित्र वेगळेच दिसते . जडेजा आणि अश्विनला यापूर्वी इतके लूज बॉल टाकताना पाहिल नाही .

आपले किती फलंदाज या सिरीजमधे लूज शॉट मारून आउट झाले ट हेही बघण पण धडा शिकवणारे ठरेल .

गंभीर परिस्थिती .

सध्या मी झोपताना विचार करतोय की उद्या सकाळी मस्त साडेनऊ चा अलार्म लाऊन उठायचे आणि आपला चुम्मा ऋषभ पंत काहीतरी जबरदस्त खेळी करेल ती बघायची

आज पाडवा आहे, साडे नऊ ---- इतक्या उशिरा उठू नका.

आज खरंच चुम्मा आणि सरफराज यांनी खेळले पाहिजे. सरफराज म्हणे 150 झाल्याशिवाय शतक झाल्यासारखे समजत नाही. आज भारताने किमान 350 केले पाहिजे म्हणजे एकूण 450 च्या जवळ जातील. आणि उद्या आश्विन - जडेजा यांनी यात भर घातली पाहिजे. 600 च्या आसपास घोषित करून 450 चे टार्गेट द्यायला हवे.

Pages