क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

161- 4, गील व पंत यांची अर्धशतके !
मलाच गाढव ठरवणार हे आता; त्यातच आनंद आहे म्हणा मला !!

ऑफिसात बॉसने रोज म्हटलेलं चालतं, घरच्यांनी मात्र प्रेमाने क्वचित कधी ' गाढव ' म्हटलं की बरं झोंबतं !! 20200914_172734_2.jpg

" 600 च्या आसपास घोषित करून 450 चे टार्गेट द्यायला हवे. "

दिल के खुश रखने को 'ग़ालिब' ये खयाल अच्छा है I

*600 च्या आसपास घोषित करून 450 चे टार्गेट द्यायला हवे. "- कोणी , आपण की पाहुण्यांनी ? Wink

*चुम्मा 60 वर आऊट. * - बॅड लक, पंत ! आज कसोटीचा दुसरा दिवस. चेंडू इतका वळवताना शेन वॉर्नलाही क्वचितच पाहिलं असावं. कसोटीसाठी खेळपट्टीच्या किमान दर्जाचे निकष असण खरंच आवश्यक वाटतं .

84-4 वरून 195-5 आता जरा बरे वाटत आहे.
गिल जडेजा मैदानावर, आणि सरफराज, आश्विन, सुंदर अजून यायचे बाकी..

मालिकेत पहिल्यांदा आपण लीड घेणार आहोत. आणि तो जास्तीत जास्त हवा.

पंतने शतक मारायला हवे होते. गेम पलटवलेला. कॅश करायचे होते अजून..

पंतचे आज 36 चेंडूत अर्धशतक झाले. न्युझीलंड सोबत हे आपले आजवरचे वेगवान आहे.
पण ठरवून मारत होता असे वाटत नव्हते. सहज धावा येत होत्या.

आपण की पाहुण्यांनी ?

आता पाहुणे कसे करतील, पण त्यांनी केले तरी चालेल, शेवटी क्रिकेट जिंकले पाहिजे.

पंतने शतक मारायला हवे होते. गेम पलटवलेला ---- खरंय, चुम्माच्या वेगवान खेळीने खेळ पलटवलेला.

आता सरफराजचे दीड शतक झाले पाहिजे. मग आश्विनचे किमान 50. शर्माजीका बेटा खेळत नाहीये आणि दिल्लीचा बॅडबॉय फेल जातोय तर किमान अण्णाने तरी रिटायर होण्यापूर्वी मैदान गाजवले पाहिजे.

आपण की पाहुण्यांनी ?

आता पाहुणे कसे करतील, पण त्यांनी केले तरी चालेल, शेवटी क्रिकेट जिंकले पाहिजे.

पंतने शतक मारायला हवे होते. गेम पलटवलेला ---- खरंय, चुम्माच्या वेगवान खेळीने खेळ पलटवलेला.

आता सरफराजचे दीड शतक झाले पाहिजे. मग आश्विनचे किमान 50. शर्माजीका बेटा खेळत नाहीये आणि दिल्लीचा बॅडबॉय फेल जातोय तर किमान अण्णाने तरी रिटायर होण्यापूर्वी मैदान गाजवले पाहिजे.

जडेजा गेला..
नशीब सरफराज पाठवला..
कसोटीत लेफ्ट राईट कॉम्बिनेशन कसले बघता..

आता इथून हा सामना जिंकायचे म्हणजे आपल्या फिरकीच्या त्रिकूटाने न्यूझीलंडला 100-125 मध्ये उखडला पाहिजे..

*आता उद्या कोणाची बॅटिंग बघायची.* - वा: ! पीच फक्त गोलंदाजांसाठीच बनवायचं व बॅटिंग बघायचीय म्हणायचं !! हेच खरं तर चिटिंग आहे !! Wink

१२०-१२५ च्या पुढची प्रत्येक रन, ह्या पीचवर चवथ्या इनिंगला त्रासदायक होईल असं वाटतंय. Needless to say, इंडिया अ‍ॅग्रेसिव्हलीच मैदानात उतरेल. फक्त फिनिशिंग लाईन क्रॉस करतात का हे बघायचं (करावी ही सदिच्छा!)

पीच फक्त गोलंदाजांसाठीच बनवायचं व बॅटिंग बघायचीय म्हणायचं !! हेच खरं तर चिटिंग आहे !!
Wink wink wink

बरोबर आहे तुमचे, पण या पूर्ण सिरीज मध्ये दोन्ही बाजूचे गोलंदाज प्रभावी ठरले, NZ चे फलंदाज काही प्रमाणात प्रभावी ठरले त्यामुळे आता तरी कसोटीला साजेशी फलंदाजी बघायला मिळावी असे वाटले होते. आणि पुण्याची पिच गोलंदाजासाठी बनवली होती पण त्या चक्रव्यूहात आपणच अडकलो.

चला . शेवटच्या टेस्टच्या शेवटच्या दिवशी तरी चांगला खेळ करून दिवाळी साजरी करायची संधी आहे . सहा सात विकेटने मॅच जिंकली तर खर नाहीतर मटका .

*दिवाळी साजरी करायची संधी आहे ...* - आणि गेल्या दोन कसोटीतलं फलंदाजीचं दिवाळं झाकायची संधी पण ! Wink
शुभेच्छा !!!
आजी, आज तरी आजोबांना टिव्हीवर मॅच बघायला नको देवू ना ! ते चूका काढत बसतात म्हणून
आपली बॅटिंग होत नाहीय
!!diwali3.JPG

सउदी आणि सँटनर हे दोनी "एस" नसल्याने NZची बाजू कमकुवत झाली आहे. मागे एकदा ह्याच जागी मायकेल क्लार्कने जादूचे प्रयोग केले होते, तसे कोणी करणार नाही अशी आशा करुया.
इथेच आणि ह्या ग्राउंड वर अशीच शामल वेळ
सख्यारे कसा रंगला खेळ.

*...तसे कोणी करणार नाही अशी आशा करुया.* - त्यापेक्षा, आपले फलंदाज स्वतःचाच खेळ व्यवस्थित खेळतील अशी आशा करूया; जगातली सर्वोत्तम फलंदाजी आहे आपली, हे दाखवून देवूंदे ना आता तरी !! Wink

मागे एकदा ह्याच जागी एजाज पटेल याने 2021 मध्ये 10 पैकी 10 विकेट घेतल्या होत्या. आजही तसे काही घडले तर मजा येईल.

अवांतर
सरांनी आपले प्रोफाईल पिक्चर बदलले आहे. सर, "उदास" झालेले दिसत आहेत. गजल गायचे कार्यक्रम्म करणार असे वाटते आहे.
सर काळजी करू नका. सामना आपण कालच जिंकला आहे. आज फक्त शिक्का मारायचे काम उरले आहे.

*सरांनी आपले प्रोफाईल पिक्चर बदलले आहे. .उदास" झालेले दिसत आहेत. .. * - भाऊबीजेच्या दिवशी बहिणींच्या अपेक्षा वाढू नयेत, म्हणूनही कांहीं जण अशा आयडिया लढवत असतात; अर्थात, ' सर ' त्या वर्गातले वाटत नाहीत ! Wink

Pages