Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
तिथे अॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
'Discretion Is The Better
'Discretion Is The Better Part Of Valor'
पंत रन आऊट
पंत रन आऊट
कोहलीचा अजून एक बळी.
कोहलीचा अजून एक बळी.
मागच्या ओवर मध्ये त्याने जयस्वालला आउट करायचा प्रयत्न केला होता आता पंतचा घास घेतला.
संटनरला दहा विकेट मिळु नयेत
सॅंटनरला दहा विकेट मिळू नयेत म्हणून...
सुंदरला पुढे पाठवले. चांगले
सुंदरला पुढे पाठवले. चांगले केले.
पंतची चौथ्या डावात 62 सरासरी दाखवली होती. आज अजून एका अश्याच खेळीची गरज होती आणि असा बाद झाला.
जयस्वाल खेळीने आशा दाखवली होती. आता पुन्हा जास्त अपेक्षा न ठेवता बघूया अजून तासाभरात काय होते...
कोहली सुद्धा गेला..
कोहली सुद्धा गेला..
तसे पंतचा रन आऊट बघूनच मी सोडली होती मॅच.
कोहलीला भारतात कसोटीत टर्निंग ट्रॅकवर स्पिनर समोर डॉमीनेट करून शेवटचे कधी खेळताना पाहिले ते आठवत नाही. त्याला आपण ऑस्ट्रेलियातच बघू आता.
त्या ऐवजी ज्यात ती क्षमता आहे तो सरफराज काही स्पेशल खेळतो का बघायला हवे आता. सुंदर आहे जोडीला, त्याच्यात क्षमता आहे उभे राहायची. पण टारगेट आता फारच दूर वाटत आहे इथली कंडीशन पाहता.
सर्फराज चहा पितो आहे.
सर्फराज चहा पितो आहे.
अर्र झाले की 7 आऊट
अर्र झाले की 7 आऊट
चला आटोपले
चला आटोपले
पहिल्या दिवस अखेरीस इंडिया-ऑस्ट्रेलिया पुणे सामन्याचा स्कोअर शेअर केला होता तेच आणि तसेच झाले.
अगदी तसाच स्कोअर बोर्ड आणि तश्याच स्टाईलच्या बॉलरने वाट लावली.
आता आपला विकेंड एन्जॉय करा आणि पुढचा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप नजरेसमोर ठेवून खेळा..
We are living on the "edge,"
We are living on the "edge,"
एक सिद्ध झाले की भारतीय
एक सिद्ध झाले की भारतीय खेळपट्ट्यांवर सँटनर हा अश्विन जडेजापेक्षा चांगला स्पीनर आहे. आणि त्याने दोन्ही डावात सिद्ध केले.
किती वेळ चहा पिताहेत. आधी
किती वेळ चहा पिताहेत. आधी इकडे या आणि सामना जिंका. मग मी तुम्हाला ॐॐभुर्भूरेश्वर अमृततुल्य मध्ये घेऊन जाईन. प्या रजवाडी तिकडे पाहिजे तेव्हढा.
एक सिद्ध झाले की भारतीय
एक सिद्ध झाले की भारतीय खेळपट्ट्यांवर सँटनर हा अश्विन जडेजापेक्षा चांगला स्पीनर आहे. आणि त्याने दोन्ही डावात सिद्ध केले.
>>>
हेच वॉशिंग्टन सुंदरने सुद्धा सिद्ध केले म्हणू शकतो ना..
किती वेळ चहा पिताहेत.
किती वेळ चहा पिताहेत.
>>>
अच्छा टी टाईम झाला होता का..
तरी मी म्हणालो बराच वेळाने स्कोर चेक केलं तरी विकेट वाढलेली नाही दिसली.. हे कसे काय झाले..
१८१ झालेत
१८१ झालेत
१७८ हवेत
जितके झाले त्यापेक्षा कमी हवे आहेत..
आणि ७ सेशन शिल्लक आहेत.
२००+ झाले
२००+ झाले
१५०+ हवेत
३०+ भागीदारी झालीय आश्विन जडेजाची..
एक सिद्ध झाले की भारतीय
एक सिद्ध झाले की भारतीय खेळपट्ट्यांवर सँटनर हा अश्विन जडेजापेक्षा चांगला स्पीनर आहे. आणि त्याने दोन्ही डावात सिद्ध केले.
>>
पुन्हा एकदा सिद्ध झाले की आपल्या महान बॅटर ना आपल्या देशातल्या खेळपट्ट्यांवर प्रेशर सीचुएशन मधे लाँग इनिंग खेळायची सवय राहिली नाहीये.
टेस्ट सिलेक्षन साठी रणजी खेळणं कम्पल्सरी केलं पाहिजे...
“ दुपारी १२ ते ५ पिचवर झोपला
“ दुपारी १२ ते ५ पिचवर झोपला म्हणजे झालं. हाय काय नाय काय” -
मॅचच्या रिझल्टविषयी जे काही
मॅचच्या रिझल्टविषयी जे काही सुख-दु:क्ख असेल ते बाजूला ठेवू. पण इंडियाचा हा एकतर्फी अॅप्रोच मला नाही आवडला. इंग्लंडच्या बॅझबॉल पेक्षा यडछाप अॅप्रोच आहे हा. टेस्ट क्रिकेटमधे मॅच च्या परिस्थितीनुसार अॅडाप्ट होऊन खेळण्याला महत्व आहे.
भारतीयांचा approach हा
भारतीयांचा approach हा एकतर्फी नव्हता, त्यांना टर्निंग पिच वर खेळताच येत नाही, प्रत्येक प्लेअर्स नी त्याला जो योग्य वाटेल तो approach घेतला होता, सरसकट bazball सारखे नाही खेळले, ही त्यांची मर्यादा आहे, डोमेस्टिक मध्ये पण ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन वगळता फिरकी चांगली खेळणारे फलंदाज नाहीत, भारतात टर्निंग पीचं बनवू नये नाहीतर गायकवाड व साई सुदर्शन ला प्रेफरन्स द्यावा
या मालिकेआधी भारतात आपण सलग
या मालिकेआधी भारतात आपण सलग १८ मालिका जिंकलो होतो.
आपल्या फलंदाजांना स्पिन चांगले खेळता येत नाही असे म्हटले जाते तरी देखील घरात आपण सलग १८ मालिका जिंकलो होतो हे निव्वळ अदभुत आणि अविश्वसनीय आहे.
पण अखेर नशीब तरी किती साथ देणार.. यंदा हरलोच!
वेल प्लेड एन झेड !!
भारतीयांचा approach हा
भारतीयांचा approach हा एकतर्फी नव्हता, त्यांना टर्निंग पिच वर खेळताच येत नाही, प्रत्येक प्लेअर्स नी त्याला जो योग्य वाटेल तो approach घेतला होता, सरसकट bazball सारखे नाही खेळले, ही त्यांची मर्यादा आहे >> पहिल्या इनिंग मधे किवीज स्वीप मारून आपला र्ह्दम बिघडवत होते आपण तसा प्रयत्न केला नाही त्यामूळे नक्की काय अॅप्रोअच होता हे एक गंभीर नि दुसरे शर्माच जाणे. माझ्या मते एव्हढी एव्हढी चांगली बॅलॅन्स्ड बॉलिंग युनिट आजवर कधी असतानाही घरी आपण १५ पैकी चार सामने हरलो आहेत शर्माच्या कॅप्टन्सी मधे म्हणजे हा एकूण अॅप्रोचचा आऊटकम आहे असे म्हणू शकतो.
भारतात वेगवान 1 हजार धावा आणि
भारतात वेगवान 1 हजार धावा आणि चेंडू
यशस्वी जयस्वाल : 1315 बॉल
वीरेंद्र सेहवाग : 1436 बॉल
रोहित शर्मा : 1506 बॉल
तिघे ओपनर आहेत हे विशेष
ऋषभ पंत लवकरच हा रेकॉर्ड तोडेल,
937 धावा 1065 चेंडू
आज तो धावबाद झाला नसता तर कदाचित निकाल वेगळा असता.. आताही त्याची विकेट आठवली की त्रास होतोय.
भारतात वेगवान 1 हजार धावा आणि
भारतात वेगवान 1 हजार धावा आणि चेंडू
यशस्वी जयस्वाल : 1315 बॉल
वीरेंद्र सेहवाग : 1436 बॉल
रोहित शर्मा : 1506 बॉल
तिघे ओपनर आहेत हे विशेष
ऋषभ पंत लवकरच हा रेकॉर्ड तोडेल,
937 धावा 1065 चेंडू
>>
सेहवाग जेंव्हा मारायचा तेंव्हा बॅलन्स सांभाळायला पुढे द्रविड - लक्ष्मण होते, सचिन-दादा होते. या प्रत्येकाचा अप्रोच वेगळा होता.
वरचे आकडे हेच दाखवतात की शर्मा, पंत, जयस्वाल या तिघांचाही अप्रोच एकच आहे. अन् हेच मारक ठरत आहे हे कुणी मान्य करून त्यावर काही उपाय करत नाहीये याचा त्रास हा पराभवाच्या त्रासापेक्षा जास्त आहे....
न्यू झीलंड विरुद्ध मॅरेथॉन
न्यू झीलंड विरुद्ध मॅरेथॉन इनिंग खेळून टेस्ट वाचवणारा गंभीर या संघाचा कोच असताना ८ सेशन मध्ये ३५९ धावांचा पाठलाग करताना आपण २ सेशन ही पूर्ण खेळू शकलो नाही म्हणजे काहीतरी मेजर चुकीचं होतंय...
पंत आणि जयस्वाल यांचा तो
पंत आणि जयस्वाल यांचा तो नैसर्गिक खेळ आहे. सेहवागप्रमाणेच जयस्वाल आणि पंत यांचे स्ट्राइक रेट सोबत एवरेज चेक केले तरी ते खूप चांगले आहेत. नेमके आकडे आणू शकतो, पण त्याची गरज नाही. ते लक्षात येते की ते बेभरवशाचे नाहीत.
आपला काही बाझबॉल प्रमाणे पूर्ण संघाचा मिळून एप्रोच नाहीये. ज्याचा जसा नैसर्गिक खेळ आहे त्याला तशी खेळायची मुभा आहे. जे आक्रमकच खेळतात त्यांना उगाच स्लो खेळायला सांगून त्यांचा खेळ बिघडवत नाही की जे स्लो खेळतात त्यांनी मारलेच पाहिजे असा हट्ट नसतो.
स्पिन खेळायला जमणे न जमने हे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. तुम्ही सचिन आणि फॅब फोर सोबत तुलना कराल तर आताचे कमी पडताहेत असेच वाटणार.
पण फॅक्ट हे सुद्धा आहे की कित्येक मालिका जिंकल्यावर आता एक हरलो आहोत.
त्यामुळे लगेच पॅनिक होऊन काहीतरी बिघडले आहे आणि ते तात्काळ शोधून सुधरवायला हवे नाहीतर आपले काही खरे नाही या धांदलीची तूर्तास गरज वाटत नाही. ज्या छोट्या मोठ्या सुधारणा असतील त्या ते खेळाडू ते शोधायला आणि सुधरवायला समर्थ आहेत असे वाटते. सोशल मीडिया एक्स्पर्टना आता ऊत येईल ते चालायचेच.
“जे आक्रमकच खेळतात त्यांना
“जे आक्रमकच खेळतात त्यांना उगाच स्लो खेळायला सांगून त्यांचा खेळ बिघडवत नाही की जे स्लो खेळतात त्यांनी मारलेच पाहिजे” - गंभीरच्याच शब्दात सांगायचं तर टेस्ट क्रिकेट हा adaptability चा खेळ आहे. त्यामुळे - आणि त्याशिवायही, ह्या लॉजिकला टेस्ट क्रिकेटमधे अर्थ नाही. मॅच जिंकणं, हारणं, वाचवणं ह्या पलिकडे जाऊन परिस्थितीनुरूप खेळ करणं, प्रसंगी आपल्या इंस्टिंक्ट्सना तात्पुरती मुरड घालून मॅच सिच्युएशनप्रमाणे खेळणं म्हणजे टेस्ट क्रिकेट.
पंतने सिच्युएशन नुसार खेळ करत
पंतने सिच्युएशन नुसार खेळ करत नाही का?
किती इनिंग दाखवू त्याच्या ज्यात त्याने सांभाळून सुरुवात केली आहे आणि मग गेम कंट्रोल मध्ये आल्यावर मारायला सुरुवात केली आहे.
जयस्वालचा फॉर्म पाहता तो योग्य प्रकारेच खेळत होता. किंबहुना त्यामुळेच आपण आज सुरुवातीला गेममध्ये पुढे होतो.
मला नव्वदीच्या दशकातील अश्या काही मॅच आठवत आहेत ज्यात शेवटच्या दिवशी सामना वाचवायचा म्हणून आपले फलंदाज शेल मध्ये गेल्याने आपण सामना गमावलेला आहे. परिस्थितीला इतके ही शरण जाऊ नये की ती बदलायची शक्यताच बाद व्हावी.
अति क्रिकेट, प्रतिभावान
*
अति क्रिकेट, प्रतिभावान
अति क्रिकेट, प्रतिभावान खेळाडूंची मुबलक उपलब्धता व त्यामुळे संघात वारंवार बदल करण्याची प्रवृत्ति , स्पिनवर अविश्वास व स्पिन खेळण्याच्या तंत्राचा अभाव, यामुळे, उत्तम संघ असूनही, अधून मधून आपल्या क्रिकेटला अशा उचक्या लागणं अपरिहार्य असावं !
अरे, पुढच्या दौऱ्याचं विमान पकडायला कां धावतोयस ? अजून 9 ओव्हर्स शिल्लक आहेत ह्या मालिकेतील शेवटच्या मॅचच्या !!!

Pages