Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01
आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.
कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!
एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>बाबर कप्तान म्हणून खूप कमी
>>बाबर कप्तान म्हणून खूप कमी पडतो असे वाटते
हो खरय!! आज आफ्रिदीच्या एक दोन ओव्हर खाली ठेवायला पाहिजेल होत्या
अंपायरचे एकदोन डिसीजन पण महत्वाच्या वेळी आफ्रिकेच्या बाजूने गेले!!
चुकून राजकारणाच्या धाग्यावर
चुकून राजकारणाच्या धाग्यावर आलो की काय असे वाटले मला Wink >>>
ते वेगळेच प्रकरणं आहे..
आज मारक्रम शतकाजवळ येता
आज मारक्रम शतकाजवळ येता त्याचा गेम बदलला आणि त्यातच तो सिच्युएशन विपरीत फटका मारून गेला..
कॉमेंटरी वर कोणीतरी आधी म्हटलेले सुद्धा की मार्क्रम शतकाजवळ आला आहे हा विकेट घ्यायचा चान्स आहे. पर्सनल माईल स्टोन डोक्यात आले की खेळ बदलतोच.
चुकून राजकारणाच्या धाग्यावर
चुकून राजकारणाच्या धाग्यावर आलो की काय असे वाटले मला >>
आज मारक्रम शतकाजवळ येता त्याचा गेम बदलला . .... पर्सनल माईल स्टोन डोक्यात आले की खेळ बदलतोच. >> जान्सेन बाद झाला तेंव्हा Markram ८४ बॉलस मधे ८६ वर होता. सहावा रेकग्नाईज्ड बॅटस्मन बाद झाला त्यानंतर पुढच्या तीन ओव्हर्स मधे ८७ (८८ बॉल्स), ८८ (८९ बॉल्स) ९१ (९२ बॉल्स) असे होते. ह्या तिन्ही फास्त बॉलर्स च्या होत्या. पुढच्या मीर् च्या ओव्हर्स मधे खेळलेल्या पहिल्या बॉल वर तो बाद झाला. हा बॉल चांगला फ्लाईटेड होता नि ऑफ च्या बाहेर होता ज्याला तो बिग शॉट खेळायला गेला. बाद होणे हा पर्सनल माईल स्टोन असतो का ? एक एक धाव काढताना बाद झाला असता तर ' शेपटाबरोबर खेळताना स्पीड वाढवला नाही " नि शॉट मारयला गेला नि बाद झाला तर " पर्सनल माईल स्टोन डोक्यात आले की खेळ बदलतोच." हे बरं आहे राव. चीत मै जीता, पट तू हारा.
आकडे नका देऊ असामी
आकडे नका देऊ असामी
मी सामने बघतो
एखाद्या खेळाडूच्या डोक्यात काय चालू आहे हे त्याच्या बदललेल्या देहबोली आणि फटक्यांवरून ओळखता येते. माईंड रीडिंग हा आवडीचा छंद आहे. मी हे तुम्हाला समजवू शकत नाही हे मान्य. त्यामुळे विषय खेचण्यात अर्थ नाही. तुम्ही जिंकला मी हरलो
आणि हो, गोलंदाजाने फ्लाईट दिली तर आता मारावेच लागणार असे नसते. तो निर्णय फलंदाजाचा असतो. जो त्याने गेमची सिच्युएशन बघून घ्यायचा असतो.
तो निर्णय फलंदाजाचा असतो. जो
तो निर्णय फलंदाजाचा असतो. जो त्याने गेमची सिच्युएशन बघून घ्यायचा असतो. >> मैदानात प्रत्यक्षात खेळणार्या खेळाडूपेक्षा तुला "खेळाडूच्या डोक्यात काय चालू आहे हे त्याच्या बदललेल्या देहबोली आणि फटक्यांवरून ओळखता येते" हे ज्ञान मला नवीनच आहे.
"मी सामने बघतो" हे लिहिताना Markram जनरली स्पिन कसा खेळतो हे पण "बघितले" असतेस तर .......
आकडे नका देऊ असामी >> दर दोन दिवसाआड रोहित च्या " फाईन लेगला फटके मारून २०१३ नंतर बाराशे सत्त्याहत्तर धावा काढणारा पहिला खेळाडू " टाईप्स विक्रमांची आकडेवारी लिहिताना तू इतक्याच निर्विकारपणे देतोस का अशी आपली एक भाबडी शंका मनाला चाटून गेली रे बाबा.
असो.
माईंड रीडिंग हा आवडीचा छंद
माईंड रीडिंग हा आवडीचा छंद आहे. >>
मोगॅम्बो खुश हुआ
“माईंड रीडिंग हा आवडीचा छंद
“माईंड रीडिंग हा आवडीचा छंद आहे” - बाबो!!!
आप आदिपुरुष हों, महापुरूष हों, आप महान हों सर. 
माईंड रीडिंग हा आवडीचा छंद
माईंड रीडिंग हा आवडीचा छंद आहे >>>
सहीच.
माईंड रीडिंग हा आवडीचा छंद
माईंड रीडिंग हा आवडीचा छंद आहे

>>
सत्तर ऐंशी च्या दशकात असतास तर कुणी चिनॉय / कालरा / सिंघानिया / दावर सेठ नी "आज से तुम कंपनी की तरफ से जुआ खेलोगे" टाईप ऑफर दिली असती...
माईंड रीडिंग हा आवडीचा छंद
आज वॉर्नर तिसरी सेंच्युरी मारणार का?
खेळाडूंच्या एकंदरीत
खेळाडूंच्या एकंदरीत देहबोलीतून त्याला अंदाज येत असेल. यात एव्हडां हसण्यासारखा काय आहे.
खेळाडूंच्या एकंदरीत
खेळाडूंच्या एकंदरीत देहबोलीतून त्याला अंदाज येत असेल. यात एव्हडां हसण्यासारखा काय आहे.
>>>>
असे काही असते हेच कित्येकांना ठाउक नसते.
कदाचित म्हणूनच या कौशल्यात बाप असलेला धोनी सुद्धा किती महान खेळाडू होता हे कित्येकांना कळत नाही. काही जण तर त्याला नशीबवान कर्णधार, संघ चांगला मिळाला वगैरे असेही म्हणतात.. असो.
आज से तुम कंपनी की तरफ से जुआ
आज से तुम कंपनी की तरफ से जुआ खेलोगे" टाईप ऑफर दिली असती...
<>>>>>
करेक्ट! मी या पत्याच्या जुगारात एक्सपर्ट म्हणून शाळा कॉलेज बिल्डिंग जिथे तिथे प्रसिद्ध आहे ते याच कारणासाठी...
पॉइंट टेबल स्थितीवर मागे दोन
पॉइंट टेबल स्थितीवर मागे दोन विधाने केलेली.
१) ऑस्ट्रेलिया दहाव्या वर असली तरी इंग्लंड अफागणाशी हरल्याने त्यांची स्थिती त्याहून वाईट आहे
२) न्यूझीलांड आता सर्वात वर असली तरी चार पैकी तीन सामने अफगाण, बांगला, नेदरशी जिंकले आहेत. त्यांची खरी परीक्षा आता सुरू होईल..
भारताने मात दिली. आता कांगारू आज बुकलावत आहेत.
फिलिप्सचा फिरकी समोर
फिलिप्सचा फिरकी समोर ऑस्ट्रेलिया डाव गडगडला
हे एक चांगले लक्षण आहे.
ऑस्ट्रेलिया ३२ ओवर २४०-३
ऑस्ट्रेलिया ३२ ओवर २४०-३
फिलिप्स १० ओवर ३७-३
इथून ४०० च्या मागे न जाता
इथून ४०० च्या मागे न जाता शांतपणे खेळले तर ३५० होतील.
तितके पुरतील असे वाटतेय.
मेक्सवेलने येत गेम पुन्हा
मेक्सवेलने येत गेम पुन्हा पलटला..
बॉलिंग मध्ये देखील तो त्रास देऊ शकतो..
३८९ टारगेट
होतील किंवा जवळपास पोहोचतील असे वाटत नाही..
पण कोनवे एखादे मोठे शतक मारेल आज तर मजा येईल
NZ is on track as of now
NZ is on track as of now
155/2 in 22
छान खेलतेय एनझेड..
छान खेळतेय एनझेड..
पण चुकीच्या वेळी विकेट जात आहेत..
Batters with two World Cup
Batters with two World Cup hundreds before turning 26
Sachin Tendulkar (at 22y, 313d)
Rachin Ravindra (at 23y, 244 days)
८ ओव्हर ८३ हवेत
८ ओव्हर ८३ हवेत
४ विकेट हातात
पण नीशम आणि संनटनर दोघे क्षमता राखून आहेत..
अजून एक क्लोज सामना बघायला मिळू शकतो आज
४ ओवर ४९ ३ विकेट हातात..
४ ओवर ४९
३ विकेट हातात..
३ ओवर ४३
३ ओवर ४३
२ विकेट हातात..
पण नीशम आहे अजून..
..
आता
२ ओव्हर ३२
८ बॉल १९
८ बॉल १९
नीशमला सिंगल काढता आला नाही. लास्ट ओवरला सुरुवातीला स्ट्राईक नाही..
६ बॉल १९
५ बॉल १९
५ बॉल १९
आता धोनी स्टाईल गेम आला
वाइड चे पाच
वाइड चे पाच
३ बॉल ९
३ बॉल ९
जिंकायला हवेत यार.. मजा येईल
हार्ड लक NZ
हार्ड लक NZ
हाथ को आया, मुंह न लगा...
कुणाला टाईट फिनिश हवा होता... घ्या
मस्त खेळल्या दोन्ही टीम
Pages