Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01
आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.
कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!
एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कालच्या रावणदहनाचा राग
कालच्या रावणदहनाचा राग श्रीलंकेने आज उगीचच इंग्लंडवर काढला ! >>
आजच्या इंग्लंड च्या विकेटस ह्या बॉलिंगपेक्षा बॅटींग च्या चूका वाटल्या मलातरी .
तोपर्यंत सुर्यावर भरवसा ठेवून शमी/अश्विनला पीच कंडिशननुसार खेळवावे >> तसेच होणार आहे. फार तर एखाद्या मॅच मधे इशान ला आणतील.
(अरे तुम्हा सगळ्यांना पण विंडो मध्ये टाईप करताना कधी कधी कर्सरची लाईन्/उभी रेघ असते ती गायब होतेय का?) >> नाही होत बुवा. तुम्ही जावास्क्रिप्ट ब्लॉकर ठेवलाय का ?
नाही होत बुवा. तुम्ही
नाही होत बुवा. तुम्ही जावास्क्रिप्ट ब्लॉकर ठेवलाय का ?>>>>> काही माहीत नाही असामी. आता दिसतोय पण मध्येच गायब होतो.
माझाही कर्सर दर सेकंदाला दोन
माझाही कर्सर दर सेकंदाला दोन वेळा गायब होतो. पण मी टेन्शन घेत नाही
ह्या जगात, आसमंतात, वैश्विक
ह्या जगात, आसमंतात, वैश्विक पोकळीत असं काय आहे, ज्याचा सरांना आधीच प्रत्यय आलेला नाहीये?
(‘दिब्रूगड धोक्यात आहे असं आमचा बातमीदार म्हणतो‘ - हे वाक्य आपल्या वासरीत लिहीणार्या आण्णा पावश्यांचा मानवतार आहेत सर).
ह्या जगात, आसमंतात, वैश्विक
ह्या जगात, आसमंतात, वैश्विक पोकळीत असं काय आहे, >>>>
उद्या तडाखेबंद मॅच होऊ शकते असं उगाच वाटतय. कारण अफ्रिकेवाले सॉलिड पंप्ड आहेत.
(‘दिब्रूगड धोक्यात आहे असं
(‘दिब्रूगड धोक्यात आहे असं आमचा बातमीदार म्हणतो‘ >>
आण्णा पावशे 
उद्या तडाखेबंद मॅच होऊ शकते असं उगाच वाटतय >> नि वाटत पण नाहिये कारण प्रत्येक मॅच मधे असे चेव आल्यासारखे कसे खेळणार. आफ्रिका हरू शकते नि पाकिस्तन पण हरू शकतो. रोहित मात्र नक्की जिंकेल. मी हे सगळे आधीच बोललो आहे हे लक्षात ठेवा रे
अय अरे काय चाललय
अय अरे काय चाललय
असामी, त्यांना तो चोकर्सचा कलंक पुसायचा आहे आणि आता अचानक बॅटिंग पहिल्या लॉस नंतर सॉलिड फायर होत आहे.
You never know!
“ मी हे सगळे आधीच बोललो आहे
“ मी हे सगळे आधीच बोललो आहे हे लक्षात ठेवा रे” -
असं नुसतं मायबोलीवर लिहिलंयस ते ठीक आहे. पण ‘हे मी चार ग्रूपवर लिहून आलोय‘ चं प्रीअँबल जोडायला विसरू नकोस 
‘दिब्रूगड धोक्यात आहे असं
‘दिब्रूगड धोक्यात आहे असं आमचा बातमीदार म्हणतो‘ >>>
बाय द वे मला वाटले टॉप ४ ऑलरेडी लॉक होउन आता बहुतांश डेड रबर्स कडे वाटचाल आहे. पण क्रिकइन्फो वरचा एक लेख म्हणतो अजूनही बराच ओपन आहे हा कप. भारत १००% इन नाही आणि पाक्/इंग्लंड अजून पूर्ण आउट नाहीत.
“ क्रिकइन्फो वरचा एक लेख
“ क्रिकइन्फो वरचा एक लेख म्हणतो अजूनही बराच ओपन आहे हा कप.” - प्रत्येक टीम इतर टीमशी एक मॅच खेळणार - म्हणजे प्रत्येकी ९ मॅचेस. आत्ता साधारण प्रत्येकी ५ मॅचेस झाल्या आहेत (५५%). अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे ह्या स्पर्धेत.
*अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे
*अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे ह्या स्पर्धेत.* - ऑसीज जसे जरा उशीरा फॉर्मात आले, तसे इंग्रज आतां इतक्या उशीरा फॉर्मात येतील का, हा खरा प्रश्न आहे. आता पर्यंतचा विश्वचषकाचा अनुभव सांगतो की अशा मोठ्या, दीर्घ चालणाऱ्या स्पर्धेत " फॉर्म " निर्णायक ठरण्याची शक्यताच अधिक . England of course deserves much better placement in the points table !
आणखी काही ऑप्शन्स ऍड केले
https://wc2023.streamlit.app/
आणखी काही ऑप्शन्स ऍड केले आहेत
इंग्लंडचा पुढचा सामना
इंग्लंडचा पुढचा सामना आपल्याशी आहे. त्यात ती हरली तर बाहेर.
निदान पाक तरी आज जिंकायला हवे. ते ही बाहेर पडले आणि चार संघ फिक्स झाले तर मजा गेली.
बाई दवे अजून
बाई दवे
अजून एकही सामना क्लोज झाला नाही.
पॉइंट टेबल सुद्धा रंगतदार नाही झाला तर कसे चालेल..
ते आयपीएलवाले हे दोन्ही जमवतात.. म्हणून पैसा प्रसिद्ध लोकाश्रय मिळत आहे..
भारत जिंको वा न जिंको,
भारत जिंको वा न जिंको, पाकिस्तान हरणे जास्त महत्त्वाचे आहे.
पुढे जाऊन हरू दे आज नको
पुढे जाऊन हरू दे
आज नको
शमसी आणि केशव महाराज खेळणार
शमसी आणि केशव महाराज खेळणार आज.
पाकिस्तान आज पॉजिटीव्ह आणि
पाकिस्तान आज पॉजिटीव्ह आणि आक्रमक फलंदाजी करायला बघतेय. त्यानादात विकेट सुद्धा टाकल्या.
१४१-५ होत्या
सहाव्या विकेटला भागीदारी झाल्याने २२५-६ झालेत.
पण खरा प्रॉब्लेम त्यांच्या गोलन्दाजीचा आहे. ती सामान्य भासत आहे. तिथे आज आक्रमकपणा दाखवायची गरज.
विकेट्स गमावल्या नाही तर
विकेट्स गमावल्या नाही तर पाकिस्तान ३०० च्या जवळ जाऊ शकतील अश्या परिस्थितीत आहेत.
इंडियाच्या मांजरेकरला पाकिस्तानचा मुँहतोड़ जवाब - रमिझ राजा. दोघं एकत्र आले कि कॉमेंट्री बॉक्स च्या टोटल आय क्यू ला खग्रास ग्रहण लागतं.
*....दोघं एकत्र आले कि
*....दोघं एकत्र आले कि कॉमेंट्री बॉक्स च्या टोटल आय क्यू ला खग्रास ग्रहण लागतं.* -
२० चेंडू राखून पाकिस्तान २७०
२० चेंडू राखून पाकिस्तान २७० ला सर्वबाद
बाई दवे,
संज्या चांगला आहे. जरा रोखठोक आणि जरा फटकळ आहे.
रमीज राजा वात आणतो.
आफ्रिका २ ओवर ३०-०
आफ्रिका २ ओवर ३०-०
पाकिस्तान जिंकते आज
पाकिस्तान जिंकते आज
अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे
अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे ह्या स्पर्धेत. >>> सहमत, फेफ.
लीग मॅचेस मधले ऑसीज आणि नॉक आउट मॅचेस मधले - या जमीन अस्मानाचा फरक असतो खरे म्हणजे. हे कसे खेळतात बघू. पूर्वीचे लोक महत्त्वाच्या मॅचेस मधे आपला गेम अजून भारी लेव्हलला न्यायचे.
अरे संपला ना वर्ल्ड कप
अरे संपला ना वर्ल्ड कप मागच्याच आठवड्यात. इंडियाने जिंकला. अरे सॉरी सॉरी चुकून भूतकाळात टाईप झाला मेसेज.
मस्त चाललीय मॅच!!
मस्त चाललीय मॅच!!
३६ मध्ये १५ पाहिजेत आणि २ विकेट्स हातात!!
आफ्रिका जिंकली १ खेळाडू राखून
आफ्रिका जिंकली १ खेळाडू राखून.
आफ्रिका कप जिंकू शकते हा
आफ्रिका कप जिंकू शकते हा आत्मविश्वास आजच्या मॅच ने दिला असेल त्यांना. कंकशन सब पाकिस्तानला भलताच पावला . बाबर कप्तान म्हणून खूप कमी पडतो असे वाटते. आफ्रिदीला कधी नि किती वापरायचा ह्यबद्दल नेहमीच घोळ असतो त्याचा. २१ एक्स्ट्राज जास्त होतात. पाकिस्तान ने जवळजवळ निम्म्या ओव्हर डॉट बॉल मधे घालवल्या आहेत.
संज्या चांगला आहे. जरा रोखठोक आणि जरा फटकळ आहे.
रमीज राजा वात आणतो. >> + १ संजय जोवर नरकुंडी लावणारे बोलत नाही तोवर आवडतो.
आजच्या मॅचचं वैशिष्ठ्य -
आजच्या मॅचचं वैशिष्ठ्य - 'चोकर्स ' आता निश्चितपणे ' विनर्स ' व्हायला लागले आहेत !
>>संज्या चांगला आहे. जरा
>>संज्या चांगला आहे. जरा रोखठोक आणि जरा फटकळ आहे.
चुकून राजकारणाच्या धाग्यावर आलो की काय असे वाटले मला
Pages