क्रिकेट विश्वचषक - २०२३

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01

आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.

कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!

एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिथे दोन्ही संघातील गोलंदाज धुमाकूळ घालत आहेत तिथे एकाचे काय कौतुक
पण जिथे दोन्ही संघामध्ये सारे फलंदाज गोंधळलेले असताना एकच फलंदाज अफलातून खेळत असेल तिथे त्याला डोक्यावरचं घ्यायला हवे.

असो, मागच्या विजयानंतर म्हटल्या प्रमाणे
शर्मा, कोहली, राहुल, शमी, बुमराह असे पाच सामन्यात पाच सामनावीर मिळाले आपल्याला. सहाव्यात पुन्हा शर्मा असो की शमी, ज्याला मिळाले ते स्विकारूया. हे पाचही सामनावीर आणि सोबत कुलदीप जडेजा सुद्धा सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. आता इतर खेळाडू सुद्धा लवकरात लवकर येत्या सामन्यात रंगात येऊ दे हीच इच्छा.

शर्मा या वर्ल्डकप मध्ये एक फलंदाज आणि एक लीडर म्हणून जी काही कमाल करतोय त्याला खरेच तोड नाही.
असो, पण बिचारा शापित राज कुमार आहे. त्याचा जो वर्ल्ड क्लास दर्जा आहे तो पाहता एखाद्या लिजेंड खेळाडूला मिळावा असा सन्मान त्याला आता कुठे मिळू लागला आहे. हा विश्वचषक जिंकल्यावर मला सर्वात जास्त आनंद त्याच्यासाठी होईल.

जिथे दोन्ही संघातील गोलंदाज धुमाकूळ घालत आहेत
>>
एका संघानी पूर्ण ५० षटकं खेळून, सर्व गाडी न गमावता २२९ धावा केल्या अन् दुसऱ्या संघाला मात्र ३५ षटकात, १२९ मधे गुंडाळून टाकलं असं मी या स्कोअर बोर्ड कडे बघतो... त्यामुळे माझ्या दृष्टीनी धुमाकूळ एकाच संघाच्या गोलंदाजांनी घातला

मी शर्मा चा खेळ मस्त होता असच म्हटलं आहे, पण २२९ हा स्कोअर जिंकण्याच्या दृष्टीनी पुरेसा होता असं तुला तरी दुसऱ्या इनिंग च्या आधी वाटत होतं का?? प्रामाणिकपणे स्वतः लाच सांग... (शर्माचं माईंड रीड केलं होतं त्यामुळे निश्चिंत होतो वगैरे उत्तराच्या अपेक्षेत...)

एका संघानी पूर्ण ५० षटकं खेळून, सर्व गाडी न गमावता २२९ धावा केल्या त्यामुळे माझ्या दृष्टीनी धुमाकूळ एकाच संघाच्या गोलंदाजांनी घातला..
>>>>>

अहो तेच तर शर्मामुळे झाले. त्यांनी बाकीच्या फलंदाजांना उखडले, जखडले, पण शर्मा समोर काही चालले नाही Happy

..

२२९ हा स्कोअर जिंकण्याच्या दृष्टीनी पुरेसा होता असं तुला तरी दुसऱ्या इनिंग च्या आधी वाटत होतं का??
>>>>>>>>>

माझ्या इनिंग ब्रेक मधील पोस्ट वाचा.
### ऑस्ट्रेलिया आणि पाकला आपण 200 आत रोखला आहे.
गोलंदाजांना जर पहिल्या डावासारखी जवळपास पूर्ण इनिंग मदत मिळाली तर आपला बॉलिंगएटेक विकेट टेकर आहे.####

मी शर्मा चा खेळ मस्त होता असच म्हटलं आहे, पण......
>>>>>>

मी सुद्धा आपल्या गोलंदाजांचे कौतुकच केले आहे. नव्हे इनिंग ब्रेक मध्येच जर त्यांना मदत मिळाली तर ते इंग्लंडला उखडणार हा विश्वास दर्शवला होता.
पण दुसऱ्या डावात खेळपट्टीकडून देखील आपल्या गोलंदाजांना खूप मदत मिळाली हे तुम्हीही नाकारू शकत नाही.

तसेच एक कर्णधार म्हणून तो नेहमी गोलंदाजासोबत असतोच. एखादी विकेट सेटअप करून घेतली जाते तेव्हा कर्णधार देखील त्यात सामील असतो. क्षेत्ररक्षण लावायला सामील असतो. बॉलिंग चेंजेस तोच करतो.. टीमचे स्पिरिट कसे हाय राहील हे एक लीडर म्हणून तोच बघतो. आणि शर्मा या पूर्ण स्पर्धेत कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रेंड म्हणून उठून दिसत आहे.
पण दुर्दैवाने कप्तानी हा गुण आपल्याकडे कधी गौरवला जात नाही. Captain is as good as his team. टीम चांगली मिळाली म्हणून जिंकला वगैरे वाक्ये फेकली जातात.

जेव्हा कोहलीसह तीन गडी बाद झाले तेव्हा सगळीकडे लॉ ऑफ एवरेजनुसार आपण आज हरणार अशी चर्चा सुरू झाली होती. पण मी शर्मा वरचा विश्वास कायम ठेवून लॉ ऑफ एवरेज ही अंधश्रद्धा आहे असे चार ठिकाणी तरी लिहून आलो आणि शर्माने तोच विश्वास सार्थ ठरवला

पण आपल्याकडे बोलर ना गृहीत धरायची खोड आहे अन् बॅटर ना डोक्यावर घ्यायची... >> +१ किमान कालचे अवार्ड विभागून द्यायला हवे होते. शमीपेक्षाही बुमरा ला अधिक कारण सिराज चालत नसताना एका बाजूने बुमरा अशक्य लागला होता. त्याने जे प्रेशर बिल्ट केले होते त्याचा पुढे जे घडले त्यात प्रचंड वाटा होता. असाच बेलो पार स्कोअर (कोटींग : रोहित) आपण टी २० सेमी फायनल ला पण टाकला होता (जवळ जवळ ह्याच संघासमोर) नि दहा विकेट्स नि हरलो होतो दणक्यामधे (जवळ्जवळ सेम बॉलिंग अ‍ॅटॅक असताना) - मुख्य फरक बुमरा नसणे नि असणे.

फार फार मजा आली मॅच बघायला. आधी रोहित ची इनिंग्स. सुर्या येऊ पर्यंत त्यानीच एकटा किल्ला लढवला. अफलातून बॅटिंग. आल्या आल्या चाचपडत होता थोडा कारण बॉल मस्त स्विंग होत होते. मान गये उस्ताद! कोणालाच जमत नसताना येवढी भारी बॅटिंग म्हणजे गंमत नाही.
सुर्या पण छान खेळला, अजून टिकायला हवा होता. राहूलनी थोडा बेजबाबदार शॉट मारला असं वाटलं. कोहली बहुतेक खुप डॉट बॉल झाल्यामुळे काहीतरी करायचं म्हणून पुढे आला.

बॉलिंग तर काय विचारायलाच नको. मलान आणि बेअर्स्टोनी बॉल स्टंप्सवर मारुन घेतला पण त्याला जबाबदार बुमरा आणि शमीची लाईन, लेंत होती. They both were cramped for space due to the line and length. सो कॅच तरी उडू शकतो किंवा मग असे बॅटच्या आतल्या एंडला लागून बॉल स्टंप्स वर जातात. बुमरा आणि शमी दोघंही खत्तरनाक ऑन पॉईंट टाकत होते बॉल! जस्ट टू गूड!
बेन स्टोक्सचं दांडकं काढलं तेव्हा शमीच्या बॉलची सीम बघून घ्यावी! एक नंबर कंट्रोल होता शमीचा. म्हणजे बॅट्समननी थोडी दिरंगाई केली किंवा चूक केली तर बात खतम. यॉर्कर पेक्षा ही लेंत अर्थातच अवघड असते कारण थेट स्टंपवर मारण्यापेक्षा उद्दिष्ट टप्पा पडून मग स्टंपच्या वरच्या बाजूला बॉल लागणे हे असते.

नंतर अजून एक अफलातून बॉल होता कुलदीपचा ज्यात बटलर उडाला. क्लास! मला त्याच्या हाताच्या अ‍ॅक्शनवरुन चुकून सुद्धा वाटलं नाही की बॉल आत वळेल. कंप्लिटली बीट झाला बटलर! हताश वाटला अगदी. तिथेच उभा राहिला बिचारा २-३ सेकंद.

बॅटिंग तितकीशी फायर नाही झाली पण बॉलिंग मध्ये कसर काढली सगळी. असाच मोमेंटम ठेवा लोखो म्हणा!
लंकेशी आहे मॅच मध्ये पण काही पावर नाही वाटत त्यांची ह्यावेळी. रविवारी एस्सेशी आहे मॅच ती बघण्याजोगी आहे/होईल.

राहूलनी थोडा बेजबाबदार शॉट मारला असं वाटलं. कोहली बहुतेक खुप डॉट बॉल झाल्यामुळे काहीतरी करायचं म्हणून पुढे आला. >> हो दोघांनीही थोडी घाईच केली असे वाटाले. अगदी अन कॅरॅक्टरिस्टिक्स शोट्स होते त्यांचे. रोहित च्या एकंदर अ‍ॅप्रोचसमोर अजूनच ठळक झाले.

असाच बेलो पार स्कोअर (कोटींग : रोहित) आपण टी २० सेमी फायनल ला पण टाकला होता (जवळ जवळ ह्याच संघासमोर) नि दहा विकेट्स नि हरलो होतो दणक्यामधे (जवळ्जवळ सेम बॉलिंग अ‍ॅटॅक असताना) - मुख्य फरक बुमरा नसणे नि असणे.
>>>>>>>>

त्या आणि या खेळपट्टीत जमीन अस्मानाचा फरक होता...
शमीला तेव्हा 3 ओवर 39 मारले होते Happy

असो,
आज अफगाण ने पुन्हा दाखवले मागचा चेस फलुक नव्हता.
तेव्हाही याची खात्री होतीच. आणि आजही लंकेची चौथी विकेट पडल्यावर मी म्हटलेले की 275+ हवेत तरच सामना क्लोज होईल. 250 पर्यंत थांबले तर अफगाण सहज चेस करेल. आणि तेच झाले. अफगाणने हा विश्वास जो कमावलाय ती मोठी मिळकत आहे त्यांची.

आता ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका ला कसे नाडतात हे बघायला मजा येईल.. कुठे आहेत ते सामने बघायला हवे..
.

शमीला तेव्हा 3 ओवर 39 मारले होते >> माझा बुमराचे मह्त्व अधोरेखित करण्याचा मुद्दा स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद ! Happy

ओके.. आता शमीची काढली Lol

त्याच्याच आदल्या वर्षीच्या 20-20 वर्ल्डकपला आपण साखळी सामन्यातच बाहेर पडलो होतो. पाकिस्तानने आपल्याला 150+ स्कोअर एकही विकेट न गमावता चेस केला होता..

आणि त्यात चक्क शमी सोबत बुमराह होता Happy

पण कदाचित बुमराहला कप्तान शर्माची जोड नव्हती हे नडले Happy

पण कदाचित बुमराहला कप्तान शर्माची जोड नव्हती हे नडले
>>
दुबईत होता रे तो वर्ल्डकप
तिथे टॉस जिंकून पहिली बोलिंग करा अन् दुसऱ्या डावात पाटा विकेट वर गोलंदाजांची कत्तल करा टाईप पॅटर्न होता...

त्या वर्ल्डकप च्या जास्त आधी दुबई मध्येच झालेल्या आयपीएल मधे शर्मा ची मुंबई टीम 5व्या नंबर वर राहिली, ज्यात बुमारा पण होता...

माझा खेळपट्टीचा मुद्दा स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद Happy

शुभ सकाळ
झोपतो पुन्हा चादर ओढून ...

जर पहिल्या बॅटिंग मधे असा स्कोअर झाला की विजय नक्की वाटतं असेल, तर हाय स्कोअरिंग बॅटर ला सामनावीर द्या, पण तसं नसेल अन् बोलर नी विजय खेचून आणला असेल तर तो सन्मान बोलार लाच मिळायला हवा. >> +१

शामीची बोलिंग खतरनाक आहे सध्या.

बॅटिंग तितकीशी फायर नाही झाली पण बॉलिंग मध्ये कसर काढली सगळी. > >> टोटली. म्हणूनच मला हा विजय विशेष वाटला. सेमीज पर्यंत सगळ्या लोकांना एकदा तरी प्रेशर सिच्युएशन मधे खेळायची गरज पडली पाहिजे.

काय बिन्डोक हायलाइट्स आहेत यार! केवळ फोर, सिक्स आणि विकेट्स दाखवणे म्हणजे हायलाइट्स असे कोणालातरी सांगून मॅच एडिट करायला लावल्यासारखे आहेत.

फारएन्ड highlights मुद्द्याला जोरदार अनुमोदन
कोणा अरसिक खाटक्याने ( प्लिज जातीयवादी अर्थ नको ) एडिटिंग केल्यासारखे

हेच काल घरी बोललो होतो. असे।कसे highlight, बॉल सीमापार व्हायच्या आधी पुढचा शॉट दाखवायची घाई.
नंतर युट्युब वर 1992 ची भारत पाकिस्तान match चे highlights पाहिले. चांगले 45 की 50 मिनिटांचे होते.
मुलगा म्हणाला 50 मिनिटांचे highlights !!!!!
पण त्यात match चा टोन पूर्ण लक्षात येतो.

अफ्गाणिस्तान बद्दल दोन शब्द पण नाहीत? मस्तच खेळताय्त ते. आतापर्यन्त मिलवलेल्या ४ विजयांपैकी ३ या वर्ल्ड कप मध्ये आलेत Happy

अफ्गाणिस्तान बद्दल दोन शब्द पण नाहीत?
>>
वर एक प्यारा लिहिलाय की... Happy
Submitted by ऋन्मेऽऽष on 31 October, 2023 - 02:42

भारतात वर्ल्डकप असल्याने यावेळी ते धक्के देतील अशी अपेक्षा होतीच, पण गेले दोन विजय धक्के वाटलेच नाही हे त्याहून सुखद आहे.

अफगाण चौथ्या क्रमांकाला आली आणि आपण पहिल्याला आलो तर २००३ ला जसे सेमीला केनिया मिळून पेपर सोपा झालेला तसे होऊ शकते. अर्थात अफगाण केनिया ईतका सोपा पेपर नाही..

*Pakistan needs to win all their remaining matches to enter
......Pakistan.* -

जर ते हरले तर तुमच्या देशात त्यांना आसरा द्यावा लागेल,
याची अपील करताना तुझ्या टीमला जाणीव ठेवायला सांग !
20210313_161753.jpg

बांगलादेश पाहिली फलंदाजी... Advantage..
पाकिस्तानला अजून एका धक्का बसू शकतो इथे..
पण बांगलादेश सुद्धा हल्ली गचाळ क्रिकेट खेळत आहे..
दोघात जो कमी गचाळ खेळेल तो जिंकेल

जास्तीत जास्त वाईट खेळणारा हारेल, किंवा कमीत कमी वाईट खेळणारा जिंकेल अशी मॅच आहे आज. Happy

अफगाणिस्ताननं टी-२० ते वनडे हे ट्रान्झिशन लवकर पार पाडलं ह्याबाबतीत त्यांचं आणि त्यांच्या कोचिंग स्टाफचं कौतुक आहे. बांग्लादेशने बरंचसं शिकण्यासारखं आहे ह्यातून.

४० ओवर पुर्ण व्हायच्या आत शाकीब बाद होत ७ विकेट झाल्यात.
तिथे प्रमुख गोलन्दाज काढून सामना संपवायचे सोडून सोडून बाबर ४१-४२ ओवर चौथ्या-पाचव्या गोलंदाजाला देत त्यांचा कोटा पुर्ण करून घेतोय.
असा कप्तान असल्यावर कसा जिंकणार संघ.

हायलाईट्स बद्दल अनुमोदन. कमीत कमी अर्ध्या तासाचे तरी ठेवायचे होते. आता म्हणजे अगदी १२ मिनिटात सगळं संपवतात.
बांग्लादेश २०५. जमायला हरकत नाही पाकिस्तानला.

इंग्लंडला चान्स? अख्ख्या टीम वगैरे गायब झाल्या तर शक्य आहे.

https://wc2023.streamlit.app/

ही आस्चिग ह्यांनी तयार केलेल्या प्रोग्रॅमची लिंक आहे. सेमीसचे स्पॉट जवळ जवळ फिक्स आहेत आता. अफघाणांनी जर पुढच्या सगळ्या (३) मॅच जिंकल्या तर त्यांना स्कोप असू शकतो. ३ मधल्या २ मॅचेस ह्या ऑस्ट्रेलिया आणि एसे शी आहेत.

हायलाईट्स ची मेन लफडे असे आहे कि मागच्या काँट्रॅक्ट्स मधे डिजिटल राईट्स ज्यांनी विकत घेतलेले त्यांनी त्याचा काही भाग कोनालातरी ऑफ्लोड केलाय (मला नक्की नावे आठवत नाही आहेत - विलो कि डिस्ने ते) नि स्ट्रिमिंग राईट्स फक्त मेटाकडे आहेत त्यामूळे हायलाईट्स फक्त आय सी सी च्या ऑफिशियल साईट वरून येतात नि इंस्टा नि फेसबुकवरच दिसतात. ह्या सगळ्या गदारोळात नीट हायलाईट्स कोण बनवणार

आणि त्यात चक्क शमी सोबत बुमराह होता >> भाई, बुमराची इंजरी हिस्टरी टाईमलाईन एकदा पाहा. रोहित चे हजार विक्रम बघायच्या आधी तो बुमरा बद्दल काय म्हणाला होता वर्ल्ड कप आधी ते वाच. तुझा वेळ सत्कारणी लागेल , मायबोलीचे काही गिगाबाईट्स वाचतील नि इथल्या इतरांच्या डोक्याला कमी त्रास होईल.

आज शाहीन आफ्रिदी हवा होता सामनावीर..
आज का फखर झमानला दिले?
जसे आपल्या पाकिस्तान आणि न्यूझीलांड सामन्यात अनुक्रमे शर्मा आणि कोहली ऐवजी अनुक्रमे बुमाराह आणि शमी होते. तसाच आजचा सीन होता.. आज नक्कीच चुकले

Pages