क्रिकेट विश्वचषक - २०२३

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01

आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.

कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!

एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन लागोपाठ क्लोज गेम्स!! क्या बात हैं||

“ जवळपास पोहोचतील असे वाटत नाही” - माईंड रिडिंग ऑन स्टिरॉइड्स Happy

“ जवळपास पोहोचतील असे वाटत नाही” - माईंड रिडिंग ऑन स्टिरॉइड्स
>>>>

या अंदाजांचा आणि माईंड रीडिंग यांचा आपसात संबंध नसतो.
आणि माईंड रीडिंग म्हणजे काय हे आपल्याला खरेच माहीत नाही हे पटत नाही Happy

आज भारत इंग्रजांना फॉर्मात आणणार की त्यांना निर्णायक " चले जाव " करणार !!!

आज काय, तर म्हणे इंग्रजांना ' चले जाव ' ! चहाचा कप कधी उचलून ठेवला नाही, आणि म्हणे विश्वचषक उचलायचाय!!20190201_190757_0.jpg

भाऊ Proud

इंग्लंडला आजचा सामना करो या मरो आहे. त्वेषाने खेळतील. पण त्याचवेळी प्रेशर सुद्धा असेल त्यांच्यावर..
आपली विनिंग स्ट्रीक कायम राहायला हवी.. कोणाला दयामाया नाही..

टॉस हरलो
पहिली फलंदाजी
बरे झाले. चेस करतोय सलग पाच सामने. आता सेमी फिक्स झालीय आपली तर आता बाकी सर्व सिच्युएशन टेस्ट व्हायला हव्यात..

इंग्लंडने बहुतेक ' ड्यू फॅक्टर ' मुळे सावधगिरी म्हणून प्रथम गोलंदाजी घेतली असावी .

विलीची पहिली ओवर मेडन काढली. पुढच्या ओवरला पुढे येत फोर.. लाईन गडबडवली.. आणि पुला शॉट चा सिक्स.. नंतर पुन्हा पुढे येत समोर सिक्स.. शर्मा कामाला लागला.. नेत्रसुखद फटकेबाजी

विराट का असा फटका खेळून गेला समजत नाही.
पीचमध्ये गोलंदाजांना मदत आहे हे डिस्कशन चालू होते दोघांचे .. तर जाऊ द्यायचे होते अजून काही डॉट.

तिसऱ्या ओव्हर पासून रंग बदलले

आधी गिल ला एका मस्त बॉल वर खोलला अन् मग कोहलीला मस्त सेट अप करून काढला.

गंमत आहे आता

गेला अय्यर
खिलवाड करून घेतला त्याला..

माईंड रीड करायला वेळ नाही मिळाला का?
>>>
थोडा O C मध्ये जातो फलंदाज
आपण चांगल्या फॉर्मल आहोत. आपल्याशी काही वाइट होऊ शकत नाही वगैरे विचार कुठेतरी येतात मनात.. तसे झाले असावे.. जर शैली विपरीत खेळला..

आता तीन विकेट झाल्या तर शर्माला त्याच्या सध्याच्या शैली विपरीत खेळावे लागेल..
गिल आणि स्पेशली अय्यरने मात्र आज निराश केले. कमजोर कडी तयार झाली आहे. त्याचा पर्याय असलेला सूर्या सुद्धा खात्रीशीर वाटत नाही. दोन विकेट लवकर पडल्या तर मागे म्हटले होते तसे राहुल चौथा हवा असे वाटते.

शर्मा अर्धशतक
Are काय जबरदस्त सिक्स मारला अर्धशतक होताच...

आज लॉ ऑफ अवरेज ला शरण जायचं ठरलेलं दिसतंय.

आज हरून आपल्याला फार फरक नाही, इंग्लंडला जिंकून काही फरक नाही. मग घ्या तीट लाऊन. म्हणजे पुढच्या सामन्यांमध्ये लक परत आपल्या बाजूनी राहील.

IND 131-3 (30)
KL Rahul*: 39 (56)
Rohit Sharma: 79 (86)

शर्मा खेळतो तेव्हा पीच वेगळाच भासतो. वेगळाच क्लास आहे त्याचा.

आणि ही पोस्ट लिहिताना गेला राहुल..

लॉ ऑफ एवरेज हे मी आज अजून काही ग्रूपवर सुद्धा वाचले.
असे काही नसते. अंधश्रद्धा आहे ती Happy

आज सूर्या खेळला या पीचवर तर पांड्या परत येता अय्यरची जागा धोक्यात, राहुल चौथा आणि सूर्या पाचव्या क्रमांकावर आत येऊ शकतो.
पण प्रश्न हा आहे की या पीचवर आणि या सिच्युएशनला वन डे मध्ये अजून चाचपडणारा सूर्या खेळू शकतो का?
खेळला तर बरे होईल...

अंधश्रद्धा आहे ती

>>
खेळाडू पाळतात खूप अंधश्रद्धा
कुणी लाल कपडा खिशात ठेवतो, कुणी डावं pad आधी घालतो, कुणी जागाचं हलत नाही, कुणी शॉवर घेत नाही... वगैरे वगैरे

Pages