क्रिकेट विश्वचषक - २०२३

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01

आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.

कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!

एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रवींद्र त्याचे मिडल नेम असू शकेल… मिडल नेम = बाप हे महाराष्ट्रात असते… बाहेर देशात मिडल नेम काहीही असू शकते…

आज आपण हरणे गरजेचे आहे… एक मॅच हरावी लागेल- चढावा चढवावा लागेल.. याच स्टेज ला हरावे.. कप जिंकणे महत्त्वाचे…

आज आपण हरणे गरजेचे आहे…
>>>
शर्मा सुरू झालाय पुन्हा..
त्याला घेतला नाही लगेच तर अवघड आहे आपले हरणे..

शर्मा स्लो का होत नाही … एकदा साठ क्रॉस केले की शतक मारेल तो.. faaltu लॉलिपॉप खायला जातो आणि विकेट देतो पन्नास च्या आधी…

शर्मा स्लो का होत नाही… एकदा साठ क्रॉस केले की शतक मारेल तो..
>>>>>

तोच गेमप्लान आहे.
सोबत कोहली राहुल आय्यर मागे सांभाळतील हा विश्वास. जोपर्यंत ते विश्वासाला जागत आहेत, शर्मा आपला एप्रोच बदलणार नाही. बदलूही नये.

सामना धुक्याने थांबला.
जर सामना २० ओवरचा झाला तर भारताला अजून ४.२ ओवर मध्ये २४ मारावे लागतील.

हो.. विकेट हातात आणि फास्ट सुरुवात होती ना..
पण झाला आता सामना सुरू..
अय्यर गेला शॉर्ट बॉल वर पुन्हा..
अजूनही सोपा आहे पण कोहली गेला तर अवघड होईल हा सामना..

अरे आता सूर्या कश्याला..
याच दोघांनी सामना काढायला हवा..
म्हणजे ५० च्या आत आणायला हवा..

या दोघांपैकी कोणीतरी एक आऊट व्हायला पाहिजे
>>>
कोहली बाद होणे अवघड आहे
जिंकायला १०४ त्याच्या शतकाला ५७.. आज पण शेवटी धमाल आहे Proud

*विराट ने उडवला त्याला…* - फिल्डरच्या हातात चेंडू तरी सूर्या धांवत सुटला तर विराटला दोष कां ?

KL चा lbw samjala नाही. त्याने खूप पुढे येवून खेळला होता. DRS मध्ये distance फ्रॉम विकेट का consider केले नाही??

DRS मध्ये distance फ्रॉम विकेट का consider केले नाही??
>>>
मलाही तसेच वाटले.. ठराविक अंतराचा नियम होता ना आधी डीआरएसला...

कोहली धावला असता तर रन होता नक्की. बॉल लांब होता. थेट हातात नव्हता. कितीही छान फिल्डींग केली तरी कोहली पोहोचला असता. पण कोहलीला तितकी रिस्क घ्यायची नसावी. जे कोहलीचा सध्याचा फॉर्म आणि मॅच सिच्युएशन पाहता योग्य देखील होते.
पण प्रॉब्लेम झाला की मग दोघात तसे कोऑर्डीनेशन हवे. ते मीसिंग होते. आता ते दोघे एकत्र कमी खेळल्याने असावे किंवा आयपीएल मध्ये कधी काळी झालेल्या वादाने त्यांच्यात पर्सनल बाँडींग कमी असावे.

गेला.. ९५
त्याने सिंगल घ्यायचा होता.. मग फोर ला जायचे होते.. थेट सिकसला गेला..

Pages