क्रिकेट विश्वचषक - २०२३

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01

आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.

कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!

एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उगाच गेला.. शेवटी सूर्या शर्मा धमाल फटकेबाजी बघाया मिळाली असती.. एवढी मेहनत केलेली आणि चुकीच्या वेळी गेला.. एक यादगार शतकं सुद्धा गेले..अजून एकदा..

9 ओवर बाकी असताना बुमाराहला कुलदीप आधी का पाठवले समजले नाही.
कुलदीपने आधी विकेट सांभाळली असती आणि बुमराहने शेवटी बॅट फिरवली असती..

230 टारगेट
50 ओवर पूर्ण खेळले.
शर्मा बाद झाल्यावर 13.1 ओवर्मध्ये 65 आले..
250 व्हायला हवे होते. इंग्लंड विकेट पडल्या तरी बॅटिंग डीप आहे.. आपल्याकडे पाच बोलार आहेत. कोणाचा वाईट दिवस परवडणार नाही.

इंडियाने ५० ओव्हर्स पूर्ण खेळल्या हे बरं झालं. २३० चॅलेंजिंग स्कोअर होऊ शकेल जर बॉलिंग आणि फिल्डिंग टिच्चून केली तर. लाईट्स आणि ड्यू चा कितपत परिणाम होईल माहीत नाही, पण पहिल्या १५ ओव्हर्समधे इंग्लंडच्या बॅटिंगचा कणा मोडला, तर इंडियाला मॅच जिंकायची संधी आहे.

पीच तुलनेत सोपा झाला तर हीच भीती आहे म्हणून ते वरचे रन हवे होते
अन्यथा ऑस्ट्रेलिया आणि पाकला आपण 200 आत रोखला आहे.
गोलंदाजांना जर पहिल्या डावासारखी जवळपास पूर्ण इनिंग मदत मिळाली तर आपला बॉलिंगएटेक विकेट टेकर आहे.

इंग्लंड 7 गडी राखून जिंकेल असे वाटते. पंड्या गेल्यामुळे टीम चा बॅलन्स पुर्ण बिघडला आहे, पंड्या फिट नसेल तर भारताने ताबडतोब तिलक verna हा बदली खेळाडू घ्यावा. पंड्या ला डायरेक्ट सेमी फायनल ला खेळवणे risky ठरेल, तिलक श्रेयस च्या जागी 4 वर खेळू शकतो व 3-4 ओव्हर्स टाकू शकतो

सूर्या मूर्खासारखा आऊट झाला.
त्यानी शेवट पर्यंत विकेट वर टिकून राहाणं संघाच्या दृष्टीनी गरजेचं होतं. २५० काय २८० पण झाले असते मग...

आपल्याला बॅटिंग मधे अजून कन्सिस्टन्सी हवीय. आपले आयपीएल चे स्टार्स एक राहुल सोडता सो फार अगदी मिडिओकर खेळत आहेत असे माझे मत आहे. अय्यर, गिल, सूर्या कोणालाच त्यांच्या हाइप ला साजेसा स्पार्क दाखवता आलेला नाही. बॅटिंग स्टॅट्स पाहिले तर कोहली, रोहित आहेत फक्त टॉप १० मधे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलन्ड, साउथ अफ्रिका ३५०-४०० करताना बघून एकूण सेमीज ची चिंता वाटत आहे.

इंग्लंड - 33-३, 55-५ ..
भारताची भारी गोलंदाजी, क्षेत्ररचना व क्षेत्ररक्षण !!

८२/६ आता मॅच भारताच्या ताब्यात आहे.

गिल च्या जागी किशन, अय्यर च्या जागी हार्दिक आणि सिराज च्या जागी अश्विन ट्राय करायला हरकत नाही. अय्यर आणि हार्दिक सेम run करतात

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलन्ड, साउथ अफ्रिका ३५०-४०० करताना बघून एकूण सेमीज ची चिंता वाटत आहे.
>>>>>>>

ते करत आहेत तसे बरेचदा समोरच्याला करायला देतही आहेत.

आपल्या समोर अजून कोणी नाही केले. जसे आपले गोलंदाज चालत आहेत आणि जसे शर्मा ते वापरत आहे ते पाहता सोपेही नाही.
तरी तसाच पीच असेल आणि 300+ केले तर तेव्हा आपणही करू Happy

विश्वचषक स्पर्धा तशी निर्दयच म्हणायला हवी; भल्याभल्यांना कधी कधी अगदीं नगण्य करून टाकते ! ह्यावेळी पाळी आहे इंग्लंडची !!! अर्थात, आजचं भारताचं श्रेय कमी लेखण्याचा मूर्खपणा न करतां हे सांगावंसं वाटलं, इतकंच.

रोहीत शर्मा सामनावीर!
अवघड खेळपट्टीवर खेळायचे स्पेशल टेलेंट आहे त्याच्यात. तेच आज दोन संघातील फरक ठरला..

त्या दिवशी म्हटलेले की शर्मा खेळताना खेळ पट्टी वेगळी भासते ते हेच Happy

ह्यावेळी पाळी आहे इंग्लंडची !!>>
भाऊ, परंतु इंग्रज पूर्ण स्पर्धेत खूपच खराब खेळले असे वाटते टीमवर्क अजिबात नाही दिसले.
पुढील विश्वचषकासाठी कदाचित क्वालिफायर खेळावे लागेल एखादा सामना अजून हरले तर. जी खूप मोठी नामुष्की असेल इंग्रजांसाठी.

*इंग्रज पूर्ण स्पर्धेत खूपच खराब खेळले असे वाटते * - निःसंशय ! पण शापित असल्यासारखे कुवतीच्या मानाने खूपच खराब खेळले, हेही तितकंच मान्य करायला हवं.

“ आजचं भारताचं श्रेय कमी लेखण्याचा मूर्खपणा न करतां हे सांगावंसं वाटलं” - आज भारतानं कमाल केली. २२९ डिफेंड करणं आणि ते सुद्धा १०० रन्सने जिंकणं - कितीही इंग्लंड आऊट ऑफ फॉर्म असली तरिही - ही बॉलर्सची कमाल आहे. माझ्या मते आजचे सामनावीर बुमराह-शामी होते.

पाकिस्तानला हारवण्यातला इमोशनल भाग बाजूला ठेवला तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझिलंडला हारवण्यात स्किल आणि टेंपरामेंटचा भाग जास्त मोठा होता.

माझ्या मते आजचे सामनावीर बुमराह-शामी होते. >>> मलाही तसेच वाटले. शर्माची इनिंग भारी होती हे धरूनही. आजचा विजय जास्त चांगला वाटला कारण या कप्स मधे ३५०+ चे स्कोअर्स सुद्धा सेफ नाहीत. पण बोलर्सनी जाम हवा टाइट केली. नाहीतर गेल्या काही मॅचेस म्हणजे शर्मा-राहुल-कोहली "तुम्ही काय करायचे ते रन्स करून घ्या. आम्ही बघून घेऊ" टाइप खेळायचे.

क्लाईव्ह लॉइड एकदा म्हंटला होता की जर प्रतिस्पर्धी संघाने आम्हाला लौकर आउट केले तर आमचे बोलर्स जबरी खुन्नसने मैदानात उतरत आणि ते बघायला फार मजा येत असे. आज आपली बोलिंग तशीच वाटली.

भारताने एकाच कप मधे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलण्ड, इंग्लंड आणि पाकला यापूर्वी कधीच हरवले नव्हते असे दिसते. १९८३ मधे पाक व न्यूझीलंड विरूद्ध आपण खेळलो नव्हतो. तेव्हा इंग्लंडला हरवले होते पण ऑस्ट्रेलियाविरूद्ध लीग स्टेजला एक विजय व एक पराभव होता. २०११ मधे पाक, ऑस्ट्रेलियाला हरवले. न्यूझीलंड विरूद्ध खेळलो नव्हतो व इंग्लंडविरूद्धची गेम टाय झाली होती. १९९२ मधे पाक सोडून इतर सर्वांकडून हरलो होतो. १९९९ मधे ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडकडून, १९९६ मधे ऑस्ट्रेलियाकडून, १९८७ मधे इंग्लंड व ऑस्ट्रेलिया दोन्हींकडून. मागच्या वेळेस पाक व ऑस्ट्रेलिया दोघांना हरवले होते पण न्यूझीलंडकडून हरलो होतो. २०१५ चे लक्षात नाही. बहुधा ऑस्ट्रेलियाकडून हरलो सेमीज मधे.

मागच्या वेळचे विजेते लीगमधेच बाहेर होण्याची वेळ - १९९२ मधे ऑस्ट्रेलिया, १९९९ मधे श्रीलंका अशी दोनच उदाहरणे असतील. यावेळेस इग्लंडला अजूनही थोडाफार चान्स आहे असे ऐकले. काय इक्वेशन आहे माहीत नाही.

सामनावीर शर्माच होता आजचा.
अख्खी इनिंग लाईव्ह पाहिली आहे. खूप दिवसांनी अशी एखादी इनिंग बघायला मिळाली.
सुरुवातीला खेळपट्टी सोपी नाही हा अंदाज घेत मेडन ओवर जाऊ देत सावध सुरुवात केली.
पण मग त्याच बॉलरला पुढच्या ओवरमध्ये पुढे सरसावत फोर मारला, शॉर्ट बॉल टाकायला भाग पाडत सिक्स मारला. आणि पुन्हा लास्ट बॉलला पुन्हा समोर उचलत सिक्स मारला. इंग्लंड डोक्यावर चढणार नाही हे सध्याच्या त्याच्या रोल नुसार बघत होता.
पण पुढच्याच ओवरला समोरून गिल बाद झाला. कोहलीला 10-12 बॉल झाले खाते उघडणे जमत नव्हते त्यातच तो गेला. अय्यर तर कधीही जाईल इतका गोंधळलेला या पीचवर. आणि तसाच गेला. 3 झटपट विकेट आणि खेळपट्टीचा नूर पाहता शर्माने तलवार म्यान केली. आपला रोल बदलला आणि डाव सावरला. अर्धशतक झाल्यावर पुन्हा ड्यू फॅक्टर लक्षात घेत 250+ टारगेट गाठायला पुन्हा अलगद गेअर बदलला. त्यातच वैयक्तिक शतकाची पर्वा न करता गेला.

पण आजच्या इनिंगाची खासियत म्हणजे ही इनिंग पेस करताना त्याने जे शॉट खेळले आहेत ते अश्या कठीण पीचवर फलंदाजी करताना प्रतिस्पर्धी गोलंदाजांशी माईंड गेम कसा खेळावा याचे उत्तम उदाहरण होते. स्वीप, रिव्हर्स स्वीप, चीप शॉट अगेनस्ट द टर्न, पन्नास केल्यानंतरचा फ्लिक कम पूलच्या मध्ये कुठेतरी मारलेला सिक्स.. बाद झाला तेव्हाही विचार योग्य होता पण execution चुकले. पूर्ण खेळी वर्णन करावी अशी होती. कोणी बघितली नसल्यास शक्य झाल्यास हायलाईट जरूर बघा आज त्याच्या खेळीची. भले शतक नाही झाले पण हरून वाया नाही गेली हे छान झाले Happy

इग्लंडला अजूनही थोडाफार चान्स आहे असे ऐकले. काय इक्वेशन आहे माहीत नाही.
>>>>>

फक्त theoretical चान्स असेल. ज्याला काही अर्थ नसेल. इंग्लंडचे आता जास्तीत जास्त 8 गुण होऊ शकतात. जे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे आधीच 8 गुण झाले आहेत आणि त्यांचे अजून प्रत्येकी तीन सामने बाकी आहेत. इंग्लंड आणि या दोन्ही टीम मध्ये रन रेटचा सुद्धा एवढा मोठा फरक आहे की तो मिटने अवघड. बरे ८ गुण बनवायचा चान्स बाकीच्या संघाना सुद्धा आहे ते वेगळेच..

माझ्या मते आजचे सामनावीर बुमराह-शामी होते
>> +1

शर्मा मस्त खेळाला, नो डाऊट. पण त्याच्या 87 धावापेक्षाही जास्त फरकाने विजय मिळवण्यात अन् इंग्लंड चा सपशेल खुर्दा उडवण्यात बुमरा-शमी चा वाटा मोठा आहे. जर टॉप ऑर्डर खेळली असती तर सगळं अवघड होऊन बसलं असतं.

माझं स्पष्ट मत आहे, जर पहिल्या बॅटिंग मधे असा स्कोअर झाला की विजय नक्की वाटतं असेल, तर हाय स्कोअरिंग बॅटर ला सामनावीर द्या, पण तसं नसेल अन् बोलर नी विजय खेचून आणला असेल तर तो सन्मान बोलार लाच मिळायला हवा. तसंच पहिल्या बोलिंग मधे जर समोरच्या टीम ला अशा स्कोअर मधे रोखलं, जो त्यांनी जिंकायच्या दृष्टीनी कमी वाटेल, तर बोलर सामनावीर, पण स्कोअर समोरच्या टीम च्या बाजूनी पारडं झुकावत असताना बॅटिंग च्या जोरावर मॅच जिंकली, तर सामनावीर बॅटर...

पण आपल्याकडे बोलर ना गृहीत धरायची खोड आहे अन् बॅटर ना डोक्यावर घ्यायची...

Pages