Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01
आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.
कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!
एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नावडतीचे मीठ अळणी म्हणू का
नावडतीचे मीठ अळणी म्हणू का परदु:ख शीतल म्हणू? >> आधी 'मराठी असे अमुची मायबोली' असे म्हणायला लागेल रे
गंभीर कॉमेंटरी करायला येतो की
गंभीर कॉमेंटरी करायला येतो की धोनीबद्दलची खदखद व्यक्त करायला येतो समजत नाही.
दोन्ही वर्ल्डकप चा हिरो आहे तो.
तरी त्याने हे थांबवायला हवे. उगाच या नादात ट्रोलरना आमंत्रण देतो.
आज त्या सुमित पाटीलचा एक फनी व्हिडिओ पाहिला त्याच्यावर बनवलेला..
बघ माझी आठवण येते का.....
Watch this video on Facebook https://fb.watch/o0SQ2k7AvO/?mibextid=ifW6Jt
“मराठी असे अमुची मायबोली' असे
“मराठी असे अमुची मायबोली' असे म्हणायला लागेल रे” -
सहज मागचा धागा चाळत होतो तर
सहज मागचा धागा चाळत होतो तर त्यावर ही कमेंट दिसली
हि सिरीज ऑसीज ऐवजी पाकिस्तान किंवा इंङ्लंड विरुद्ध हवी होती म्हणाजे पूर्ण तावून सुलाखून निघालो असतो.
Submitted by असामी on 25 September, 2023 - 21:37
De kock चौथ्या शतकाकडे...
De kock चौथ्या शतकाकडे...
500 धावा झाल्या आताच..
673 सचिनचा 2003 सालचा विक्रम तुटणार यंदा..
पण फक्त आकड्यात तुटणार..
दर्जात नाही.
आफ्रिका जिंकायला हवेत
आफ्रिका जिंकायला हवेत
न्यूजीलांड हरायाला हवी
म्हणजे सेमीची स्पर्धा कायम राहील
SA is becoming a force to
SA is becoming a force to reckon with! We need to really watch out for them. We are thru to the semis and it will be a good practice match on Sunday. I have a feeling they will make us sweat a bit, give us a run for our money. If they don't, then we are in totally badass mode and the trophy is ours!
सहज मागचा धागा चाळत होतो तर
किवीज किती इंजरी ग्रस्त झाले आहेत. आज मोक्याच्या वेळीस हेन्री उडला. बोल्ट चे आकडे काय जबरदस्त आहेत ह्या केऑस मधे पण.
. I have a feeling they will make us sweat a bit >> बुवा आपली उद्याचीमॅच पदरात पडली तर संडे च्या मॅच ला सिरीयसली किती मह्त्व देऊ ( तशात नेदरलँड बरोबर शेवटची मॅच आहे म्हटल्यावर) कोणास ठाऊक ?
सहज मागचा धागा चाळत होतो तर त्यावर ही कमेंट दिसली >>
विनोदाचाअ भाग बाजूला ठेवून बोकलत तेंव्हा तू त्यावर एक चकार शब्द बोलला नव्हता हे लक्षात असू द्या. मला क्रिकेट मधले कळत नाही हे तू आधीच सांगितले असल्यामूळे माझ्या पोस्ट परत वाचण्याचे कष्ट कशाला घेतोस बाबा ? मला भविष्य कळत नाही पण तुला कळते हा तुझाच दावा आहे ना ? (नीट सुरू असलेल्या चर्चे मधे उगाच अमकी टीम वर्ल्ड कप जिंकली वगैरे असंबंद्ध पिंका वरून म्हणतोय ) तेंव्हा तू समजावायला हवे होतेस माझ्यासारख्यांना. पश्चातबुद्धीवर टिंगा मारण्यामधे कसली हुशारी बाबा !
190 धांवांनी द. आफ्रिका विजयी
190 धांवांनी द. आफ्रिका विजयी !!!
बुवा आपली उद्याचीमॅच पदरात
बुवा आपली उद्याचीमॅच पदरात पडली तर संडे च्या मॅच ला सिरीयसली किती मह्त्व देऊ >>>> अरे उद्या लंका आहे ना? आरामात जिंकू असं वाटतय पण लंकेवाल्यांच्या अंगात एकदम जय श्री रावण संचारला तर काय सांगा हा मुद्दा आहेच. आणि तो मुद्दा कुठल्याही टीम बाबतीत असतोच. आपल्याला नाही का एशिया कप मध्ये बांग्ला देशनी टोला दिला सुपर ४ मध्ये.
बेसिकली आउटलायर्स बाहेर काढता शक्यता अशी आहे की उद्या आपण जिंकू आरामात पण रविवारी कस लागेल कारण एसे वाले सॉलिड फॉरमात आहेत. पण आपणही काही कमी फॉर्मात नाही आहोत. माझ्यामते बॉलर्सच जिंकून देतिल आपल्याला. पहिली बॅटिंग घेतली पाहिजे. दणक्यात स्कोअर केला तर आधीच अॅडवांटेज असेल पण नाही जरी केला तरी बॉलर लोक कुछ कमाल करेंगे! फक्त पीच फार डिटिरियोरेट व्हायला नको.
संडे ची मॅच फायनल ची रंगीत
संडे ची मॅच फायनल ची रंगीत तालिम म्हणायची का?
साउथ आफ्रिकेने नुस्ता धोपटायचा सपाटा लावलाय! ३५० च्या खाली बोलतच नाहीयेत राव . आपल्या बोलर्स चा कस लागणार आहे. आपल्या बॅटींगच्या कन्सिस्टन्सी बद्दल मला तरी अजिबात खात्री वाटेना त्यामुळे धडधड पाक पुक होऊन राह्यली!!
या स्पर्धेतील गोलंदाजांची
या स्पर्धेतील गोलंदाजांची Best Economy चेक करा.
पहिल्या 8 मध्ये 5 भारतीय गोलंदाज आहेत.
आफ्रिकेला घाबरायची गरज नाही.
आणि फलंदाजीचे म्हणाल तर त्या रबाडा आणि लुंगीला 4-5 सिक्स प्रत्येकी तर एकटा आपला शर्मा मारेल.
कोहली आणि तो कमालीचे सातत्य दाखवत आहेत.
मागची खेळपट्टी अवघड होती. त्यावरून फलंदाजाचे यश अपयश जोखू नका.
शुभमन गिलला एका खेळीची गरज आहे. ती लंके समोर आली की मग तो अहमदाबादचा राजकुमार आहे. गिल मोठी खेळी खेळू लागताच शेपूट छोटे आहे याची चिंता राहणार नाही आणि आपलीही फलंदाजी आफ्रिकासारखी भक्कम भासू लागेल.
पांड्या परत येता अय्यरला नारळ देता येईल. सूर्याला ठेवता येईल.
याउलट आफ्रिकेने मात्र चेस करताना नेदर समोर पराभव पत्करला आहे आणि पाकिस्तानने फारसे मोठे टारगेट नसताना त्यांचा घाम काढला आहे. आपल्या बॉलिंगसमोर ते सहजी चेस करतील असे वाटत नाही.
तरी सगळ्यांनी निश्चिंत राहा.. तसेही प्रतिस्पर्धी तुल्यबळ असतील तरच विजयाची चव चाखायची मजा वाढते
श्रीलंकेविरुद्ध नि नेदरलँड्स
श्रीलंकेविरुद्ध नि नेदरलँड्स विरुद्ध नवोदित लोकांना संधि द्यावी का? जयस्वाल, पृथ्वी शॉ, वगैरे?
पृथ्वी शॉ पेक्षा सचिन
पृथ्वी शॉ पेक्षा सचिन तेंडुलकर ला खेळवा… तो जास्त चांगला खेळेल…
सचिन पर्यंत कुठे जाता आहात..
सचिन पर्यंत कुठे जाता आहात.. धोनीलाच बोलवा.
वर्ल्ड कप जिंकायला त्यापेक्षा योग्य पर्याय तो काय
धोनी ओव्हरेटेड आहे.. सचिन एक
धोनी ओव्हरेटेड आहे.. सचिन एक नंबर आहे.. जुन्या काळातला विराट आहे तो…
ओह असामीजी तुम्ही टाकली होती
ओह असामीजी तुम्ही टाकली होती ती कमेंट हे आता समजलं. गैरसमज नसावा मी तुमची चेष्टा करत नसून क्रिकेट मधील समीकरणे किती लवकर बदलतात आणि त्याने झालेली पाकिस्तान इंग्लंडची अवस्था यावर हसत होतो. कॉपी करताना प्रतिसादासोबत तुमचं नाव तारीख टाईम पण कॉपी झालं. आता चार तास उलटून गेलेत त्यामुळे एडिट पण करू नाही शकत. जाऊ दे पुढच्या वेळी कॉपी करताना काळजी घेईन.
काल न्यूझीलंड मोठ्या फरकाने
काल न्यूझीलंड मोठ्या फरकाने हरल्याने पाकिस्तान बाद फेरीत येऊ शकते बाकी सामने मोठ्या फरकाने जिंकून.
धोनी ओव्हरेटेड आहे.
धोनी ओव्हरेटेड आहे.
>>>>
तुम्हाला विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज भारताचा हवा आहे की विश्वचषक हवा आहे यावर धोनीबद्दलचे तुमचे मत ठरते असे मला वाटते.
इथे तुम्ही म्हणजे तुम्हीच असे नाही
न्युझीलँड श्रीलंकेशी हरली तर
न्युझीलँड श्रीलंकेशी हरली तर रनरेटची गरज नाही. पाक इंग्लंडशी जिंकून सुद्धा पॉइंटवर पुढे जाऊ शकते.
अर्थात पाक न्युझीलँडमध्ये पाकला जिंकावे लागेलच.
लंका जर का भारताशी जिंकली तर ते स्वतः सुद्धा या स्पर्धेत असतील.
तिथे अफगाणने नेदरशी जिंकावे आणि ऑस्ट्रेलिया किंवा आफ्रिका पैकी एकाला धक्का द्यायला जमतो का हे बघावे.
*..तसेही प्रतिस्पर्धी तुल्यबळ
*..तसेही प्रतिस्पर्धी तुल्यबळ असतील तरच विजयाची चव चाखायची मजा वाढते *. - 100% सहमत. किंबहुना,चार वर्षे ज्यासाठी प्रत्येक सहभागी देश कसोशीने प्रयत्न करत असतो, ती स्पर्धा अत्यंत चुरशीची होणच औचित्यपूर्ण ठरेल.
आणखी एक. स्पर्धेचा पहिला टप्पा व दुसरा टप्पा (knock out stage) यातील फॉर्म, मानसिकता, डावपेच इ. भिन्न असू शकतात. उदा., एखादी टीम बाहेर जाता जाता उसळी मारून बाद फेरीत आली असेल, तर त्या संघाची जिद्द, उत्साह द्विगुणित झालेला असतो. शिवाय, आधीच्या पराभवांमुळे आलेला त्या टीमवरचा दबावही नाहीसा झालेला असतो. थोडक्यात, दुसऱ्या स्टेजमधील चार संघ निश्चित झाल्यावरच त्यांचा पुढील वाटचालीचा नव्याने विचार करूनच भाकीतं वर्तवण शहाणपणाचं, असं मला वाटतं .
लंका पाहिली फलंदाजी घेतली
लंका पाहिली फलंदाजी घेतली
त्यांना आशिया कप फायनलला जे झाले ते नको असेल..
पण लाईट लागल्यावर सुद्धा तेच होण्याची शक्यता आहे..
शर्मा आज सेहवाग मोड मधे...
शर्मा आज सेहवाग मोड मधे...
पहिल्या बॉल वर चौका
हे लिही पर्यंत पुढच्या बॉल ला बोल्ड झाला....
लंका पाहिली फलंदाजी घेतली
लंका पाहिली फलंदाजी घेतली
>>
गोलंदाजी रे...
हो गोलंदाजी
हो गोलंदाजी
शर्माला घेत निर्णय सार्थ ...
काल म्हटल्याप्रमाणे आपल्यासाठी आज गिल खेळणे गरजेचे..
बॉल मस्त पडत आहेत. क्रुशिअल पिरीअड.. खेळा सावचितपणे
>>त्यांचा पुढील वाटचालीचा
>>त्यांचा पुढील वाटचालीचा नव्याने विचार करूनच भाकीतं वर्तवण शहाणपणाचं,
नॉक आउट मॅचेसच्या बाबतीत भाकित न वर्तवणे हेच शहाणपणाचे
भाऊ, स्वरूप - सहमत! जनरली
भाऊ, स्वरूप - सहमत! जनरली प्लेऑफ्समधे खूप गोष्टी बदलतात. तसंही इतक्या मोठ्या स्पर्धेत वैय्यक्तिक फॉर्म, फिटनेस सुद्धा कमी-जास्त होण्याची शक्यता असते, ज्यामुळेसुद्धा टीम बॅलन्स बदलतो.
भाऊ +१. सेमीस आणि फायनल
भाऊ +१. सेमीस आणि फायनल मध्ये काहीही होऊ शकतं.
आपण आत्ता पर्यंत तरी टॉप फॉर्म दाखवला आहे. ट२० फायनल सारखं एन वेळेस नांगी टाकली असं ह्या वेळी होणार नाही असं वाटतय.
बुमराह एक खुप मोठा फॅक्टर आहे. त्यात ह्यावेळी समहाऊ बॉलर वेग्वेगळे बॉल ट्राय करयायत असं स्पष्ट दिसतय.
गिल कोहली दोघांची शतके
गिल कोहली दोघांची शतके हुकविली लंकेने.
३५०+ व्हायला हव्यात मुंबईत.
यातला एक जण शेवटपर्यंत टिकला
यातला एक जण शेवटपर्यंत टिकला असता तर बेक्कार तुडवला असता.. तसेच समोरून सुर्याला स्टेज सेट असती..
आफ्रिका पॅटर्न झाला असता..
आता पुन्हा नवीन दोन फलंदाज.. आणि आपले शेपूट तसे मोठे असल्याने आता तसे खेळता येणार नाही. पुन्हा एक पार्टनरशिप हवी.
बाकी सामना जिंकायला हरकत नाही.
Pages