आई कुठे काय करते!-३

Submitted by sonalisl on 8 August, 2023 - 08:18

आई कुठे काय करते!-२ वर प्रतिसाद संख्या २०००+ झाली. त्यामुळे पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल अभिषेकला हॉस्पिटलमधून अर्जंट कॉल आला. जाताना तो आजीआजोबांना दार लावून घ्या म्हणून सांगून गेला. जानकीला सांभाळायची ड्युटीही दिली. तो बाहेर पडताच जानकी चालत चालत कॅमेर्‍याच्या रेंजबाहेर गेली ती परत दिसलीच नाही. पणजोबा / जी ला तिची आठवणही नाही. दोघे रोमान्स करू लागले. मग उघड्या दारातून कधीतरी संजना अन्घा परत आल्या.

पोलिस स्टेशनमध्ये आशुतोष जोडाक्षरयुक्त मोठे मोठे शब्द वापरून गुंडांना व्याख्यान देत बसला. एपिसोडभर चक्क नितीन दिसला नाही.

ईशाचं काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. परवा ती गणपती बघायला गेली होती, तिथून परत कधी आली वगैरे काही दाखवलंच नाही.

गुंड बड्या बापाची पोरं आहेत म्हणून सुटणार, तर अरुंधती (जगप्रसिद्ध गायिका) आणि आशुतोष ( केळकर (पार्ल्याचा Warren Buffett) सेलिब्रिटी असण्याचा फायदा घेऊन सोशल मीडियावर कँपेन चालवायचं की. रेप केसमध्ये दोघे विटनेस असल्याची बातमी झाली होती ना?

अरुंधती, अनीश , चिंगी हे कोणी तिथे जात नसले तरी वीणा संगीत विद्यालय अजूनही सुरू आहे. आता आरोही तिथे शिकवायला जाणार.

आरोही संगीत विशारद आहे म्हणजे अरुंधतीपेक्षा जास्त क्वालिफाइड म्हणायला हवं.

Lol
यांना सगळेच कसे संगीत क्षेत्रातील भेटतात?
चिंगी चा तर विषयही काढत नाहीत...
पार्ल्याचा वॉरन बफे! Biggrin
केळकरांकडे ही आजकाल बरीच लोकं असतात..जेवायला
अनिश, ईशा, आरोही, नितीन, आशुतोष, अरुंधती आणि सुलेखाताई!!!.....
आधी सुटसुटीत होतं कुटुंब !

आज अरु बलात्कार कर णा र्या मुलाला थोबाडित मारायच्या महत्वाच्या कामाला घराबाहेर गेली आहे. म्हणून केळकर साहेब स्वतः स्वयंपाक करत आहेत. व चहा कॉफी मुलांना देत आहेत. असा गुणी नवरा सर्वांना भेटो व मिळो. आरोही मदत करते अ‍ॅक्चुअली कांदे कापते. व त्याच हाताने अनीशला कॉफी देते . ते बघून इशाचे तोंड वाक डे झाले आहे. नुस्ती बसुन असते आजीचे संस्कार दुसरे काय!! आमच्या घरी येउ नकोस असे समृद्धी वाल्यांनी अरु ला चक्क हात जोडून समोर सांगितले आता हिने ऐकले पाहिजे. संजना व अनघाचे काही लो लेव्हल मारामारी व लपवणे चालू आहे.

Happy
आरोही ने खरेच कांदा चिरताना तसेच हात न धुता अनिश ला कॉफी दिली....!
आणि अनिश म्हणे.. वा काय छान झालीय ! ईशा का सदैव तोंड फुगवून असते?
अनघा एकदाही केस या बांधत नाही?
अन्या नक्की काय काम करतो?
आरोही लगेच इतका पॉश स्लिव्हलेस पंजाबी ड्रेस घालून?

आज अरु बलात्कार कर णा र्या मुलाला थोबाडित मारायच्या महत्वाच्या कामाला घराबाहेर गेली आहे.
>>>
तो अरुची वाट पाहत थांबला होता का? हद्द झाली. आणि अरुला पत्ता वगैरे माहिती असेल तर पोलिसांकडे का नाही दिले त्याला पकडून?
अरुला मोठे करण्याच्या नादात बलात्कारासारख्या गुन्ह्याला त्रिविआलाईज्ड करताहेत का हे लोक?

बलात्काराच्या केसेसमध्ये पीडित मुलीची ओळख गुप्त ठेवली जाते.
अरुंधती त्या मुलाच्या घरी जाऊन विचारते की आरोही नाव ऐकलं असेल ना टीव्हीवर, बातम्यांत?

आशुबाळाने समृद्धीला प्रायव्हेट आणि पोलिस अशी दोन्ही सेक्युरिटी देईन असं सांगितलं. (गृहमंत्री याच्या ऐकण्यातला आहे) तरी उद्या समृद्धीवर दगडफेक होणार आहे.

अरुंधती मोसादची मुख्य असल्यासारखी सगळ्यांना बसवून प्लान सांगतेय.

मागच्या भागात तिने "मला तू नाही, तुम्ही म्हणायचं" इथून वादाला सुरुवात केली. एक जेन्युइन प्रश्न. वादावादीत प्रथम स्त्रीने पुरुषावर हात उचलला तर तो मारहाणीचा गुन्हा होऊ शकतो का?

आशुतोषने दिलेले सेक्युरिटी गार्ड्स त्याच्यासारखेच मेंगळट आणि बिन्डोक आहेत. ते गुंड जाताना दिसताहेत तर त्यांना अडवण्याऐवजी धावत अनिरुद्धकडे आले. संजना आणि अन्घासुद्धा बाहेर गडबड आहे हे दिसत असूनही बाहेर थांबून मदत मिळवण्याऐवजी धावत घरात आल्या. आणि यांच्या बंगल्याचं फाटक कायम , रात्री अपरात्रीही सताड उघडं. अजून सी सी टी व्ही कॅमेराही लावला नाही.

भरत Lol Lol
आशुतोषने दिलेले सेक्युरिटी गार्ड्स त्याच्यासारखेच मेंगळट आणि बिन्डोक आहेत. ते गुंड जाताना दिसताहेत तर त्यांना अडवण्याऐवजी धावत अनिरुद्धकडे आले. ... Biggrin
काही दाखवतात! आता अन्या आणि संजना मधे जरा मनैक्य झालेय.
ते गार्ड्स आशुतोष ने दिलेले आहेत का? की यांच्या सोसायटीचे आहेत?
नितीन हल्ली शांत शांत असतो!

देशमुखांच्या घरी आशुबाळ म्हणाला होता, आपण पोलिसांत कळवु आणि मी प्रायव्हेट सेक्युरिटी ठेवतो. देशमुखांपैकी कोणाच्या केसालाही धक्का लागणार नाही .

त्यांच्याकडे दंडुके तरी होते का?

आरोही ला आवडतात म्हणून आशुतोष बटाट्याच्या काचऱ्या करत होता...!
यांना ऑफिस चे काहीच काम नाही का?
Angry
आता अरोहीच्या जोडीला अल्पना !
किती ती पात्रांची भर !
आता अनघाच्या माहेरचे कुणी दाखवत नाहीत...आणि शेखर दुसरे लग्न करणऱ होता ना?....तो ट्रॅक दिला अर्धवट सोडून..

मी वाचताना इतकं हसलोय की देवा आता ती मालिका रोज बघताना मला हे सगळं आठवणार. शुक्रतारा मंदवारा अगदी क्लासिक होतं.

काल 'एक हसीना थी' टाईप होत. सिमी गरेवालच्या जागी वामनराव पाटील होता.

त्या वामनराव आणि त्याच्या मुलाला अरुन्धतीच दुसर लग्न झालय हे माहीत नव्हत?

कान्चन कित्ती वेळा घरात पुजा घालणारेय? घरी कोणी धड कोणी कमवत नाही आणि देशमुखान्च सार बजेट पुजा- सणवारात जात.

ती नाटुकल्याची आयडिया यांनी तू चाल पुढे मालिकेतून जशीच्या तशी - कपडेपटासकट उचलली. फक्त त्यात जिच्यासाठी हे केलं ती मालिकेची नायिका अनभिज्ञ होती. (BTW अश्विनी तिथे please all अतिच करू लागल्यापासून मी तीही मालिका पाहायचं बंद केलं.)

पाटीलच्या स्पाइजना सुलेखाताईं आशुबाळाची आई आणि अरुंधतीची सासू आहे, हा आश्रम त्यांचा आहे हे माहीत नव्हतं?
आश्रमात प्रत्येक वेळी वेगवेगळ्या बाया असतात. राठीबाईंना तरी बोलवायचं.

ते पत्रकार पण धन्यच होते. पेपर पॅडवर लिहीत होते. तू चाल पुढे वाल्यांनी लोकल न्युज चॅनेलवाल्याला बोलावलं होतं आणि लाइव्ह दाखवलं.

(BTW अश्विनी तिथे please all अतिच करू लागल्यापासून मी तीही मालिका पाहायचं बंद केलं.) >>>>>>> अजूनही तिच तेच चालू आहे.

सध्या तिथे अन्धश्रद्धेच भूत अवतरलय.

अन्घा - अभि, आता जानकीशी बोलताना माझ्या मनात एक विचार आला. मी आता पार्ट टाइम प्रॅक्टिस बंद करणार आहे.

अभि आनंदाने नाचू लागतो.
अन्घा - आणि पूर्णवेळ कौन्सेलिंग सुरू करणार आहे.
अभि - तू नीट वेचार केला आहेस का?
अन्घा - मी पूर्ण विचार केला आहे.

ती जानकी या दोघांना अजिबात ओळखत नाही. हे दोघे तिच्याशी लाडाने बोलत असले तरी ती भलतीकडेच बघत असते. (बहुतेक तिची आई सेटवर तिच्यासमोर पण कॅमेर्‍याआड उभी राहत असावी.) आजच्या भागात एक बाई तिला घेऊन उभी आहे, असे नंतर दाखवले.

नितीन कसा कायम केळकरांकडे नाहीतर देशमुखांकडे पडलेला असतो, हे आपण इथे लिहितो ते वाचून लेखक मंडळींनी मुद्दाल अगदी नवरात्रीतल्या रात्रीही त्याला समृद्धीवर आणले.

अनिशने ईशाचा डिरेस तिला न विचारता - न सांगता आरोहीला घालायला दिला. ईशाने अनिशच्या झिंज्या आणि दाढी उपटायला हवी होती.

एकामागून एक प्रॉब्लेम हा या मालिकेचा यु एस पी आहे. पण सध्या या मालिकेच्या टीमचं एकावेळी एकच प्रॉब्लेम दाखवून समाधान होत नाही. म्हणून संजनाचा प्रॉब्लेम अजून सुटलेला नाही, अनिरुद्ध हरवला आहे त्यात अन्घाला फुल टाइम कौन्सेलिंगचे डोहाळे लागलेत.
आपल्या मुलीला अप्पा आजी संजना सांभाळतील हे त्यांना न विचारता ती ठरवून मोकळी झाली.

भरत..:-) बाकी ठीकच आहे..
पण
आपल्या मुलीला अप्पा आजी संजना सांभाळतील हे त्यांना न विचारता ती ठरवून मोकळी झाली....
यात काही वावगं वाटलं नाही मला तरी.
तसेही ते सांभाळतातच की.
एकत्र कुटुंबात असे गृहीत धरल्या जातेच. तिलाही हे लोक धरतातच अनेकदा.
आणि ती अभी शी बोलतेय..मग बाकीच्यांशिही बोलेल कदाचित....
Happy

आता काय अनिरुद्द त्या राधिकाशी अफेअर करणार आहे की काय? ह्याचा काही नेम नाही.

आजची अरुंधतीची गंमत. ती अन्घाला सांगत होती - अगं मुलांसोबत जास्तीतजास्त वेळ घालवायचा हाच काळ आहे. इ.इ. अनघा कोंडीत. अभिषेकला मारे ठणकावून सांगितलं की माझा विचार झाला आहे, तू विचार कर. पण ताई, तू म्हणत असशील तर मी नाही करणार काम.
अरुंधती मस्त कात्रीत सापडली होती. पण कांचनने येऊन नाक खुपसल्यावर तिला आपण स्त्रीवादी इ. आहोत हे आठवलं आणि तिने अन्घाला पाठिंबा दिला. मूल तिचं एकटीचं नाही. अभिषेकचंही आहे, हेही तिला आठवलं. वर आपण सगळे मिळून सांभाळू हे आहेच. कुठूनही देशमुखांकडे नाक खुपसायला जायला निमित्त हवं.

आता यावरून आशुबाळाला पाळणाघर काढायची आयडिया मिळेल. पाळणाघराची मॅनेजिंग डायरेक्टर अर्थातच अरुंधती.

परत आलेला अनिरुद्ध पार हादरलेला आहे. तो जिला भेटायला गेला होता तिची आणि त्याची काही हिस्टरी आहे असं अरुंधतीच्या बोलण्यावरून वाटलं.

ते नाटुकलं करताच आरोहीचा प्रश्न सुटला वाटतं. गुंडांनी आपल्या गुन्ह्याचा कबुलीजवाब दिला. बायकोला छळलं म्हणून मेन गुंडाचा बाप स्वतःच पोलिसांना सरेंडर झाला.

अरुंधतीच्या आणि कांचनच्या भारी साड्या- दागिन्यांसमोर ईशा अगदीच लंकेची पार्वती वाटते.

हे सगळं वाचल्यावर मला छकुली ची फारच काळजी वाटायला लागली आहे. अप्पांना डिमेंशिया झालाय, कांचन गुडघेदुखी आणि तत्सम तब्येतीच्या तक्रारींमुळे फक्त देवासमोरचे आसन ते हॉल मधला सोफा एवढिच हालचाल करु शकते. अनिरुद्ध कुठेतरी बाहेर माती खाण्याच्या तयारीत आहे. संजना अरुंधतीनेच वीणा प्रकरण ऐन भरात असताना स्वतः ची ओळख जपण्यासाठी समृद्धीतुन बाहेर पडण्याचा सल्ला दिला दिला आहे. अभीची ऍनेस्थेशिआची प्रायव्हेट प्रॅक्टिस जोरात सुरू आहे. अनघा पुर्ण वेळ बाहेर काम करुन परत समस्त देशमुख परिवाराच्या खाण्यापिण्याची तंत्र सांभाळणार आहे (कारण तो तिचा समृद्धी मधला डेजिग्नेटेड जॉब आहे. यश गौरी च्या विरहात डिप्रेशन मध्ये प्रेमभंगाची गाणी संगीतबद्ध करण्यात बिझी आहे. विजिंटिंग केअर गिवर अरुंधती ने सोडवण्यासाठी दोन नवीन समस्या शोधल्या आहेत. विमल अंतर्धान पावली आहे.
छकुली ला नक्की कोण सांभाळणार आहे?

छकुलीचा प्रश्न सुटला. अरुंधतीने एका दगडात चारपाच पक्षी मारले. अन्घाला आश्रमात येऊन रोज कौन्सेलिंग कौन्सेलिंग खेळ असं सांगितलं. हवं तर तिथेच तुझ्या क्लायंटसनाही बोलव. म्हणजे ऑफिसच्या जागेचा प्रश्न सुटला. सोबत छकुलीला घेऊन ये. तिला आश्रमातल्या बायका बघतील.

आता आश्रमातल्या बायका एक मूल सांभाळताहेत म्हटल्यावर आशुबाळालाही बाळ हवं झालं.

Pages