आई कुठे काय करते!-३

Submitted by sonalisl on 8 August, 2023 - 08:18

आई कुठे काय करते!-२ वर प्रतिसाद संख्या २०००+ झाली. त्यामुळे पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण त्यात अनिरुद्ध सोडला तर एकानेही तिच्यावर विश्वास ठेवला नाही, तिला खोटं पाडलं यातून जनरली योग्य संदेश जात नाही.>> तिला कुठे खोटं पाडलं? उलट तिचे खोटे उघडे पाडले. तिच्या घरातले तिला चांगले ओळखून आहेत. अन्याची जशी तिच्या बाजूने रियॅक्शन होती तशीच बाकीच्यांची अनिशच्या बाजूने.
अरूने दहीहंडीत भाग घेण्यावरून किती चर्चा! ही झोपताना साडीची नाही तर केसाचीही पीन काढत नाही. मग दहीहंडी फोडताना कशी दाखवणार होते?

ती खोटं बोलत होतीच. पण तो प्रसंग तसा रचायची गरज नव्हती.

आज अरुंधती ईशाला - तुम्ही दोघे नंतर शांतपणे बोला. आता सगळ्यांसमोर तमाशा नको. (शब्द हेच नसतील. अर्थ मात्र हाच)

हे वाक्य मोठ्या पोस्टरवर चिकटवून तिलाच सतत दिसेल अशी सोय केली पाहिजे.

निखिलला आईची कदर आहे हे दाखवण्यासाठी हा सगळा घाट घातला होता. उद्याही अरु संजनाला वॉर्न करणारे की अन्या काही बदलत नाही, भुलू नकोस.

संजना पडली तेव्हा मला वाटलं बहुचर्चित हनीमून फिस्कटला पण देवाक काळजी आणि संजनाने डोळे उघडले.

बहुचर्चित हनीमून फिस्कटला >>>>> बहुचर्चित युक्रेन-रशिया बोलणी फिस्कटल्यासारखा Happy Happy
मुळात जेवढा वेळ हे लोक हनिमून-हनिमून करताहेत तेवढ्या वेळात बेबीमूनची वेळ येते लोकांची....
आता वेळात वेळ काढून निदान लोणावळ्याला तरी जा म्हणावं. शिवनेरीची तिकिटे काढून देऊ का दोन?

आणि संजना चे कपडे केव्हा बदलले?
ती पडली तेव्हा पिवळ्या टी शर्ट मध्ये होती आणि नंतर पलंगावर एकदम छान लाइट ग्रे लखनवी कुर्ता ...!!
कोण करते असे? आपण आधी पेशन्ट ला झोपवू ना?

आई कुठे काय करते चं सध्याचं उत्तर - आई दुसर्‍यांच्या संसारात नाक खुपसते.

अभिषेकची नोकरी का गेली हे मला आज कळलं. संजना घराबाहेर पडली होती. बेशुद्ध झाली होती. अशावेळी तिला उचलून हॉस्पिटलमध्ये नेणं सोपं आणि योग्य होतं. पण ..................................... हॉस्पिटलचा सेट अप दाखवायला लागला असता. निर्मात्यांनी बजेट आखडतं घेतलं आहे, त्यामुळे नो हॉस्पिटल. अभिषेकची नोकरी जाण्याचं खरं कारण हे आहे. अरुंधती म्युझिक स्कूलमध्ये जात नाही कारण तो सेट परवडत नाही. कॉलेजात जात नाही कारण त्या जागेचं भाडं भरायला पैसे नाहीत. आता तर आशुतोषचं ऑफिसही गेलं.

डॉक्टर धन्य होता. सांगितलेली दोन वाक्ये म्हणून कधी पळून जातो असं त्याला झालं. होम व्हिजिट करायला आलेल्या डॉक्टरांना फी दिल्याचं कधी कोणत्या मालिकेत किंवा सिनेमात दाखवलं असेल तर ते सांगा. की धोबी, इस्त्रीवाला, मेड , दूधवाला यांच्याप्रमाणे डॉक्टरचे महिन्याचे पैसे देतात?
डॉक्टर यायच्या आधी संजनाच्या कपाळाला मालिकांत असते तशी स्टँडर्ड पट्टी होती. नंतर हाताला बँडेज आलं. पाच फुटावरून पडल्याने तिला फ्रॅक्चरही झालं असावं कारण अंग दुखतंय आणि एक्स रे काढायला सांगितला आहे. तरीही ती वॉकर घेऊन जिना उतरून खाली आली. आणि आपण नाच गाणी करूया असं म्हणू लागली. म्हणजे डोक्यावर परिणामही झालाय. एम आर आय करून घ्या.
घरात एवढी रिकामटेकडी माणसं असताना (घरातली सगळी माणसं रिकामटेकडी असताना) तिच्या जवळ मात्र कोणीही नाही.

अरुंधती हल्ली खूपच डोक्यात जातेय. त्यामुळे संजनाला लागलं याला माझ्या मते तीच जबाबदार आहे. ती त्यांच्या टीम मधून खेळणार होती. तर त्यांच्याजवळ उभं राहायचं. कोणी पडलं तर आधार द्यायचा, एवढं तरी करायला हवं होतं.
आता तर संजनाही तिची आरती ओवाळू लागली आहे.

अनिश लग्न करूनही काकाच्या घरी राहतोय. अरुंधतीने त्याच्या आईवडिलांसमोरच यांना दोन तीन महिन्यांत घराबाहेर काढते, असं म्हटलंय आणि हा संजनाच्या मुलाला तिथे राहायला यायचं आमंत्रण देतो.

सुलेखाताई हनिमूनला जाणार्‍या मुलाची आणि सुनेची गंमत करत असाव्यात असं वाटलं.

शॉर्ट कटच्या विरुद्धार्थी शब्द लाँग कट? ड्राइव्ह करणार अरुंधती आणि रस्ता सांगणार आशुतोष. तुमच्यासोबत असताना दोन तास काय दोन जन्म लागले तरी चालेल , असला संवाद लिहिणार्‍या लेखकाला गाडीच्या डिकीतून दोन तास प्रवास करायला लावला पाहिजे.

उद्याचा भाग नक्की बघा. उद्या ईशा नितीनला - तुम्ही कायम इथेच पडीक असता असं म्हणणार आहे. तिच्यासाठी एजोटाझापा.

ती पडली तेव्हा पिवळ्या टी शर्ट मध्ये होती आणि नंतर पलंगावर एकदम छान लाइट ग्रे लखनवी कुर्ता ...!!
कोण करते असे? आपण आधी पेशन्ट ला झोपवू ना? >>>>>>> अगदी अगदी बाकीचे लोक सुद्दा आरामात कपडे बदलून आले होते.

भरत... Biggrin
तो होम व्हिजिट ला आलेला डॉक्टर किती भंगार होता! अगदीच घाईघाईत दोन वाक्ये बोलून सुटला च ! फुकटात ही याच्या पेक्षा बरे लोक मिळू शकतात की....!!!
आणि अभिनेच का नाही तपासले?

सुलेखा ताई बहुतेक गंमत च करत असाव्यात....! म्हणजे I hope she does not mean it !!! Angry

जसे कोणी देशमूखांच्या घरात अरूंधती तू आज इथेच रहा म्हटले कि अशुतोष लगेच हो हो करायला लागतो तसे कोणी हनिमूनला (नाही फिरायला कारण अरू नेहमी फिरायलाच म्हणते) नंतर जा बोलले तर अरू लगेच हो हो करायला लागते.

<<<<तुमच्यासोबत असताना दोन तास काय दोन जन्म लागले तरी चालेल , असला संवाद लिहिणार्‍या लेखकाला गाडीच्या डिकीतून दोन तास प्रवास करायला लावला पाहिजे.>>>

एवढ्या नेच कुठे भागतय खुप हिशोब बाकी आहे अजून आजी, माजी लेखकांचा.

इनिश साखरपुडा पाल्हाळ सुरू होते तेव्हा माझे हॉट स्टार सबस्क्रिप्शन संपले, ते मी वैतागून परत सुरू केले नाही. जर स्टार प्रवाह ने युट्यूबवर तो इशा नितीन सीन टाकला तर नक्की बघीन.

बहुतेक नितीन इशा ला म्हणेल की इशा तु मला आज जो प्रश्न विचारला तो मी देखील कधी स्वतःला विचारला नाही. माझी बायको आय सी यु मध्ये होती तेव्हा ही मी इथेच पडीक होतो!

आणि अरुंधती काल नितीन ला म्हणत होती की
जसे काही वर्षा शिवाय तुम्हाला खूप करमते....!!!
काही.. Lol
करमतेच की त्याला....!!!

तुम्हाला असे नाही वाटत अरु चे पात्र आशूबरोबर एकांत, शारीरिक जवळीक अवॉइड करत आहे? काहीही फिक्टिशिअस कारन दाखवून दूर राहते किंवा त्याने काही जवळिकीचे प्रयत्न किंवा रोमान्स चे प्रयत्न केले की दूर जाते. गोंध ळते? खरे तर दुसरे लग्न इतक्या विचित्र रिलेशन शिप नंतर केले तर आधी ती दुसरी रिलेशन शिप छान एस्टा ब्लिश करायला हवी. फोकस तिथे हवा. पन ही इतर सर्व करते उत्साहाने. बाळाची गोकुळाश्ट् मी साजरी करणे हे फार महत्वाचे आहे का? त्याचे आइवडील करतील ना.

एवढ करुन त्या बाळाचा मोर मुकुट घातलेला नटलेला फोटो पण दाखवला नाय

आता पुढील भागा पासून ती दुसरी मुलगी तिचा पाठलाग रेप सुटका ह्यात आठवडा जाईलच. मग हे घरीच नेतील त्या मुलीला. ट्रिप वगैरे गेले कुठे तरी. आशू एक हॉटेल विकत घेइल किंवा बांधायला सुरू करेल बोरिवलीत.

तो अनिश केशवा माधवा म्हणताना वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाथी म्हणाला चक्क हाती न म्हणता. आणि एकदा नाही तर दोन्ही वेळा हाथी च. आणि काय रडत होता ... गायक म्हणून करिअर करायची म्हणतोय पण कठीण आहे त्याच.

तुम्हाला असे नाही वाटत अरु चे पात्र आशूबरोबर एकांत, शारीरिक जवळीक अवॉइड करत आहे? काहीही फिक्टिशिअस कारन दाखवून दूर राहते किंवा त्याने काही जवळिकीचे प्रयत्न किंवा रोमान्स चे प्रयत्न केले की दूर जाते. गोंध ळते? >>> अमा! तुमने मेरे मन की बात छिनली...अनुपमा याच्या ३-४ पट लाउड आहे पण तिच दुसर लन्ग, नात फार सुदर दाखवलय.

ती दुसरी मुलगी यशसाठी आणलेय का? भविष्यात देशमुखांच्या घरात फूट पाडण्यासाठी. अनुपमा मध्ये तसं आहे.

अमा..
एवढ करुन त्या बाळाचा मोर मुकुट घातलेला नटलेला फोटो पण दाखवला नाय..
हो ना...
Lol

<तुम्हाला असे नाही वाटत अरु चे पात्र आशूबरोबर एकांत, शारीरिक जवळीक अवॉइड करत आहे> ते आहेच. पण रोमेंटिक एक्स्प्रेशन्सही धड येत नाहीत. कालच्या भागातलं इश्श फ्लॅट होतं. कांचन यापेक्षा चांगलं लाजून दाखवते Lol

केळकरांचं घर नितीनसाठी देऊळ आहे आणि इथे तो रोज प्रसाद घ्यायला येतो. आता देशमुखांचं घर त्याच्यासाठी काय आहे तेही ठरवून टाका.

इशाने अगदीच पुणेरी प्रश्न विचारला, तुम्ही घरातूनच चहा घेउन आलात का?! आणि नितिन ने ब्रेफा काय आणला तर समोसे. निदान घरचे ढोकळे तरी आणायचे. वर्शाच्या ऑर्डरी असतील ना. मी पण कधी कधी ढोकळे खाते ब्रेफा. अरु गाडी चालवते सो ग्रेट.

अनुपमा थोडी पाहिली होती. त्यात अनुज व तिची केमिस्ट्री छान होती. अनुपमाचं सुरूवातीचं बिचकणंही स्वाभाविक वाटत होतं. यांचा तो लग्न ठरवायचा एपिसोड पाहिला तो इतका फ्लॅट होता. यांच्यापेक्षा ऑफिस कलीग्ज किंवा कॉलेज फ्रेंडसमधे जास्त चांगली केमिस्ट्री असते.

आशुतोष म्हणे..
आम्ही हनिमून ला जातोय...!
काही! कोण सांगते असे?

हो. तेच तर. आणि एकदा तिने सोहम नाव सांगितल्यावर परत परत तुझा होणारा नवरा असं कशाला म्हणायचं?

आशुतोष मात्र छान दाखवलाय रोमॅण्टिक. तो कारमधला सीन छान होता. अरु बोरिन्ग होती.

अनिष मात्र महाबोरिन्ग. एवढ नवीन नवीन लग्न झालय आणि हा गातोय काय तर केशवा माधवा. उगाच नाही ईशा चिडत ह्याच्यावर. जरा सुद्दा केमिस्ट्री नाही ह्यान्च्यात.

रटाळ झालीय सिरीयल रोमान्स च्या नावाने शून्य त्यापेक्षा झी च्या मालिका बऱ्या .नवा गडी नवं राज्य सिरीयलचा धागा आहे का?

आता त्या आरोही ची आणि यश ची लाईन लावतील. तिचा होणारा नवरा तिला accept करणार नाही , यशला गौरीने सोडलं आहेच त्यामुळे यश मोकळाच आहे.

मी बघतो नवा गडी नवं राज्य. अभिनय, संवाद, कथानक सगळं चांगलं आहे. मालवणीत थोड्याफार चुका करतात, पण तेवढं माफ.

साडेसातला झी मराठीवर "तू चाल पुढे" असते, ती आकुकाकच्या तुलनेत, आणि तशीही बरीच चांगली आहे. फक्त एका तासात १००+ उकडीचे मोदक दोन बायकांनी मिळून केले, तिथे चुकले.

Pages