Submitted by sonalisl on 8 August, 2023 - 08:18
आई कुठे काय करते!-२ वर प्रतिसाद संख्या २०००+ झाली. त्यामुळे पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तू चाल पुढे आईच्याच वळणाववर
तू चाल पुढे आईच्याच वळणाववर जाईल आताच तिला सुपरवूमन करतायत बिजनेस घर स्वयंपाक मुली समाजकार्य एकंदर तिची मसालेवाली राधिका करतायत.त्यापेक्षा नवा गडी जास्त चांगली आहे सोमवारपासून टाईम चेंज ,8 -30 ला लागणार आहे न्यू ट्विस्ट सह.कुणीतरी धागा काढा सिरियलचा
अनायासे गौरीचं लग्नही ठरलेलं
अनायासे गौरीचं लग्नही ठरलेलं आहे, आता यशोराही नक्की.
आरोहीला आश्रमातही सोडता येईल पण मग यश बरोबर जुळणार कसं ? इशाही सुधारेल बहुतेक आता. एका बाणात अनेक पक्षी
आता अमुक सण साजरा करा शी
आता अमुक सण साजरा करा अशी ऑर्डर सोडणे हे कांचनंचे काम.
आरोहीची मेडिकल कंडिशन झोके घेते. काल चालत घरी आली. मग आज कळलं की तिचं काही खरं नाही, म्हणून हॉस्पिटलमध्ये.
एका दिवसांत परत घरी.
आता गणपतीसाठी तिला समृद्धीवर आणतील.
पुढे आजी यांच्या लग्नाला विरोध करेल. हेसुद्धा तिचं ठरलेलं काम.
हो ना..यांचा अनायासे घरचाच
हो ना..यांचा अनायासे घरचाच आश्रम आहे!

अर्थात मग लांबण कशी लागणार म्हणा!
पण तीच लग्नच लावणं जरुरी आहे
पण तीच लग्नच लावणं जरुरी आहे का ???
पण तीच लग्नच लावणं जरुरी आहे
पण तीच लग्नच लावणं जरुरी आहे का ???>>> नाही. पण यशचं लग्न लावणं जरूरी आहे ना. अरूचा हनीमून टळला आणि यशला बायको मिळाली …लेखकाला हवे तसे झाले.
ही मालिका आता बघवत नाही. नवा गडी कुठे बघायला मिळेल?
नवा गडी कुठे बघायला मिळेल? >
नवा गडी कुठे बघायला मिळेल? >>>>>>> झीमवर. रमा परत येतेय.
ति़कडे अनुपमा मध्ये यशला मारुन टाकणार आहे. आरोही प्रेग्णट आहे तिकडे.
झी ५ वर असेल. सुरुवातीच्या
झी ५ वर असेल. सुरुवातीच्या भागांत अनिता दातेला सहन करावं लागले.
परत आणू नये तिला.
अरुंधतीला तिच्या सगळ्या सुना-
अरुंधतीला तिच्या सगळ्या सुना- जावई "अ / आ " आद्याक्षरापासून आणि तिच्या फॅन हवे. या निकषात गौरी आणि अंकिता बसत नाहीत म्हणून एकीला लंडन आणि दुसरीला US ला पाठवलं. आता यश ला जोडीदार म्हणून आरोही ( आ + फॅन ) दोन्ही परफेक्ट आहे. यश ला गुंडाळणे सोप्पे आहे, कांचन आणि अनिरुद्ध ला जरा उपदेशाचे ढोस पाजले कि यारोही जोडी तय्यार.

. सुरुवातीच्या भागांत अनिता
. सुरुवातीच्या भागांत अनिता दातेला सहन करावं लागले.
परत आणू नये तिला. >>>>>>>> ती येतेय परत. प्रोमो नाही पाहिला?
हो . मालिकेतच पाहिलं.
हो . मालिकेतच पाहिलं.
केळकरांचं घर पार्ल्याला आहे.
केळकरांचं घर पार्ल्याला आहे. बोरिवलीहून पार्ल्याला जाताना जंगल लागतं. गुंड पाळतीवर आहेत , घरापर्यंत पोचले आहेत, हे माहीत असून दोघीच रिक्षाने जातात.
आता यश त्या गुंडांना चाकू मारणार आहे का?
आरोहीला येऊन किती दिवस झाले? तिला यशचं गौरी प्रकरण सुद्धा माहीत आहे.
तेच तर....आशुतोष आणि नितीन ने
तेच तर....आशुतोष आणि नितीन ने यांना कार मध्ये नाही नेले?
त्यांना अर्जंट मीटिंग आली. ते
त्यांना अर्जंट मीटिंग आली. ते या दोघींना कार देत होते, पण दिवसा ढवळ्या कोण काय करतं - इति अरुंधती
बोरिवलीहून पार्ल्याला जाताना
बोरिवलीहून पार्ल्याला जाताना जंगल लागतं. >>
Possible routes
1 . Borivali national park --> mulund -- ghatkopar --> powai --> Andheri --> parle
2. Borivali ----> aarey via highway --> seepz --> parle
भरत...:-) ok.
भरत...:-) ok.
मी मिसलं ते मग....
३. बोरिवली --> घोडबंदर रोड --
३. बोरिवली --> घोडबंदर रोड --> ठाणे --> पवई --> अंधेरी --> पार्ले
असे नाही का गेले?
४. बोरिवली --> घोडबंदर रोड --> ठाणे --> पवई --> आरे --> गोरेगाव --> पार्ले
किंवा मग असे डब्बल जंगल दाखवता आले असते. तेवढीच गुंडांची सोय...
एवढे रूट घेऊन जर ते रोज
एवढे रूट घेऊन जर ते रोज प्रवास करत असतील तरी ते २ मिनिटात पोचतात कि इकडे तिकडे

किती ती माथेफोड त्यांच्या
मध्यंतरी एका सिरिअल मध्ये
मध्यंतरी एका सिरिअल मध्ये (नाव विसरले आहे सुरुची आडारकर आणि सुयश टिळक हीरो हिरोईन होते) ती मुलगी अंबरनाथ ला राहायची, तिथे सकाळी उठून सैपाk करुन विरारला जायची. तिथे ही पुन्हा सकाळचा सगळा सैपाक करायची आणि दहा ला बांद्र्याला ऑफिस ला पोचायची.
का ही ही दाखवत असतात.
आंबट गोड, तुम्ही पुण्यात
आंबट गोड, तुम्ही पुण्यात राहता ना? मग नाही कळणार.
बोरिवलीहून पार्ल्याला जायचे दोन्ही रस्ते भरपूर वाहतुकीचे आणि दोन्ही बाजूंना वस्ती असलेले आहेत.
जंगलातून जाणारा सुनसान रस्ता शोधतोय.
पुण्याचे लोक मुंबईत येऊन
पुण्याचे लोक मुंबईत येऊन मालिका लिहितात आणि बनवतात त्याचा परिणाम.. No offence to anyone here.
शुभांगी गोखले आणि आदिती सारंगधर घ्या एका मालिकेतही असंच होतं. नायिका अंबरनाथ हून मुंबईत यायची आणि फक्त एकदाच ट्रेनने प्रवास केला
(No subject)
आणि आशुतोष - नितीन ला अर्जंट मीटींग आली तर अरुंधतीलाही न्यायचे की मिटींग ला..... ती तर त्यांचा उजवा हात आहे न?
आता बहुतेक आरोहीलाही घेतीलच कंपनी मधे!
यश साठी जोडीदार आणायची तर स्टोरी इतकी फिरवून कशाला आणायची ?
तिकडे अनुपमा मधे तर ड्रामा मॅक्स चालू आहे!
आपण राकट देशा कणखर देशा - दगडांच्या देशातले मराठी लोक.... इतके भावनांचे चढ उतार सहन करु शकणार नाही!!
आरोहीने चाकू काढल्यावर
आरोहीने चाकू काढल्यावर अरुंधतीने हातातला दांडका फेकून दिला. ते या दोघींना संपवायची भाषा करतात आणि ही म्हणे कायदा हातात घेऊ नकोस.
नशीब एका गुंडाला तरी पकडलं.
एवढ्या वेळात तिथून दुसरं एकही वाहन गेलं नाही.
पुण्याचे लोक मुंबईत येऊन
पुण्याचे लोक मुंबईत येऊन मालिका लिहितात आणि बनवतात त्याचा परिणाम......
सध्याचा लेखक पुण्याचा आहे का?
जंगलातला प्रसंग अ आणि अ होता.
जंगलातला प्रसंग अ आणि अ होता. काय नसतं म्हणा. दोन बांबू रिक्षाच्या अगदी बाजूलाच पडले होते. रिक्षा चालक आत बहुतेक रील बघत बसला होता. दोन्ही बाजूने बाईक येऊन बराच वेळ झाला तरी या दोघी आश्चर्य दाखवत बसल्या होत्या, तेवढ्या वेळात फोन लावायचा यांना सुचलं नाही. अरु आई बहिणी आठवा म्हणून भाषण ठोकत होती. आरोही फोन लावतेय हे एकाही गुंडाने बघितलं नाही. तेही अरुबरोबर डिबेट करत होते. आरोहीने व्हॉइस मेसेज का आणि कसा पाठवला जर नेटवर्क नव्हतं. यशने आतापर्यंत सराईत गुन्हेगार व्हायला हवं होतं, जेलमध्येही ओळखी असतील त्याच्या. काहीतरी गंभीर घडलंय हे कळूनही फक्त घरातले दोन चार पेद्रट पुरुष तिथे जातात. बहुतेक यशच्या भरवशावर असतील.
आरोही देशमुख घरी आली तेव्हा लालभडक चेहरा होता, मग काही तासाने फक्त काही खरचटल्याच्या खुणा, बाकी चेहरा व्यवस्थित. यश फोन कुणाचा आहे हे न बघता खिशात ठेवतो, कामाचे फोन नाही येत का त्याला. अन्या संजनाला म्हणतो, मी तुला आणायला येईन, न्यायला येईन पाहिजे ना.
खरेच.
आणि अरुंधती त्या गुंडा ना लेक्चर देत होती तेव्हा ते ऐकत होते!!!!!! आणि आरोहि मागे मेसेज करत होती...!!!!
कैच्याकै!!
हा नवीन लेखक फारच chamya आहे!
केळकरांचं घर पार्ल्याला आहे.
केळकरांचं घर पार्ल्याला आहे. बोरिवलीहून पार्ल्याला जाताना जंगल लागतं. गुंड पाळतीवर आहेत , घरापर्यंत पोचले आहेत, हे माहीत असून दोघीच रिक्षाने जातात. >>>>>>>> अरुंधतीचा अती स्वाभिमान दुसर काय. ह्या अरु अश्विनीसारख्या बायका आपलच खर करतात. मलाच सगळ कळत अस वागतात. दुसर्यान्च कधीच ऐकुन घेत नाहीत मग ते त्यान्च्या भल्यासाठी का असेना. जाम हट्टी आहेत ह्या.
यश साठी जोडीदार आणायची तर स्टोरी इतकी फिरवून कशाला आणायची ? >>>>>>> हिन्दी मध्ये सुद्दा हेच होत.
तिकडे अनुपमा मधे तर ड्रामा मॅक्स चालू आहे! >>>>>>>> मेला का यश तिकडे?
इनफ ऑफ आरोही नाऊ!!
इनफ ऑफ आरोही नाऊ!!
यश अगदीच desperate वाटतोय.
यश अगदीच desperate वाटतोय. म्हातारीने काल काय भाषण झाडलं फिनिक्स वरून, मला इतकंच कळलं की अरु फिनिक्स पक्षापेक्षा महान आहे. कांचनला नवीन काम मिळालं विरोध करायचं, म्हणजे काम तेच फक्त माणूस नवीन.
Pages