Submitted by sonalisl on 8 August, 2023 - 08:18
आई कुठे काय करते!-२ वर प्रतिसाद संख्या २०००+ झाली. त्यामुळे पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फारेण्ड, पोलिस आणि हॉस्पिटलचा
फारेण्ड, पोलिस आणि हॉस्पिटलचा पॉइंट आहे. सारी कायनातच अनिरुद्धच्या विरोधात गेली आहे. तसं पोलिसांना नितीन मॅनेज करू शकतो. पण यात त्याचा हात नव्हता . अरुंधतीने एकहाती सामना फिरवला असं दाखवायचंय. तिनेह अनिरुद्धला घाबरवताना सगळं रेकॉर्ड केलं म्हणून यश तिला हॅट्स ऑफ म्हणतो. आता ती स्टुडियोत रेकॉर्डिस्ट म्हणून सुद्धा काम करून ऑस्कर मिळवेल.
अरुंधतीच्या कहाण्या - त्यासाठीच तर मालिका काढली आहे.
अनघा दोन दिवस नव्हती ना? त्यामुळे तिला सगळे डिटेल्स माहीत नसतील
दुसरीकडे संजना अरुंधतीच्या अपघाताशी आपला काहीही संबंध नाही, हे अनिरुद्धच्या डोक्यात हॅमर करत असते; पण त्याबद्दलचे काही डिटेल्स आले की लगेच बसलेली उठून त्याबद्दल आणखी प्रश्न विचारते. वर अरुंधती आता काही जगत नाही, असं सांगते.
तिने नवा श्रीमंत बॉयफ्रेंड शोधला आणि अनिरुद्धला डंप केलं असं का दाखवत नाहीत?
शेवटचा भाग वाया घालवला.
शेवटचा भाग वाया घालवला. अनिरुद्धने विबासं ठेवला, अरुंधतीचा कायम अपमान केला याची परिणती तिने घटस्फोट घेण्यात झाली. तरी आज तेच सगळं उगाळलं.
अनिरुद्धला घराबाहेर काढायचं कारण त्याने अप्पांना फसवलं आणि तो समृद्धीमध्ये त्याचा हिस्सा मागतो आहे हे आहे. त्याबद्दल काहीच नाही. घराचं व्हॅल्युएशन किती, त्यातला अनिरुद्धचा वाटा किती याचा हिशोब अरुंधतीने मनातल्या मनात तरी केला का? की तिला त्या बड्या बॅनरकडून जे पैसे मिळाले ते अनिरुद्धला देऊन टाकले? त्याच्याकडून मला हिस्सा मिळाला, आता मी हक्क सोडतो, असं लिहून घ्यायला नको ?
शेवटी नाही नाही म्हणत अरुंधतीने सूड उगवला. वर ती किती ग्रेट , तिला आणखी दोन फिल्म मिळाल्या हे उगाळायला विसरले नाहीत.
बथ्थड.
भोंगळ मालिकेचा भोंगळ शेवट.
वाईट शेवट.
वाईट शेवट.
त्यातला अनिरुद्धचा वाटा किती
त्यातला अनिरुद्धचा वाटा किती याचा हिशोब अरुंधतीने मनातल्या मनात तरी केला का? >>

त्याच्याकडून मला हिस्सा मिळाला, आता मी हक्क सोडतो, असं लिहून घ्यायला नको ?>>
हो ना..
शेवटचा भाग बघेन म्हणत होते पण
शेवटचा भाग बघेन म्हणत होते पण इथे वाचून, बघायला नकोच असं वाटलं.
सगळ्यांनी इथे भारी लिहिलंय, बरंच अजून वाचायचं आहे.
आदत से मजबूर. आई कुठे काय
आदत से मजबूर. आई कुठे काय करते संपल्यावर फेसबुकने आई बाबा रिटायर होत आहेत च्या क्लिप्स दाखवून दाखवून मालिका बघायला ओढून नेलं. पहिले तीन एपिसोड्स पाहिले. सगळं काही मागील मालिकेवरून पुढे चालू.
तिथे अरुंधती घरातली सगळी कामं करायची. इथे शुभा किल्लेदार (निवेदिता जोशी सराफ) करते. तिथे समृद्धी बंगला. इथे सार्थक . हे कधी रो हाउस असतं , कधी बंगला असतो. तिथे भोसले बिल्डर होता. इथेही आहे. तिथे भोसले बिल्डरचे पैसे लिटिगेशन मुळे अडकले. इथेही अडकलेत. पण इथे किल्लेदारांच्या मुलगा आणि सुनेने बिल्डरला पैसे दिलेत. शिवाय तिथे कोण त्याही रकमा सांगत नसत. इथे १५ लाख आहेत (मॅजिक फिगर). तिथे संजनाला टॉवरचे डोहाळे इथे सून सीमाला. आणखी एका बिल्डरचा डोळा या जागेवर आहे. आणि यांच्या शेजारचे प्लॉट त्या बिल्डरने घेतले आहेत. प्लॉट शोधायला बिल्डरचा पी ए फिरतो.
निवेदिता दोन्ही गालांत एकेक गुलाबजाम ठेवून गोग्गोड बोलते. सून संजना गुणिले ईशा इतकी कजाग आणि उद्धट, कांगावखोर आहे.
सासरा रिटायर झाला , म्हणून घरात पार्टी असते. तिथे सास र्याला केक भरवतानाच किती पैसे मिळाले ते विचारते. आणि त्याला किती पैसे मिळालेत हेही आपल्याला कळतं. लाखभर. अप्पांसारखी त्याला पेन्शन आहे का ते कळलं नाही.
सासूबाई सगळ्यांसमोर सगळं छान चाललंय असं दाखवण्यासाठी कायम सावरून आणि आवरून घ्यायच्या मोड मध्ये . सुनेला एकटी धरून समजावू बघतात. सून कायम इतकी वैतागलेली, चिडलेली असते की माझंच बीपी वाढेल की काय असं वाटतं. सून आणि मुलगा म्हणून निवडलेले अभिनेते वयाने जास्त वाटतत. सून आणि सासू दोघींचा चेहरा सारखाच खस्ता खाल्लेला. म्हणून डोकं शांतं ठेवावं, ध्यान , मेडिटेशन करावं. मुलाला डबल चिन. हा ऑफिसमध्ये जीन्समध्ये जातो, शर्ट इन करत नाही. दोघे ओला उबर करून ऑफिसला जातात.
तिकडे अप्पा कांचनला आणखी एक मुलगा आहे हे काही शे एपिसोड्सनंतर ठरलं होतं. इथे चौथ्या एपिसोड्समध्येच तो येतोय.
तिकडे अरुंधती आणि आशुबाळाला एकमेकांवरच्या प्रेमाचा इजहार करायला भाग पाडण्यासा ठी सारखे कोणाच्या न कोणाच्या जिवावर उठायचे. कधी सुलेखा, नितीनची बायको तर कायम लटकतच असायची, कधी चक्क आशुतोष स्वतः. इथे यांच्या जवळच्या शेजारीण कम कौटुंबिक मैत्रिणीला ब्रेन हॅमरेज करून व्हेंटिलेटरवर ठेवलंय. तिची सोबत मिळाली पण सहवास नाही म्हणून नवरा हळहळतोय.
कशासाठी? तर बाबासोबतच आईनेही रिटायर व्हावं आणि दोघांनी आपलं असं आयुष्य एकत्र जगावं असं नवरोबांचं स्वप्न आहे. पण बायको अरुंधती मोडमध्ये. मी उठले नाही, तर सूर्य उगवणार नाही.
भरत..
भरत..
कशाला आपणहून डोकेदुखी ओढवून घेता?
तो मुलगा व सून मीही पाहिले...पहिल्याच एपिसोड मध्ये.
अगदीच बेकार कास्टिंग!!!
फक्त छोटी नात गोड आहे.
सगळे बजेट निवेदिता वरच खर्च केल्याने बाकीचे कलाकार अगदीच सुमार निवडले आहेत.
भरत तुमच्या सहनशक्तीची कमाल
भरत तुमच्या सहनशक्तीची कमाल आहे, हाहाहा.
एक प्रोमो पाहिलेला त्यावरून मुलगा हरिश दुधाडे आहे, हा पूर्वी मला आवडायचा, माझे मन तुझे झाले मध्ये. अभिनयही आवडलेला (डोळे छान आहेत). तुमची मुलगी काय करतेमध्ये एवढा आवडला नव्हता. तुमची मुलगीमध्ये मधुरा वेलणकर, आशुतोष कुलकर्णी फार आवडलेले, नंतर बिग बॉस मुळे ती मालिका सोडून दिलेली.
भरतजी , तुम्ही धागा काढा व हि
भरतजी , तुम्ही धागा काढा व हि पोस्ट प्रस्तावनेत टाका ... सुरु करूया पिसे काढायला .
फेसबुकने आई बाबा रिटायर होत
फेसबुकने आई बाबा रिटायर होत आहेत च्या क्लिप्स दाखवून दाखवून मालिका बघायला ओढून नेलं.
अगं अगं म्हशी मला कुठे नेशी...!!!
आणि फक्त लाखभर रुपये मिळाले रिटायर झाल्यानंतर?
तुषार दळवी व हषर्दा
तुषार दळवी व हषर्दा खानविलकरची अशीच एक सिरियल आलीये. ती कुठली?
लक्ष्मी निवास
लक्ष्मी निवास
ती लक्ष्मी निवास झाली का सुरु
ती लक्ष्मी निवास झाली का सुरु. ती झी वर येणार आहे. हर्षदा खूप दिवसांनी पॉझिटीव्ह कॅरॅक्टर करतेय. खरंतर जोडी तुषार दळवी आणि निवेदिताची छान दिसली असती. कलर्सवर होते बहुतेक एकत्र. मंगेश कदम आणि हर्षदाची शोभली असती.
मी मुद्दाम ग्रॅच्युइटीचा नियम
मी मुद्दाम ग्रॅच्युइटीचा नियम शोधला. नोकरी केलेल्या प्रत्येक वर्षासाठी १५ दिवसांचा पगार- कमाल रु. १० लाख. आज पाहि लेल्या भागात ३६ वर्षे नोकरी केली असं आलं. फेअरवेल व्हायचं आहे. शेवटच्या दिवशी नाही झालं.
समजा पन्नास हजार पगार असेल २५००० गुणिले ३६ = ९००००० ग्रॅच्युइटी भरेल. पी एफ वेगळा. किंवा कम्युट केलेली पेन्शन.
जर यांना ३६ वर्षांसाठी लाखभर पैसे मिळाले आणि ते ग्रॅच्युइटीचे असतील तर पगार साडेपाच हजार भरेल.
एका भागात सुनेने चिडून हेअर ड्रायर फेकला. तो जमिनीवर पडतो न पडतो तोच सासरे आले. हे रात्रभर हॉस्पिटलमध्ये मित्र कम शेजार्याला सोबत म्हणून थांबले होते . तर गुलाबजाम सासूने सावरून घेण्यासाठी सांगितलं की सूनबाई सोसायटीच्या नाटकात भाग घेताहेत. त्याची प्रॅक्टिक्स करताना तिने हेअर ड्रायर फेकला. चांगला अभिनय करते ना ती? आणि सुनेला, अगं तू खरंच फेकलास हेअर ड्रायर?
ही सारवासारवी झाल्यावर , सून आतल्या खोलीत गेल्यावर, हवा काय छान पडलीय म्हणावं तसं सहज त्या अमुक वहिनी कशा आहेत? वगैरे.
कथा चिन्मय मांडलेकर. संवाद स्वरा मोकाशी - हरवलेल्या पत्त्यांचा बंगलाची लेखिका. तिची ही पहिलीच मालिका आहे.
मराठी मालिकेत मध्यमवर्गीय कुटुंब आणि बंगला असला की रिडेव्हलपमेंट आणि त्यामुळे ट्रॉमा हा नियम झाला आहे का? प्रपंचचा शेवट असाच झाला होता. जुळून येती रेशिमगाठी मध्ये नानांनी रिडेव्हलपमेंटला हो म्हटल्यावर माईला ताप आला आणि मुलाने , नाही करणार हं आपण रिडेव्हलपेंट असं सांगितल्यावर उतरला. आई कुठे मध्ये तर मारहाण - खुनाचा प्रयत्न इथवर गेलं.
सून संजना गुणिले ईशा इतकी
सून संजना गुणिले ईशा इतकी कजाग आणि उद्धट, कांगावखोर आहे. >>>
मराठी मालिकांच्या कल्पनाशक्तीचा विस्तार प्रचंड होत चाललाय. आधी फक्त किचन पॉलिटिक्स होते. आता बोटी उडवणे, खुनाचे प्रयत्न, कृषि उत्पन्न बाजार समितीत अफरातफर वगैरे पर्यंत आलेत.
विविध मालिकांमधले खुनाचे प्रयत्न यावर वेगळा विनोदी धागा निघेल इतके ते हास्यास्पद आहेत
आता मी हॉटस्टारवर जाऊन आई
आता मी हॉटस्टारवर जाऊन आई बाबा रिटायर होत आहेत पाहत नाही. फेसबुकवर तीन चार मिनिटांच्या क्लिप्स दिसतात, त्या बघतो. तर या किल्लेदारांच्या घरी एके रात्री चोर शिरला. सून रात्री पाणी प्यायला किचनमध्ये गेली तर फ्रीजच्या बाजूला चोर. मग तिचा आरडाओरडा. घरातले सगळे आपापल्या खोल्यांतून धावत तिथे आले ( आपण पळून जावं असा विचारसुद्धा चोराच्या मनात आला नाही) पुरुषांनी चोराला बडवा घेतलं . पण मदर शुभाने त्यांना थांबवून चोराची मुलाखत घ्यायला सुरुवात केली. चोर तीन दिवसांचा उपाशी होता आणि काही खायला मिळतंय का हे बघत होता.
आता साधारण असाच प्रसंग आई कुठे काय करते मध्ये होऊन गेला होता. फेसबुकवर सुद्धा कोणीतरी हे लिहिलं आहे.
म्हणजे जुनीच मालिका माणसं बदलून आली आहे.
आई आणि बाबा रिटायर होत आहेत,
आई आणि बाबा रिटायर होत आहेत, ही मालिका पुन्हा पाहायला लागलो आहे. जुने नाही, सध्याचेच भाग.
ही मालिका म्हणजे आई कुठे काय करतेचं भूत आहे.
इथे शेवट बंगला पाडून टॉवर, त्यासाठी लांडालबाड्या असा झाला. या मालिकेची सुरुवातच त्यातून झाली. तिथे अप्पांना दोन मुलगे एक मुलगी. इथेही तेच. तिथे मोठा मुलगा बंगल्याच्या मागे. मुलगीही काही काळ त्याच्या नादाला लागली. इथे धाकटा मुलगा आणि मुलगी.
तिथे मोठ्या मुलाला नोकरी नव्हती. इथेही नाही. धाकटा मुलगा चक्क त्या बिल्डरकडेच नोकरीला लागला. अमेरिकेला जाणार होता, त्यात ट्रंपने अडथळा आणला बहुतेक, तिथे अविनाशची भूमिका करणारा नट नाटकात बिझी झाल्याने ते पात्र गायब केलं. इथे आदिश वैद्यने भूमिका सोडली आणि नवीनच कोणी अभिनेता आलाय. त्याच्या चष्म्यामुळे न- अभिनयाकडे लक्ष जाणार नाही, असा निर्मात्यांचा अंदाज फसला आहे.
बिल्डर आधी पुरुष होता. त्याच्या जागी त्याची आई आली आहे. ही अभिनेत्री नवी आहे. पौराणिक कम ऐतिहासिक मालिकेतला अभिनय करते.
शिवाय इथल्या आईची एक भाची आणि नणंद ( संजीवनी जाधव) याही यांच्या घरी मुक्कामाला आहेत.
त्या मालिकेत कुटुंबात माणसं वाढली की घरातल्या खोल्या आपोआप वाढत. इथे यांच्या घराला पंपहाउस वाढलं. ते एवढं मोठं आहे की त्यात यांनी क्लाउस किचन थाटलं. अरुंधतीच्या रेस्टॉरंटच्या वेळी केलेला अभ्यास वापरून FSSAI वगैरे शब्द वापरले.
तिथे अनिरुद्ध संजनाने बिल्डरकडून पैसे घेतले. इथे धाकट्या मुलाने वडिलांची खोटी सही करून गावचं घर बिल्डरला विकलं. मुंबईत टॉवर बांधणारा बिल्डर तिथे काय करणार, हे विचारायचं नाही.
ज्यासाठी हा धागा उकरून काढावा लागला ती खरी गंमत आता सांगतो.
तिथे अरुंधतीने अनिरुद्धचा हिस्सा देण्यासाठी पाककला स्पर्धेत भाग घेतला. इथे बिल्डर कडून घेतलेले पैसे परत करायला आई - आज डब्ब्यात काय - या पाककला स्पर्धेत भाग घेते.
निवेदिता जोशींनी काल वांग बटाट्याची भाजी आणि चपात्या असा नवर्याला आवडणारा डबा तयार केला.
तिथे सुरुंग लावायला संजना स्वतः स्पर्धेत होती. इथे सून आणि नणंद घरूनच अडथळे आणतात. सुनेची आई सासूला पाड अशी कल्पना देते. सून दुसरे पर्याय निवडते. तिने या आधी त्या पंपहाउसला आग लावून झाले आहे.
शेवग्याच्या शेंगा ही जुनी कथा आणि चित्रपट या मालिकेत कांद्याचं थालिपीठ होऊन आले .
Pages