आई कुठे काय करते!-३

Submitted by sonalisl on 8 August, 2023 - 08:18

आई कुठे काय करते!-२ वर प्रतिसाद संख्या २०००+ झाली. त्यामुळे पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरुंधती चा प्राॅब्लेम ओव्हर पॅरेंटिंग नाहीये तर 'सतत सोडवायला कुठलीतरी समस्या हवी असणे' हा आहे:). आशुतोष ने तिच्याशी लग्न केले कारण समस्या सोडवणे हा त्याचाही छंद आहे.
बरीच वर्षे इशा कडे सपशेल दुर्लक्ष करुन आणि त्या साठी ती लहान आहे हे कारण पुढे करून आता अचानक तिला इशा ला वळण लावण्याची इच्छा झाली. मध्यंतरी यश, गौरी च्या वियोगात पार आत्महत्या करण्यापर्यंत गेला तर हिला त्याची खबरच नव्हती पण तेच त्या कामत मुलाला शोधून काढुन शिक्षा करण्याच्या वेळी हिनेच त्याला ऍम्बुश करुन पकडून दिला. तेच अभिच्या बाबतीत त्यांची ती पहिली गर्लफ्रेंड त्याच्यासाठी योग्य नाही हे दिसत असताना ही तिच्या साठी लग्नाची अंगठी बनवण्यात बिझी होती मग डायरेक्ट अनघा समोर अभिचा पर्दाफाश! मोघे काकांच्या बाबतीत तेच, केदारच्या बाबतीत तेच, संजना च्या बाबतीत ही तेच.
एवढं करुन स्वतः च्या आयुष्यातल्या सोडवण्यायोग्य समस्यांचा ह्या बाईला पुर्ण विसर पडला आहे. स्वतःचे राहिलेलं शिक्षण पूर्ण करणे, आईच्या दुखणार्या गुडघ्यांवर उपचार करुन घेणे, आश्रमातील मैत्रीणिंना भावनिक आधार देणे ह्या सगळ्यांवर हिने स्वतः वेळीअवेळी जी भाषण दिली होती तीच तिला सकाळ, दुपार आणि संध्याकाळ ऐकवली पाहिजेत!

पर्णीका ... Lol
ऍम्बुश ! Biggrin

अगं.... अरुंधती हे एक कॅरेक्टर आहे. खरी बाई नाही... !!
किती वैतागशील!!
आई- भावाचे तर नाव काढत नाही... आणि ती धुमकेतू मैत्रीण कुठे उलथलीए कोण जाणे!
अनीश चे कमाईचे साधन काय?
आणि खरेच..आशु किती बावळट दिसतो, बोलतो, वागतो!
कुठल्याच अँगल ने अजिबात प्रथितयश उद्योजक वाटत नाही !

पर्णीका+१
बाकी सध्या लेखक बदलल्याने नुसते यव त्यव डोस चालु असतात...फार बोअर होतय, कान्चन-आप्पाचा रोमान्स तर कहर होता .कटाळुन मी बन्दच केल बघायच...
हास्यजत्रा यापेक्षा कैक पटिने बघणेबल वाटते.

आणि आशू किती कृत्रिम , एका दमात, नाटकी भाषेत, पाठ केल्यासारखे डायलॉग बोलतो ...
भरपूर समस्या, मग अरू ने त्या सोडवणे आणि सगळ्यांच्या नजरेत वर जाणे, या सम ही अरूच दुसर कोणी नाही अशी एकंदर सिरीयल ची थीम आहे. एका मागोमाग एक प्रॉब्लेम क्रिएट करायचे , दोन पार्ट्या पाडून वाद घालायचा आणि शेवटी अरुला जिंकवायच हे ध्येय आहे सिरियलच. त्यासाठी मग ओढून ताणून काही ही दाखवायचं...

अरुंधती केदारला टॉर्चर करत होती. आशुतोष - ओंकार गोवर्धनने केदार- आशिष कुलकर्णीकडून अभिनय शिकावा.

आशुबाळाने मेहेंदी - हळद समारंभाला सोनेरी काड्यांचा चष्मा लावला होता. आता पुन्हा काळी फ्रेम आली.

आजच्या एपिसोडमधला सगळ्यात मस्त भाग विशाखाने कांचनला सुनावण्याचा.

अनघाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका यायला ठेवले आहे का? लेखकाने मोजून ठेवायला हवे आतापर्यंत कितीवेळा ॲटॅक आलाय ते.

हो ना, अनघा एकाच कारणाने गायब होऊ शकते.

मुलांचे झाले आता अरुची नणंद्,मग दीर, असं करत आशु बाळ सगळा वेळ देश्मुखांचे प्रॉब्लेम्स सोडवत बसेल आणि त्याचा बिझनेस डुबेल, मग अरु चमत्कार करुन तो वर आणेल.

लग्नाची खरेदी साधारणपणे १-२ दिवस आधी करतात. कांचीने इतक्या सहज सांगितलं अरुला सुलेखासाठी साडी आणायला जणू दूध आणायचं आहे.

अनिशच्या आई बाबांचा पर डे परवडेल का हे अजून नक्की नाही. १००० भाग झाले किंवा होऊ घातले आहेत.

अनघाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका यायला ठेवले आहे का?
Biggrin
हो ना..बिचारे! अगदीच तोळामासा झालीय त्यांची तब्येत !!! Happy
अनघा गायब होणार आता म्हणजे.
विशाखा ओठांची विचित्र हालचाल करत बोलते. असिंक्रोनस वाटते ते!!!
मनिमोहोर. >>

ओह १०८६ झाले का, कुठेतरी वाचलं १०००.

ही मालिका चार दिवस सासूचे चा विक्रम मोडणार की काय

किती ते अलंकारिक संवाद! माझा जीव घेतलास, आता प्रेताची माफी मागणार का? आधीची जखम भरायच्या आधीच नवी जखम.

केदारचं मतपरिवर्तन कसं केलं /झालं ते दाखवलंच नाही. अनिशने सांगितलं प्रेमात पळायचं नसतं, लढायचं नसतं आणि याचे डोळे उघडले. खरं तर

अनिरुद्धला यात मध्ये पडता यावं म्हणून विशाखा केदारलाच इथे राहायची अट घालते. आणि तिची ती मुलगी सुद्धा इथेच आहे. पण नितीनच्या बायकोसारखी अदृश्य आहे. केदारला आईवडील कधीच नव्हते का?

विशाखा वाक्ताडन आणि केदार परिमार्जन संवादांच्या वेळी सगळ्यांच्या रिअ‍ॅक्शन्स दाखवत होते तेव्हा अरुंधतीच्या चेहर्‍यावर नेहमीप्रमाणे काहीतरी विचित्र भाव होते. संवादांशिवायचा अभिनय तिला अजिबात जमत नाही. त्यामानाने संजनाच्या रिअ‍ॅक्शन्स योग्य होत्या. अरुंधतीचा मुद्राभिनयसुद्धा आशुतोषच्या तोडीस तोड आहे Lol

भरत.. Lol
विशाखा वाक्ताडन आणि केदार परिमार्जन!!
जुन्या मराठी कादंबऱ्यांमधील प्रकरणाचे नाव वाटते!!!

अरुंधती चा तेलकट मेकप आणि पांढरी साडी! विचित्र जाड रंगविलेले ओठ, चेहऱ्यावर गोंधळल्याचे भाव! सगळेच ऑड !
केदार ला परत आणल्याचे विशाखा ला अजिबातच आवडलेले दिसले नाही.
आणि मिनू कधीच दाखवत नाहीत......
केदार ला वाया घालवत आहेत.....!!!!!

केदारला आईवडील कधीच नव्हते का? >> होते ना कांचन भेटायला गेलीय त्यांना असा संवाद होता एकदा पण एवढं कुठल लक्षात लेखकाच्या ?
मीनू वर्षा , जिगर कायम अदृश्य

केदार ची आई आहे असे पूर्वी ऐकलेले. ओनिली विमल फेसबुकवर रंगील्या छब्या टाकत असते. फ्राकी घालून.
ही सर्व सिचुएशान बळंच आहे. आता तर अनीश पण रुसून बसला. गाडीतुन खाली उतरणार नाही म्हणे. तिकडे इशा नटुन थटून रेड्डी बसलेलीच आहे. आत ही काय अवदसा!!! उरका एकदाचे लग्न. अप्पा परत अन्याला ज्ञान देत आहेत. तो उद्या कन्यादान करेलच.

केदार, अनीश, अनीशचे आईवडील, अनिरुद्ध यांनी भरपूर भाव आणि फूटेज खाल्ले. केदारचं खाणं अदृश्य होतं. त्याला कुठेही जायचं नव्हतं, म्हणूनच तो अरुंधतीला भेटायला गेला आणि मग अगं अगं म्हशी करत विशाखाकडे. हा तिला सोडून जात होता आणि विशाखाला म्हणाला - तू़ मला तुझ्या आयुष्यातून बेदखल करू नकोस.

अनीशचे आईवडील येत नाहीत म्हटल्यावर इंदूरला जाऊन त्यांच्यासमोर तिसर्‍यांदा लग्न लावायची संधी होती.

हे दोघे बंगल्याच्या पायर्‍यांपाशी येऊन बोलेपर्यंत कोणालाही दिसले नाहीत.
ज्या माहेरच्या लोकांना विशाखा आपल्या नवर्‍याची नोकरी सुटली आहे, त्याल दारूचं व्यसन लागलं आणि तो तिला सोडून चालला आहे, हे सांगू शकली नाही, त्या लोकांचा तिला आता आधार वाटू लागला. आणि तो घटस्फोट देणार होता तर कोर्ट प्रोसीडिंग्ज व्हिडियो कॉन्फरन्सने होणार होते का? याआधी अप्पा- कांचन तिला कधी विशू म्हणाल्याचं आठवत नाही. तिच्यावर संकट आल्यावर तिचं नाव मोठं वाटू लागलं.

आईवडील आपला फोन घेत नाहीत, आपल्याशी बोलत नाहीत, म्हटल्यावर एखादा मुलगा त्यांना तडक भेटायला गेला असता. हेच केदारच्या बाबत अरुंधतीने करायला हवं होतं. पण दोघे गप बसून राहिले. अनीशची आई अरुंधतीला आपण बहिणी, मैत्रिणी असं म्हणाली ' पण अरुंधती तिच्याशी लग्नाबद्दल काही बोलली आहे, असं दाखवलं नाही.

आशुतोषने लग्नात पुन्हा सोनेरी काड्यांचा चष्मा घातला.

अनीशचे आईवडील आले नसते तर आशुतोष आणि अरुंधती यांना वर आणि वधू दोघांच्या मातापित्यांची कामं करावी लागली असती. वराप्रमाणे वरमाईचेही पाय धुतात का?

वडील कन्यादान करत नाहीत म्हटल्यावर ईशाला अचानक दान हा शब्द खटकला?

तिच्यासाठी शॉकर म्हणून अनीशच्या आईवडिलांनी त्याला प्रॉपर्टी देणार नाही म्हणून सांगितलंय. त्यांच्याकडे पाहून प्रॉपर्टी फार काही असेल असं वाटत नाही. जसं आशुतोषचं बिझिनेस एम्पायर एकटा नितीन , तेही पार्ट टाइम , म्हणजे यांच्या आणि याच्या बायकोच्या आधीच्या सासरी टाइम्पास करत सांभाळतो तसंच काही असेल.

फॉर अ चेंज मिलिंद गवळीला आरडा ओरडा न करायचा एक एपिसोड मिळाला.

भाटेबाई आणि जांबोटकर बाई ऐन लग्नाच्या वेळी आजारी पडल्या का? भाटेबाईंसाठी आश्रमातल्या मुलीला पळवून लावलं.

इतक्या सगळ्या थापा रचण्यापेक्षा मालिका आवरती घ्या.

वडिलांनी कन्यादान केलेलं चाललं ईशाला. देऊन टाकली एकदाची, नो रिटर्न पोलिसी पण ठेवायला हवी होती. अंघा, तिचे आईवडील, अविनाश, विमल, शेखर, दोन्ही आज्या, निखिल असे बरेच लोक नव्हते.

Ok ok.. Happy

पूर्ण लग्न आधी शूट करून नंतर नुसत्या एकेकाच्या रिअॅक्शन्स शूट करतात..खूप विचित्र वाटतं. अरू ची साडी, संजना चा ब्लाऊस अजिबात आवडला नाही.

कन्यादान कन्यादान कन्यादान ...किती ते महत्व कन्यादानाला ...ऐकून ही वीट आला.
शेवटी आज एकदाची अन्या नी बदलली पार्टी आणि आला मेन स्ट्रीम मध्ये.

अचानक अन्याला उपरती झाली, केदार सुधारला, सगळीकडे आनंदीआनंद नांदला तोच इशाने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली.

अनिशचे आई-बाबा एका दिवसात परत घरी, इला भाटे गायब. नितिनची बायको तर नावालाच आहे मालिकेत. आता पिसं काढायलाही बघावीशी वाटत नाही मालिका.

अगदी मामे बहिणीच्या लग्नात ही मीनू दिसली नाही.
आणि कांचन परवा म्हणली अनिश चे आई बाबा आले नाहीत तर एवढे पाव्हणे आलेत त्यांना काय सांगायचं ? प्रत्यक्षात अनेक घरची मंडळी नव्हती फक्त ईशाच्या दोन मैत्रिणी दिसल्या आलेल्या.

पिसं काढायलाही बघावीशी वाटत नाही मालिका. >> अगदी अगदी

एकामागोमाग एक तीन पिढ्यांचा रोमान्स.

नितीन आज पुन्हा सकाळीच केळकरांकडे हजर. भाटेबाई गायब.

अनिशने मी आता कॉलेजात जातो असं म्हटल्यावरसुद्धा अरुंधतीला आपणही त्याच कॉलेजला जात होतो आणि लग्नासाठी म्हणून कॉलेजला दांड्या मारल्या त्या अजूनही मारतोच आहोत, हे अजिबात आठवलं नाही. आशुतोषने म्युझिक् स्कूलचं नाव काढल्यावर हे आपण चालवतो हेही तिला आठवलं नाही. ती ऑफिसात नक्की काय करते हे कधी दाखवलं नाही. तसं आशुतोष आणि नितीनतरी काय करतात ऑफिस?

आता ईशाला हनीमूनला जावंसं वाटेल तर अरुंधती आणि आशुतोष जातील की काय?

इशा अनिशच्या ग्रुहप्रवेशानतर इशा जेव्हा अनिशच्या आइ-बाबाचि माफी मागते त्यावर त्यानी काही बोलायच्या आधिच अरुच आता मागच सगळ विसरा टाइप इमोशनल सुरु करते....कुठल्ही स्कोरिन्ग वाक्य, ग्यान मुख्य पात्रानेच वाटल पाहिजे ...असा काहितरी अजब आग्रह असतो मालिकावाल्याचा..

ईशाने राखी प्रकरणात अरुंधतीचा सगळ्यांसमोर केलेला अपमान मला खूप आवडला. She deserved every bit of it.
तिने ईशाचा घरातले सगळे + बाहेरचा नितीन + डिलिव्हरी पर्सन यांच्यासमोर अपमान केला.
बरं, ही स्वतः सुद्धा घरात बसूनच आहे. स्वतःचं लग्न करायच्या वेळपासून कसलीही कामं करत नाहीए. आणि नको नको म्हणत नवरा, सासू यांच्याकडून महागड्या वस्तू घेते आहे की. मग ईशाने केलं तर काय बिघडलं? आता तर केदारकडून राखीसाठी सोन्याच्या बांगड्या घेतल्या.
मुळात तिने तिच्या सख्ख्या भावाला राखी बांधायला आणि आजारी आईला भेटायला डोंबिवलीला जायला हवं होतं. तर भावाला इथे बोलवून त्याच्याकडे मस्त दुर्लक्ष केलं.

केदारने तिला लिटरली देव्हार्‍यात बसवलं आहे. पण त्याला थांबवण्यासाठी हिने स्वतः काहीच पाऊल उचललं नव्हतं.

अनिरुद्धला अपमान करण्यासाठी नवा बकरा हवा म्हणून विशाखाने केदारला इथे जबरदस्ती ठेवून घेतलं आहे?

केदार विशाखा दोघे इथे आहेत तर मिनू कुठे आहे?

संजना पहिल्यापासून नोकरी करायची ना? मग शाळेतून येणार्‍या मुलाची वाट बघत घरी कधी असायची?

महामाता अरुंधतीची तीनही मुलं डिफेक्टिव्ह निघाली तर संजनाचा मुलगा बराच गुणी , लाघवी आणि समजूतदार आहे.

Pages