Submitted by sonalisl on 8 August, 2023 - 08:18
आई कुठे काय करते!-२ वर प्रतिसाद संख्या २०००+ झाली. त्यामुळे पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घरातल्या शेंडेफळाचे लग्न
घरातल्या शेंडेफळाचे लग्न म्हणत दोन दिवसात जोरदार तयारी करत घरातच लग्न लावणार आहेत. त्यात अरूला ईशाला आता वळण लावायचे आहे. तिला पुढे त्रास होईल म्हणून अरू आतापासूनच तिला त्रास देऊ लागली आहे.
<तिला पुढे त्रास होईल म्हणून
<तिला पुढे त्रास होईल म्हणून अरू आतापासूनच तिला त्रास देऊ लागली आहे.>
शुभ प्रभातः आज घरात पूजा
शुभ प्रभातः आज घरात पूजा आहे समृद्धि मध्ये. पहिली दहा मिनिटे अभी अनघा रोमान्स. अनघा लाल नौवारी शिवलेली साडी नेसली आहे. अभी यलो कुरत्ता जो अनघाने आणला आहे म्हणून त्याचे फिटिन्ग एकदम परफेक्ट आहे. मग अभी तो जुना पुराणा वरचे ब टण लावुन दे हा नुस्ख्या वापर तो व तिच्या जवळ जायचे प्रयत्न करत आहे हात धरत आहे. अनघाने एक चीप सेट घातला आहे. गळ्यातील ठुशी उलटी घातली आहे असे वाट्ते. अंबाडा घालून वेल घातले आहेत. हिरवा शेला लाल साडी मग हात धरणॅ इतकेच होउन हे खाली म्हातारीने बोलवले आहे तिथे जातात पण अजून पोहोचले नाहीत. जिना पुसून घ्यायला झाला आहे.
खाली गुरुजी पण इशा अनीशला पुजेला बसवा म्हण तात. पण कांचन नो मीन्स नो. संजनाने प्रसादाचा शिरा बनवला आहे. व विशाखा आलेली आहे अनेक सबबी देत आहे. आरु आशू व सुधीर आले आहेत. अरु ने मस्त निळी साडी नेसली आहे. पण आल्या आल्या लगेच चहा करायला धावते पदर खोचुन पण विशाखा तिला बसवते. गुलाम गिरी अंगातच मुरलेली आहे. इशा अनीश पण आलेले आहेत. मस्त कपडे
आजोबा अन्याला गप कर त आहेत पण तो बड बड करतच् आहे. इशाला बा पा कडून लग्ना चे पैसे हवे आहेत म्हणून गोड बोलत आहे.
अप्पा मुले म्हणजे फुलपाखरे असे बडबडत आहे. पुजा सुरू झाल्याने कांचन पुजेला कोण बसेल ह्यावर ऑलिंपिक्स स्पर्धा घेत आहे व अभी अनघा ना बसवते. अरु हाताने बसवते जोडप्ल्याला. उगीच शब्दाने शब्द नको म्हणून. खंग्री म्यान फॉर्मात येउन डबे बडवत आहे. दोन प्लेट प्रसादाचा शिरा चापायचा आहे मेल्याला.
इशा रागवून बाहेर जाते व अनीश सम जावुन सांगायच्या मोड मध्ये आहे. ही फारच भडकलेली आहे. वाद भडकत आहे. हिला हिचा बेसिक मान हवा आहे. विशाखा आत घेउन जायला येते. पण इशा आईवर घसरलेली आहे आता. विशाखाचे दागिने भाड्याने आणलेले दिसतात. ही पन संस्कारी जिलब्या वाढत आहे .
हे गुरुजी दुसरेच आले आहेत. कांच्यन च्या चेह र्या वर संस्कृती थापून बसवलेली आहे. आता बासरी मॅन शिरा घ्यायला आलेला आहे.
गुरुजी हाताला हात लावा सां गतात मग अनघा हात लावते. आता सर्व हात जोडून कथा ऐकत आहेत. सर्व कथा ऐकवणार कि कॉ य.
आज काल काही खरे नाही.
पुढील भागात सेन्शेशनल खुलासा की केदार विशाखा डिवोर्स होणार आहे. !!! पुजा करुन काय उपयोग नाय. समृद्धी मधे वास्तु दो श आहे. घर पाडून नवे बांधले पाहिजे.
&……अमा रीटर्न्स. खूप मजा आली
&……अमा रीटर्न्स. खूप मजा आली वाचून.
<समृद्धी मधे वास्तु दो श आहे.
<समृद्धी मधे वास्तु दो श आहे. घर पाडून नवे बांधले पाहिजे.>
खरंय .
अनीश - ईशानी कोणाला न सांगता देवळात जाऊन लग्न केलं हे लोकांना कसं सांगायचं म्हणून हे लोक त्यांचं लग्न लावून देताहेत. त्यांच्यावरच्या प्रेमाखातर किंवा आमच्या आशीर्वादाशिवाय लग्न केलं म्हणून नव्हे.
आणि तसंही त्यांचं लग्न लावणारच होते, तर नीट, त्यांची हौसमौज पुरवून लावा. त्यांनी गुपचूप लग्न केलं म्हणून ईशाला काही बोलायचा हक्क नाही हा अरुंधतीचा फंडा म्हणजे जो प्रॉब्लेम मला वीस वर्षांनी दिसला तो आताच सोडवला पाहिजे.
ईशाला वेगळ्या कारणासाठी तिच्या दोन्ही विवाहांचे दिवस लक्षात राहणार आहेत.
अनिरुद्धची बत्तिशी फळेल. यांचंही लग्न टिकणार नाही.
म्हणजे देशमुखांकडे ज्यांचा डायव्होर्स झाला नाही असे फक्त कांचन- अप्पा उरलेत. ( यशचा अर्धा झालाय) त्यातही अप्पाचं कोणा बाईसोबत काही आहे, असा कांचनला संशय आहेच.
अनिरुद्ध, अरुंधती, अभिषेक यांची दोन दोन लग्नं झालीत. ईशाचं दुसर्यांदा लग्न होतंय. अविनाशच्या नाटकाचे प्रयोग थांबले की त्याचं पण आशुतोषच्या बालमैत्रिणीशी लग्न लावता येईल.
कालचा भाग आज बघितला आणि बाबा
कालचा भाग आज बघितला आणि बाबा पोताचा अर्थ कळला
मधुराणी बाहेर एव्हडी कविता वाचन करते तिला बाबापुता माहित नाही
की डोकं वापरायची परवानगी नसते या कलाकारांना. वीस वर्षानंतरचा प्रॉब्लेम आता दिसला म्हणजे? अभिचं पहिलं लग्न तर बाहेर झालं होतं तरी नाही टिकलं म्हणजे माणसचं फॉल्टी आहेत.
होय, मी पण ते बाबा पोता नोटीस
होय, मी पण ते बाबा पोता नोटीस केलं.
एकदा प्रिया मराठे भांगात कुंकू च्या ऐवजी भांगेत कुंकू म्हणली होती ते ही आठवलं आज हे पोता ऐकून
ईशाच्या हट्टीपणा हा २० वर्षे
ईशाच्या हट्टीपणा हा २० वर्षे जुना प्रॉब्लेम. अरुंधतीनेही लाड केलेच ना? -रोज बिछान्यात दुदू, हवा तो नाश्ता देऊन.
बाबा पोता..
बाबा पोता..

मीही लगेच नोटीस केलं ते...
आणि इथे सगळ्या मायबोलीकरांनी केलेलं पाहून ...इतकं छान वाटलं...
आपण सर्व एकाच वर्गात शिकतो आहोत.. शाळेतील मित्र मैत्रिणी आहोत असे फिलिंग आले....
एक लग्न धड नाहीये सिरीयल
एक लग्न धड नाहीये सिरीयल मध्ये आज विशाखा केदार पण
अजून पर्यंत अप्पा -कांचन
अजून पर्यंत अप्पा -कांचन जोडी टिकवून ठेवली आहे हे नशीब
अजून पर्यंत अप्पा -कांचन जोडी
अजून पर्यंत अप्पा -कांचन जोडी टिकवून ठेवली आहे हे नशीब >>>>>>तिला पण फोडतील उर्सेकरणीला आणून
असा आज बॅक विथ (खंग्रीमॅन्स)
अमा आज बॅक विथ (खंग्रीमॅन्स) बॅंग!
केदार तर अरु टीम मध्ये होता ना फिर कैसे? मी काय म्हणते आता सुरू केलच आहे तर केदार आणि धुमकेतू मैत्रीणीच लग्न लावून द्या म्हणजे दोघांच्याही समृध्दीतल्या अनुपस्थितला काही तरी लॉजिकल कारण मिळेल. विशाखा मोकळी होईल तर न दाखवलेल्या वर्षाला जुन दुखणं परत आणुन कायमच हार घातलेल्या फोटोत पाठवा म्हणजे विशाखा ची सोय होईल आणि नितीन च्या उठसूठ समृद्धी त येण्याला काही कारण मिळेल कारण तो विशाखा पेक्षा जास्त वेळ समृद्धी त असतो. ह्या सगळ्या भावनिक गुंत्यांचा मुलांना त्रास नको म्हणून दोघांचीही मुलं पाचगणीला पाठवा म्हणजे दर मंगल प्रसंगी ते का नाही आले हा प्रश्न विचारण्याचा त्रास वाचेल. मोघे काकांनी चिंगी शी सुत जुळवलच आहे त्यामुळे त्यांचा प्रश्न नाही. राहता राहिला सुधीर तर अन्या संजना डिव्होर्स नंतर संजना सुधीर लग्न लावून टाका. तशीही संजना आता अरु टीम मध्ये आहे त्यामुळे ह्या जोडीचा संसार सुखाचा होईल. उरला यश तर गौरीचा करीयर आणि आई वडील काळजीचा अटॅक तोपर्यंत आटोक्यात आला नाही तर अनिश ची आधीची गर्लफ्रेंड समृद्धी त आणुन तिचे यश शी सुत जुळवून देता येईल.
जगात ८ बिलियन माणसे असली तरी समृद्धीत फक्त आणि फक्त आधीच्या माणसांना ओळखणारी माणसंच टिकु शकतात हा नियम असल्याने हे करणं आवश्यक आहे. मग चॅनलला अशी टॅग लाईन देता येईल, "समृद्धी जिथे माणसं रिसायकल करुन नाती सस्टेनेबल केली जातात!" मग ह्या पाच सहा नवपरिणीत जोडप्यांच्या लग्नातील वेगवेगळ्या समस्यांवर उपाय शोधण्यात अरु आशु, अप्पा कांचन आणि अनघा ह्यांचा वेळ मजेत जाईल. मंडळी स्थिरस्थावर होईपर्यंत छकुली मोठी होईल आणि आपण सगळे हार घातलेल्या फोटोत जाऊन बसलो तरी सिरियल सुरुच राहील.
(No subject)
वीणा राहिली.
बाप्रे.. पर्णीका ! काय
बापरे.. पर्णीका !
काय इमॅजिनेशन!
वीणाचे तर आता नावही काढत नाहीत. वीणा आणि चिंगी एकमेकीना ओळखतच असतील ना?
काही काही लूप्स अर्धवट ठेवतात.
आणि प्रत्येक प्रसंगी नितीन चे असणे; मला तर अन्याहूनही खटकायला लागले आहे आजकाल !!!
वीणा राहिलीच नाही का , वीणा
वीणा राहिलीच नाही का , वीणा आणि शेखर ही जोडी जुळवून टाका म्हणजे राखीच्या दिवशी विशाखा, वीणा आणि इशा प्रत्येकीला समृद्धीत दोन भावांना राखी बांधता येईल. अरु हिरवीण असल्याने तिला तीन राख्यांच फुटेज!
<<काय इमॅजिनेशन!>>>
<<काय इमॅजिनेशन!>>>
इमॅजिनेशन नाही ग हे, ७००+ एपिसोड मध्ये सतत हल्ले झाल्याने मरायला टेकलेल्या लाॅजीकची वाचण्यासाठी केलेली शेवटची धडपड आहे ही :).
मग ... फक्त अन्याच राहिला
मग ... फक्त अन्याच राहिला की....!!!!!!!!!!!!!!
आज दोन्ही कडे टाइम पास एपिसोड
आज दोन्ही कडे टाइम पास एपिसोड होते. अनुपम्मा आणि अरुम्मा. पूजा झाल्यावर जोडप्याने बसूनच आरती केली.!!! अनघाला परत दिवस आहेत वाट्ते. मग नमस्कार चमत्कार आरती फिरवणे, प्रसाद देणे, ह्यात अरु अग्रभागी आहे. बासरी म्यान सॉफ्ट मुझीक मारत होता. इशा लग्नात घालायला आईच्या साड्या घेउन आलेली आहे. फक्त लग्ना नंतरच्या सर्पाइज पार्टीला नवा ड्रेस घेणार म्हणे. खरेच अरु कडे घडी न मोडलेल्या फ्यान्सी साड्या असतील अजुनही लग्नातल्या. रोज दोनतीनच वापरते धुवुन धुवून.
विशाखा फूटेज खात आहे. आठव् ड्यात कधी तरी सांगेल घटस्फोटाचे. म्हातारीस पूजा केल्याचे हेच फळ मिळेल. अन्या कुचका शेंगदाणा अजूनही जावयावर खार खाउन आहे. स्वतः ला अमरीश पुरी समजतो बहुतेक. पण आम्ही हे ड्रामे बघितले आहेत. कांचन पण अरुच्या लग्नात रुसून बसलेली पण आली तसेच ह्याचे होईल.
इशाला मामा चिडवतो पण ती आईवर उखडून आहे.
अनुपमा मध्ये आता समर चा डिवोर्स होईल. सून फारच क टकटी आहे. व दिराचा मुलगा दिल्लीहून आला आहे तो आगावू आहे.
"समृद्धी जिथे माणसं रिसायकल
"समृद्धी जिथे माणसं रिसायकल करुन नाती सस्टेनेबल केली जातात!
आणि आपण सगळे हार घातलेल्या फोटोत जाऊन बसलो तरी सिरियल सुरुच राहील.

>>>>
केदार मालिका सोडून गेला आहे
केदार मालिका सोडून गेला आहे तर लगेच घटस्फोट कशाला ? वेगळा कलाकार आणायचा की. ४ दिवसांनी लग्न हे गुरुजींनी पण जाहीर केलं आज. महा रविवार कधी ते ठरलं नसेल.
अनिश किती कमवतो नक्की.
अनिश किती कमवतो नक्की. नकाशावर कुठेही बोट ठेव म्हणाला, महाराष्ट्र कि भारत की जग, नक्की कुठला नकाशा. विशाखाची रडारड किती दिवस चालणार. पूजेला अरु, अनघा आणि विशाखा या तिघींचे दागिन्याचे सेट स्वस्तातले वाटत होते. अनघाचा तर अगदीच चिप, उलटा घातल्यासारखा. नितीन चक्क दिसला नाही पूजेला आणि अरु आशु गेले होते आधी तेव्हाही नव्हता. अरुचा एक नंबरचा चमचा आहे तो. ती काहीही बोलली तरी अमृत कानात पडल्यासारखा मान डोलावत असतो. अरु लईच खडूस वागते आजकाल, नवरा मुठीत म्हणजेच बुळा असल्याचा परिणाम.
पत्ते खेळायलाही मन्डळी सजुन
पत्ते खेळायलाही मन्डळी सजुन बसली होती...
चंपा..
चंपा..

अमृत कानात पडल्यासारखा....!!!
अमृत खूप गोड असते ना...? म्हणजे असे ऐकले आहे. चाखायची वेळ नाही आली..
तर ते तोंडात पडावे..म्हणजे चव कळेल ना...!
केळकरांकडचे सगळे बाहेर गेलेले
केळकरांकडचे सगळे बाहेर गेलेले आणि नितीन त्यांच्या घरात.
आता दोन दिवसांनी पूजा असं सांगायच्या आधी कांचन, अरुंधती यांनी अनाउन्स केलं होतं की आजपासून चार दिवसांनंतरचा लग्नाचा मुहूर्त आहे.
आता पूजेच्या दिवशीही गुरुजी म्हणतात आजपासून चार दिवसांनी लग्न.
देशमुखांकडच्या प्रत्येक मंगल कार्यात राडा होण्याची परंपरा विशाखा - केदार मुळे कायम राहिली. विशाखापेक्षा केदारच अरुंधतीला जास्त जवळचा दिसायचा. तिला बहीण मानून राखी- भाऊबीज करायचा. मुलांशी चांगलं बाँडिंग आहे. विशाखाशी घटस्फोट घेतोय म्हटल्यावर ही सगळी नातीही तुटली का? आणि त्याचं एवढं छान बाँडिंग आहे, तर मुलं अरुंधती त्याला कधी फोन करत नाहीत?
संजनाला तिचे केस घाणेरडे दिसण्यासाठी कॉम्पेन्सेशन म्हणून एक्स्ट्रा पेमेंट देत असावेत.
संजना चे केस आता.. अर्धवट
संजना चे केस आता.. अर्धवट रंगलेले..धड वाढत ही नाहीत त्यामुळे कापता ही येत नाहीयेत ..
ती अतीच चांगली वागते आहे हल्ली.
आणि केदारचं बळच घुसवले आहे..
काही. ..!
तोच आधी अन्याच्या इतका विरोधात होता... दुसरी बायको करायच्या...!
उगीच बिचाऱ्याला लफडेल ठरवलं
केदार सोडून जाण्याची कारणं
केदार सोडून जाण्याची कारणं अजिबात पटण्यासारखी नाहीत. विशाखा अरुंधतीला, " तुला वेगळं सांगायला हवं का?" असं म्हणते तेव्हा विबासं आहे, असं वाटलं. पण याला स्वतःच्या वागण्याची लाज वाटतेय म्हणून जातोय म्हणे.
अरुंधती म्हणतेय की जे काही करायचं ते घाईघाईत आणि भावनेच्या भरात नाही. मी केदारशी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने बोलेन म्हणतेय. अभिषेक आणि ईशाच्या वेळी हे करायची गरज होती , तिथे 'आज आणि आताच' राडा घातला. आता बिघडलेली परिस्थिती सुधारायची गरज आहे, तर मुहूर्त पाहणार आहे.
देशमुख कुटुंब पहिल्यापासूनच डिसफन्क्शनल आहे. आधी एका मुलाला घराबाहेर काढलं. मग त्याच्या डोक्यावर कर्ज होतं , बायकोशी पटत नव्हतं तरी तो कोणाला काही सांगेना. केदारची नोकरी गेली, दारूचं व्यसन लागलं हे लपवून ठेवलं. आता तो सोडून जातोय तेही. अप्पासुद्धा वडील म्हणून नापासच की.
आणि हे लोक ऊठसूट अरुंधतीचे गोडवे गात असतात. पण तिच्याशी आपल्या समस्यांबद्दलबोलावं असं त्यांना वाटत नाही. हिलाही त्यांचं काही बिनसलंय हे कडेलोटाची स्थिती येईतो कळत नाही.
तुला वेगळं सांगायला हवं का हे
तुला वेगळं सांगायला हवं का हे प्रेम संपल्याच्या संदर्भात असेल. अरु आणि अन्यामध्ये प्रेम होतंच कधी. यांचे संवाद असंबद्ध असतात. कालचा विशाखाचा मोनोलॉग तर कायच्या काय असंबद्ध होता. हहपुवा अगदी. फक्त एवढंच नाही असं ती चार वेळा म्हणाली पण ठोस काहीच सांगितलं नाही. संजनासारखी एक नटवी त्याच्या आयुष्यात आलीये हे ऐकायला कान तरसले होते पण फुसकी लवंगी होती. मग मधेच मिनूला ताप काय आला, लेखकाने अगदीच पाट्या टाकल्या काल. आप्पा एवढे ओरडत होते पण कोणाला काही ऐकायला आलं नाही खाली. अरु काय देशमुख वाडा सोडत नाही. एकामागून एक लोकांना डिवोर्सचे झटके येतात तिथे.
केदारच गौरीसारख झालय वाटत.
केदारच गौरीसारख झालय वाटत. प्रेम सम्पलय म्हणे.
१.तेरा पात्रे
१.तेरा पात्रे
२.चौदा लग्नं
३.पंधरा घटस्फोट
अधुनमधून
१.कलाकारांचे नाच,गाणे दाखवण्यासाठी समारंभ,
२.सायकलींग यात्रावाले कोणतातरी सामाजिक संदेश देत भारतदर्शन करतात तसे संदेश.
Pages