आई कुठे काय करते!-३

Submitted by sonalisl on 8 August, 2023 - 08:18

आई कुठे काय करते!-२ वर प्रतिसाद संख्या २०००+ झाली. त्यामुळे पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे हे हो ना पदराचा बोळा तों डा त कोंबून पुर्वी बायका माजघरात आत पळून स्फुंदु स्फुंदु रडायच्या तसे. आज आईच्या गळ्यात पडुन रडला. त्याची कोंडी होते आहे म्हणे. शेळपट निव्वळ .

अनाथाश्रमातून आलेल्या मुलीला पहिल्या भागात चॉकलेट कोणाच्या वाढदिवशीच चॉकलेट मिळतं असं वाटत होतं. तीच मुलगी फटा क्यांसाठी हट्ट करू लागली.

यश = अभिषेक देशमुख त्याच्या बहिणीच्या लग्नामुळे मालिकेतून गायब .

अरुंधती आणि अनीश ईशावर डाफरायला तयारच असतात. लग्नाआधी अनीशने ईशाला काय काय प्रॉमिस केलं होतं.

हो, यश बहिणीच्या लग्नामुळे गायब असणार. फिलर म्हणून कांचीची आरती ओवाळावी लागली - शब्दशः

गेले २ भाग अन्या मंद मंद हसण्यापलीकडे काही काम करत नाहीये. करोडपती आशुला १० लाख काही जड नाहीत.

आरोही लोचटपणाचा कहर आहे. आणि संस्थेतली मुलगी अशी घरी राहू देत असतील का ?

ती मुलगी अगदी पटापट इंग्लिश शब्द वापरते...अजिबात गरीब संस्थेतील अनाथ वाटत नाही.
तिला अशा दोन साईड ला बुच्या का बांधून देतात केसांच्या...समोर? विचित्र दिसतं ते !
मुलगी अगदीच साधारण मिळालीये यांना..त्या मानाने अनुपमा मधली छोटी अनु खूपच गोड आहे.
आणि आरोही का राहतेय अजून?
बाकी ईशा जास्तीच आगाऊ होत चाललीय. आईचा तिरस्कार अगदी दिसतो तिच्या वागण्या बोलण्यातून..
Good acting !!!!

<<<अरुंधती आणि अनीश ईशावर डाफरायला तयारच असतात.>>>
एक टेनिस मॅच सुरू असल्याचा फील येतो. हे दोघे इशावर डाफरतात तर तिकडे समृद्धी त कांचन, अनिरुद्ध, इशा आणि अभि वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये अरुंधती वर घाबरतात. इकदा इकडउन एकदा तिकडुन. आता हे चौघे पुन्हा एकदा एकत्र आघाडी उघडणार अशी चिन्हे आहेत.

<<गेले २ भाग अन्या मंद मंद हसण्यापलीकडे काही काम करत>>>
हे बरंच सुसह्य असेल त्याचा तो सो काॅल्ड (शिरा ताणून संतापण्याचा) अभिनय बघण्यापेक्षा.

अरुंधतीला प्रश्न पडला की प्रत्येक वेळी शुभप्रसंगी किंवा काही चांगलं करायला गेलं की असा राडा कसा होतो? Rofl
प्रत्येक मालिकेचा एकेक पॅटर्न असतो. एखाद्या मालिकेत एक दुष्ट पात्र सुष्ट पण बावळट पात्रांना जिवे मारायचे प्रयत्न करत असते. एका मालिकेत बावळट कुटुंब सारखं कर्जबाजारी होत असतं. या मालिकेत प्रत्येक शुभप्रसंगी छान नटून थटून , भाड्याचे डिझायनर कपडे घालून यायचं आणि तोंड गोड करायच्या ऐवजी कडू करायचं हा पॅटर्न आहे.

काल अनाथ आरोहीला सुद्धा डिझायनर ड्रेस होता. मनू घोळदार ड्रेस , त्यावर ओढणी घेऊन फुलबाज्या उडवत होती.

आज अरुंधती आशुबाळाला पाडव्याच्या नावाखाली तेल (उटणं नाही? ) लावताना त्याची आई वाटत होती आणि तो लाजत होता आणि तसाच संवाद पुढे आला. ओंकार गोवर्धन अभिनय करतोय असं वाटलं नाही.

दिवाळीच्या दिवशीसुद्धा नितीन सकाळी सकाळी केळकरांकडे. त्यालाही आरोही आणि मनूसारखं अनाथ डिक्लेअर करून टाका.

आजच्या भागात तसे नवे काहीच नव्हते. बोब ड कांद्याचे कौतूक. तिला पिझा खायचा आहे. ओवाळणी. गरीब भावाचे बहिणीला साडी देणे. मग तिने कश्याला कश्याला करणे. तो नितिन इतक्या पर्सनल समारंभाला पन तिथे का पडीक असतो?! अरु आशुला सप्राइज देणार तेवढ्यात इशा येते व अनीश कडून औषध लावुन घेते ह्यांच्यात काडीची केमिस्ट्री नाही. वन नाइट स्टँड वाले लोक्स पन एकमेकांशी जास्त प्रेमान वागतात.

इशाला बघुन बो का जरा घाबल्ला आहे. व आरोही समजूत घालत आहे. आज हिने फुल भाह्यांचा ड्रेस घातला आहे. नशीब. इशा अनीशला पैसे पण आशूच देतो. त्या ऐवजी अनीश ने स्व कमाईचे १०० रु. नाहीतर आईक डून मागवुन घेतलेली काही सोन्याची ज्वेलरी बरी दिसली असती.
इशा हावरट पणे लगैच समोरच पाकिटातील पैसे मोजते व निघून जाते.

इकडे केदार व त्या नण्देचा सुखी व लाडिक सं सार परत चालू आहे.

कांचन आजी उद्ववस्त साम्रा ज्याची राणी असल्या सारखी बाहेर मैदानत बसली आहे. तिला त्या राजेशाही बे ड वर कोन्तरी उचलून आणुन ठेवले असावे. मागे मोठी हिरवी भिंत आहे जी आधी दिसत नव्हती. समोरचा टीपो य पण जुन्या बाजाराfunction at() { [native code] } तला आहे.
मग तेच तेच दळन परत. अंघा अभी क्यानडाला शिफ्ट होणार! मग अंकिता काय वेगळे सांगत होती. ती ह्याला फिट होती.

सगळ्यात वर्स्ट इला भाटे गोड गोड माना वेळाव त लेकाला गुड न्युज देते. व कानात गळ्यात लोकल मधील ज्वेलरी घातली आहे.

काल अरुंधतीने भावाला भेटायला येत नाही म्हणून टॉंट मारला. मग सॉरी सॉरी केलं.
आधी अरुंधती , देशमुख आणि मग केळकरांच्या समोर कायम अपराधी चेहरा ठेवून वावरायची. तिचा भाऊ तिच्यासमोर कायम अपराधी चेहरा घेऊन राहतो.
इथे स्त्री पुरुष समानता नको का? हिच्या दिमतीला मोटारी, ड्रायव्हर आहे.दहा वेळा देशमुखांकडे जाऊन आल्यावर एकदा तरी आईला भेटायला जात.

काल केदारने ओवाळणी देताना खर्च वाढेल अशी पुडी सोडली.
Cancer की damaged liver?

अरूंधतीच्या खर्‍या माहेरची माणसं ही कथानकाच्या सोयीनुसार मालिकेत डोकावत असतात. नव्याने मालिका बघायला कोणी सुरूवात केली तर त्याला पहिली अरूंधती अनाथ वाटेल.

अनि रुद्ध बायकोशी कसाही वागला अफेअर केलं तरी बाप म्हणून चांगला होता ना? मुलांसाठीही तो कधी हजर नसे असं म्हटल्याचं आठवत नाही. आणि ईशाशी त्याचा बाँड चांगलाच स्ट्राँग आहे. तिच्या लग्नाच्या सीनच्या रडारडीत आठवणी उगाळताना त्याने तिच्यासाठी काय काय केलं ते आलं होतं. अभिषेकही त्याच्याच अधिक जवळ आहे.
शिवाय कालच्या भागात कांचनबाई म्हणाल्या , जानकीच्या बापाला पण मी सांभाळलं आहे.
मग आज अचानक अरुंधती आपल्या मुलांना वाढवताना मी एकटीच होते असं कसं म्हणते?

समर कँप असतात . मिनूसाठी दिवाळी कँप काढला.

अरुंधती त्या मनूला कायमचं ठेवायला तयार झाल्यावर आशुबाळ जबाबदारीच्या जाणिवेने घाबरल्यासारखा वाटला.

आणि अरुंधती उद्या समृद्धीत घोषणा करणार आहे की आम्ही मनूला कायमचं सांभाळणार. नो दत्तक?

तेच मला समजत नाहीये..की हे तिला नुसतेच सांभाळणार आहेत की प्रॉपर दत्तकविधन करणार आहेत !
आशू खरंच आनंदी न वाटता एकदम गंभीर झाला....
आणि आरोही अगदी घरच्या सारखी रूळली आहे त्यामुळे ईशा अती आगाऊपणा करतेय...!!!!

दिवाळीच्या पहिल्या दिवशी देशमुखांकडे झालेला अपमान पचल्यावर पुन्हा भूक लागल्याने केळकरांकडची वरात पुन्हा समृद्धीवर. यावेळी बिचार्‍या नितीनला घेतलं नाही. आरोही आणि मनू पॅकेज डीलमध्ये आल्या. देशमुखांना अपमान करायला आणखी नवे बकरे.

तिथे अरुंधतीने आशुतोषला कसं गुंडाळून ठेवलं हे कळलं. त्याला बाप व्हायचं होतं, म्हणून त्याला मूल दत्तक घ्यायचं होतं. तर अरुंधतीने तिकडे थापा मारल्या की त्या बिचार्‍या अनाथ मुलीला घर मिळावं म्हणून आम्ही तिला कायमचं सांभाळणार. आशुबाळाने अमेरिकेतून शिकलेला फॉस्टर केअर हा शब्द टाकला. भारतातहे फॉस्टर केअरची पद्धत आहे का?
आधी निराधार स्त्रियांसाठी असलेला केळकरांचा आश्रम आता अनाथ मुलांचा झाला किंवा तिथे आणखी एक आश्रम उगवला. जर अनाथ मुलांना प्रेम आधार द्यायचे आहेत्, आणि ते सगळं स्वतः करायचंय तर यांनी त्या आश्रमातच जाऊन राहायचं. नाहीतरी यांना कुठे काय कामं आहेत? कंपन्या ऑटो पायलट मोडवर चालतात आणि पैसा येतो. अरुंधतीने घोस्ट रायटर असतात तशी घोस्ट सिंगर ठेवली असावी.

आशु अरुच्या जोडीला केदार विशाखापण मूल दत्तक घेणार. आणाखी एक अदृश्य मूल.

यश घरी आला तर कांचन म्हणते अरे आधी कळवायचं तरी. आँ? तुमच्याच घरातला ना तो?

आता कांचनची मज्जा आहे. एका वेळी अन्घा अभिषेक, अरु आशु, केदार विशाखा आणि यश आरोही इतक्या लोकांवर तलवारी चालवायला मिळणार.
ईशा कर्जाऊ दहा लाख रुपये मिळवण्यासाठी प्रेझेंटेशन करेल का?

फॉसटर केअर मधे मूल म्हणजे नुसते सांभाळणार. आशुतोष ची माया आटे परेन्त. नाहीतर धार्मिक दत्तक विधान, कोर्ट प्रोसीजर असते, गॅझे ट
मध्ये मुलाचे नवे नाव छापून यावे लागते. मूल ऑफशिअली दत्तक घेतले की तेच तुमचा वारस होते. माझ्या आई बापांनी हे सर्व केले एव्ढेच नव्हे तर त्यां ची जीवन पुंजी घर घ्यायला मला दिली. हा बेकार ड्रामा चालू आहे.

<<<<आता कांचनची मज्जा आहे. एका वेळी अन्घा अभिषेक, अरु आशु, केदार विशाखा आणि यश आरोही इतक्या लोकांवर तलवारी चालवायला मिळणार.>>>

अगदी अगदी. अनिरुद्ध इतकं नाही,पण कांचन उग्र चेहरा करुन जी रिग्रेसिव मुक्ताफळं उधळत असते ते फार इरिटेटिंग असतं.

<<<हा बेकार ड्रामा चालू आहे.>>
आजकाल सतत बेकार ड्रामाच चालु असतो ह्यांचा. जुन्या समस्यांना क्लोजर नाही कारण ते दिलं तर कथा संपेल आणि नविन काही दाखवायला नाहिये मग हे लोक काहीही पांचट दाखवत बसतात. शेंडा बुडखा नसलेल्या बिनबुडाच्या समस्या. इशाची इनसेक्युरिटि आणि नवर्यावर बॉसिंग, अभिच कॅनडाला जाण्याचं खुळ, संजना चा अनिरुद्ध वरील प्रेमाचा तळ्यात मळ्यात खेळ, केदारला लागलेले व्यसन आणि त्यातुन ताबडतोप मिळालेली मुक्ती काय वाटेल ते सुरु असते.

मला तर आजकाल शंका येते की कॉस्ट कटिंग साठी पर्मनंट लेखिकेला सोडचिठ्ठी देऊन एपिसोड बेसिस वर कुणाकुणाकडुन लिहुन घेताहेत. त्यामुळे एका ट्रॅक चा दुसर्याशी काहीही संबंध नसतो.

केदार विशाखा मध्ये काही घडलेच नाही असे वागत आहेत. आता आरोळी गौरीच्या घरात राहायला येणार की यश परत जाळे विणायला चालू करेल.

आरोहीला कशात बघितलंय ते आठवत नव्हतं, आज वाय झेड सिनेमा लागला होता आणि त्यात ती दिसली. मग आठवलं ती वसंतराव चित्रपटात सौ वसंतराव दाखवली आहे. मग गुगल केलं तेव्हा कळलं की क्लिनिकल सायकोलॉजिमध्ये सुवर्ण पदक मिळवलं आहे. बालकलाकार म्हणून राज्य पुरस्कार देखील मिळाला आहे.
https://nettv4u.com/celebrity/marathi/movie-actress/kaumudi-walokar?expa...

कोणीच बघत नाही का ही मालिका?

मालिकेतल्या अदृश्य पात्रांमध्ये भर - गौरी.

आधी मंगल कार्यात राडा व्हायचा. आता मंगल कार्याचं नाव निघताच उलथापालथ. आरोही आणि यशचे एक्स हजर.

द्विधा मनस्थितीबाबत यश अभिषेकला कॉम्प्लेक्स देईल. शिवाय हातपाय चालवायचा त्याचा स्वभाव उफाळून आलाय.

कांचनबाई फॉर्मात. दगडापेक्षा वीट मऊ तसं त्यांना आरोहीपेक्षा गौरी बरी वाटू लागली.

आशु अरुंधतीचा घटस्फोट करून टाका आणि आशुचं मनुच्या टीचरच्या = तिच्या खर्‍या आईच्या - गळ्यात बांधा.

रविवारी काहीतरी दाखवायचं म्हणून महाएपिसोड ठेवतात पण काहीही म्हणजे काहीही दाखवायचं. कोणाचा कमवायचा पत्ता नाही आणि निघालेत स्वयंवर करायला. काय आहे त्या यशमध्ये जे दोन मुली त्याच्यावर मरताहेत. आरोहीची जी काही परीक्षा घेतली कांचनने त्यानंतर तर त्या घरातल्या एकाही मुलाला मुलगी मिळू नये. आरोहीने लगेच सोहमला बोलावून घेतले जसे काही तिला एकही दिवस बॉयफ्रेंडशिवाय जगता येत नाही, यश नाहीतर सोहम कोणीतरी पाहिजेच. तो सोहमही लगेच येऊन वर मागणीही घालतो. तुला पर्याय आहे तर मलाही आहे हेच दाखवले आरोहीने. कसले डोंबलाचे प्रेम. पैसे कुठून आणतात हे प्रेमवीर पोटापाण्यासाठी हेही दाखवावे.

आरोहीने फोन करून बोलवलं हे खोटं आहे, असं आरोही म्हणाली. मला आधी वाटलं होतं , आरोहीचा फोन वापरून ईशाने त्याला बोलवलं असेल.

कांचनने नातसुनेसाठी जे स्किल सेट लावलेत ते नातीसाठी लावले नाहीत. ईशा इतके दिवस घरी आहे, तर तिला निदान घरकाम तरी शिकवायचं होतं.

आशु अरुंधतीचा ट्रॅक कसौटी जिंदगीच्या वळणावर चालला आहे. त्यातही प्रेरणा आणि अनुराग एकदा मुलाला शाळेतून आणायला विसरतात.

अरुंधती प्रसिद्ध गायिका. कंपनीत डिरेक्टर. म्युझिक स्कूल चालवते. तरी तिला मुलीच्या शाळेबाहेर दिवसभर बसून राहायला वेळ मिळतो. तांदूळ निवडायला सुद्धा.

आशुबाळाचं बिझिनेस एम्पायर आहे. पण त्याच्याकडे एकच कार आहे. अदृश्य ड्रायव्हर सोडला तर नोकर नाही.

आणखी एक लग्न देशमुखांच्या गळी उतरावयचं आणि लावून द्यायचं मिशन अरुंधतीला मिळालं.

साखरपुडा मुलीकडे करतात. इथे तोही मुलाकडे.

गौरी परत येईल या आशेवर सांभाळून ठेवलेल्या घरात यशने आरोहीला आणावं हे तिच्यासाठी इन्सल्टिंग नाही का?

ईशाचा बिझिनेस प्लान बॅक बर्नरवर गेला. अभिषेकचा कॅनडाही. व्हिसा मिळाला. नोकरी वाट बघतेय. तर जा आता.

माझ्या मते कांचनने बाकी सगळं सोडून पहिलं ईशाच्या मागे लागावं. बाकी सगळे खंबीर आहेत स्वतःच आयुष्य सांभाळायला ही सोडून.

मजा मजा चालू आहे मालिकेत.

मलाही वाटतयं की त्या टीचरला आशुशी लग्न करायचं आहे. अरु मंदाक्का असल्याने तिला माया सरळ साधी वाटते.

माया चीटर आशूला बेसावध असताना बाटलीत उतरवले व मेरी इज्जत पर डाग लगाया करून इशू करेल आणि महान हारु नवऱ्याचं व घराण्याचं नाव मातीत मिळू नये म्हणून स्वतः त्यांचे लग्न लावून देईल व कुठेतरी डोंबिवलीच्या काळोखात तोंडात पदराचा बोळा कोंबून दम्याचे उसासे टाकून रडत बसेल .

हँडसम हंक वरून आठवले त्या अश्विनीच्या (तू चाल पुढं)नवऱ्याला मोस्ट हँडसम हंक हा 'किताब मिळाला आता तो त्यांचा चॅनेल ने त्यांच्या चॅनेल तर्फे दिला किंवा त्या सिरीयल पुरत दिला हे वाचनात नाही .

Pages