आई कुठे काय करते!-३

Submitted by sonalisl on 8 August, 2023 - 08:18

आई कुठे काय करते!-२ वर प्रतिसाद संख्या २०००+ झाली. त्यामुळे पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही...मला नाही आवडले ईशा ने तिला वाटेल तसे बोललेले.!!
अरुंधती चे आशुतोष कडून कपडे /दागिने- न मागता- घेणे आणि ईशाने तसेच हव्यासाने मागणे..यात फरक आहे.
ईशा ने घाईघाईने लग्न केले, दोघांच्याही करिअर चा पत्ता नाही, काही मेहनतीची तयारी नाही, इस्टेट फक्त पाहिजे, आईशी तुलना करून तिलाच उफराटे बोलणे...
नॉट डन !!!
आणि सगळ्यांसमोर काय अपमान केला तिचा? बाकी घरचेच होते, तो डिलिव्हरी बॉय..त्याचे काय!!
तो अचानक दारावर आल्यावर तेव्हाच बोलणार ना? की गुपचूप पैसे देऊन राख्या ठेऊन घ्यायला हव्या होत्या?

दोघींच्या वयात आणि अपब्रिंगिंगमध्ये फरक आहे. अरुंधती गरिबीत वाढलेली आहे. ईशा लाडावलेली आहे, आणि ती लाडावली जायला अरुंधतीही जबाबदार आहे.
मुलांच्या बाबतीत दिसलेल्या प्रत्येक समस्येची सोडवणू़क आज आणि आताच , काळवेळ परिस्थिती न पाहता करणं ही चूक अरुंधती पुन्हा पुन्हा करते. आधी अनघाचं डोहाळजेवण. आता ईशाचं लग्न आणि राखी. तिने ईशाला नंतर एकटी असताना समजवायला हवं होतं.

अरुंधती किती काय काय करते अशी आरती ओवाळून घेते आणि आता लिटरली का ही ही करत नाहीए. सुलेखाताई तिच्यापेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह दिसतात.

आणि मुलांचा चारचौघात अपमान मला चूक वाटतो. आता नाहीतरी ईशाला बिघडलेली मुलगी दाखवलीच आहे, त्यामुळे तिच्यामुळे अरुंधतीला कसं सोसावं लागतंय हे दाखवतील. एकतर ती या घरात राहील नाहीतर मी, असं अरुंधती म्हणाली आहे (हे लेखक टीमच्या लक्षात राहिलं तर) , तर बहुतेक अरुंधतीलाच घराबाहेर पडावं लागेल

भरत +१
अरुच राखीवरुन तमाशा करण, इशाला कॉर्नर करण आणी उच्च म्हणजे त्या डीलिव्हरी बॉयसमोर हे सगळ करण हे भयकर होत.आपल मुल चुकत असेल तर त्याला चारचौघात अपमानित करण हे यावर कधिच सोल्युशन असु शकत नाही.

ती मीनू तर मामे बहिणीच्या लग्नात नव्हती आज तो संजनाचा मुलगा आला राखी साठी पण मिनुच दर्शन दुर्लभ .

मीनु,नितिनची बायको ही सगळि आभासी पात्र आहेत...बर ते करे बाधलेले हात तसेच, साग्रसग्नित लग्न आणी रितिभातीच लेक्चर देतात मग लग्नानतर सत्यनारायण नाही का?

अनीशची परीक्षा होईपर्यंत तो कुठेही (हनिमूनला) जाणार नाही, असं अरुंधती म्हणणार आहे. बाई, लग्न झालेलं जोडपं, त्यांचं ते बघून घेतील ना.
तुम्हांला त्यांचा बालविवाह झालाय असं वाटत असलं तरी तसं ते नाही.

नॉर्मल जोडपे लग्न करतानाच डिस्कस करते फिरायला कुठे जायचे म्हणून...अगदी घरातलेही हौशीने विचारतात कुठे जाणार. अरु काय मंगळावरून आली आहे का? नसेल तिला हौस तर त्यांना ठरवू दे ना त्यांच्या प्रायॉरिटीज. फेल झाला/कमी मार्क मिळाले तर बघून घेईल त्याचे तो...दर वेळी उपदेशाचा एरंडेल काढा पाजण्याची काय गरज आहे? एकदा लग्न झालेले असताना परत लग्न लावून देण्यात/ एकंदर घोळ घालण्यात नाही दिवस फुकट गेले? तेवढ्या वेळात दोनदा हनिमून झाला असता त्यांचा.

एवढे सगळे राडे झालेत तर त्यांना निवांत काही दिवस त्यांचे नाते सुदृढ करण्यासाठी मिळावेत असे नाही वाटत तिला? किमान आपल्या मुलीचा घायकुतीला येणार स्वभाव पाहता निदान नॉर्मल होणाऱ्या गोष्टीत अडथळे निर्माण करू नयेत/तिच्या कलाने घ्यावे ही अक्कल नाही आली का अजून? या बाईला हनिमून सारख्या अत्यंत पर्सनल गोष्टीत नाक खुपसू नये एवढे भान नाही?

असल्या पॅसिव्ह-अग्रेसिव्ह आणि कंट्रोलिंग नातेवाईकामुळे बेबनाव निर्माण होतात कुटुंबात.

स्वतःच्या आयुष्यावर फोकस कर म्हणावं. नाही तर तिलाच अंटार्क्टिकावर हनिमूनला पाठवा. किमान २-३ महिने परत येणार नाही आणि लोक श्वास घेतील जरा.

अरुला सिरिअसली कौन्सिलिंगची गरज आहे. कसले स्टीरीओटाइप्स सेट करताहेत सीरिअलवाली लोकं?

माझेमन अगदी मनातल.. लेखक बदलल्यावर अरुच पात्र दिवसे दिवस भयकर इरीटेटीन्ग होत चाललय.

SHE IS TOO MUCH IRRITATING. WHY SHE BOTHERING OTHERS LIFE. HAVE TO FOCUS HER LIFE GOALS AS SHE HAS TO COMPLETE HER GRADUATION AND ALL OTHER THINGS .

आज अभंग आणि कविता पिळल्या. ते सगळं पुढे ढकललं. त्यामुळे पटकन बघून झालं.

पाचसहा फायलींचं बिझिनेस एम्पायर. त्यात निरक्षर माणसाला सा़गावं तसं निळी फाइल.

उद्या अरुंधतीची संक्रांत संजना आणि अनिरुद्धवर.

उद्या अरुंधतीची संक्रांत संजना आणि अनिरुद्धवर. >>>>>संजनाला काहीतरी मौलिक सल्ला देतात बाई पण अन्या येऊन शिरा ताणायला लागतो, प्रोमो पहिला .

शेखर पुनर्विवाह करणार आहे ते तिला उशीरा सांगतो म्हणून संजना बावचळली आहे व रडते आहे. म्हणजे हिची काय अपेक्षा होती? त्याने तिच्या नावाने दिवा लावून संन्यास घेउन राहावे!!! त्यात अभु म्हण तो बिचार्‍या निखिलला त्याची वाट बघणा री आई भेटेल!! काय लॉ जिक!! पुढे ती ढसा ढसा रडत आहे.

इकडे अनीश इशा झोपलेले अस्तील बहुतेक. पण अरु व सासूचा सीन आहे सासूबरोबरच जास्त इश्क होत आहे. त्यात ही अरू साइडने दिसते तर बरीच जाडि दिसते. सासू पण लाडात येउन चि ड्वत आहे व हनिमूनला एक औषधाचा डबा घेउन जा म्हणत आहे हे सर्व आशू जिन्यावरून
खळ्या पाड्त ओठ मुड पून बघत आहे व खूष होत आहे

प्रोमो मध्ये ही संजना ला घर सोडायला सांगते पण ती नाही म्हण ते!!! पार ह्यांच्या बेडरूम मध्ये हिचा प्रवेश कसे काय!! चालते.

हायला! आता शेखरचं लग्नसुद्धा समृद्धीत लावणार? अरुंधतीने त्याला राखी की भाऊबीज कशाततरी बांधलंच होतं. दीर हिचा भाऊ. नणंदेचा नवरा हिचा भाऊ. सवतीचा नवरा हिचा भाऊ. दुसर्‍या नवर्‍याचा बिझिनेस कम लिव्ह इन पार्टनर पण हिचा भाऊ. अप्पाला सुद्धा राखी बांधून झाली असेल.

अभु कोण?

अरुंदती ला मोप भाऊ हायती ... !!! Lol

दीर हिचा भाऊ. नणंदेचा नवरा हिचा भाऊ. सवतीचा नवरा हिचा भाऊ. दुसर्‍या नवर्‍याचा बिझिनेस कम लिव्ह इन पार्टनर पण हिचा भाऊ. >>>
Sister syndrome
मला शंका आहे की बेडरूमचे दार बंद झाले की ही नवऱ्याला पण राखी बांधत असेल.
जगतबघिणी.

झंपू दामलू >> भारी.
म्हणजे ईशा ला सोडलं का आता ?
आले अरु च्या मना, तिथे कोणाचे काही चालेना... अरु म्हणेल ते आणि तेच योग्य ..बाकी जग मिथ्या आहे. अशी आहे ही सिरीयल.

दीर हिचा भाऊ. नणंदेचा नवरा हिचा भाऊ. सवतीचा नवरा हिचा भाऊ. दुसर्‍या नवर्‍याचा बिझिनेस कम लिव्ह इन पार्टनर पण हिचा भाऊ. >>>
Sister syndrome
मला शंका आहे की बेडरूमचे दार बंद झाले की ही नवऱ्याला पण राखी बांधत असेल.
जगतबघिणी.

महान आणि उच्च --- Kay amazing comments aahet !!!!!!! ंमी ही serial comments wachayla baghte.

हनिमूनला जाताना औषधांचा डबा घेऊन जा असं सांगताना सुलेखाताई तिच्या वयावरून आणि कधी डोकं तर कधी पाय दुखण्यावरून टोमणा मारत होत्या हे अरुंधतीला कळलं नाही.

ही संजना अनिरुद्धच्या बेडरूममध्ये घुसणार आहे तो रविवारचा महाएपिसोड आहे.

पडदा उघडतो तेव्हा अरुंधती तिच्या रूममध्ये छान छान साड्यांच्या घड्या घालत असते. तिच्या दिवसभराच्या कामाचं फलित. मग आशुतोषची एंट्री आणि रोमान्सचा प्रयत्न. हे लोक हनिमूनला जाणार हे इतक्या वेळा उगाळून झालंय, पण कुठे जाणार हे अजून ठरलेलं दिसत नाही.

ईशाच्या खोलीत पसारा. तो बघून अनीशचं डोकं फिरणं. भांडणं. " हे सगळं तुला लग्नाआधी माहीत नव्हतं का? " हे वाक्य केव्हापासून माझ्या मनात वाजत होतं , ते ईशाच्या तोंडून बाहेर पडलं. ती चक्क एवढ्या रात्री घर सोडून देशमुखांकडे गेली आणि अनीशने तिला थांबवलंही नाही.

देशमुखांकडच्या कुकरमध्येही प्रेशर जमायला सुरुवात झाली आहे. आपल्या मुलाशी लग्न केल्यानंतरही संजनाचा जीव तिच्या पहिल्या नवर्‍यात अडकला होता हे ऐकल्यापासून कांचन भडकली आहे. शेखर लग्न करतोय हे कळल्यापासून संजना जखमी आवाजात बोलतेय. आता शेखरला मुलगा पण नको. अनिरुद्ध - नाही. अप्पा - हो. घर माझं आहे. पण कांचनने व्हेटो वापरल्यावर ती त्याला होस्टेलमध्ये ठेवेन म्हणतेय. हे इथे पर्णीका यांनी आधीच सांगितलं होतं.
जेवण वाढायला घ्यायचा सीन. संजनाने आतापर्यंत मारलेल्या सगळ्या टोमण्यांची सव्याज परतफेड करायची संधी अनिरुद्ध सोडत नाहीत.
या लोकांच्या घराचं दार एवढ्या रात्रीही उघडं असतं. ईशा घरात शिरते आणि जेवण वाढा सांगते. मग प्रत्येकाचे प्रश्न आणि शेवटी गद्धेपंचविशीतल्या यशचं नेहमीप्रमाणे तिला पोरकटपणे चिडवणं, त्यात अभिषेक सामील. त्यामुळे तिची रडारड.
मग ती आपण घर सोडून आलोय हे सांगते. हे ऐकून अनिरुद्ध कुकर फुटावा तसा फुटला कसा नाही याचं नवल वाटलं.

उद्या अरुंधती संजनाच्या बेडरू ममध्ये तिला घर सोड म्हणून सांगते. अनिरुद्ध तिला तू माझं घर तोडायला आलीस आणि संजनाला चालती हो, एकाच दमात सांगतो. तो जा सांगतो म्हटल्यावर संजना नाही जाणार असंच म्हणणार.
हे होईपर्यंत ईशा घर सोडून आली आहे हे अरुंधतीला माहीत नसावं. उद्या कळेल..
हनीमून पुन्हा कॅन्सल ?

आजच्या भागात खूपच भांडणं, उणीदुणी काढणं होतं.

ईशा बरोबर बोलत होती काल. तिला अनिशबरोबर स्पेस आणि प्रायव्हसी हवी आहे. काय चुकल तिच? अनिश सुद्दा अरुच ऐकून बोरिन्ग वागतोय हल्ली.

नातिची पहिली गोकळास्ट्मी आहे म्हणे तिथे आजि पाहिजेच...कान्चनचा काहीही बिनबुडाचा हट्ट....इशाला लग्न म्हणजे फोटो,मज्ज्,इन्स्टा रिल्स, शोबिझ एवढच वाटतय आणी तिच्या आइला लेकिने कसलीच मजा न करता एकदम आदर्श ग्रुहिणी व्हावसस वाटतय....दोघी दोन टोकाला.

इशाचं लग्न जसं काही दिवस सतत चार दिवसांवर होतं तसं अरुंधती आशुतोष सतत काही दिवस दुसर्‍या दिवशी हनिमूनला जाणार आहेत.
महाराष्ट्र राज्य लॉटरी का फल आज नहीं तो कल.

नातीच्या पहिल्या गोकुळाष्टमीत नातच गायब.
मागे अभिषेक म्हणाला होता की आपल्याकडे कोणाचं काही प्राय व्हेट राहत नाही. सगळ्यांचं सगळं सगळ्यांसमोरच डिस्कस करतात, ते हल्ली प्रकर्षाने जाणवतं. संजनाच्या नवर्‍याने दुसरं लग्न ठरवलं, तिचा मुलगा येतो की नाही या गोष्टीची चिरफाड पंचायतीसमोर केल्यासारखी. त्यात अनिरुद्ध तिला लिटरली फाडून खायला बसलेला. ति नेही त्याला उठता बसता टोमणे मारले होते, त्याचे उट्ठे काढायला टपलेला. मला मागचे दोन एपिसोड बघताना शांतता कोर्ट चालू आहे नाटक आठवलं.
केळकरांकडेही हेच. ईशाने राख्या घेतल्या. सगळ्यांसमोर पंचायत. तिने मोठ्याने गाणी लावली तर अनीशने तिला फोन करून खाली बोलवलं आणि पुन्हा पंचायत.

संजनाला एकदमच बिचारी करून टाकली. आज तिला दहीहंडी खेळताना पाडणार आणि बेशुद्ध करणार. मागच्या दहीहंडीला अनीश ईशा पहिल्यांदा भेटले हे कोणाच्याही लक्षात नसावं. ईशा पडल्यावर अनीशने तिला झेललं तसं संजनासाठी कोणी आणता आलं असतं. नितीनला दिसणारा लाइफ पार्टनर मिळावा म्हणून त्याच्यावर पाडता आलं असतं.

नितीनला बायको मुलगाच काय घरदारही नाही. ऑफिसमध्ये रिनोव्हेशन चालू आहे. त्याचा फॉस्टर मुलगा हनिमूनला चाललाय आणि गोकुळाष्टमी आहे तर हा आधी केळकरांकडे आणि मग देशमुखांकडे. गुजरात्यांत कृष्णजन्म मोठा सण असतो. तेव्हा त्याच्या घरी या सगळ्यांनी जायला हवं. पण हा शहा म्हणजे जैन असावा , पण सगळं खात असतो. कृष्णजन्म रात्री बारा वाजता. पण यांच्या पूजा केव्हाही झाल्या.

केदार विशाखा निरोप न घेताच गेले? विशाखा इथेच राहणार होती ना? की अनिरुद्धकडून नवर्‍याला माफी मिळवायला थांबली होती?

ईशा घर सोडून आली त्या रात्रीचं देशमुखांकडचं पिठल्याचं आणि केळकरांकडचं कढीचं जेवण कोणी जेवलं का? कारण सगळी रात्र तमाशा करण्यातच गेली असेल.

आज तिला दहीहंडी खेळताना पाडणार आणि बेशुद्ध करणार. >> तिची स्मृती गेली तर या विचाराने प्रेक्षकांना अजून काय काय बघावे लागणार!! असे वाटून गेले.

भरत.. एक्झॅटली! Lol
मीही तोच विचार करत होते..की जेवले कोण आणि कधी?

अनीश माझ्या अंगावर धावून आला , मी घाबरले हे ईशा खोटं बोलली तो भाग वेगळा.
पण त्यात अनिरुद्ध सोडला तर एकानेही तिच्यावर विश्वास ठेवला नाही, तिला खोटं पाडलं यातून जनरली योग्य संदेश जात नाही.
नवऱ्याने असं काही केलं तर तुझीच चूक असेल, असं माहेरचेही सांगतात. आणि समाजात सभ्य समंजस सोशिक इ. असलेला माणूस चार भींती़ंच्या आत तसाच असेल असं नाही.
हा प्रसंगच मुळात अनावश्यक होता.
आणि एवढे सगळे राडे, प्रॉब्लेम असताना कोण सण साग्रसंगीत साजरे करतील?
ईशा आणि अनिरुद्ध दोघांना पार काळपटवायचे उद्योग चाललेत.

सध्या ज्ये. ना. आलेले असल्यामुळे मी ही (आणि इतर अनेक) मालिका अधूनमधून बघतेय. आधी सगळीकडे राखी पौर्णिमा झाली. मग सगळीकडे कृष्णजन्म. मग दहीहंडी. आता श्रावण संपत आला..उद्या अमावास्या. तरी यांच्या दहीहंड्या चालूच.

'ठरलं तर मग' नावाची मालिका आहे त्यात नायिकेला त्रास द्यायला टपलेली पात्रं इतका बालिशपणा करतात. काल स्टुलावर चढून लोणच्याची बरणी काढताना मुद्दाम ती तिरकी करून नायिकेच्या अंगावर लोणच्याचं तेल सांडवलं. Uhoh मग नायिकेने चक्क त्या दोघींना सुनावलं. ( एरवी या नायिका मिटल्या तोंडी सगळं सहन करतात.)
मग त्या दोघी तिच्या बेडरूममध्ये जाऊन तिच्या सगळ्या साड्या लपवून ठेवतात Uhoh कपाटात फक्त एक पंजाबी ड्रेस शिल्लक ठेवतात. दहीहंडीच्या सणाला सून साडी न नेसता सलवार कमीज घालून आली तर तिची आजेसासू चिडेल म्हणून Uhoh त्या हा उद्योग करेपर्यंत ती खालच्या मजल्यावर साडी स्वच्छ करत बसते. त्या दोघी साड्या लपवून बाहेर पडताना ही वर येते. म्हणून या दोघी तिच्याच बेडरूमच्या दारामागे लपून बसतात आणि ती आत आल्याआल्या बाहेर पळतात. नायिकेला काहीही कळत नाही. .. अरे काय हे? कोण करतं असं?
आता गंमत म्हणजे बाहेर दहीहंडी फोडायला नायक वर चढतो पण त्याला हंडी फोडता येत नाही तेव्हा आपली सलवार कमीजधारी नायिका तडफदारपणे येऊन कुणाच्या तरी खांद्यावर चढून वर जाते आणि दहीहंडी फोडायला त्याला मदत करते. तेवढ्यात तिचा तोल जातो, हिरो तिला सावरतो आणि मग एक हळुवार रोमँटिक वगैरे प्रसंग !!!
हिरॉईन साडी नेसून आली असती तर तिला असं वर चढता आलं नसतं ना? म्हणजे जे होतं ते चांगल्यासाठीच! ब्लेसिंग इन डिसगाईज म्हणतात ते असं!

Pages