आई कुठे काय करते!-३

Submitted by sonalisl on 8 August, 2023 - 08:18

आई कुठे काय करते!-२ वर प्रतिसाद संख्या २०००+ झाली. त्यामुळे पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कांचन चक्क चहा करते म्हणाली.

अभिषेकच्या साखरपुड्याची स्टोरी रिपीट. तेव्हा अंकिताने आत्महत्येचं नाटक केलं होतं.
आता अदृश्य गौरीने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बया भारतात येऊन कोणाकडे राहत होती? हाटेलात?

हो ना, अरुच्या एकाही मुलाचं लग्न / करीयर (?) धड नाही. आशु कधी नव्हे ते चाणाक्षपणा दाखवतोय तरी अरु मंद ती मंदच.

जर मनू मायाची मुलगी असेल आणि ते प्रूव्ह झालं तर ती मनूला कायमची घेउन जाऊ शकते ना ?

गौरी सारखी खम्बीर मुलगी आत्मह्त्या कशी करु शकेल? आता काय तिला खलनायिका दाखवणार?

आशूच काम करण्यार्या अभिनेत्याने मनुविषयीचा पझेसिव्हपणा छान दाखवलाय.

संजना अँटी अरुंधती कँपमध्ये परत यावी एवढ्यासाठी गौरीला अदृश्यरूपात आणलं होतं.
सीरियसली?

(संजनाच्या टोनमध्ये वाचा.)

सध्या सुरू असलेले ट्रॅक - यश आरोहीचा साखरपुडा.
मनुची टीचर.

विसरलेले ट्रॅक - अभिषेकची कॅनडातली नोकरी.
ईशाचा बिझिनेस प्लान.
अनीशचं इंदौरला जाणं.

सुलेखाताई सुद्धा अदृश्य झाल्या.

आरोहीला लग्न करून समृद्धीमध्ये घुसवायची काय गरज आहे? समोरचा बंगला भाड्याने घेतलाच आहे. तिथेच दोघे राहतील.

संजना अँटी अरुंधती कँपमध्ये परत यावी एवढ्यासाठी गौरीला अदृश्यरूपात आणलं होत? >>>>>>> ती त्या कँपमध्ये आधीच होती. आता बाहेर आली ना?

संजना अँटी अरुंधती कँपमध्ये परत यावी एवढ्यासाठी गौरीला अदृश्यरूपात आणलं होत? >>>>> हे मी दोनदा , "संजना आंटी ,
अरुंधती कँपमध्ये परत यावी एवढ्यासाठी गौरीला अदृश्यरूपात आणलं होत? " असं वाचलं

संजनाने यशला खुल्लम खुल्ला सांगितलंय की आरोही या घरात आली की मी तिला छळणार.

म्हणजे आपल्याला कांचन आणि संजना विरुद्ध अन्घा आणि आरोही अशी लेडीज डबल मॅच बघायला मिळेल. अप्पा अ - आच्या टीमध्ये.

संजनाचं डोकं तापलं तसे तिचे पूर्ण आणि सगळे केस एका रंगात रंगले. आधी कुठे कुठे झिपर्‍या रंगवलेल्या असत. काल तिने आरोहीला यशला गौरीकडून हिरावून घेतलं. तुझा संसार धड होणार नाही, असं काय काय ऐकवलं.
हिचा अभिषेक झाला. आपण काय केलं हे तिच्या लक्षात नाही. हिने अरुंधतीचा संसार मोडला आणि तिचाही दुसरा डायव्होर्स झालाय.

मालिकेत भांडणं कायम राहायला हवीत म्हणून कॅरॅक्टर्सचे विचार वाट्टेल तसे बदलतात.

स्वतःच्या मुलांबाबत अरुंधतीचा सिक्स्थ सेन्स कायम जागृत असे. इथे मनुबद्दल आशुबाळ काळाजी करतोय. तर ही त्याला तसं काही नाही, असं समजावतेय.
नितीन बिझिनेसमन आहेच, पण पार्ट टाइम डिटेक्टिव्हसुद्धा. तो कोणाचीही माहिती काढून आणू शकतो.

अभी कायमचा चाललाय का? म्हणजे मरणार वगैरे आहे का? त्याशिवाय एवढं फुटेज देणार नाहीत. कांचनला पण गुरुजींनी सांगितलं होतं ना तसंच काहीसं.

सगळ्या पात्राना आणी लेखक-निर्मात्याना मेमरी लॉसचा प्रचन्ड प्रॉब्लेम आहे....आधी काय झाल ते प्रेक्षकाच्या लक्षात असत पण हे रोज सकाळी उठुन रोजदारी वर स्क्रिप्ट लिहित असल्याने आधिच्या घटना पार विसरलेले असतात...अद्रुष्य गौरी बाय स्वतःच अमेरिकेला गेली ना? मग बॉल्न्ड सन्जनाने जेम्स बॉन्ड बनुन यशला धारेवर धरण्यात काय अर्थ आहे पण नाही काहीही बोलायच आणी काहीही दाखवायच...
अरुने नविनच मैत्री झालेल्या माया टिचरला आठवणीने यशच्या सापुला बोलावल पण बिच्चारी आपल्या आई आणी भावाला विसरली...

हो ना, अरुची आई, भाऊ, भाचा कोणाचाही उल्लेखही नाही.

माया नुसती आलीच नाही, बराचं वेळ थांबली सुद्धा. आशुला माया आवडू लागेल की काय ? तसही अरु कायम देशमुखांमधे बुडलेली असते. माया निदान मुलीचं चांगलं बघेल.

भरत.. Lol
हो ना.. तिला कशाला बोलावलं साखरपुड्याला?
आणि आशू कशाला तिच्या जाळ्यात फसेल?
तो तर अरुंधतीच्या प्रेमात पागल आहे...
पण हल्ली तो फारच मुलगी मुलगी करू लागला आहे..
That is something unlikely of his usual logical nature!

द ग्रेट डिटेक्टिव्ज आशु-नितिनची जोडी मायाचं गुपित शोधून काढणार आहे.

इतकं उघड आहे की मनू मायाची मुलगी असू शकते पण कोणीही तसा उघड उल्लेख नाही करते.

सध्या इरिटेट करण्यात कांचन पार मागे पडली आहे. संजना कित्येक मैल पुढे आहे. रूपाली भोसले बिग बॉसमध्ये अगदी नॅचरल वागत होती असं वाटू लागलं. संजनाच्या मागे मनू आणि मनूशी खोटं खोटं गोड वागणारं आशुबाळ.

अरुंधतीने दबून राहायला कांचन ऐवजी माया निवडली.

अगदी पहिल्या एंट्रीच्या भागात चॉकलेट मिळाल्यावर आज कोणाचा बड्डे आहे का असं विचारणारी मनु रात्री १२ वाजता बड्डे केक कुठे आहे, असं विचारते.

अरुंधतीची कसौटी जिंदगी की मधली प्रेरणा केली आहे. देशमुखांकडे काही महत्त्वाचं असलं की ती केळकरांकडे अडकणार आणि vice versa.

मला वाटलं अभिषेकचं प्लेन उडवतील. पोचला का तो कॅनडाला? अदृश्य जानकीशी बोलला का?

ती मनू फारच इंग्लिश मिडीयम मध्ये शिकणाऱ्या सोसायटी किड्स सारखी बोलते!
आणि पानी, देनार , म्हनाल..असे अशुद्ध बोलते.
आशू तिच्याशी कैच्या कैच कृत्रिम प्रेमाने वागतो.
नितीन हरकाम्या आहेच.

अनाथाश्रमातलं मूल दत्तक घेऊ इच्छिणारं कोणी ही मालिका पाहत असतील तर घाबरतील. अनाथाश्रमातली मुलं इतकी हट्टी आणि हावरट , सारखं काहीतरी मागणारी असतात म्हणून.

मनु म्हणजे क्वीन एलिझाबेथ. तिचा वाढदिवस २४ तास साजरा व्हायला हवा.

कालचा भाग फारच आचरट. यशचे कपडे भयानक. ईशाला वाढदिवसात इंटरेस्ट का आला? मिरवायला आणि केक खायला मिळेल म्हणून?

लहान भावंडांची जोडी खाऊसाठी भांडावीत तसे आशुबाळ आणि माया मनुसाठी भांडणार.

कालचा भाग फारच आचरट. यशचे कपडे भयानक. ईशाला वाढदिवसात इंटरेस्ट का आला? मिरवायला आणि केक खायला मिळेल म्हणून? >>>>> कान्चन आणि ईशा अचानक आरोहीमध्ये सुद्दा इंटरेस्ट घ्यायला लागल्यात! इतक गोड वागतायत तिच्याशी!

मधुराणी बाईंवर सुट्टी घ्यायची वेळ आली तेव्हा मालिकावाल्यांना अरुंधतीची आई आठवली. बिचारीला शुगर लो करून पाडलं आणि फ्रॅक्चर केलं.

Lol
अरुंधती ची आई आजारी पडली का?
मला तेच समजलं नाही की नक्की कोण पडलं...
पण ते तर काहीतरी आश्रमातील मुलं..एकटी कशी राहणार असे म्हणत होते ना?
कैच्या कैच चालले आहे

आशू ने माया ला घरी राहायची परवानगी दिलीच कशी?
असे random थोडी चालते ना...दत्तक चे काम

आणि बाय द वे, मनूच्या वाढदिवसाची तारीख कशी काय कळली?
ती तर अनाथाश्रमात होती ना

माया - आशुची जवळीक कशी होणार, म्हणून अरु गायब वाटतं.

मन जिंकणे काय, काहीही चालू आहे. मायाकडे पुरावे नाहीयेत वाटतं.

सगळी पात्रं सरड्याप्रमाणे रंग बदलत असतात.

शनिवार (पर्यंत)च्या भागातले आणि कालच्या भागातले काही पात्रांचे संवाद यु टर्न होते. संवादलेखक बदलला वाटतं.

आधी आरोही आपण सगळ्यांनी मनुच्या जाण्याची तयारी करायला हवी असं म्हणत होती. काल ती जाईल का रे? गेली तर आशुबाळ आणि अरुमॅमना किती त्रास होईल असं म्हणाली.

आशुतोषचंही असंच काहीतरी झालं.

मनु प्रश्नावर उपाय - आशु अरुचा घटस्फोट करून तिला त्याच घरात ठेवा आशुचं लग्न मायाशी लावा. मनु अरुला काकू म्हणते. त्यामुळे तिला काही फरक पडणार नाही. ती जादुगर आणि जादुगरणी सोबत मज्जेत राहील. अरुला देशमुखांकडच्या प्रश्नात जास्त वेळ घालता येईल. आणि त्यासाठी आशुची मदतही घेता येईल.

त्या कसल्या पुजेला आधी एकच मुहूर्त होता. आता दोन दिवसांनंतरचा दुसरा मुहूर्त मिळाला.

यशने ब्रश ब्रिश न करता पोहे खाल्ले. या मालिकेतला कोणत्याही जोडप्याचा रोमान्स फार खोटा खोटा ओढून ताणून वाटतो.

घरी नवीन आलेल्या मुलीने काही खायला केलं की तिला पैसे बक्षीस द्यायची पद्धत आपल्यात (मराठी लोकांत ) आहे का? मी हिंदी मालिकांत पाहिली आहे.

सध्या जुळून येती रेशीमगाठी बघतो आहे. त्यात एलिझाबेथ एकादशीच्या रिलीझच्या वेळी मधुगंधा = विजया गायब झाली. पण ते इतक्या कन्व्हिन्सिंगली दाखवलं आहे , की प्रमोशनसाठी त्या चित्रपटातली मुलं आल्यावरच संबंध लक्षात आला. आई आजारी आहे म्हणून टेन्शनमध्ये गेली. मग फोन वर बोलणं झाल्याचे उल्लेख. नवर्‍याने तिथे जाऊन येणं.

इथे अरु तिच्या फ्रॅक्चर झालेल्या आईला सोडून दोन दिवसांत परत.

Pages