आई कुठे काय करते!-३

Submitted by sonalisl on 8 August, 2023 - 08:18

आई कुठे काय करते!-२ वर प्रतिसाद संख्या २०००+ झाली. त्यामुळे पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे दत्तक घेण्यापूर्वी निदान आपला संसार तरी सेट करा ना. इतर सगळ्या भानगडीच निस्तरत बसले आहेत. काय जोडी आहे...यांच्यापेक्षा अप्पा आणि कांचन बरे.

इशा किती तण त ण करते. आरो ही ने यश ला व्य वस्थित फ्रेंड झोन केले तरीही तिच्या नावाचा दिवा घेउन बसला आहे. तो गोमु नाच लैच विनोदी होता. कानात गोम गेल्या प्रमाणे. येड्या नितिनला काहीही बाउंड्रीज नाहीत. आशुतोष पोर स्वभाव असल्याने एकदा मनात आले दोन मिनिट तेच.
मग ल्गेच विसरून नवे खेळणे. बायको मग मूल ते ही दत्तक विना मेहनतीचे की लगेच आरोही लेव्हल चाइल् ड. पुढे काय?! नात्यात एक पोर्गा नाही का. अनीश लाच दत्तक घ्यायचे. प्रश्न सुटला.
आज मुलगी व आजी घरी येणार ते दाखवले आहे. मुलगी मोठी आहे त्यामुळे आशूचे डायपर बदलायचे स्वप्न अधुरेच राहणार ग बाई.

आजकाल पुर्ण एपिसोड बघत नाही हॉटस्टार बंद करून टाकलंय मी. पण स्टार प्रवाह युट्यूब‌ चॅनेल वर ३/४ मिनिटांचे तुकडे टाकते ते दोन तीन बघितले.मजा मजा चाललीय एकुणच.

एक सीन बघितला त्यात अरु आणि आशु त्या दत्तक घेण्यासंदर्भात काही तरी बोलत असतात तर लगेच ती आरोही लगबगीने येऊन त्यांचा निर्णय ही झाला नसताना खुशाल त्यांची दत्तक मुलगी कशी भाग्यवान आहे आणि मी (म्हणजे आरोही) आज किती खुश आहे ते सांगायला लागते. काय संबंध? आता आरोहीचे मन राखण्यासाठी अरु होकार देणार बहुदा. लॉजिक च्या नावाने चांगभलं!

दुसर्या तुकड्यात अभि अनघाला दुसर्या मुलासाठी आग्रह करताना दाखवला आहे. आधी हाच अभि मला मुलं नकोय झालेच तर ते अरु ने सांभाळावे म्हणजे मला आणि अनघाला करियर करता येईल असं काही तरी बोलायचा ना? मग आता एकदम अबाऊट टर्न?

बाकी एक गोष्ट मात्र मान्य करायलाच हवी. अरुची इतकी भाषणं आणि प्रवचने ऐकुनही ना अभि बदलला, ना कांचन, ना इशा ना अनिरुद्ध. त्या बाबतीत ही मालिका अतिशय वास्तववादी आहे. ही सगळी मंडळी अरुच त्या त्या वेळेच म्हणणं खुशाल कानाआड करुन आपापले धोरण मागील पानावरून पुढे चालू ठेवतात.

तो डोळे उघडणे प्रकार अनिश सोबत झालेला दिसतोय मात्र कारण त्या वरच्या आरोही, अरु आशु सीन मध्ये रडणार्या आरोही ला अरुने जवळ घेतले हे बघून संतापलेली इशा काही तरी कुजकट बोलते तेव्हा अनिश म्हणतो तुला कुणाचाच आनंद बघवत नाही का ग? अनिश ह्या पात्राला अरुनेच न्याय (घटस्फोट) मिळवून द्यावा आणि ह्या निमित्ताने मालिकेला स्त्री पुरुष समानतेच्या ट्रॅक वर आणुन ठेवावे.

बाकी इशचे मानसिक वय लेखिकेने एकदा स्पष्ट करावेच, कारण आईने आपल्या कडे दुर्लक्ष करुन दुसर्या कुणाला तरी जवळ घेतले ह्याचा संताप मुलांना फार फार तर ३ वर्षांपर्यंत येतो.

पर्णीका, तुम्ही जुळून येती रेशीमगाठी पाहिली होती का?
त्यात नणंद अर्चना स्वतः: आठदहा वर्षांच्या मुलीची आई आहे. पण तिच्या आईने आपल्या नव्या सुनेला तिचं रडणं , घाबरणे थांबवण्यासाठी जवळ घेतलं, भरवलं तेव्हा अर्चनाने घर डोक्यावर घेतलं.

मी ही मालिका तेव्हा अर्ध्यातून पाहिली होती, आता सुरुवातीपासून पाहतोय.

नाही भरत मी नाही बघितली 'जुळून येती रेशीमगाठी '. मायबोली वर एखाद्या मालिकेची चर्चा रंगली तर मी ती पाहते. एका लग्नाची दुसरी आणि तिसरी गोष्ट आणि आता आई .... ह्या तिन्ही मालिका मी मायबोली वाचून बघितल्या. रेशीमगाठी ची पण चर्चा खुप चालायची मायबोली वर पण तेव्हा मी पर्सनल फ्रंट वर मी खूप बिझी होते त्यामुळे ती नाही बघितली.

नात्यात एक पोर्गा नाही का. अनीश लाच दत्तक घ्यायचे. प्रश्न सुटला. >>>>>>>>>> सॉरी पण हे काय तुम्ही सारख मुलगा मुलगा लावलय अमा? मुलगी दत्तक घेतली तर त्यात काय वाईट?

आधी हाच अभि मला मुलं नकोय झालेच तर ते अरु ने सांभाळावे म्हणजे मला आणि अनघाला करियर करता येईल असं काही तरी बोलायचा ना? मग आता एकदम अबाऊट टर्न? >>>>>>>> कान्चनने भडकावलय त्याला दुसर काय

निदान आपला संसार तरी सेट करा ना. इतर सगळ्या भानगडीच निस्तरत बसले आहेत. काय जोडी आहे...यांच्यापेक्षा अप्पा आणि कांचन बरे. >>>>>> नैतर काय. दुसरीकडे ईशा- अनिश लग्नाला १० वर्ष झाल्यासारखे भाण्डतायत. नवीन लग्न आहे पण नो रोमान्स. अप्पा-कांचन इज अ बेस्ट रोमॅण्टिक जोडी.

ईशाला सन्जनासारखी आई हवी होती. 'भुक लागली तर येईल ती खाली' वॉव!

अमा ! तुमच्या वारस म्हणून मुलगा हवा, मुलगाच घ्यायचा, मुलगी कशाला अर्थाच्या सगळ्या पोस्ट्स वाचुन आश्चर्य आणी खेद वाटला...तुमच एरवीच लिखाण अस नसत म्हणुन ते प्रकर्षाने जाणवल.

मला असं वाटलं की आई..... पात्रांचा रिग्रेसिव माइंडसेट अधोरेखित करण्यासाठी त्यांनी मुद्दाम तसे लिहलय. थोडक्यात ती वक्रोक्ती आहे.

अरे बंधु भगिनिंनो वैतागू नका. मी स्वतःच दत्तक दिलेली मुलगी आहे. मला दत्तक घेतल्याने आपल्या मुलाचा इस्टेटीचा चान्स गेला म्हणून माझ्या दोन्ही काकवा खार खाउन होत्या. त्यांच्या मुली अजूनही अ‍ॅक्नॉलेजही करत नाहीत वॉट्सॅप गृप वर. इतकी खुन्नस आहे. तेव्हा मलाही हा प्रश्न सतावत असे की आपल्याला सोडून कोणा मुलाला का नाही घेतले. त्या अनु शं गाने लिहिले.

आज लेकीची गोड बडबड. संजनाची लिंबू कलरची साडी. यश चा निर्धार.

अनुपमाच्या लेकीने क्रे डिट कार्ड वर भरपूर खरेदी केली म्हणून तिने दोन एपिसोड भर पूर लेक्चर दिले व आजच्या भागात धनत्रयोदशीचा प्रोग्राम म्हणोन एक राजकीय धार्मिक नाटुकले केले.

महाएपिसोडचा प्रोमो पाहिला. हे सगळे असे का उभे आहेत गार्डनमध्ये. गोलमेज परिषद भरल्यासारखे?

कान्चन दुटप्पी आहे. सणासुदीला हिला अरु लागते, पण हिच्या मनाविरुद्द निर्णय काय घेतला तर लगेच तु आता ह्या घराची कुणी लागत नाही?! वॉव!

अनुपमाच्या लेकीने क्रे डिट कार्ड वर भरपूर खरेदी केली >>>>>>> मध्यन्तरी ही हिन्दी ईशा सुधारली अस दाखवल होत ना?

सॉरी अमा. मी समजू शकते. Happy

आज दिवाळी अमावास्येच्या दिवशी देशमुखांचे कोजागिरी पौर्णिमा आहे.
आरोही, मला लग्न करायचं नाही म्हणत असताना यशची काय जबरदस्ती?

नितीन, केळकरांकडे पडीक असतो यावरून हे लोक आता प्रत्येक एपिसोडमध्ये एकतरी संवाद ठेवू लागलेत.

काल अप्पांनी ठरवलेल्या कोजागिरी मीलन कार्यक्रमात कांचनने आपला अजेंडा पुढे रेटला. आरोहीसाठी एक जरा जास्त वयाचा, घटस्फोटित, शब्द / नावे नीट न उच्चारणार , तिरसट इसम स्थळ म्हणून आणला.

ईशाला आतापर्यंत आरोही ही एक स्पर्धक होती. तिच्या जोडीला मनू आली. मनूला सगळा स्वैपाक येतो (म्हणजे कसा करायचा हे सांगता येतं).
अप्पांनी शांत केलेली ईशा तिला पाहून आणखीनच बिथरली.

आरोहीने यशला मनूबद्दल फार काही सांगितलं नाही. तरी सुलेखाने तिला घरी का आणलंय हे त्याला आपोआप कळलं.

मी बाकी सगळं सहन करू शकतो , फक्त लहान मुलांना रडताना बघू शकत नाही - इति आशुबाळ. बाळा , तुला रक्त बघितलं की चक्कर येते आणि झुरळ बघितलं की -- - - - -- जाऊ दे !

संजनाचे सगळे एम्प्लॉयी राजीनामा देऊन गेले. तिचा पदर जमिनीवर लोळत होता.

अनीश अन्घा आपापल्या स्पाउसबद्दल नावं न घेता कुचाळाक्या करत असतात हे नेमकं ते दोघे ऐकतात. त्यावरून ईशा यन्ग्स्टर्स ओव्हरनाइट पिकनिक, कँप्सला खेळतात तसले रिस्की गेम आजोबा ते पणती या वयोगटाच्या ग्रुपमध्ये खेळणार आहे.

प्रथेप्रमाणे जो संवाद या भागाचा प्रोमो म्हणून दाखवला, तो या भागात दाखवलाच नाही. तोच प्रोमो पुढील भागात म्हणून दाखवला.

भरत...हो ना..मी वाटच बघत बसले. प्रोमो मधले वाक्य आलेच नाही.
कांचन दीडशहाणे पणा करते. अगाव आहे !
आशू ला वेळच वेळ असतो.
अरुंधती उसासे टाकत बोलते.
संजना कडे किती employee होते?
ईशा चा गेम खरेच रिस्की आहे. आमच्या घरी असा गेम खेळला तर काय होईल असा विचार करूनच कापरे भरले.

आरोहीला म्हणे मदत नको आहे, मग ह्या घरात तरी का रहाते आहे ? काहीच्या काही चालू आहे आता. उगाच बघायचं म्हणून बघितलं जातयं आता आकुकाक.

ईशा यन्ग्स्टर्स ओव्हरनाइट पिकनिक, कँप्सला खेळतात तसले रिस्की गेम आजोबा ते पणती या वयोगटाच्या ग्रुपमध्ये खेळणार आहे. >>>>>> कॉय? म्हणजे Truth or Dare? बापरे! मी महाएपिसोड बघितला नाहीये म्हणून विचारल.

मग ह्या घरात तरी का रहाते आहे ? >>>>>> अरुने 'तुस्सी ना जाओ' केल म्हणून.

संजनाचा एकाच वाक्याचा संवाद खणखणीत होता. आरोहीबद्दल बोलताय तर ते तिने ठरवायला हवं इ.
अन्घाने आरोहीच्या आडून स्त्रियांना स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचा हक्क हवा म्हणत आपले घोडे पुढे दामटले.
आरोहीने आधी यशला सगळ्यांच्या विरोधामुळे नकार दिला होता. म्हणजे आपण एकत्र येणं इथे कोणालाच आवडत नाही , इ. मग संजना, अन्घाची डायलॉगबाजी ऐकून तीसुद्धा my life my decision वर आली.
अरुंधतीचा वेगळाच प्रश्न - यशला आरोहीशी लग्न करायचंय तर त्याने हे मला आधी का सांगितलं नाही?

बरं हे यश, अनिश, आरोही कमावते कधी झाले? गाणी करून यांना रेग्युलर इन्कम मिळतं? की वीणा संगीत विद्यालयात न जाताच अरुंधती सारखा भरपूर पगार मिळतो?
आपण आरोहीला प्रपोज करण्यात घाई केली याची यशला अक्कल आली. पण नंतर फिल्मी डायलॉग मारले. हा आधी गौरीशिवाय जगू शकत नव्हता. आता आरोहीशिवाय.
अनिरुद्ध आणि कांचन यांनी प्रोमोतला तो डायलॉग शेवटी म्हटला - अरुंधती तू आता देशमुख नाहीस. यशचे निर्णय तू घेऊ नकोस. अरे पण तो यश पंचविशी उलटलेला घोडा आहे. त्याचे निर्णय तोच घेईल ना? ईशाने घेतला तसा.

इतकं होऊनही आरोही बहुधा केळकरांकडेच राहील.

कोजागिरीला मसाला दुधासोबत भेळ करतात ना? ते मोठे मोठे बंद डबे बाहेर आणून उगाच ठेवले होते.

आमचा दिवाळी पाडवा आला तरी यांची कोजागिरीच ???
म्हणजे अजून करवा चौथ बाकी आहे , काय भरवसा नाही.

संजनाचा एकाच वाक्याचा संवाद खणखणीत होता. आरोहीबद्दल बोलताय तर ते तिने ठरवायला हवं इ. >>>>>>> अगदी अगदी. पण हे यशला कळत नाही ना.

इथे अभीच वेगळच चालू आहे. काय तर म्हणे तु प्रेम करण्याच्या कल्पनेच्या प्रेमात आहे. आपल्यावर कुणी प्रेम कराव अस तुला वाटतय. सो व्हॉट, मग काय झाल? आत्महत्या करण्याची कल्पना करण्यापेक्षा प्रेमाची कल्पना करण कितीतरी पटीने चान्गल.

<<<अरुंधतीचा वेगळाच प्रश्न - यशला आरोहीशी लग्न करायचंय तर त्याने हे मला आधी का सांगितलं नाही?>>>

धन्य ती अरुंधती आणि धन्य तिच्या कौतुकात नाहुन निघालेले सगळे. मध्यंतरी तिने '३ महिन्यात इशाला वळण लावीन नाही तर घर सोडून निघून जाईन ' अशी काही तरी प्रतिज्ञा केली होती ना? विसरली वाटतं!

संजना हे पात्र आधी बर्याच अंशी लॉजिकल दाखवलं होतं. अरु टीम मध्ये गेल्यापासून ती सुध्दा लॉजिक गुंडाळून वागते. त्या कुठल्याशा अनिरुद्ध चा सुड घेण्यासाठी आलेल्या आणि हिला हिचा बिझनेस बंद करायला भाग पाडण्यासाठी प्रयत्न करणार्या बाईशी हिने बिझनेस पार्टनरशीप केली या. तिचा हेतू जाणुन घेणार आहे म्हणे! गंमत म्हणजे स्वतः चा हेतु त्या बाईने लपवलाच नाहीये! ही त्या प्रमोद बरोबर पार्टनर म्हणून कॅनडात काही तरी करायला जाणार होती ना? ते रद्द झाल्यामुळेच ट्रुडो बिथरला असावा.

बाय द वे, " मी विसरण्याचा आजार विसरुन गेलो आहे ' असा काही तरी डायलॉग अप्पांनी कांचनला गमतीत मारला. आपल्यासारखेच त्यांचे फेसबुक, युट्यूब वरचे प्रेक्षक देखील त्यांना ह्या मुद्द्यावर रोस्ट करत असणार. सगळीकडून खेचली गेल्यामुळे सारवा सारव केली गेली असावी.

आता अभिषेक जान्कीला घेऊन कॅनडाला जातोय.

आशुबाळाच्या मातेने त्याच्यासाठी अरुंधतीला दातांच्या कण्या करून विनवले होतं. तेच संवाद रिसायकल करून अरुंधतीला आरोहीने यशबाळासाठी म्हणून दाखवले.

अंघाला पण नेणारे ना >> हो डायपर कोण बदलणार आणि हातात डबा कोण देणार. प्रोटीन शेक दुधात घालून कोण देणार?

पन अंघाला ताइ ला सोडून जायचे नसल्याने भांडण होईल. ह्यातली कोणतीच स्त्री लग्न ह्या मेजर व मेन रिलेशन शिप वर फोकसच करत नाहीत. भलतेच काहेत्री वर बडबडत असतात व एफ र्ट घेतात.

इशा: नवरा सोडून माहेरी व शॉपिन्ग व पार्टी नो एजु केशन ऑर वर्क.
अरु: नवरा रोज पोरासाठी रडत आहे पण हिचा अजून निर्णय होत नाही. आशूने करण जो हर सारखे मुलं व आईबरोबर सुखात राहिले पाहिजे. पण हात दगडाखाली असल्या सारखा वागतो वयस्कर माणूस
संजना : ही काय संसार करायला आणलेली नाही. पण कायम नोकरी, धंदा व सुं दर दिसणे हाच फोकस नवृयाला कडक टोमणे मारते. किती आया मुलापासून दूर असल्या तरी एक भावनिक कनेक्षन जपून ठेवतात मुलाबरोबर ते ही दिसत नाही.
आजी: ही वेगळ्यच युनिवर्स मध्ये जगते. नवरा फक्त ओवाळायला हवा असतो हिला.
अंगा मॅरिड ड्यु टू मला ताईजवळ राहायचे आहे. नवरा नको वेगळा संंसार नको. दुसरे मूल नको कॅनडा नको. विश्व माझे ताई पाशी

करण जोहरबद्दल+१. They haven't even consummated their marriage. तिचं गाणं वीणा संगीत विद्यालयात ऐकता आलं असतं
आणि तिने हापिसात डबे पाठवले असते.
Arundhati is literally fleecing Ashubal.

या मालिकेतलं एकही जोडपं सुखाने नांदत नाही . नितीन, अविनाश, केदार हेही धरा.
आणि तो यशची भूमिका करणारा अभिषेक लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळाची जाहिरात करतो.

ह्यातली कोणतीच स्त्री लग्न ह्या मेजर व मेन रिलेशन शिप वर फोकसच करत नाहीत >>>>> Lol Lol
हो ना. नव्या नव्या लग्न झालेल्या बायांना पण नवर्यापेक्षा इतर बाबीत जास्त रस असतो. अरु तर मुलांतून बाहेरच पडत नाही. आधी मुले, मग त्यांचे वेगवेगळे पार्टनर्स.
मुले जरा शाळेत जायला लागली कि बायका सुटवंग होतात. निदान प्रयत्न तरी करतात. हिने आशुशी लग्न करण्याऐवजी त्याला दत्तक घेतले असते तर त्याच्याकडे जास्त लक्ष दिले असते का?

उगाच म्हणायचं आम्ही मनाने कधीचे एकत्रच आहोत. हे अन्या समोर आणि आशूचे दु:ख कळत नाही का. बिचारा वात्सल्य दाखवायला धडपडत आहे. पण ही कोर्डी ठाक. एव्ढेसे पोर त्या घरात कुठेही वाढून जाईल व आया ठेवायची. सासू आहे. हिला काय करावे लागेल त्या मुलीचे.

मी १९८५- ८८ मध्ये हैद्राबाद मध्ये नारायण गुडा भागात राहात होतो. तिथे आमच्या जवळ च्या ओळखी तली एक बारकी दोन अडीच वर्शाची गोड मुलगी होती धनश्री. मी खूपच खेळत असे तिच्याशी व बेबीसिटिन्ग करत असे. १९८८ ला आम्ही बंजारा हिल्स ला शिफ्ट झालो तेव्हा तिला सोडून जायचे दु:ख अगदी ढसाढसा रडु परेन्त झाले. पुढे ही फेसबुक वर भेटली पुण्यात आहे. लग्न झाले आहे.

त्या आधी सुद्धा मी च शाळेत असताना खालच्या मजल्यावरच्या जोशांच्या नात वाला संभाळले आहे. त्याची आठवण झाली. आशू किती सज्जन आहे. आईसमोर रडतो पण बायको समोर गप्पच बसतो.

ती मनु म्हणाली होती की तिला शाळेत जायला आवडत नाही की जाता येत नाही. ती घरीच राहून स्वैपाकघरात निरीक्षण करीत बसे. मग ती इंग्रजी शब्द वापरत आणि इंग्रजी वळणाच्या उच्चारांचं मराठी कशी बोलते? आणि यशकडून इंग्रजी कविता शिकायला त्याच्यासोबत असा कितीसा वेळत्याच्यासोबत?

आज तर आशुबाळ जुन्या मराठी नाटक सिनेमातल्या स्त्रिया रडू फुटल्यावर तोंडावर पदर दाबून आतल्या खोलीत पळत तसं आत पळालं. त्याच्या निष्ठुर जोडीदाराला त्याची ही तडफड तळमळ दिसेना. अगदी जुन्या मराठी नाटक सिनेमातल्या निष्ठुर आणि पत्नीच्या भावनांबद्दल अनभिज्ञ नवर्‍यासारखी अरुंधती आपण तो आकाशकंदिल पूर्ण करू असं हसत हसत म्हणाली.

अन्घाला आलेल्या फोनवर अभि आणि त्याची मुलगी यांना कॅनडाला शिफ्ट व्हायचं आहे असंच सांगितलं. बहुतेक त्याची ती वन नाइट स्टँडवाली मैत्रीणपण येणार असेल किंवा ती कॅनडातच असेल. नाहीतर आणखी कोणीतरी.

पण भारत कॅनडा संबंध बिघडलेत हे यांना माहीत नाही का?

Pages