आई कुठे काय करते!-३

Submitted by sonalisl on 8 August, 2023 - 08:18

आई कुठे काय करते!-२ वर प्रतिसाद संख्या २०००+ झाली. त्यामुळे पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरुंधतीच्या आणि कांचनच्या भारी साड्या- दागिन्यांसमोर ईशा अगदीच लंकेची पार्वती वाटते.>>>
नवरा बायको दोन्हीही कमवत नसताना दुसरे काय होणार? तशी अरुंधती काम करत नसली तरी तिला आश्रम आणि संगीत विद्यालयाचा पगार पूर्ण मिळत असावा. नवऱ्याचा नितीन चालवत असलेला बिझनेसही आहेच की.

आता आश्रमातल्या बायका एक मूल सांभाळताहेत म्हटल्यावर आशुबाळालाही बाळ हवं झालं. >>>
हनिमून झाला का?

हो...दत्तक आणतील.
अरुंधती ने चेहेरा फारच विचित्र केला हे सांगताना की मुल शक्य नाही आता...

एक फार विनोदी वाटले. अनघा मुलीला घेउन आश्रमात गेली होती ना? मग ती आशुतोष नित्याच्या घरी कशी काय येते बाळ रडत असताना? आश्रमात पोहोचून मुलीला झोपवले असते ना?! पण ती इथे येते व मुलीला झोपवते त्यात अर्धा तास गेला. व मग पटटकन आश्रमात जाउन काउन्सेलिन्ग करुन परत पण येते!!! तो आश्रम दूर आहे ना? लगेच आशूला पान्हा फुटलेला आहे. पण अरु तर मेनोपॉज व पुढे गेलेली आहे.

अजून ह्याचा हनिमून झालेला नाही तरी बिचारा मी समाधानी आहे मी समाधानी आहे म्हणतो. दयनीय परिस्थिती.

आशुबाळाच्या आत एक बाप लपला आहे , त्याला जागा करण्यासाठी सगळा खटाटोप.

याआधी या लोकांनी कामाचं नाटक आशु अरु च्या हनिमूनच्या आधी केलं होतं. तेव्हा ऑफिस मध्ये फर्निचरचं काम चालू आहे , म्हणून नितीन फाइल्स घेऊन घरी आला. आज पेस्ट कंट्रोलचं निमित्त.

आरोहीचं नाटुकलं महिला आश्रमातच झालं होतं ना? त्यात अन्घा सामील होती तरी आज ती म्हणाली किती दिवसांनी मी आश्रमात गेले.

आज पण आशुबाळ निळी फाइल शोधत होता.

अरुंधतीची डबल चिन दिसते आहे.

मला बाळ हवंय असं आशुने सांगितल्यावर अरुंधतीच्या चेहर्‍यावर उमटलेल्या भावांचा अर्थ - अरे तूच मला माझ्या बाळासारखा आहेस.

लोकेशन्स - समृद्धी बंगला - बोरिवली. केळकर हाउस - पार्ले. महिला आश्रम आणि संगीत विद्यालय - पनवेल. महिला आश्रमाचं ऑफिस - बोरिवली. अरुंधतीचं माहेर - डोंबिवली.

इकडून अनिश - आरोही आणि ते जातात म्हणून ईशा समृद्धीवर जाणार होते. घरात नंतर दिसले नाहीत, म्हणजे गेले असावेत. तिकडे यश कांचनला सांगतो - तुम्हांला आवडत नाही म्हणून मी आरोहीला घरी बोलवत नाही.

संजनाच्या बिझिनेस रायव्हलने तिच्या नवर्‍याचा आणि बापाचाही खून केला असावा. हे अरुंधती तिच्याकडून वदवून घेईल.

आज ती म्हणाली किती दिवसांनी मी आश्रमात गेले. >>> आणि मग म्हणते सगळं कसं तिथे व्यवस्थित चालू होतं . ... म्हणजे तुझ्याशिवाय कामाचे बारा वाजणार होते ???? कोण आहे ही ??

अरू रैकॉर्डिंग आहे म्हणत होती , ते काय सोडून लवकर आली नातीला बघायला.

भरत, स्वस्ति... तुमच्या इतका लोकेशन्सचा आणि टायमिंगचा आणि आधी काय म्हटलं होतं त्याचा...ट्रॅक खुद्द लेखकही ठेवत नाही..कलाकार तर काय....सांगितल्या डायलॉग चे धनी !!!! Lol

<<<<मग म्हणते सगळं कसं तिथे व्यवस्थित चालू होतं . ... >>>

:). अरुंधती नाही का जात आजकाल तिथे. सगळ्या जगभर समस्या शोधत फिरत असते, आश्रमातल्या लोकांच्या समस्या कधी सोडणार ही? त्या प्युन ला पुढचं शिक्षण घ्यायला प्रोत्साहन द्यायचे आहे, त्या एका बाईच्या नवर्याने आशु ला चाकु मारला तिला स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करायची आहे. बाकी अरुंधती कडे नव्याने काम करु इच्छिणाऱ्या कुठल्याही व्यक्तीसाठी एकच सजेशन आहे, गाणं! ते ही यश अनिश दोघांच्या मदतीने. न गाणार्या लोकांचे काय?

आजचा भाग पण लैच विनोदी. आज ते मला बाबा व्हायचे आहे पूर्ण डिस्कशन झाले. अरुच्या चेहर्‍यावर पोट बिघडल्याचे हाव भाव होते. तरी येडं मला तू म्ह णतीस तो निर्णय मान्यच असेल म्हणतो. हिने नवृयाच्या गळ्यात चांगलाच पट्टा बांधला आहे. ते ही काहीच अ‍ॅक्षन न घेता. ही त्याला टॅक्ट फुली दूर ठेवत असते. मग हा रोज कसे काय करतो?! अरुंधतीला नुसते बघून किती दिवस खळ्ञा पाडत ओठ मुडपून हसेल.? मर्दुएका कुच प्राबलेम लगरा. पोर दत्तक घेतले की इस्टेट पोराला जाईल. ही विचार करायला वेळ मागून घेते म्हणे. लॉयर चा सल्ला घेइल पहिले. तिचा निर्णय होईतो आशू ७५ चा होईल.

इकडे अनघा फार उत्साहात आपले मूल तिसरेच कसे संभाळतात छान हे अभि ला सांगते व ओरडा खाते. आता पण ते पोर अप्पा जवळ झोपले म्हणे. आता अन्या राधिका संजना अरु हे वेगळेच वळन/ दळण चालू झाले आहे.

आज आरोही व यश गप्पा मारत होते तरी म्हतारी डूक धरून बघत होती. आता यश चे नाव अनुरूप मध्ये नोंदवणार च म्हणे. आरोही अ‍ॅडवान्सड बुकिन्ग आहे एकदम रात्रीची अनीशच्या मागे बाइक् वर बसून आली. त्या ला पण तितकाच आधार कारण आल्या वर इशाने साले काढली. ह्यांचे लग्न भांडण्या पुरतेच आहे का? नव प्रेमाचा लवलेशही दिसत नाही. रादर लव्ह लेस म्यारेज .

संजना अन्याचा एकदम प्लीज सॉरी थँक्यु करत करत संवाद. तो तिला एक पत्र देणार व त्या आधारे हुशार गायिका राधिकाला खोटे पाडणार.
की लगेच संजना चा इन्सिटियुट चा मार्ग मोकळा. प्लॉट लिहिणार्ञा ला पोकळ बांबूने मारले पाहिजे. अनुपमात पण चार सहा महिन्यांची लीप झाएली आहे. काव्या सात महिन्याची प्रेगंट. तिची आता परत गोद भराई आहे. अनुपमा व अनुज चे प्रेम सासूला बघवत नाही.

ती राधिका झालेली अगदीच 'ही' वाटली. मला वाटल कुणी Dashing स्मार्ट व्हॅंंम्प असेल. केवढा गाजावाजा केला होता हिचा.

हि नक्कीच माया असावी छोटया अनुची आई. हिन्दीमध्ये छान एक्ट्रेस घेतली होती.

अनुपमा व अनुज चे प्रेम सासूला बघवत नाही >>>>>>>> कुठल्या सासूला?

कुठल्या सासूला?>> अपरा मेहता. पहिली सासू टीव्ही वर ची आता अनुज ची आई बनून आलेली आहे. सारखी टुकत असते. हे पण कोणालाही घरी ठेवुन घेतात. अनूज कायम बाय कोच्या प्रेमात मेंगळट शायरी करत असतो. हे म्हणजे फोन उचलला की लोक स जे गाणी लावुन ठेवतात कॉलर ट्युन ती ऐकावी लागतात तसे आहे. ह्याने तोंड उघ डले की पहिले अनुप मा प्रेम चार वाक्ये शायरी बोलतो मग कामाचे बोलतो.

मागे पर्णीका यांनी लिहिलं होतं तसं जानकी, निखिल, जिगर यांना बोर्डिंग शाळेत घाला. नितीन आपण काहीतरी पराक्रम केल्याच्या थाटात मी जिगरच्या शाळेची पीटीए मीटिंग विसरलो हे सांगतो. सकाळच्या चहापासून केळकरांकडे दिसतो आणि त्यांच्या कौटुंबिक बाबींत नाक खुपसतो. त्याचा डायव्होर्स झाला असं दाखवून त्यालाही केळकरांकडेच राहायला ठेवा.
समृद्धी बंगल्याप्रमाणेच केळकर सदनातही खोल्यांची संख्या आपोआप वाढत जाते. आधी सुलेखा एकटी , मग आशुबाळ आलं, मग अनिश आला. मग अरुंधती आली ती आशुबाळाच्या खोलीत सामावली. मध्ये चिंगी आली. ती गेली तर आरोही आली. चिंगी /आरोही सुलेखाच्या खोलीत राहायच्या असं काही म्हटलेलं नाही. चार बेडरूम्स + न्हाणीघरं पहिल्या मजल्यावर. त्यांचा दिवाणखाना इतका लहान की सगळे देशमुख आले तर बसायला जागा पुरत नाही. किचन तीन फूट बाय चार फूट. एवढ्या जागेच्या वरच्या मजल्यावर चार प्रशस्त बेडरूम. नितीनसाठी पण एक बांधून टाका.

नितीन आशुबाळाला म्हणाला तुझ्यात चांगले मॅटर्नल इन्स्टिंक्ट्स आहेत. तू चांगला बाप होशील. जेंडर न्युट्रल रोल म्हणून पॅरंटल आणि पालक तरी म्हणायचं.

हल्ली दोन तीन लोक बोलत असताना चौथ्याने लांबून बघत बसायची टूम निघाली आहे. रेकॉर्डिंगनंतरच्या यश आरोहीच्या भयाण पकाऊ गप्पा आणि मग त्यांचं आचरट फोटोशूट कांचनला नीट दिसलं. कालची तीन बायकांची रस्त्यावरची मीटिंग अनिरुद्ध कारमध्ये बसून बघत होता. मीटिंग संजनाच्या इन्स्टिट्यूट खाली होती, तर त्या इन्स्टिट्युटचा बोर्ड बिर्ड तरी दिसला का?

आरोहीच्या बाबत जे झालंय त्यामानाने ती बरीच लवकर मूव्ह ऑन झाली आहे असं वाटतं आहे का? की मलाच तस वाटतंय?

आरोहीच्या बाबत जे झालंय त्यामानाने ती बरीच लवकर मूव्ह ऑन झाली आहे असं वाटतं आहे का? की मलाच तस वाटतंय?>> हो प्लस स्लीवलेसच घालून असते कायम

Lol भरत, अगदी अगदी !
अन्याला गाडीत बसलेले किमान पंधरा वेळा दाखवले. तोच शॉट !!!
भरत, तुमचे architectural perspective मस्त आहे..अशुच्या घराचे

आरोही आणि यश प्रीवेडींग सारख्या पोझ का देत होते. आरोही छान छान कपडे घालते. कुठून आणते. राधिका अगदीच बच्ची वाटते. संजनाचे वजन वाढले आहे.

कुठल्या सासूला?>> अपरा मेहता. >>>> ओके. धन्स अमा Happy

सकाळच्या चहापासून केळकरांकडे दिसतो आणि त्यांच्या कौटुंबिक बाबींत नाक खुपसतो. >>>>>>>>> ईशा सेम हेच म्हणाली तेव्हा आशू किती चिडला तिच्यावर.

आरोहीच्या बाबत जे झालंय त्यामानाने ती बरीच लवकर मूव्ह ऑन झाली आहे असं वाटतं आहे का? की मलाच तस वाटतंय? >>>>>>>> अगदी अगदी. जे काही झाल त्यानन्तर ती पुरुषान्शी इतकी फ्रीली कशी काय वागू शकते? तिला मध्यन्तरी पॅनिक अ‍ॅटेक आला होता ना?

बाकी ईशा आशूला ' ह्या वयात तुम्ही मुलाचा विचार करतात, जरा तुमची वये तरी बघा' म्हणत होती तेव्हा अस वाटत होत की जस काय अरु- आशू मूल दत्तक न घेता जन्मालाच घालणार आहेत.

राधिका खोट बोलत असेल. तिच मुल किव्वा मुलगी अनाथाश्रमात असेल आणि नेमकी तीच मुलगी अरु दत्तक घेईल.

हिन्दीमध्ये माया तिच्या नवर्याच्या खुनाचा आरोप अनुजवर करते अस दाखवल होत. नीट नक्की आठवत नाही.

आरोहीला दत्तक घेता येईल की आशुरुला. सून दत्तक मुलगी, जावई पुतण्या अरुचा.

अन्या- संजना नक्की नांदत आहेत की नाही तेच ठरलं नाहीये अजून लेखकाचं. कधी टोमणे कधी प्रेम उतू जातं दोघांचं.

आरोहीला दत्तक घेता येईल की आशुरुला. सू>> तेच म्हणते पण मग आशू ला बाबा व्हायचा अनुभव कसा मिळेल. त्याला बाळ खेळवायचे आहे. वाढवायचे आहे.

आज अरु स्वयंपाक करता करता विचार करत कसनुसा चेहरा करून उभी होती. तर प्रेशर कुकर ठीक आहे तीन शिट्ट्या झाल्या व आज्जीने तो बंद केला गॅस. पण शेजारी काहीत री झाकणा खाली कढईत शिजत होते ते नक्की जळले असेल कारण फुल गॅस होता. आज्जी आरु चे बोलुन होईतो.

अरु चे कसे आहे पहिले लग्न एकदम एकदम १००% डोमि ने टिन्ग वातावरण. तिथून बाहेर पडल्यावर केळ करांकडे एकदम १००% बोट चेपे वातावरण. तू जो निर्णय घेशील तो. तुला हवे तसे ह्याव अन त्याव पण फर्म आम्हाला असे असे हवे आहे. हे कधीच नाही.

आशू किती एंटाय टल्ड व प्रिव्हिलेज्ड आहे. पोर दत्तक घ्यायचे तर ते ही मेहनत नाही. घरच्याच आश्रमात पोर आधीच आली आहे. निदान
चांगला गट्टू मुलगा घ्यायचा व पूर्ण इस्टेट त्याच्या नावावर करून द्यायची. मग आरु काय विचार करते ते बघावे.

अनीश ईशाचा लवकर डायव्होर्स करून टाका. त्यांच्या भांडणांचा कंटाळा आला.

आरोहीला इम्प्रेस करायला यश सारखी जाकिटं घालायला लागलाय का?

आधी हे लोक एकेकच ट्रॅक रडत खडत चालवायचे. आता अचानक ईशा- अनीशचं भांडण, अरुंधती - आशुबाळाला बाळ , अन्घा अभिषेकला दुसरं बाळ, संजना अनिरुद्ध दिलजमाई , अनिरुद्ध राधिका खून का बदला , यश आरोही प्रेम एवढे सगळे ट्रॅक भरधाव वेगात सुरू केलेत. इतके की कांचनबाई दसरा विसरल्या.

सुलेखाशी बोलताना अरुंधती म्हणाली की आशुबाळाने माझ्याशी जेव्हा बाळाचा विषय काढला तेव्हा त्याच्या चेहर्‍यावरचे निरागस भाव मी बघतच राहिले. की असंच काही. निरागस नक्की. आता बाळ हवं हा विषय निरागस कसा? आणि आशुच्या चेहर्‍यावर एक्स्ट्रीम पेन होत असल्याचे एक्स्प्रेशन्स होते. हे एक्स्प्रेशन्स या आधी त्याने अरुंधतीला तिच्या रेन्टेड फ्लॅट मध्ये प्रपोझ केले होते, तेव्हा दिसले होते.

भरत...काय मस्त ! Lol
निरागस भाव, एक्स्ट्रिम पेन...!! Biggrin

आणि आशुच्या चेहर्‍यावर एक्स्ट्रीम पेन होत असल्याचे एक्स्प्रेशन्स होते. हे एक्स्प्रेशन्स या आधी त्याने अरुंधतीला तिच्या रेन्टेड फ्लॅट मध्ये प्रपोझ केले होते, तेव्हा दिसले होते.>> बाळाच्या कळा असाव्यात. ह्यांना रिलेशन शिप मधली इंटिमसी दाखवायला आजिबात जमत नाही त्यामानाने अनुज अनुपमा अ‍ॅक्टर असूनही आपल्याला नवरा बायको ते ही प्रेमातले वाटतात. जरा जास्तीच करतात पण तरी तो एक वेगळा पदर नीट दाखवला आहे.

आजचा भाग फुकट टाइम पास टाइप होता. अर्धावेळ कार मध्ये त्यातही अनीश इशा जोडपे असून बायको मागे. इशाला एकदम काय झाले आधीतर अनीस अनीस करत होती पण लग्न झाल्या झाल्या तो जन्माचा वैरीच असल्या सारखी का वागते?! ह्याच्या पेक्षा बरे आपण ऑफिस कलीग बरोबर पण वागतो. अन्या बरोबर होता मंजे. तर मुली मागे मुले पुढे अशी नैतीक डिव्हिजन होती. यश आरोही मागे बसले असते तर जरा कारोमान्स ला संधी होती.

एक बोअर व्हिजिट इकडे आरोहीचे अनाथालय. व एक रँडम बाई परत रि कॅप. तो आरोहीने फ्लू झाल्यासारखा झटकून टाकला आहे.
तिकडे आशू आरू आपल्या सर्वांच्या माहितीच्या लोकेशनला कोर्ट/ मंदीर/ कॉलेज जातात व मुलीची चौकशी करतात. आशू बिनडोक व व्यवहार शुन्य आहे. मुलगा घ्यायचा ना व इस्टेट ला वारस झाला असता. पण हा बयकोचा नंदी बैल आहे. म्हणून मुलगीच. आरू एरवी अन्या समोर नांगी टाकत असे पण इथे जरा भाव मिळतो आहे दिसल्यावर लगेच आढेवेढे. मला नाही जमणार चालू झाले. खरेतर तिची खरी करीअर तीच आहे. ( जसे अनुपमा प्रत्येक भागात मेरे तीन बच्चे है और चौथे को बडा कर रही हू. सांगत असते. विसरूच देत नाही.) पण आता नवे मूल!!!
खरे तर आजीच सांभाल णार पण ही इशासारखीच दुष्ट आहे. नवर्‍याला कसले च सूख लाभू देत नाही. पण येडे तरी तिलाच चमच्याने काहीतरी भरवत आहे. व तू मुलांना आव्डतेस, सर्वांनाच आवड्तेस मोड् मध्ये आहे. बाइल बुद्ध्या. एकदाही त्याला आपले मत ठाम पणे मांडताना बघितलेले नाही.

अनुपमाची सासू एकदम हळू हळू जहर घोलत आहे. त्या मानाने अरुची सासू लैच मेंगळट.

आणि हीच अरुंधती जानकीला सांभाळायची तयारी येता जाता दाखवत असते.
आशुबाळाला सतत कोणीतरी आधार लागत असावा. अमेरिकेत एकटा कसा राहिला देव जाणे.

अमा, मुलगाच वारस हवा हे पॅट्रिआर्कल नाही झाले का?

अरुची सासू मेंगळट म्हटल्यावर दचकायला झालं. पण मग हे सुलेखाबद्दल असावं हे लक्षात आलं.

पर्णीकांनी इथे लिहिलं होतं की कांचन सध्या सोफा ते देवासमोरचं आसन एवढंच चालते. ते तिने वाचलं वाटतं. आता किचनमध्ये, बंगल्याच्या आवरात जायला लागली.

नितीन केळकरांकडे पडून असतो यासंदर्भातले त्यांच्यातले संवाद मुद्दाम आपल्याला चिडवायला लिहिल्यासारखे वाटतात.
आज आशुबाळाने नाचायला गाणं काय निवडलं तर गोमू संगतीने. याचा ओरिजिनल डान्सच भयानक. आणि रात्री उशिरा हा डान्स सुरू असताना नितीन दार उघडून आला. मला वाटलं याच्याकडे घराची चावी देऊन ठेवली आहे का, तर लगेच तसा संवाद आला. पुढे मी माझ्या घराचा पत्ता विसरतो. आणि हा उगाचच एवढ्या रात्री इथे आला होता?

मुळात असं लगेच दत्तक कसं घेता येईल मूल ? काही प्रोसेस वगैरे आहे की नाही ?

उद्या त्या मुलीला ईला भाटे घरी आणणार. त्यापेक्षा रेडीमेड आरोहीला घ्यायचं ना दत्तक

Pages