पठाण - शाहरूख खान

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 March, 2022 - 13:59

पठाण - शाहरूख खान

हमारे देश मे हम नाम रखते है हमारे धर्म या जाती से
पर उस के पास ईन मे से कुछ नही था

यहा तक के उस के पास कोई नाम रखनेवाला भी नही था

अग कुछ था...... तो बस यही एक देश, ईंडिया !

तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..

(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )

और जिनका नाम नही होता, उनका नाम करन उनके साथी कर देते है

और ये नाम क्यू पडा कैसे पडा..
ईस के लिये थोडा सा ईंतजार किजिये

जल्द ही मिलते है.....

पठाण से !!!!

............

हो, तो येतोय.
हिंदुस्तान की आन बान शान, खानों मे खान, किंग खान शाहरूख खान, बॉलीवूडचा देव आता खुद्द पठाणच्या रुपात येतोय.
खान के घर मे देर है पर अंधेर नही.. कोरोनाच्या लाटांवर मात करून तो आपल्या मनोरंजनासाठी पुन्हा येतोय.. शाहरूख संपला अश्या अफवा उठवणार्‍यांना चोख उत्तर द्यायला येतोय Happy

पठाण
https://www.youtube.com/watch?v=Ymu9wVN7pWs
फक्त तारीख सांगितलीय, आणि त्याला १० मिलियन व्यूज पडलेत Happy
तुम्हीही बघा, अंगावर शहारा येतो Happy

पठाण चित्रपटावर आणि शाहरूखच्या मोठ्या पडद्यावरील दमदार आगमनावर चर्चा करायला हा धागा हे सुज्ञ मायबोलीकरांना वेगळे सांगायला नको Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिने काय घालावे हे मी सांगत नाही तर इतकी वर्षे इथे काढुन, काही चांगले चित्रपट देऊनसुद्धा तिच्यावर इतक्या खालच्या पातळीच्या अंगप्रदर्शनाची वेळ यावी याचे वाईट वाटले. कदाचित निर्मात्यांना चित्रपटाची खात्री वाटत नसावी म्हणुन थेटरात पब्लिक खेचण्यासाठी हे केले असावे, कोणास ठाऊक.

चलो. जंग शुरू हो जाय. वरून ऑर्डर आली आहे. लाल चिंधी, बैल भडकला.
Bhopal: Madhya Pradesh Home Minister Narottam Mishra today took objection to actor Deepika Padukone's bikini in a song of the film "Pathaan" and said if certain scenes are not "corrected", the government will consider what to do about its screening.

काही चांगले चित्रपट देऊनसुद्धा तिच्यावर इतक्या खालच्या पातळीच्या अंगप्रदर्शनाची वेळ यावी याचे वाईट वाटले. >>>>
स्पर्धेतून बाहेर पडण्याचा भीतीमुळे असेल.

अर्थ! काय बकवास गाणं आहे. दिपिकाला ना ते कपडे ( जे काही आहेत ते) शोभत आहेत. ना तो नाच (जो काही आहे तो) शोभत आहे
काहीही नको तिथे ठुमकतेय लचकतेय.

>>>>>>>दिपिकाला ना ते कपडे ( जे काही आहेत ते) शोभत आहेत. ना तो नाच (जो काही आहे तो) शोभत आहे
+१००
शाहरुखही हिप्पी दिसतोय. शॅबी!

नेहमीची टीम सोडून.
अक्षय,अजय,सलमान,शाहरुख,दीपिका,आलीय,अमीर,अभिषेक,अमिताभ, , कपूर खानदान ,सिन्हा खानदान,आणि ह्या सर्व
लोकांच्या मुल बाळ .
ह्यांच्या व्यतिरिक्त
एका तरी नवीन कलाकार बॉलिवूड मध्ये आहे का?
ह्यांना किती दिवस सहन करायचे.

दीपिका नी पण पन्नाशी गढली आहे.>> नाही ओ सर. तावातावाने तुम्ही काही पण ठोकून देता.

पण अजून हिला सिनेमे मिळतात.
ते पण नायिका म्हणून>> ५७ -५८ वर्षाचा शारुक चालतो हिरो म्हणून!!

Protesters Burn Effigies Of SRK In Indore. Their Demand: Ban 'Pathaan'
The protesters have raised to Deepika Padukone's costume in the song 'Besharam Rang'
Indore: Activists of an outfit on Wednesday staged a protest against the upcoming Bollywood film "Pathaan" and its song "Besharam Rang" in Indore city of Madhya Pradesh.

जे एन यू मध्ये जाऊन caa विरोधकांना साथ देणारी दीपिका आणि भारतात tolerance राहिला नाही म्हणून ओरडणारा शाहरुख दोघेही पठाण निमित्ताने एकत्र आले आणि दुग्धशर्करा योग जुळून आला .
राईट wing च्या दृष्टीने पूर्वीच्या वकात्व्या बद्दल बदला घ्यायचा म्हणुन पठान sathi बॉयकॉट ट्रेण्ड चालवत आहेत .
तर मीडियाचा फोकस रहावा म्हणूनच शारुक् ने बेशरम रंग गाण्यात भगवा रंग वापरला असेल असे वाटतंय .
बाकी थेट्रात जाऊन बघण्यासारखा पठान मूव्ही वाटतं नाही .
Ott वर येण्याची वाट बघणार ......

दीपिका नी पण पन्नाशी गढली आहे. >>> माबोरवचे सगळे स्पर्धक बाद करून दीपिकेला आपल्या गोटात आणायची ही ट्रिक जबराट आहे.

या लॉजिकने दोन्ही रणवीर पण पन्नाशीच्या पुढचे होतील आणि आलिया गेला बाजार आमच्या गोटात येईल. धन्यवाद सर.

या गाण्यातले वातावरण, आजूबाजूच्या ललना बघून कॉकटेलच्या तुम्ही हो बंधू गाण्याची आठवण येत होती. ते जास्त छान आहे म्हणा. गायिका सेम आहे का?

खर्‍या साधकास अशा गाण्यातूनही ध्यान लागते. ब्रह्मानंदी टाळी लागते. साक्षात तेजाचे दर्शन होते. पंचतत्वांपैकी मृदा हे तत्त्व सोबत किंवा समोर नाचत असताना ध्यानधारणेसाठी अजून काय हवंय ?
(हे गाणं म्युट करून देहाची तिजोरी लावून पहा. आतला दिवा प्रकाशमान झाल्यावर मिळणार्‍या आनंदाची अनुभूती येते).

मी इकडचे वाचून पाहिले गाणे! मला आवडले ऐकायला. फार नाही पण तरी ठेका आहे.
शाखा & दिपिका दोघंही हॉट दिसतात. आजकाल दिपिका ने घातलेले कपडे कुणीही (ऑर्डीनरी म.वर्गिय, उ.वर्गिय स्त्रिया) आयलंड्/क्रुस ई. ठिकाणी घालून मिरवतयं. ती तर दिपिका आहे आणि परफेक्ट फिगर आहे. का नाही घालायचे तिने? सनी लि. ला डोक्या वर घ्यायचे मग हिला का नाही? हिला तर अ‍ॅक्टिंग, डान्स, अदा सगळं येतंय की Happy
पिकु मधल्या ड्रेसेस मधे कसली ग्रेसफूल दिसलिये ती! मला तशी जास्त भावते.

शाखा.. जर बॉडी खरी असेल तर कौतुक च आहे, पण खरंच त्याने आता डियर जिंदगी सारखे रोल्स करावेत, जास्त हॉट दिसतो Wink

कागाळू सर, नेहमीप्रमाणे तुमची माहिती चुकली आहे. जे एन यू मध्ये अभाविपच्या गुंडांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मारहाण केली होती. दीपिका तिथे जाऊन त्यांच्यासोबत उभी राहिली.
जर तुम्ही शाहरुखच्या टॉलरन्सवाल्या विधानावरून त्याच्यावर बहिष्कार घातलात तर त्याचेच म्हणणे सिद्ध कराल. अर्थात हे तुम्ही नेहमीच करता. खरं म्हणजे तुम्ही किती टॉलरंट आहात हे सिद्ध करायला हा चित्रपट सुपरहिट करायला हवा.

वरचे शरीर शक्य तितके अनावृत्त ठेवलेले पाहायची सवय होतीच पण हॉलिवुडच्या रेड कार्पेटवर आता खालचे शरीरही शक्य तितके अनावृत दाखवायची फॅशन पाहुन ही बॉलिवुडमध्येही अवतरणार हे माहीत होते, ते पडद्यावर पाहुन झाले.

शाहरुखकडे लक्ष जावे असे फारसे काही दिसले नाही, गाणे दीपिकेचे आहे, तीच ठळकपणे दिसते. शिल्पा रावने गाणे सुंदर गायलेय, ऐकायला छान आहे पण पडद्यावर दीपिकेच्या तोंडी >>>>>>एकदम खरे। ती वाणी कपूर छान वाटली असती। तिच्यावर असली गाणी शोभतात।

कोणाविषयी द्वेष नाही.
त्यांच्या सामाजिक भूमिके वरून .
आपल्या कडे आहेच ती पद्धत एकदा चिकटला की हाकलून दिल्या शिवाय सोडत नाहीत.
Bollywood मध्ये जी अवस्था आहे तशीच क्रिकेट मध्ये पण आहे वय उलटली तरी टीम मध्ये असतातच जो पर्यंत bcci हकलात नाही.
बांगलादेश ची टीम बघा कशी अगदी young आहे आणि आपली बघा .
त्यांची वय बघा

>>> तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..

(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )
>>>
चित्रपटाच्या वरच्या थीमशी गाणं किती सुसंगत आहे?

आशु29 शी एकदम सहमत.बीच आणि मोनोकिनी वाली गाणी बरीच आली आहेत बॉलिवूड मध्ये , फक्त याच गाण्यावर आक्षेप का?
ती चांगली दिसलीय सगळ्या मोनोकिन्यामध्ये.काहींचे रंग फारच झगरी आहेत.
गाणं ऐकायला भंगार आहे हा वेगळा मुद्दा.

आजकाल दिपिका ने घातलेले कपडे कुणीही >>> दिपिका च्य स्कर्ट चे डीटेलिंग पाहिले एका मीम (ब्लड चढवायची गरज आहे असा) मधे आज Sad त्या स्कर्ट ला इतका डीप कट मी नोटीस च केला नव्ह्ता गाणं बघताना, तेंव्हा माझे विधान मी मागे घेते.

Pages