पठाण - शाहरूख खान

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 March, 2022 - 13:59

पठाण - शाहरूख खान

हमारे देश मे हम नाम रखते है हमारे धर्म या जाती से
पर उस के पास ईन मे से कुछ नही था

यहा तक के उस के पास कोई नाम रखनेवाला भी नही था

अग कुछ था...... तो बस यही एक देश, ईंडिया !

तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..

(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )

और जिनका नाम नही होता, उनका नाम करन उनके साथी कर देते है

और ये नाम क्यू पडा कैसे पडा..
ईस के लिये थोडा सा ईंतजार किजिये

जल्द ही मिलते है.....

पठाण से !!!!

............

हो, तो येतोय.
हिंदुस्तान की आन बान शान, खानों मे खान, किंग खान शाहरूख खान, बॉलीवूडचा देव आता खुद्द पठाणच्या रुपात येतोय.
खान के घर मे देर है पर अंधेर नही.. कोरोनाच्या लाटांवर मात करून तो आपल्या मनोरंजनासाठी पुन्हा येतोय.. शाहरूख संपला अश्या अफवा उठवणार्‍यांना चोख उत्तर द्यायला येतोय Happy

पठाण
https://www.youtube.com/watch?v=Ymu9wVN7pWs
फक्त तारीख सांगितलीय, आणि त्याला १० मिलियन व्यूज पडलेत Happy
तुम्हीही बघा, अंगावर शहारा येतो Happy

पठाण चित्रपटावर आणि शाहरूखच्या मोठ्या पडद्यावरील दमदार आगमनावर चर्चा करायला हा धागा हे सुज्ञ मायबोलीकरांना वेगळे सांगायला नको Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाय द वे भुरटे सर , पठान मूव्ही वरील हरकती बद्दल मुस्लिम ऊलेमा बद्दल बोलायला शब्द शिल्लक नाही की हेतुपुरस्सर दुर्लक्षित करण्याची सवयच लागून गेली आहे ?

अक्षय कुमारने 'टिप टिप बरसा पानी' हे गाणं अभिनेत्री रविना टंडन आणि कतरिना कैफ यांच्यासोबत केले आहे. या दोन्ही गाण्यांमध्ये अभिनेत्रींनी भगव्या रंगाची साडी नेसली असून त्यात त्यांचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. यामध्ये अक्षयचे इंटिमेट सीनही आहेत. याच गाण्यातील स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर करत शाहरुखचे चाहते अक्षयला ट्रोल केलं जातंय. याशिवाय अभिनेत्री कंगना रणौत हिच्या सिनेमातील एक सीन सोशल मीडियावर शेअर केले गेल. कंगनाने यात केशरी रंगांचा ड्रेस परिधान केला असून या दृश्यात ती दारु पिताना दिसतेय.

चोखणी घ्या कागाळु सर

अक्षय कुमारने हिंदुत्ववाद्यांना आक्षेपार्ह वाटायला हव्यात अशा अनेक गोष्टी पडद्यावर आणि पडद्याबाहेरही केल्यात. धागा बनता है. वेळ काढून काढतो. कागाळू सरांच्या कोलांट्याउड्या बघायला मज्जा येईल.

पुरोगामी लोकांच्या हिंदू द्वेष मुळेच आज bjp भारतात सत्तेत आहे.
मुस्लिम स्वतः हुशारी नी वागत आहेत .
पण पुरोगामी स्वतल स्वतचं हुशार समजतात आणि आणि हिंदू धर्मा विषयी द्वेष ओकत असतात.
बहुसंख्य हिंदू असणाऱ्या ह्या देशात तेच घडते जे घडायला नको असे वाटते ..bjp जिंकून येते.
एक दिवस मुस्लिम च ह्या पुरोगामी लोकांना त्यांची जागा दाखवून देतील .
आमच्या विषयी काहीच मत व्यक्त करू नका कराल तर परिणाम भोगायला तयार रहा..अशी धमकी मुस्लिम च देतील
ती वेळ लांब नाही

दिवस मुस्लिम च ह्या पुरोगामी लोकांना त्यांची जागा दाखवून देतील .
आमच्या विषयी काहीच मत व्यक्त करू नका कराल तर परिणाम भोगायला तयार रहा..अशी धमकी मुस्लिम च देतील
ती वेळ लांब नाही >>>>>>>>>>>
+१११११११
तरी पण ते त्यांची पाठराखण करायचं सोडणार नाहीत .
एकवेळा त्यांची शेपट सरळ होतील पण स्वतःला बुध्छिवादी समजणाऱ्या लिब्र जंतूंची शेपटे सरळ होणार नाहीत...

पठाण हा एक चित्रपट आहे
त्यावर बोला लोकहो
गाणे बाकी भिनू लागलेय माझ्या डोक्यात अंगात रक्तात आतड्यात फेफड्यात आणि शरीराच्या एकेक भागात...
काल दिपिका स्वप्नातही आली...

बहुचर्चित गाणे आज पाहिले. बहुतेक गाण्यातल्या सगळया बायांना एकतर मिरगिचे झटके आले असावेत किंवा जेवणातून विषबाधा झाल्यामुळे गडबडा लोळत असाव्यात असे वाटले.
>>>>> Lol Lol

एकवेळा त्यांची शेपट सरळ होतील पण स्वतःला बुध्छिवादी समजणाऱ्या लिब्र जंतूंची शेपटे सरळ होणार नाहीत...

Submitted by फुरोगामी on 16 December

त्याचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील
आपली संख्या किती ,आपल्याकडे देशातील किती संपत्ती आहे .
आपण किती फुगत आहे ..
ह्याचा विचार खरेच ह्यांनी शांत पने करावा .
सरपंच ह्यांच्या मतावर निवडून येवू शकत नाही
ह्याची जाणीव ह्यांना नाही.
आर्थिक क्षेत्र वर वर्चस्व नाही
कशाचा जोरावर हे पुरोगामी बोलत असतात.
ते त्यांनाच माहीत

हजारो रंग आहेत,देशात काय स्थिती आहे हे माहीत आहे तरी भगव्या रंगाची च बिकनी परिधान करून बेशरम रंग

हे गाणे करणारे दीपिका आणि शरुख हे किती शहाणे असतील .
एजंट पण असतील .
असे पण पैसा मिळत असेल तर काही ही
. ही लोक करतील त्यांची स्वतःची अशी काहीच तत्व नसतात

गाणे बाकी भिनू लागलेय माझ्या डोक्यात अंगात रक्तात आतड्यात फेफड्यात आणि शरीराच्या एकेक भागात...>> Really?? सांभाळा..

काल दिपिका स्वप्नातही आली...>> एकटीच होती की रणबीर पण होता.

त्याचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील
आपली संख्या किती ,आपल्याकडे देशातील किती संपत्ती आहे .
आपण किती फुगत आहे ..
ह्याचा विचार खरेच ह्यांनी शांत पने करावा .
सरपंच ह्यांच्या मतावर निवडून येवू शकत नाही
ह्याची जाणीव ह्यांना नाही.
आर्थिक क्षेत्र वर वर्चस्व नाही
कशाचा जोरावर हे पुरोगामी बोलत असतात.
ते त्यांनाच माहीत>> किती हे विषयांतर. शारुख सरांना काय वाटेल ?

ते गाणं तीन वेळा बघितला. शिल्पा रावचा आवाज मादक वाटतो. गाणं आऊटस्टॅन्डिंग नाही. कोरिओग्राफी विशेष नाही. 'तेवढ्यापुरते गाजणारे' कॅटॅगरीत. मूव्हज् चीप आणि स्लटी आहेत. दीपिकाच्या नजरेत आव्हान आहे, केविलवाणी नाही ती. त्यामुळे पूर्ण नग्न झाली तरी, आपण काही लगेच तिची किंवा भारतीय संस्कृतीची काळजी करण्याची गरज नाही.

तिच्या तिकडच्या स्वारीने झालयं की 'नंगा ही तो आया था, क्या घंटा लेकर जायेगा' वर विस्तृत माहितीपट दाखवून!ह्यांनी आधी मॉडेलिंग करताना असे फोटोशूट केलेले असतेचं. फक्त सिनेमात नवीन आहे. भारतीय स्त्री-शरीरप्रकार बिकिनीसाठी अजिबात आदर्श नाही, त्यामुळे लास वेगसच्या शोगर्लचे हे इतकं पर्फेक्ट स्टॅन्डर्ड गाठणं फार-फार अवघड आहे. सरळ म्हटलयं की 'बेशरम रंग नहीं देखे दुनियावालोंने', मगं उधळू द्या की तिला ऑफिशयली Proud

शाखा चांगला दिसलायं पण तो आला की रसभंग होतोयं,
त्याला दुसऱ्याच गाण्यातून कॉपी पेस्ट केल्यासारखे वाटतेयं. असं बुजगावण्यासारखे केस व मान का हलवतोयं, काय माहिती. एकुणच अंगात ॲन्टोनियो बॅन्डॅरस आला आहे. पण ॲन्टोनियो तो ॲन्टोनियोच !! शेवटी तर अनकंफर्टेबल वाटतोय. त्याला हिरोइनच्या एवढ्या 'क्लोज प्रॉक्जिमिटी' मधे यायची सवय नाही.

गाणं काही विशेष नाही पण मला लिहावं वाटलं, हाकानाका. Proud

ती वंशाने पूर्ण भारतीय असलेल्यांपैकी आहे. आता फार नाहीत अशा. मिक्सड् रेस आहेत बहुतेकजणी. हे एक निरिक्षण आहे. //

हे काही कळलंच नाही. करीना कपूर आलिया कतरिना मिक्सड रेस आहेत खऱ्या. तसंच म्हणायचं आहे का

व्हाईट हॅट ,
म्हणजे भारतीय बॉडी टाईप साठी हे इतरांपेक्षा काकणभर अधिक अवघड आहे असं . हे दीपिकाने तिच्याच एका जुन्या मुलाखतीत तिने सांगितले होते. जे प्रेक्षकांच्या सहजासहजी लक्षात येत नाही. रेसिजम म्हणून नाही लिहिले आहे, आनुवंशिकता म्हणून लिहिले आहे. आपल्या समोर जे बहुतांश 'ब्यूटी स्टॅन्डर्ड' दाखवले जातात, ते आपल्या आनुवंशिकतेत बसत नाहीत. रंग, रूप, शरीराची ठेवण ई. हे ते निरिक्षण आहे.
असो. Happy
अनावश्यक वाटल्याने तेवढं काढून टाकलं.

गाणं काही विशेष नाही पण मला लिहावं वाटलं,
>>>

हिच ती शाहरूखची जादू Happy
हे असे लिहावेसे वाटणे.. कलाकृतीत विशेष काही नसतानाही....

हिच ती शाहरूखची जादू Happy
हे असे लिहावेसे वाटणे.. कलाकृतीत विशेष काही नसतानाही.... >> ए चल रे, पळ आता खेळायला

पठाणची चर्चा आणि धाग्यात हे चित्र नाही? जिथे जिथे पठाणची बातमी आहे तिथे हे चित्र आहे. अभिनेता शक्तिमान मुकेश खन्ना म्हणाले अजून काही वर्षांनी अभिनेत्यांनी कपडे न घातलेले चित्रपट येतील.
Pathan.png

मला जुने स्टँडर्ड आवडतात. पण मोठा चेहरा आता मलाही आवडेनासा झाला आहे. मधुबालाचा चेहरा पसरट आणि मोठा पण तिची आजही भुरळ आहे. हे परस्परविरोधी वाटतं. कट.
सांगायचा मुद्दा असा कि स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी काहीही करू शकतात. त्यामुळे आज कित्येक जणांचं पोट भरतंय. औषध कंपन्यांनी औषधं बनवायची सोडून फक्त ब्युटी सेक्शन चालू ठेवला तरी जगाची काही ट्रिलियन अर्थव्यवस्था चालू शकते. जर एखादीला म्हटलं कि मी तुला आयुष्यभर तरूण आणि सुंदर बनवू शकतो तर ती स्त्री नक्कीच पूर्ण इस्टेट नावावर करेल.

हे तर काहीच नाही , काही वर्षातच असे तंत्रज्ञान येईल कि कुठल्याही स्त्री ला कुणाचेही रूप धारण करता येईल. हल्ली ते मेक अप ने करता येते. मेक अपने काय नाही करता येत ? सत्यजित रे च्या कहाणीतल्या मेक अप आर्टिस्टची कथा अगदीच ढगातली नाही. प्लास्टीक सर्जरी पण नाही, तर औषधे घेऊनच रूप बदलता येईल. काँप्युटरच्या सह्य्याने चित्राचे डोळे लहान मोठे, जिवणी गोल, अणकुचीदार (फळं कापायला बरी अशी - आधुनिक गानकोकेनिळेसारखी) बनवणे शक्य होईल. लेप लावा, औषधं घ्या, सात दिवसात जिवणीचे ट्रान्सफॉर्मशन करून घ्या. नाकाचे रूप पाअटून घ्या फक्त दीड लाख रूपयात. विनाशस्त्रक्रिया, पेनलेस ट्रीटमेंट अशा जाहिराती दिसू लागतील.

पण इथेच सगळे चुकतात.
कारण खरे सौंदर्य हे मनाचे सौंदर्य होय. मन सुंदर तर सारे जग सुंदर. आपली नजर सुंदर तर सगळेच सुंदर.
ज्याचे मन आणि नजर सुंदर त्याला चिखलात लडबडणारे डुकराचे पिलू ही सोनेरी हरणासारखे दिसेल.
जर जग आतून सुंदर झाले तर काय भुललासि वर लिया रंगा ?
हे होऊ शकतं ध्यानाने.
ध्यानासाठी विचारावर नियंत्रण हवे.
ते हवे तर शांत पणा हवा.
मायबोलीवर येणे बंद व्हायला हवे.
बस एक छोटासा टॅब आणि त्यावर फक्त
प्रवचने..
आचार्य रघुनाथराव आणि हेमंतराव यांची
और जीने मे क्या चाहिए ?

या चित्रावरून / फ्रेमवरून इतका गहजब होतोय? असे कपडे कित्येकजणींनी या आधीही घालून झाले आहेत की! दीपिकाच्याच 'बेइन्तेहां' गाण्यात तिने अश्या प्रकारचे कपडे घातलेत. 'छलिया छलिया' गाण्यात करीनाने याहून कमी कपडे घातले होते. तेव्हा हा मुद्दा वाचनात आल्याचं आठवत नाही. उलट ती कशी छान बारीक झाली आहे वगैरे चर्चा होत्या. त्याचं ऋजुता दिवेकरने क्रेडिट पण घेऊन झालं. वास्तविक याहून वल्गर कपडे मंदाकिनी, शिल्पा शिरोडकर, किमी काटकर वगैरेंचे कधीच घालून झाले आहेत. सध्या ओटीटी वर जो काही कंटेंट येतो त्यातले कपडे आणि एकूण सगळ्याच गोष्टी खटकण्याच्या पलिकडच्या असतात (बरेचदा). मध्यंतरी एक 'टकाटक' नावाच्या मराठी चित्रपटातलं 'ये चंद्राला' नावाचं गाणं यूट्यूबवर पाहिलं होतं. ते पाहिलं तर दीपिकासुद्धा सभ्य वाटायला लागेल. मग याच गाण्यामुळे एवढं का पेटलंय समजेना?

त्याला दुसऱ्याच गाण्यातून कॉपी पेस्ट केल्यासारखे वाटतेयं. असं बुजगावण्यासारखे केस व मान का हलवतोयं, काय माहिती.>> अध्यक्ष महोदय, शारूकला बुजगावण्याची उपमा दिली जाते आहे. हा बुजगावण्याचा घोर अपमान आहे. याला आम्ही जाहीर णिशेध करतो.
-जागतिक बुजगावणे उत्पादक महासंघ

करीना कपूर आलिया मिक्स्ड रेस?
ऑं …करीना पंजाबी व सिंधी ना? आलिया पण काश्मिरी व गुजराती ना? मग मिक्स्ड रेस कसे?

Pages