पठाण - शाहरूख खान

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 March, 2022 - 13:59

पठाण - शाहरूख खान

हमारे देश मे हम नाम रखते है हमारे धर्म या जाती से
पर उस के पास ईन मे से कुछ नही था

यहा तक के उस के पास कोई नाम रखनेवाला भी नही था

अग कुछ था...... तो बस यही एक देश, ईंडिया !

तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..

(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )

और जिनका नाम नही होता, उनका नाम करन उनके साथी कर देते है

और ये नाम क्यू पडा कैसे पडा..
ईस के लिये थोडा सा ईंतजार किजिये

जल्द ही मिलते है.....

पठाण से !!!!

............

हो, तो येतोय.
हिंदुस्तान की आन बान शान, खानों मे खान, किंग खान शाहरूख खान, बॉलीवूडचा देव आता खुद्द पठाणच्या रुपात येतोय.
खान के घर मे देर है पर अंधेर नही.. कोरोनाच्या लाटांवर मात करून तो आपल्या मनोरंजनासाठी पुन्हा येतोय.. शाहरूख संपला अश्या अफवा उठवणार्‍यांना चोख उत्तर द्यायला येतोय Happy

पठाण
https://www.youtube.com/watch?v=Ymu9wVN7pWs
फक्त तारीख सांगितलीय, आणि त्याला १० मिलियन व्यूज पडलेत Happy
तुम्हीही बघा, अंगावर शहारा येतो Happy

पठाण चित्रपटावर आणि शाहरूखच्या मोठ्या पडद्यावरील दमदार आगमनावर चर्चा करायला हा धागा हे सुज्ञ मायबोलीकरांना वेगळे सांगायला नको Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केवल वयस्कों के लिए प्रमाणपत्र असावे. गाण्यावर क्लिक केल्यावर 18 वर्षे पेक्षा जास्त आहे म्हणून साईनिंग असावे. अंडर एजने काय पहायचे इतके तरी नियंत्रण पालकांच्या हाती असावे.

रामायण,महाभारत सारख्या मालिका असोत .किंवा आताचे सिनेमे.
अभिनेत्री चे पूर्ण (जवळ जवळ) शरीर कपड्या विना दिसावे.
हा अलिखित नियम आहे.
मग अभिनय काही करता आला नाही तरी काही हरकत नाही.
हे आपल्याकडे must आहे.
शरीर प्रदर्शन करता म्हणून तुम्हाला सिनेमे मिळतात.
हे खरे असेल तर ते कमी पणाचे आहे अपमान आहे.
शरीर रा व्यतिरिक्त तुमच्या कडे काहीच टॅलेंट नाही असा त्याचा अर्थ आहे.
अभिनेत्री ना हे कधी समजेल देव जाणो.

खऱ्या पुरूष रसिकाचे लक्ष देहदर्शिकेच्या कपड्यांकडे नी न झाकलेल्या इतर गोष्टींकडे जाते.
(तलाव, पाणी, वादक, नर्तक, गाणे, गाण्याचे बोल) इ.
खऱ्या स्त्री चे लक्ष नायिकेच्या कपड्याकडे, मेक अप कडे, दागिन्यांकडे, नृत्याकडे, हावभावाकडे, फिगरकडे, आधीच्या सिनेमापेक्षा वय / वजन कमी जास्त अशा लाखो गोष्टींकडे असते.
पुरूष फ्रेम मधे असला काय, नसला काय कुणाच्या खिजखणतीत नसतो. मग तो उघडा असो कि कपड्यात कोंबलेला. कि फर्क पैंदा?
काही विशिष्ट लोकांचे जर आवर्जून नायकाकडेच लक्ष जात असेल तर त्यांनाही सन्मानाने वागवले पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा सांगितले. न्यायालयाचा आदर केला पाहिजे.

तात्विक चर्चा तात्विक राहतात. कुणी त्या आचरणात आणत नाहीत.
तृतीयपंथियांचे हक्क त्यांच्या लैंगिक आवडी निवडी मान्य करणे म्हणजे उद्यापासून सर्वांनी वैवाहिक नाती जोडावीत असे नाही.
अ ची तुलना ब शी करून मग हे का नको असे राणा भीमदेवी प्रश्न विचारण्यात अर्थ नाही.
वीकर सेक्स म्हणून एका वर्गाला दुसऱ्यापासून संरक्षण मिळावे यासाठी कायदा आहे तशाच सामाजिक रिती भाती आहेत. मुलं मुली कायद्याने सज्ञान झाल्यावर त्यांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत. पण ती वयस्क होईपर्यंत तरी पालकांची जबाबदारी असल्याने त्यांना त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीने त्यांच्यावर बरे वाईट काय असतील ते संस्कार करू द्यावेत.
पालकांना आपल्या वयस्क नसलेल्यां पाल्याने नेटवर, पडद्यावर काय पहावे हे ठरवण्याचा हक्क आहेच. त्यावर अतिक्रमण होणार नाही हे पाहणे पण गरजेचेच आहे.

गरीब घरातील ,आदिवासी स्त्री साकारायची असेल तरी अभिनेत्री कमी कपड्यात.
कारण गरिबी मुळे ती कपडे घेवू शकत नाही
श्रीमंत घरातील स्त्री दाखवायची असेल तर अभिनेत्री कमी कपड्यात कारण आधुनिकता दाखवायची असते .
म्हणजे काही ही करून स्त्री देह प्रदर्शन झालेच पाहिजे
सलमान,शाहरुख ह्यांना पण उघडे होण्याची मोठी हौस आहे.
अभिनय करा,कथा नीट असू ध्या,दर्जा सांभाळा..
उघडे , नागडे झाले की दर्जेदार कलाकृती बनत नाही.
शरीर प्रदर्शन करण्यासाठी
ब्ल्यू फिल्म आहेत
आणि त्यांची शरीर अभिनेता अभिनेत्री पेक्षा पण जास्त आकर्षक असतात

शरीर प्रदर्शन करण्यासाठी
ब्ल्यू फिल्म आहेत
आणि त्यांची शरीर अभिनेता अभिनेत्री पेक्षा पण जास्त आकर्षक असतात >>>>>>> सहंम त.

काही विशिष्ट लोकांचे जर आवर्जून नायकाकडेच लक्ष जात असेल तर त्यांनाही सन्मानाने वागवले पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा सांगितले. न्यायालयाचा आदर केला पाहिजे. >>>>>>>>>>
Happy
सहमत .....
हल्ली त्यांना मानाने वागवले जाते ...

https://twitter.com/sushantify/status/1602686531449212929?t=-2MHGw_cFqax...
सारुक् xhe भगव्या रंगाशी असलेले वैर डॉन २ मध्ये देखील होते .
आता त्याने पठान मध्ये श्टोरीची गरज नसताना भगव्या रंगा वर बेशरम रंग हे गाणे घुसाडले आहे .
याचा अर्थ असा ही होतो की भगव्या रंगाला नावे ठेवली की भगवे वैरी सिनेमावर जास्त उड्या मारतात का ?
का इथे टाईमपास करून टेलिग्रामवर येण्याची वाट पाहात असावे .
एकंदरीत दुसरीच शक्यता जास्त वाटते.....

सिनेमा आला नाही. कागाळू सरांना स्टोरी पण कळली.
शाहरुख त्या चित्रपटाचा नायक आहे. निर्माते यशराज फिल्म्स आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद पण गाणं शाहरुखने घुसडलं. गाण्यात शब्द काय हवेत हे पण त्यानेच ठरवले.
३ मिनिटांच्या गाण्यांत सुरुवातीचे २० सेकंद दीपिकाने भगवे कपडे घातलेत ते चावले.

अक्षयकुमारचंही कॅटरीनासोबत असंच एक गाणं आहे. त्यात तिनेही भगवेच कपडे घातलेत. पण ते अगदी सोज्वळ आहे. कारण गाणं करताना ते दोघे गोमूत्राच्या वर्षावात भिजताहेत.

कागाळू सर तुमच्या मेंदूचा स्कॅन टाका ना इथे.

शाब्बास भुरटे सर !
टेलिग्रामच्या कृपेने बरेच ज्ञान आत्मसात केलेले दिसतय ...

>>>>>>Bollywood मध्ये जी अवस्था आहे तशीच क्रिकेट मध्ये पण आहे वय उलटली तरी टीम मध्ये असतातच जो पर्यंत bcci हकलात नाही.

हे (तुमचे वरील वाक्य) एजिझम आहे. चूकीचे आहे हे. मिडल एज, वार्धक्य याबाबत खूप बायस असतो लोकांना. आज सूपात असलेले उद्या जात्यात येणार आहेत ना?
अजुन एक bcci म्हणजे धर्मदाञी संस्था आहे का, ते ही कर्तबगारी पाहूनच लोकांना ठेवतात ना. मग हे 'हाकलणे' वगैरे शब्दप्रयोग कशाला?

अँग्री बर्ड मधील विलन च्या हिरव्या रंगा बद्दल हरकत घेणारे माननीय इथलेच आहेत , हे ही लक्षात ठेवा !

आशु29 ची पोस्ट परफेक्ट आहे. पटली. दीपिका आणि शाहरुख दोघेही मस्त दिसलेत गाण्यात. दीपिकाने तर ते कपडेही खूप छान कॅरी केले आहेत.

अब आय उंट पहाड के नीचे !
भुरटे सर , मग अँग्री बर्ड मधील या कॅरेक्टर च्या हिरव्या रंगाच्या समर्थनार्थ फक्त एक शब्द टाका !
म्हणजे तूम्ही खुंटलेल्या मेंदूने डबल स्टँडर्ड भेदभाव करत नसल्याचे सिद्ध होईल . Screenshot_20221215-213654_Chrome.jpg

बहुचर्चित पठाण गाणं पाहिले. कपड्यांना काही आक्षेप घेण्यासारखं वाटलं नाही, ती कम्फर्टेबल वाटते नेहमी. मला तिने ते कपडे घालून जे काही अचकट विचकट अंगविक्षेप केले आहेत ते भयाण वाटलं.

बहुचर्चित गाणे आज पाहिले. बहुतेक गाण्यातल्या सगळया बायांना एकतर मिरगिचे झटके आले असावेत किंवा जेवणातून विषबाधा झाल्यामुळे गडबडा लोळत असाव्यात असे वाटले. लग्न झालेल्या हिरविणी लोकांना चालत नाहित म्हणून थोडीशी एक्स्ट्रा मेहनत करावी लागते. त्या बिचार्‍यांना. घर चालवायची असतात, बँकेचे हप्ते असतात, तुम्हाला थट्टा करायला काय जात ?
शाहरुखचा पोरगा मोठा झालाय पण अजून चार पैसे कमवत नाही त्यामुळे बिचार्‍याला या वयात देखील काम करावे लागतेय. जरा दुसर्‍यांचे प्रॉब्लेम समजून घेत चला.

एका।विकृताने दीपिकाच्या बिकिनी photoshop करून हिरव्या रंगात रंगवून फोटो टाकला. किमान तिला साडी तरी नेसवायची मग

ते पूर्वी एम टीव्ही वर रात्री बीचवर डान्स दाखवायचे ना काय बरे त्याला म्हणायचे आठवत नाही पण रात्री चुकून टीव्ही लावला गेला आणि चॅनेल सर्फ करताना एम टीव्ही लागला तर हमखास ते बिचवाले किंवा बोटीवर एकाठिकाणी डीजे वाजतोय व अश्याच अर्धनग्न (बिकिनी घातलेल्या) बायका / पुरुष विचित्र अंगविक्षेप करत नाचताना दिसायच्या। 'बेशरम इश्क' हे त्याच क्याटेगरीतले वाटतेय .

https://hindi.news18.com/news/rajasthan/jaipur-boycott-pathan-shahrukh-k...
सारुख ने पठान मूव्ही मध्ये उभे केलेल्या कॅरेक्टर मुळे मुस्लिमांची बदनामी होतेय हे मध्य प्रदेशातील उलेमाना खूप उशिरा समजलेले दिसतय.
इतक्या दिवस राईट विंगवाल्यांना नावे ठेवणारे लिब्रुज मुस्लिमांचा देखील विरोध पाहून तोंडात चोखणी घेऊन बसतील .....

शाहरुखच्या कोलकत्याच्या भाषणावर काय शिव्या द्यायच्या हे अजून नेटभगव्या फूटसोल्जर्सना लिहून आलं नाही का?
भाषण त्यांना कळतं कठीणच.
त्यात जोडीला अमिताभ.

Pages