पठाण - शाहरूख खान

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 March, 2022 - 13:59

पठाण - शाहरूख खान

हमारे देश मे हम नाम रखते है हमारे धर्म या जाती से
पर उस के पास ईन मे से कुछ नही था

यहा तक के उस के पास कोई नाम रखनेवाला भी नही था

अग कुछ था...... तो बस यही एक देश, ईंडिया !

तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..

(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )

और जिनका नाम नही होता, उनका नाम करन उनके साथी कर देते है

और ये नाम क्यू पडा कैसे पडा..
ईस के लिये थोडा सा ईंतजार किजिये

जल्द ही मिलते है.....

पठाण से !!!!

............

हो, तो येतोय.
हिंदुस्तान की आन बान शान, खानों मे खान, किंग खान शाहरूख खान, बॉलीवूडचा देव आता खुद्द पठाणच्या रुपात येतोय.
खान के घर मे देर है पर अंधेर नही.. कोरोनाच्या लाटांवर मात करून तो आपल्या मनोरंजनासाठी पुन्हा येतोय.. शाहरूख संपला अश्या अफवा उठवणार्‍यांना चोख उत्तर द्यायला येतोय Happy

पठाण
https://www.youtube.com/watch?v=Ymu9wVN7pWs
फक्त तारीख सांगितलीय, आणि त्याला १० मिलियन व्यूज पडलेत Happy
तुम्हीही बघा, अंगावर शहारा येतो Happy

पठाण चित्रपटावर आणि शाहरूखच्या मोठ्या पडद्यावरील दमदार आगमनावर चर्चा करायला हा धागा हे सुज्ञ मायबोलीकरांना वेगळे सांगायला नको Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुर्यवंशमची सौंदर्या म्हणजेच आप्तमित्राची ( कन्नड मुव्ही) हिरोईन

आप्तमित्रा म्हणजे भुलभुलैय्या सिरीजचा सुरुवातीचा मुव्ही . तिचा हिरो विष्णुवर्धन होता. पिक्चर सुपरहिट झाला.
त्यानंतर तिने भाजप जॉईन केला आणि एका निवडणुक प्रचाराला ती विमानातून जात होती , ते विमान पडले आणि ती मेली. पनवती लागली बिचारीला.

मग त्याचा सेकंड सिकवल निघाला आप्तरक्षकम . त्यात डॉ विष्णुवर्धन हिरो होता , हिरोईन कुणीतरी दुसरी होती

हाही पार्ट गाजला , नंतर एका मॉलमध्ये पार्टी सुरू असताना अचानक विष्णुवर्धनपण मेला

हिरोईन हिरो दोघे एकेका पार्टनंतर लगेच मेले

Screenshot_20220818-210057_Chrome.jpg
गाणे कोणतेही असो पण ते एकाच पट्टीत बेसूर गाणाऱ्या या बांगलादेशी गायकाला पोलिसांनी बेसुरी गाणी न गाण्याची ताकीद दिली.
त्या प्रमाणे प्रत्येक धाग्यावर भाजप साठी छाती पिटणाऱ्या बेसूरी ब्लॅक कॅट ला कोणी समजावेल का ?
Happy

सोबत आणखी कुठल्यातरी हिरोचा फोटो फिरतोय. ज्याने पायात चप्पल घातली नाही.
आणि संस्कारातला फरक बघा असे म्हटले आहे. >>>>>>>>>>>नेहरूंनी लाल किल्ल्यावरून पहिले झेंडावंदन केले होते तेव्हा शूज घातले होते कि काढले होते

चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान NDTV ला दिलेल्या एका मुलाखतीत तो असं म्हणाला की ही एक गोष्ट आहे जी कोणत्याही भारतीयाला (त्याच्या देशभक्तीवर) प्रश्न विचारले जाऊ नये. तुम्ही तुमच्या मातृभूमीवर प्रेम करता याच स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. मला भारतीय असण्याचा अभिमान आहे, मुळात माझे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. इंग्रजांच्या विरोधात लढले म्हणून त्यांना ताम्रपत्र मिळाले होते.

याबद्दल सविस्तर बोलताना शाहरुख म्हणाला, “कदाचित मी माझ्या आयुष्यात तडजोड केली आहे आणि मी ती कधीच नाकारणार नाही पण मला माहीत आहे की मी चांगला वागलो आहे. नागरिकांनो, मी माझा कर भरतो, मी कायद्यानुसार ठीक राहण्याचा प्रयत्न करतो.

डॅान सारखा असेल हा चित्रपट
डॅानमधे सुद्धा शाहरूख मस्तच वाटलेला
फक्त हा जरा हॅालिवूड मूव्ही सारखा वाटतोय

हेच ते ट्रेलर्/टीझर. >>>> हो, तुमची पोस्ट वाचता तर लगेच जाऊन बघितले.

फास्ट अँड फ्यूरिअसची छाप आहे, पण आवडले. >>> अच्छा, मला ते फास्ट फ्युरीअस वगैरे काही माहीत नाही. पण हॉलीवूड चित्रपटांची छाप जरूर वाटली.

आता गाणी कधी रिलिज करतात ते बघायचं >>> हल्ली गाण्यांकडून मला फार अपेक्षाच नसतात. संगीताचा दर्जा ढासळलाय सगळा. नाहीतर एकेकाळी शाहरूखचा चित्रपट म्हणता गाण्यांची उत्सुकता असायची.

शाहरूखच्या वाढदिबसानिमित्त बुर्ज खलीफावर खास लायटिंग!
>>>>>
खतरनाक. काय भारी आहे ते..
हे त्या धाग्यावरही हवे

ऋन्मेऽऽष
झिरोचे मेरे नाम तू हे गाणे नितांत सुंदर आहे.

हा नवीन धाग्याचा विषय आहे सी
जगात टाईमपासचे लाखो पर्याय आहेत. सगळेच आपल्या आवडीचे नसतात. जे आवडीचे असतात त्या सर्वांनाही आपण एकाच आयुष्यात वेळ देऊ शकत नाही. मग आपण प्रायोरीटी ठरवतो. माझ्या प्रायोरीटीत हॉलीवूड सिनेमे येत नाहीत. आणि येणारही नाहीत. कारण आधीच ईतक्या गोष्टी आहेत आवडीच्या. त्याच जगायला आयुष्य कमी पडतेय असे वाटतेय Happy

बरं वाटलं ट्रेलर पण पिकचर येऊस्तोवर काही सांगती येत नाही. आपल्या स्पेशल इक्फेक्ट्सची खुप वाट लागते एन वेळेस. तसे धूम आणि वॉर बर्‍यापैकी बनवले होते. चांगला आहे रिपोर्ट आला तर जाईन थियेटर मध्ये वरना ऑनलाईन देखेंगे. शहारुखनी स्वतः सिनेमे काढूच नये. दुसर्‍यांची प्रोड्युस, डायरेक्ट केलेलेच बरे. तो डंकी पण येतोय ना राजू हिरानीचा? त्याच्याकडून अपेक्षा आहेत बर्‍याच.

पिक्चर टाइमपास आहे याचा अर्थ माझ्यासाठी, त्यात काही दम नाही, लोकांनी निट काम न करता उगाच टाइमपास करत बनवलाय असा होता. (हे एरव्ही कामा ऐवजी टाईमपास चालणे यावरून).
आता काही महिन्यांपूर्वीच इथे चित्रपट/मालिका टाईमपास आहे म्हणजे काय हे कळले. मी चित्रपट टाईमपास आहे म्हटले म्हणुन कोणी तो बघुन अरे काय फालतू होता म्हणाले.

तो डंकी पण येतोय ना राजू हिरानीचा?
>>>>>>>>>

अरे मस्त आहे हे.. बघूनच मूड बनला .. काहीच माहीत नव्हते याबद्दल.
Dunki | Title Announcement | Shah Rukh Khan
https://www.youtube.com/watch?v=aNxd01VzJsw

पण खरे आहे ना हे? काही पोपट नाही ना..

त्याच जगायला आयुष्य कमी पडतेय असे वाटतेय >> चूक.
तो डंकी पण येतोय ना राजू हिरानीचा? त्याच्याकडून अपेक्षा आहेत बर्‍याच. >> बरोबर.

सांभाळा. आज काही खर नाही. हमारे जमानेमे सिंड्रोम सुरु झाले आहे.
>>>>>>

हा हा..
गंमत म्हणजे शाहरूख त्या जमान्यातही होता. शाहरूख आजही आहे Happy

WTF!!!

हो.
कोरिओग्राफी घुण्गरूची कॉपी वाटतेय
शब्दही कुठल्या जुन्याच गाण्यावे उचललेले वाटत आहेत.
एक शाहरूख तेवढा ओरीजिनल आहे

पठाण चित्रपट आणि नायिकेच्या ड्रेसचा भगवा रंग असा काही वाद झाला आहे का? बहिष्कार टाकण्याचा मेसेज वाचला. इथे देत नाही. कन्फर्म नाही केलेले.
https://mobile.twitter.com/RajeshRB001/status/1600074229789396992
Boycott तर खरी बातमी आहे. बेशरम रंग एडिटेड वाटतंय.

बेकार गाणे. यावरूनच चित्रपट काय लेवलचा असणार याची कल्पना आली. बॉयकॉट केला नाही तरी पडेलच. उगाच बॉयकॉट केला म्हणून पडला असे लोकं म्हणतील.

Pages