पठाण - शाहरूख खान

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 March, 2022 - 13:59

पठाण - शाहरूख खान

हमारे देश मे हम नाम रखते है हमारे धर्म या जाती से
पर उस के पास ईन मे से कुछ नही था

यहा तक के उस के पास कोई नाम रखनेवाला भी नही था

अग कुछ था...... तो बस यही एक देश, ईंडिया !

तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..

(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )

और जिनका नाम नही होता, उनका नाम करन उनके साथी कर देते है

और ये नाम क्यू पडा कैसे पडा..
ईस के लिये थोडा सा ईंतजार किजिये

जल्द ही मिलते है.....

पठाण से !!!!

............

हो, तो येतोय.
हिंदुस्तान की आन बान शान, खानों मे खान, किंग खान शाहरूख खान, बॉलीवूडचा देव आता खुद्द पठाणच्या रुपात येतोय.
खान के घर मे देर है पर अंधेर नही.. कोरोनाच्या लाटांवर मात करून तो आपल्या मनोरंजनासाठी पुन्हा येतोय.. शाहरूख संपला अश्या अफवा उठवणार्‍यांना चोख उत्तर द्यायला येतोय Happy

पठाण
https://www.youtube.com/watch?v=Ymu9wVN7pWs
फक्त तारीख सांगितलीय, आणि त्याला १० मिलियन व्यूज पडलेत Happy
तुम्हीही बघा, अंगावर शहारा येतो Happy

पठाण चित्रपटावर आणि शाहरूखच्या मोठ्या पडद्यावरील दमदार आगमनावर चर्चा करायला हा धागा हे सुज्ञ मायबोलीकरांना वेगळे सांगायला नको Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यला बॉडीही वीएफएक्सने दाखवता येते>>>>

फॅन मधे विशीचा व आजचा शाहरुख आहे तो कसा? झेरो मध्ये बटु आहे पण ते काम फसले.

दर्दे डिस्को मध्ये त्याने सिक्ष पॅक बनवले होते आणि त्या सिन पुरतेही ते दाखवायला त्याला किती कष्ट पडले होते ते त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. सिक्स पॅक बनव़णे एकवेळ जमेल पण ते टिकवणे कठिण असे सलमान शाहरुखच्या पॅक्सला उद्देशुन म्हणाला होता.

अच्छा चला दर्दे डिस्कोवाले खरे आहेत हे ऐकून बरे वाटले Happy

सलमानवर बिचाऱ्यावर बॉडी टिकवायचे प्रेशर आहे असे वाटते त्याचे स्टेटमेण्ट ऐकून..

एफडी मोडतो आणि पहिल्याच शो ची सर्व तिकीटे खरेदी करतो.
या बॉयकॉट गॅंगला धडा शिकावयाची वेळ आता आली आहे.
शाहरूखचे पिक्चर बघून जी पिढी लहानाची मोठी झाली.
ज्याने त्यांना प्रेम करायला शिकवले.
ते मनात आज ईतका द्वेष घेऊन फिरत आहेत...

IMG_20220817_221137.jpg

बॉयकॉटची गरज आहे का ?
फ्लॉप दिसतोय पोस्टर वरून, पब्लिकला तेच ते ओव्हर एक्स्प्झ्ड फेसेस , टिपिकल अ‍ॅक्टिंग बघायला थिएटरला जावेसे वाटत नाही !

बास झाले या आता खानावळ चे मूव्ही !
सलमान , शाहरुख , अमीर शिवाय बॉलीवुड तग धरू शकत नाही का ?
बॉलीवुड म्हणजेच खानावळ हे समीकरण तुटले नाही तर बॉलीवुड संपून जाईल .
यांच्या इच्छे शिवाय बॉलीवुड मध्ये एखादा नवीन कलाकाराल बॉलीवुड मध्ये थांबुच शकत नाही ,याची भरपूर उदाहरणे झाली आहेत.

यांच्या इच्छे शिवाय बॉलीवुड मध्ये एखादा नवीन कलाकाराल बॉलीवुड मध्ये थांबुच शकत नाही ,याची भरपूर उदाहरणे झाली आहेत.>>> काहिंचा तर बळी ही गेलाय Sad

बॉयकॉट ची गरज नाही. उगाच फ्लॉप झाला तर बॉयकॉट केला म्हणून फ्लॉप झाला असे हे लोकं मिरवत सांगतील व परत तसेच चित्रपट बनवतील.

चित्रपट चांगला असेल तर हिट होऊ द्या.

शाहरूखखान स्वतः आऊट सायडर आहे यांच्यात
तो बॉलीवूडच्या प्रस्थापित फॅमिलीतील नव्हता
तो आला
आणि स्वकर्तुत्वावर सुपर्रस्टार किंग खान बनला

आमिर खान सलमान खान ही आउट सायडर होते

सलिम खान फक्त लेखक होता , फार मोठा इन्फ्लुइन्सबल व्यक्ती नव्हता

मेरेबाप का चाय का ठेला था
मैं भी किटली लेकर चाय बेचता था

हे नेपुटीझम नाही का ?

अरे मग तू दगड फोडायला जायचे की , आयतं बापाचे दुकान घेऊन बसला

सुशान्त सिंगच्या केदारनाथवर लव्ह जिहाद प्रमोट करतो म्हणून राइट विंगर्सनी बहिष्कार घातला. त्यामुळे तो निराश होऊन ड्रग्जच्या आहारी गेला आणि त्यातच त्याचा बळी गेला.

बॉयकॉट ची गरज नाही. उगाच फ्लॉप झाला तर बॉयकॉट केला म्हणून फ्लॉप झाला असे हे लोकं मिरवत सांगतील व परत तसेच चित्रपट बनवतील.

चित्रपट चांगला असेल तर हिट होऊ द्या. >>>>>>>>>>>
+११११११
अगदी खरं !
बास झाले आता .
खान मंडळी ची सत्ता संपवा , प्रत्येक ठिकाणी बदल हवाच असतो मग बॉलीवुड मध्ये का नको ?
येवू द्या बाकीचे न्यू कमर्स !
सचिन , गांगुली , धोनी ,अमिताभ , राजेश खन्ना हे सगळे एकेकाळी बादशाह होते .
ते गेल्या नंतर दुसरे बादशाह आलेच ना?
ऋन्मेश ला आवडतो म्हणून शाहरुख चे म्हातारपण अजून किती दिवस सहन करायचे ? Happy

आम्ही शाळेत झेंडावंदन केले तेंव्हा शूज घातले होते.. हा नवीन रुल कधी आला?
थोड्या दिवसांनी सोवळं नेसुनच झेंडावंदन करायचे असे आदेश नागपूर वरून येतील. मग झेंड्याची आरती.

शाहरुख चे म्हातारपण अजून किती दिवस सहन करायचे ?>> +१११
पन्नाशीपार शारुक, सलमान, अमीर,अक्षय ही मंडळी निम्म्या वयाच्या नायिकांबरोबर नाचगाणे करताना बघवत नाही.
त्यातल्या त्यात अजय देवगण त्याला शोभतील अशा मध्यमवयीन भुमिका करायला लागला आहे.

खान मंडळींची सद्दी कधीतरी संपणारच. आमीर खान सोडून. तोही संपेलच, थोडा उशीरा. निसर्गनियमानुसार ते जातील. दुसरे कोणी येतील. तितकेच ताकदीचे असतील तर टिकतील. लताबाई होत्या चाळीस पन्नास वर्षे. आता दुसरे कोणी आहेतच ना. इंडस्ट्री आणि जग थांबत नसते.

पन्नाशीपार शारुक, सलमान, अमीर,अक्षय ही मंडळी निम्म्या वयाच्या नायिकांबरोबर नाचगाणे करताना बघवत नाही.
>>>>>

ह्ममम्म मलाही बघवत नाही
पण नशीब असते एकेकाचे. असे म्हणून मनाची समजूत काढतो Happy

आणि हेच लॉजिक बच्चंन , देव , राजेश , बालगंधर्व ह्यांना नव्हते अप्लिकेबल

बालगंधर्वपण मुसलमान झाले होते का ?

आम्ही शाळेत झेंडावंदन केले तेंव्हा शूज घातले होते.. हा नवीन रुल कधी आला?
>>>>

पाहिला तो फोटो.
सोबत आणखी कुठल्यातरी हिरोचा फोटो फिरतोय. ज्याने पायात चप्पल घातली नाही.
आणि संस्कारातला फरक बघा असे म्हटले आहे.

बाई दवे,
हो. शाळेत शूज घालूनच करतात मुले झेंडावंदन. त्यात पावसाळा आणि चिखल असतो. शक्यही होत नाही बरेचदा शूज काढणे. आर्मीवाले कुठे शूज काढत असतील असे वाटतही नाही. तरी नेमके प्रोटोकॉल काही आहेत का?

आणि हेच लॉजिक बच्चंन , देव , राजेश , बालगंधर्व ह्यांना नव्हते अप्लिकेबल
>>>

अमिताभने कुठल्या निम्या वयाच्या अभिनेत्रीसमोर काम केले? रोमांटीक भुमिका वगैरे?

अमिताभने कुठल्या निम्या वयाच्या अभिनेत्रीसमोर काम केले? रोमांटीक भुमिका वगैरे?

सगळ्यांनी केले आहेत

माधुरीचेही रेकॉर्ड आहे , ऋषी आणि रणबीर कपूर दोन्ही बाप्लेकांची हिरोईन झाल्याचे

सूर्यवंशम
(बच्चन )हिरा ठाकूर ४८ वर्षे,
(सौन्दर्या) राधा ठाकूर २३ वर्षे.
.
हिराची आई जयसुधा प्रत्यक्षात हिरापेक्षा १६ वर्षाने लहान. अर्थात त्यांचे पतिदेव भानुप्रताप ठाकूर बच्चन्च आहेत.

म्हणूनच पब्लिक ने सूर्यवंशम आणि अमिताभ ला डोक्यावर नाही घेतले .
त्याचे तर सलग चार पाच पिक्चर अपटल्या नंतर मग त्याने चरित्र भूमिका कडे गाडी वळवली .
पब्लिक ला सगळ बरोबर समजते , लालसिंग ची गाडी पब्लिक ने गॅरेज मध्ये पाठवली कदाचित आता पठाण ची बारी असेल.

Pages