पठाण - शाहरूख खान

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 March, 2022 - 13:59

पठाण - शाहरूख खान

हमारे देश मे हम नाम रखते है हमारे धर्म या जाती से
पर उस के पास ईन मे से कुछ नही था

यहा तक के उस के पास कोई नाम रखनेवाला भी नही था

अग कुछ था...... तो बस यही एक देश, ईंडिया !

तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..

(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )

और जिनका नाम नही होता, उनका नाम करन उनके साथी कर देते है

और ये नाम क्यू पडा कैसे पडा..
ईस के लिये थोडा सा ईंतजार किजिये

जल्द ही मिलते है.....

पठाण से !!!!

............

हो, तो येतोय.
हिंदुस्तान की आन बान शान, खानों मे खान, किंग खान शाहरूख खान, बॉलीवूडचा देव आता खुद्द पठाणच्या रुपात येतोय.
खान के घर मे देर है पर अंधेर नही.. कोरोनाच्या लाटांवर मात करून तो आपल्या मनोरंजनासाठी पुन्हा येतोय.. शाहरूख संपला अश्या अफवा उठवणार्‍यांना चोख उत्तर द्यायला येतोय Happy

पठाण
https://www.youtube.com/watch?v=Ymu9wVN7pWs
फक्त तारीख सांगितलीय, आणि त्याला १० मिलियन व्यूज पडलेत Happy
तुम्हीही बघा, अंगावर शहारा येतो Happy

पठाण चित्रपटावर आणि शाहरूखच्या मोठ्या पडद्यावरील दमदार आगमनावर चर्चा करायला हा धागा हे सुज्ञ मायबोलीकरांना वेगळे सांगायला नको Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाण्यावरून चित्रपटाची कल्पना?
हल्ली गाणी काहीही बनवून टाकतात. प्रमोशनचा भाग म्हणून. आय्टम सोंग आहे ते. त्यावरून कथानकाचा वा चित्रपटाचा शून्य अंदाज बांधा

बाकी ती बॉयकॉट बॉलीवूडच्या नादी न लागलेलेच बरे.. ब्रेनवॉश झालेले दहशतवादी युवा आणि या ट्रेंडमध्ये बहकलेली जनता यात तत्वत: फरक नाही

सामो तो आधीही कित्येक आयटम साँगमधून चमकला आहे.
लक्सच्या जाहीरातीत हिरोईनींना लाजवणारा परफॉर्मन्स दिला आहे.

लक्सच्या जाहीरातीत हिरोईनींना लाजवणारा परफॉर्मन्स दिला आहे.>> हो ना, त्या विमल पानमसाला च्या जाहिरातीत पण जबरा अभिनय केलाय पठ्ठ्याने.

>>>>>>सामो तो आधीही कित्येक आयटम साँगमधून चमकला आहे.
लैला मै लैला मध्ये त्या सनी लिऑने पेक्षा शाहरुखच सेक्सी दिसतो. मे बी मी स्त्री असल्याने असेल Happy

सामो हो Happy
ज्या मुलीने मला हे वरचे गाणे आल्या आल्या व्हॉटसपवर शेअर केले तिनेही हेच म्हटलेले. शाहरूख दिपिकापेक्षा हॉट दिसतो Happy
खरे तर मला शाहरूखचे या गाण्यातले रुप तितके जवळचे वाटत नाही. तरीही तो या बाबतीत सभ्य असूनही त्याचे सभ्यतेचा आव न आणता विविध प्रयोग करणे आवडते Happy

पठाण चित्रपट आणि नायिकेच्या ड्रेसचा भगवा रंग असा काही वाद झाला आहे का? बहिष्कार टाकण्याचा मेसेज वाचला. इथे देत नाही. कन्फर्म नाही केलेले. >>>>>>>>>>>>>
नायिकेचा ड्रेस नुसता भगवा नाही तर अर्धनग्न कडे झुकणारा आहे .
त्या पेक्षा शाखा ने नायिकेला बुरख्यात नाचवली असती तर पठान नावाला सात्विकता आली असती .
तरी पण त्या भगव्या ड्रेस साठी पठान विरोधात ट्रेंड चालवणे चुकीचे वाटते .

हे बॉयकॉट ट्रेण्डवाली जनता उगाच काहीतरी शोधून काढतेय.
खऱ्या चित्रपटप्रेमींची शाहरूखवरून नजर हटत नाही. ते दिपिकाचे कपडे कश्याला बघताहेत.
कालपासून आठवेळा गाणे पाहिलेय. तरी दिपिकाने काय घातलेय हे चेक करण्यासाठी आता पुन्हा बघावे लागेल असे वाटतेय.

खऱ्या चित्रपटप्रेमींची शाहरूखवरून नजर हटत नाही. ते दिपिकाचे कपडे कश्याला बघताहेत. कालपासून आठवेळा गाणे पाहिलेय. तरी दिपिकाने काय घातलेय हे चेक करण्यासाठी आता पुन्हा बघावे लागेल असे वाटतेय.

IndiaTv058fde_cryingin-happiness-celebs.jpg
रडवलंस रे भावा !

गाणे स्लो पॉईजन आहे
हळूहळू भिनतेय डोक्यात..

दिपिकासाठी मुद्दाम पाहिले. तिने सात आठ कपडे बदललेत गाण्यात ज्यात अठरावीस रंग असतील. त्यापैकी तिच्या सोनेरी रंगाचा पोहायचा पोशाख चित्रपटप्रेमींना आकर्षित करत आहे. त्याचीच जास्त चर्चा आहे.

खऱ्या चित्रपटप्रेमींची शाहरूखवरून नजर हटत नाही. ते दिपिकाचे कपडे कश्याला बघताहेत.
सात आठ कपडे बदललेत गाण्यात ज्यात अठरावीस रंग असतील. त्यापैकी तिच्या सोनेरी रंगाचा पोहायचा पोशाख चित्रपटप्रेमींना आकर्षित करत आहे. त्याचीच जास्त चर्चा आहे.

दुसरे खोटे आहेत का ?

जे खरे नाही ते थेट खोटेच बोलायची घाई का? सामान्य चित्रपटप्रेमी वा नुसतेच चित्रपटप्रेमी नसू शकतात का?
जग फक्त खरे खोट्यात नसते. तर या दोन टोकांमध्ये पसरले असते.

जे खरे चित्रपटप्रेमी असतात ते कलेला दाद देतात. जे खोटे असतात ते अजेंड्याला बळी पडून वाद उकरत बसतात Happy

खरे चित्रपटप्रेमी = दीपिकाचे कपडे न बघणारे
?? चित्रपटप्रेमी = दीपिकाचा सोएनेरी ड्रेस पाहून आकर्षित होणारे, चर्चा करणारे.
कोडंच आहे हे.

खरे चित्रपटप्रेमी = दीपिकाचे कपडे न बघणारे
?? चित्रपटप्रेमी = दीपिकाचा सोएनेरी ड्रेस पाहून आकर्षित होणारे, चर्चा करणारे.
कोडंच आहे हे.

हे बॉयकॉट ट्रेण्डवाली जनता उगाच काहीतरी शोधून काढतेय.
खऱ्या चित्रपटप्रेमींची शाहरूखवरून नजर हटत नाही. >>>>>>>>>>>
मान्य आहे शाखा तुमचा आवडता अभिनेता आहे , पण वरील ओळीचा भलताच अर्थ निघतो हो Happy
आम्ही फक्त ॲक्टिंग बघत असतो , आता हे शाखा प्रेमी काय बघत असतात कोणास ठाऊक ?

इथे इतकी चर्चा म्हणून गाणे पाहिले.
शाहरुख ने बॉडी चांगली बनवलीय.
पण मला तर दीपिकाच सुपर हॉट वाटली.
तिच्या केसांचं कायतरी वेगळंच भजे झालंय.
किती डाएट केलं असेल हिने असाही प्रश्न पडला.
मग मी गुलाब जामुन खाउन मनातला प्रश्न विरघळवला.

सरांचे शरूख प्रेम हे फेटिश प्रकारातले आहे हे मी मागेच म्हणलं होत, तयाची पुन्हा एकदा प्रचिती आली

सर, सिरियसली काहीतरी उपचार करून घ्या, हवे असल्यास काही नंबर देतो संपर्कातून तुमच्यासाठी मिळवून

इथे इतकी चर्चा म्हणून गाणे पाहिले.
शाहरुख ने बॉडी चांगली बनवलीय. >>>>>>>>
नीट बघा vfx ने सलमानची बॉडी जशी दाखवली जाते तशी दाखवलीय असे पुरावे यूट्यूबवर फिरत आहेत । हा.. हा..... हा.... ...हा..... हा.....

एफ आर पी ची असली तरी खरी दिसत असेल तर खोटी कशाला म्हणायचे? आधीच खरे चिप्रे आणि नुसतेच चिप्रे हा गोंधळ झाला आहे. खरे चिप्रे खोट्या बॉडीला खरे म्हणतात कि खोटे चिप्रे खऱ्या बॉडीला खोटे म्हणतात आणि याचा व्यत्यास हा नवा गोंधळ नको.

शाहरूख हा कधीच त्याच्या बॉडी आणि डोल्लेशोलेसाठी प्रसिद्ध नव्हता. त्यामुळे ती बॉडी खरी असो वा खोटी. शाहरूख आवडणाऱ्या चित्रपटप्रेमींना त्याने फरक पडू नये !!
ईतरांनी त्यावर चर्चा करायला हरकत नाही.. Happy

दिसतो बाकी हॉट यावर दुमत नसावे !

दीपिका सुपर हॉट वाटली मला हे वर सुस्पष्ट लिहिलंय.
त्यामुळे दुमत आहे.
खरी खोटी मध्ये इंटरेस्ट नाही.
अशी तब्येत बनवायला खूप मेहनत आहे.
त्यामुळे खरी असेल तर त्या मेहनत साठी extra टाळ्या. असे माझे मत.
उदा
गजनी च्या वेळी आमिर खान
दंगलच्या वेळी आमिर खान
सरबजीत च्या वेळी तब्येत कमी करणारा रणदीप हुडा

म्हातारा झाला आता शाहरुख त्याने मक्के ल जावं आणि शेवटाच प्रवास आनंदात जावा ह्या साठी देवाची प्रार्थना करावी...
त्याचे कसले धागे काढत आहात

दीपिका कमरेला रंगिबेरंगी रुमाल बांधुन जे काही झटके देते ते फिड मध्ये आल्याने पाहिले गेले. दीपिकेसारख्या एस्टब्लिश स्टारला असे जवळजवळ अर्धनग्न नाचताना पाहुन वाईट वाटले, कोणी नवी नटी त्या जागी असती तर तिची मजबुरी म्हणुन दुर्लक्ष केले असते, दीपिकेला काय मजबुरी असावी??? असो.

वरचे शरीर शक्य तितके अनावृत्त ठेवलेले पाहायची सवय होतीच पण हॉलिवुडच्या रेड कार्पेटवर आता खालचे शरीरही शक्य तितके अनावृत दाखवायची फॅशन पाहुन ही बॉलिवुडमध्येही अवतरणार हे माहीत होते, ते पडद्यावर पाहुन झाले.

शाहरुखकडे लक्ष जावे असे फारसे काही दिसले नाही, गाणे दीपिकेचे आहे, तीच ठळकपणे दिसते. शिल्पा रावने गाणे सुंदर गायलेय, ऐकायला छान आहे पण पडद्यावर दीपिकेच्या तोंडी
मिसमॅच वाटते.

Pages