नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.
या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :
१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.
म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.
माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.
…
१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य
आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :
अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)
ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...
आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !
२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).
आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :
“यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...
३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8
इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?
४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :
“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
५. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:
तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.
पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.
मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...
......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************
हातीं लागली चेड आणि धर
हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ
= हातांत मुलगी आल्याबरोबर मग न थांबता तेथल्या तेथेंच लग्न ऊरकून घ्यावयाचें.
चेड = मुलगी; तरुण स्त्री
https://bruhadkosh.org/words?shodh=+%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A1+
https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A...
चेड कोकणी भाषेत वापरतात. सांग
चेड कोकणी भाषेत वापरतात. सांग गो चेडवा दिसतां कसो खंडाल्याचो घाट.
मेध - आहुती बळी. अश्वमेध
मेध - आहुती बळी. अश्वमेध यज्ञात शेवटी घोड्याचा बळी देत.
या अधिनियमाच्या बाबत शालेय
या अधिनियमाच्या बाबत शालेय वर्गमित्राने पाठवलेली कविता- (परवानगीने)
(१)//
----------अधिनियम--------------
( शेण्डीदाण्डीगाठपाक्ळीचेप्रक्रण )
मायमराठीमध्ये माझ्या
नवनियमांची लागे रांग
नवीन नवथर देवनागरी
जुन्या अक्षरां देई टांग
'श 'ची गाठ गळून पडली,
बदल्यात तयाला शेंडी मिळे
लाॅटरीत 'ल' ला मिळे पाकळी,
हाय ! तयाचा दण्ड गळे
वाह ! 'श'ला शेंडी मिळता
मान वाढला शहामृगाचा
'ल'ला लोभस पाकळी मिळे,
चविष्ट होई ठेचा लसणाचा
नवीन नियम विद्वान बनवीती
मी तर आहे ठार अडाणी
बिचकत लिहितो आणि बोलतो
माझी ओबडधोबड वाणी
दुसरे काही विद्वान सांगती
खटाटोप हा आहे व्यर्थ
गाठ सुटो वा शेंडी तुटो,
बदलत नाही उच्चार नी अर्थ
उच्च स्तरावर चर्चा चाले
प्रत्यक्षात काय ?
किती जणांना आपली वाटे
आज मराठी माय ?
किती जणांना आपली वाटे
आज मराठी माय ?
//
*************************
(मी वाचलेले पुस्तक धाग्यात चुकून टाकली होती ,इथे आणली.)
छान आहे.
छान आहे.
करंगळीच्या शेजारच्या बोटाला
करंगळीच्या शेजारच्या बोटाला अनामिका का म्हण तात?
खरं कारण माहीत नाही, पण एक
खरं कारण माहीत नाही, पण एक मजेशीर सुभाषित आहे - पुरा कवीनाम् गणनाप्रसंगे ... पूर्वी कवींची गणना करताना सुरुवात करंगळीवर कालिदासापासून केली, परंतु पुढच्या बोटावर गणना करताना त्यास तुल्य अश्या कवीच्या अभावामुळे अनामिका हे नाव सार्थ झालं. (म्हणजे अनामिका नाव आधीच होतं, फक्त त्याचा अर्थ सिद्ध झाला).
ह पा +१
ह पा +१
हेच लिहीत होतो.
इथे एक संदर्भ सापडला
अनामिकानाम सार्थवती बभूव।।
https://gurukul99.com/kalidas-ki-jivani-biography-in-hindi/
...
पण मग तर्जनी नाव कसे आले ?
https://mobile.twitter.com
https://mobile.twitter.com/avtansa/status/1462707704804302849
माहिती साठी धन्यवाद सर्वांना.
माहिती साठी धन्यवाद सर्वांना.
रोचक सुभाषित.
रोचक सुभाषित.
कालीदासाची महती सांगणारा हा
कालीदासाची महती सांगणारा हा श्लोक प्रसिद्ध आहे. यासम हा असे म्हणायचे असेल तेव्हा भारदस्त साहित्यात हा श्लोक येतोच येतो.
मेध म्हणजे यज्ञ, sacrifice. वेद काळी आणि नंतरही दीर्घकाळपर्यंत यज्ञाची आणि बळीची प्रथा अस्तित्वात होती. कुठल्याही मंगल कार्याच्या प्रारंभी यज्ञ करीत असत. ( नंतर नंतर त्याची सक्ती होऊ लागली.) यज्ञ पशू आधी आणून ठेवलेला असे. त्यासाठी एक बळकट मेख मारून ठेवलेली असे. मेख हा शब्ददेखील मेध आणि बली प्रथेतूनच आला आहे. मेधात वापरायची काठी म्हणून मेधकाठी आणि पुढे नुसतीच मेध किंवा मेख किंवा मेढ असे बदल झाले.
मेध किंवा मेख किंवा मेढ असे
मेध किंवा मेख किंवा मेढ असे बदल झाले.
>>> छान. रंजक आहे.
छान माहिती हीरा.
छान माहिती हीरा.
बंगलोरमध्ये 'ओळख मायबोली'ची
बंगलोरमध्ये 'ओळख मायबोली'ची ऑनलाईन मराठी शाळा; जगभरातून विद्यार्थ्यांचा सहभाग, उपक्रमाचं होतंय कौतुक
https://marathi-abplive-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.abplive.com/n...
कालच्या इथल्या अनामिका
कालच्या इथल्या अनामिका-कालिदास चर्चेनंतर थोडेसे वाचन केले. त्यात कालिदास हा पहिला ‘विदग्ध महाकाव्य रचणारा भारतीय कवी’ अशी माहिती मिळाली.
‘विदग्ध या शब्दाबद्दल कुतुहल वाटल्याने कोशात पाहिला. त्याचे भिन्न अर्थ स्तिमित करणारे आहेत :
करपलेलें; जळलेलें. अर्धकच्चें;
कुशल; चतुर; हुशार; निष्णात.
>>>
विदग्ध वाड्मय =
अभिजात वाड्मय; ललित व उच्च दर्जाचें वाड्मय
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%97%...
सा रम्या नगरी महान् स नृपति:
सा रम्या नगरी महान् स नृपति: .....
पार्श्वे तस्य च सा विदग्ध परिषत् .......
उदविक्त: स च ....
सर्वं यस्य वशात् ......... कालाय तस्मै नम:
विदग्ध हा शब्द असलेला एक प्रसिद्ध श्लोक आठवला.
>>‘विदग्ध>>
>>‘विदग्ध>>
शब्द व श्लोक छान.
लोकनाथ शब्दाची एक गंमत आहे.
लोकनाथ शब्दाची एक गंमत आहे. त्याचे अर्थ दोन प्रकारे घेता येतात:
१. लोकांचा नाथ ( षष्ठी तत्पुरुष समास)
२. लोक आहेत नाथ ज्याचे (बहुव्रीही समास)
विरुद्ध अर्थ झाले की. खरंच
विरुद्ध अर्थ झाले की. खरंच गमंत आहे.
त्यासंदर्भात एक प्रसिद्ध
त्यासंदर्भात एक प्रसिद्ध सुभाषित आहे.
एक कवी स्वतःला लोकनाथ म्हणवून घेतो म्हणून प्रजाजन खवळतात आणि त्याला राजाकडे नेतात. मग राजा याचे स्पष्टीकरण विचारतो. त्यावर कवी म्हणतो,
" महाराज, तुम्ही पहिल्या अर्थाने लोकनाथ आहात तर मी दुसऱ्या अर्थाने !"
यावर राजा संतुष्ट होतो.
संस्कृत मध्ये असे काही श्लोक
संस्कृत मध्ये असे काही श्लोक आहेत की वर वर पाहाता त्यांचा एक अर्थ होतो पण कवीला वेगळेच काहीतरी सांगायचे असते. काही श्लोकांमागे एखादी छोटी गोष्ट असते.
यस्य षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय च,
अहं कथं द्वितीया स्याद, द्वितीया स्यां अहं कथम्
गोष्ट नंतर लिहीन
जासुद व जपा
जासुद व जपा
हे शब्द उच्चारल्यावर अनुक्रमे निरोप्या आणि जपण्याचे आज्ञार्थी रूप असे अर्थ मनात येतील.
परंतु वरील दोन्ही शब्दांचा एक समान अर्थ आहे:
…
…
…
…
.. ओळखताय?
…
..
….
तो म्हणजे, जास्वंद !
विदग्ध ….
विदग्ध ….
कृष्णाष्टकात वापरलाय:-
… विदग्धगोपिकामनोमनोज्ञतल्पशायिनं…
सुंदर!
सुंदर!
जपा वरून आठवण झाली. कित्येक
जपा वरून आठवण झाली. कित्येक वर्षांपूर्वी जवाकुसुम नावाचे तेल खूप प्रसिद्ध असायचे. जुन्या काळाप्रमाणे उपडी सैलसर मांडी घालून एक महिला बसलेली आणि तिचे पुढे घेतलेले लांबसडक केस मांडीवर विखरून खाली जमिनीवर पसरलेली.
ते अर्थात जपाकुसुम अर्थात जास्वंदीच्या फुलांपासून बनवलेले तेल असायचे. भेंडी, भिजवलेली मेथी, जास्वंदीच्या कळ्या आणि फुले अशा काही बुळबुळीत पदार्थांत वायट्यामिन E जास्त प्रमाणात असते आणि ते केस आणि त्वचेला तजेलदार बनवते.
मला जास्वंद हा शब्द फार आवडतो
मला जास्वंद हा शब्द फार आवडतो. किती छान शब्द आहे!
**जवाकुसुम नावाचे तेल खूप
**जपाकुसुम नावाचे तेल खूप प्रसिद्ध>>>
अगदी ! आठवले ते
जपा चे जवा कस झाले?
जपा चे जवा कस झाले?
जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम। तमोsरिं सर्वपापघ्नं प्रणतोsस्मि दिवाकरम।
ते जपाच आहे
ते जपाच आहे
https://pages.razorpay.com/jpakusum
Pages